स्वरदा, मधूकरनगर गावचे दाम्पत्य सौ प्रेरणा आणि श्री स्वरूपकुमार बाळकृष्ण पुरव
यांची कन्या. न कळत्या वयात स्वरदाने कराटेचा श्री गणेशा केला. ज्या वयात हातपाय
झाडून, मस्ती करून आपले हट्ट पुरवायचे असतात त्या वयात तिने कराटे क्लास ला
जाऊन कराटे चे धडे गिरवले. होय, स्वरदाने वयाच्या अडीचाव्या वर्षांपासून कराटेचे
धडे गिरविले आहेत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, तसे तिच्या आई
वडिलांना तिने, झोळीत असताना झाडलेल्या पाऊलांमध्ये कराटेच्या किक दिसल्या
असाव्यात. मजेचा भाग सोडला तर, त्यांनी घेतलेला त्या वेळचा निर्णय किती अचूक
होता, हे स्वरदा ने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी पहिला ब्लॅक बेल्ट मिळवून सिद्ध केले
आहे. तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा
उमटऊन आतापर्यंत वैयक्तिक आणि सांघिक अशी ३१ सुवर्ण, १२ रौप्य आणि १६ कांस्य
अशा ५९ पदकाची कमाई करून पदकांची सुवर्णभरारी मारली आहे. एप्रिल २०१६ मध्ये
पोलंड येथे भरलेल्या ७ व्या जागतिक शोतोकान चॅम्पियनशिप स्पर्धेत तिला कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली. या
जागतिक स्पर्धेत तिचे कांस्यपदक अवघ्या काही गुणांमुळे हुकले असले तरी, तेथे दुसरी डॅन ब्लॅक बेल्ट परीक्षा पास
होऊन तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवून घेतला.
स्वरदाच्या आजवरच्या कारकीर्दीवर नजर टाकल्यास, कराटे मधील काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात ती वर्चस्व
गाजवताना दिसत आहे. २०१६ या वर्षीच्या १४ वर्षांखालील मुलींच्या निरनिराळ्या कराटे स्पर्धांत तिच्या
कारकीर्दीवर नजर टाकली तर हे लगेचच लक्षात येते. मे २०१६ मध्ये पुणे येथे पार पडलेल्या, 'कराटे महाराष्ट्र'
आयोजित महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप स्पर्धेत, काता मध्ये सुवर्ण तर कुमिते मध्ये कांस्य पदक, याच महिन्यात
दिल्ली येथे, 'कराटे असोसिएशन ऑफ इंडिया' आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक, ऑगस्ट २०१६ मध्ये वसई येथे
सुवर्णमहोत्सवी वार्षिक समारंभात कुमिते प्रकारात सुवर्ण पदक, सप्टेंबर २०१६ मध्ये विरार येथे झालेल्या
जिल्हास्तरीय DSO स्पर्धेत कुमिते प्रकारात प्रथम क्रमांक, नोव्हेंबर २०१६ ला झालेल्या धारावी मुंबई येथे झालेल्या
DSO झोनल चॅम्पियनशिप स्पर्धेत कुमिते प्रकारात प्रथम क्रमांक, आणि विरार कला क्रीडा स्पर्धेत कुमिते प्रकारात
रौप्य पदक, डिसेंबर २०१६ ला नांदेड येथे झालेल्या DSO राज्यस्तरीय स्पर्धेत कुमिते मध्ये कांस्य पदक आणि वसई
कला क्रीडा स्पर्धेत काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक काता मध्ये रौप्य पदक, अशी
पदकांची कमाई केली आहे.
२०१७ या वर्षातही तिने यशाची कमान चढती ठेऊन काराटेच्या विविध स्पर्धांत आणि प्रकारात पदकांची लयलूट
केली आहे.
जानेवारी २०१७ मध्ये JKA INDIA आयोजित राष्ट्रीय चॅम्पियनशिप
स्पर्धेत टीम काता मध्ये सुवर्ण आणि वैयक्तिक काता आणि कुमिते मध्ये दोन
रौप्य पदक मिळवली. तर जानेवारी २६ ते २८ दरम्यान झालेल्या, कराटे
महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्य अजिंक्यपद स्पर्धेत काता
प्रकारात सुवर्ण आणि कुमिते प्रकारात कांस्यपदक पटकावले. सप्टेंबर
२०१७, विरार DSO स्पर्धेत प्रथम क्रमांक, ऑक्टोबर २०१७, धारावी
DSO विभागीय स्पर्धेत कांस्यपदक, नोव्हेंबर २०१७, विरार कला क्रीडा
स्पर्धेत कुमिते प्रकारात प्रथम क्रमांक, डिसेंम्बर २०१७ मध्ये आयोजित
वसई कला क्रीडा स्पर्धेत वैयक्तीक काता आणि सांघिक काता प्रकारात
सुवर्ण आणि कुमिते प्रकारात कांस्यपदक मिळविले आहे. डिसेंम्बर १ ते ३ ,
२०१७ रोजी कराटे महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्य
अजिंक्यपद स्पर्धेत, काता प्रकारात सुवर्ण पदक मिळवून, जानेवारी ३१ ते
फेब्रुवारी २,२०१८ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे १५
वर्षाखालील (कॅडेट) मुलींमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे.
गुरु विणे फळ नाही म्हणतात, स्वरदाचे प्रथम गुरू सेन्सेई जयंत सातघरे ह्यांनी तिच्या कराटेतील यशाचा पाया
रचला. नंतरच्या यशात तिचे प्रशिक्षक शिहान रतन घारु आणि शिहान शर्मिला घारु यांचा सिंहाचा वाटा आहे.
तिच्या कर्तृत्वाची पोहोच पावती म्हणून वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळातर्फे गुणवंत गौरव समारंभात तीला
२०१६ आणि २०१७ अश्या सलग दोन वर्षी मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यांत आले.
शाळेतील अभ्यास सांभाळून स्वरादाने मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. कराटे आणि अभ्यास, अशा
दोन्ही आघाड्यांवर प्रगतीची अनेक शिखरं पार करून, भविष्यात तिने स्वतःबरोबरच, पालकांचे आणि आपल्या
समाजाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवावे, यासाठी तीला शुभेच्छा!