Villages
'चौकळशी वाडवळ' समाजबांधव हे उत्तर कोकण परिसरात वसलेले आढळतात. फार पुर्वी समाजबांधव हे क्षत्रिय योद्धा होते. तदनंतर शेती, वाडी व बागयती हे रोजगार त्यांनी अवलंबिले. पुरूषांन सोबत घरातील स्रीयाही ह्या कामात हातभार लावत. उत्तर कोकणातील पोषक हवामान तसेच सुपिक माती त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ऊपयुक्त ठरली व बहुतेक समाजबांधव हे येथेच स्थाईक झाले.
मुंबई व तिच्या उत्तरे कडील परिसरात 'चौकळशी वाडवळ' समाजबांधवाची मुळ गावे आहेत. विशेषताहा, सफाळे ते डहाणु येथे बहुतेक गावे आहेत. डोंगरातील लहान-मोठ्या टेकड्यांमधे वसलेले मांडे व मधुकर नगर ही गावं, तसेच सुपिक जमीन व सुंदर समुद्र किनारा असलेले केळवे व माहीम ही गावं, नैसर्गिक संपत्तीने संपन्न आहेत. कमारे, पंचाळी, उमरोळी, अल्याळी व शिरगाव ही गावं पालघर मधे येतात तर बेटेगाव, घिवली, चिंचणी, नांदगाव, पोफरण, सालवड व वरोर हे बोईसर मधे आहेत. जहु हे मुंबईतले एकमेव गाव. नरपड हे समाजतील सर्वात मोठे गाव हे डहाणु तालुक्यात आहे.
अलीकडे, नोकरी-धंद्या निमीत्ताने मुळ गावातुन स्थलांतरीत झालेले बांधव हे पालघर-बोईसर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली तसेच दादर-अंधेरी येथे मोठ्या संखेने वास्तव्यास आहेत. उच्चशिक्षण घेऊन काही मंडळी परदेशातही स्थाईक झाले आहेत.