Achievers Achievers Innovative Technology

रोहन पराग राऊत

करोना हया महामारीने जगभर हौदोस घातला. त्यावर मात करण्याकरीता अनेक करोनायोद्धे पुढे सरसावले. संकटावर मात करणे सुरू झाले. पण त्याकरिता अनेक आयुधांची गरज पडली. त्यातील एका आयुधाचा जनक आपल्यापैकीच आहे. संघाचे माजी अध्यक्ष श्री. पराग राऊत व उद्योजिका सौ. संगिता ह्य़ांचा पुत्र, तसेच सौ. सुलोचना व श्री. परशुराम ह्य़ांचा नातू, कु. रोहनने संपुर्णपणे भारतीय बनावटीचा ड्रोन बनाविला असून त्याचा वापर मुंबई पोलिस व मुंबई महानगर पालिका करत आहेत. करोनासंक्रमीत परीसरात ड्रोनवरील स्पिकरचा वापर करून आवाहन करणारे पोलिस आपण टिव्ही व इतर दृष्यमाध्यमांवर पाहीले असतीलच.


आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात रोहनने जगातील पहिला IP Controlled ड्रोन बनाविला. त्याला त्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसे मिळाली. आपल्या ईलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमानंतर बंगलोर येथे विकी लॅब येथे वर्षभर काम करून रोहन मुंबईत परतला. त्यानंतर आईच्या व्यवसायातील वेबसईट व अन्य आधुनिकीकरणास मदत करून मेमसिस ह्या उद्योगामधे चित्रिकरणाकरीता आधुनिक उपकरणे बनवू लागला. फोटोग्राफीची मुळातच आवड असल्याने तेथे उपकरणे बनविण्याबरोबरच चित्रीकरणही करु लागला. अमीरखानच्या दंगल ह्या चित्रपटाच्या निर्मितीला त्याने बनविलेली उपकरणे तर वापरली आहेतच पण Making of Movie चे चित्रीकरणही त्यानेच केले आहे. त्याने Virtual Realty (3D) चे चित्रीकरणही केले. दोन वर्षांच्या अल्पवधीत त्याची Virtual Cinematographer म्हणून आंतर्‍राष्ट्रिय स्तरावर ओळख झाली. जगप्रसिद्ध BBC व प्रतिवर्षी केवळ दहा VR (3D) चित्रफिती बनविणाऱ्या Occulus ह्या VR च्या जनक उद्योगांकरीता त्रिमीतीय (3 dimensional) चित्रफिती बनविल्या. पण नंतर आपला स्वतःचा उद्योग कर ह्या आई-वडीलांच्या सल्ल्याप्रमाणे मनुष्यविरहीत वाहानांच्या निर्मितीकडे वळला.


मेमसीसमधे त्याने मनुष्यरहीत डॉली (छोटे वहान) बनविले होते. त्याची निर्मिती सर्वप्रथम केली. त्याचाच वापर दिल्ली येथिल IPL मधे सीमेवरुन जमिनीच्या स्तरावरील चित्रीकरणाकरीता केला गेला. अशा प्रकारच्या डॉलीचा वापर केला गेलेला हा पहिला सामना होता. त्यानंतर शेतीकरिता उपयोगात येऊ शकेल अशा फवारणीसाठीच्या ड्रोनची निर्मिती केली. त्याचा वापर इतर फवारण्यांसाठीही केला जाऊ शकतो. जगात इतरांच्या स्पर्धेत येण्यासाठी व्यावसायिकता असावी म्ह्णून त्याने ड्रोन स्टॉर्क ह्या कंपनीची स्थापना केली. त्याचबरोबर विविधोपोयोगी ड्रोनची निर्मिती केली. आणि ती होण्यापूर्वीच आलेल्या महामारीने अशा ड्रोनची किती गरज आहे ते सिद्ध केले.


ड्रोनचा वापर अधिकाधिक व्हावा व त्याच्या किंमतीचा भार केवळ एकावरच पडू नये ह्याकरीता त्याने ड्रोनच्या वापराने सेवा भाड्याने देणे सुरू केले. महानगरपालिकेकरीता फवारणी ही अशाच सेवेचा भाग आहे. रोहनने निर्मित केलेले ड्रोन संपूर्णपणे देशीबनावटीचे तर आहेच पण जवळजवळ ५० किलो क्षमतेचे आहे. ड्रोन स्टॉर्क व्यतिरीक्‍त अशा प्रकारचे ड्रोन बनविणारी भारत फोर्ज ही एकमेव कंपनी आहे. त्याद्वारे ३० किलो वजन सेवेकरिता उचलले जाऊ शकते तर हे वजन १२ ते १५ मिनिटे वाहू शकते. एका दिवसात जवळपास २० एकर शेतावर फवारणी केली जाऊ शकते. दिर्घकालीन वापरात हा खर्च रू. ५०० प्रति एकर इतका येऊ शकतो.


हॉस्पिटलमधे सेवा देणारी सद्ध्या डॉली तयार होत आहे. अग्निशमनाकरिता वापरणारे ड्रोन व डॉली ह्य़ांचे आराखडे तयार होत आहेत. लहान विविधोपयगी परवडणारे ड्रोन बनविणे व सैन्याकरिता उपयोगात येणारे ड्रोन बनविणे हे त्याचे पुढील उद्दीष्ट आहे. वयोवृद्धांना गोळ्या-औषधे देणारे व त्यांचेकडे हरप्रकारे लक्ष ठेवून ती माहिती त्यांच्या सगे-सोयऱ्यांना देणारी डॉली परवडणाऱ्या दरात बनवायची आहे. ह्या सर्व उपकरणांचे संशोधन, डिझाईन व निर्मिती हे रोहनचे स्वतःचे शोधकार्य आहे. ह्यासर्वांची अधिक माहिती वेबसाईटवर तसेच खालील लिंकवर पाहू शकता.


  1. ड्रोनद्वारे फवारणी http://youtu.be/0xtWYbYBheY
  2. ड्रोनद्वारे फवारणी https://www.youtube.com/watch?v=S_bKU_8Yhk0
  3. ड्रोनचा आवाहनाकरीता वापर https://www.youtube.com/watch?v=EUUZ2U1LEh0
  4. बीबीसी https://www.youtube.com/watch?v=Xpq5kBcSYCI
  5. ऑक्युलस https://www.with.in/watch/the-hidden

Drone demonstration at Dharavi

Flying - close up

New multipurpose drone ready for announcement

Being examined by Police Commissioner and Home Minister