:माझी कविता:
"रात्रिने आपले ते
अस्तित्व मग पुसावे !"
रात्रिच्या पहिल्या प्रहरी,
स्वप्नांस जाग यावी !
स्पर्शाने तुझीया माझ्या,
स्पर्शास दाद द्यावी !
विसरुन सर्व जावी,
दिनभरीची कर्म कहाणी !
गात्रांस बोलु द्यावे,
ठेऊन अबोल वाणी !
ओठांनी मम पुसावी,
ओठांच्या तुझी कहाणी !
गुंफुन त्यांनी गावी,
अपुलीच प्रेम गाणी !
कर थकलेले दिनभरी,
व्हावे त्यांनी आपलेसे !
मग होऊदेत अपुले,
दडलेले, मुक्त उसासे !
चरणांस मम पुजीलेले,
तु पवित्र आरतीने !
विसरुन बंधने ती,
खेळुदे तया खुषीने !
करपाश मुक्त करुनी,
सोड बंदिस्त कुंतलांना !
बट गालीची तुझ्याग,
घालील साद मनमना !
ऐकतील फक्त ह्रदयेच,
ह्रदयांचे मग धडकणे !
आरक्त कान दोन्ही,
विसरतील त्यांचे असणे !
मिसळुन दोन्ही श्वास,
होतील एक जीव!
क्षणकाल एक होतील,
दोन वेगळे सजीव!
रात्रिने आपले ते,
अस्तित्व मग पुसावे !
न भेटताच उषेला,
गुपचुप निघुनी जावे !
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,
डहाणुरोड (पुर्व),
📱०९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.