“ज्ञान संपादनाची प्रेरणा व स्वयंमुल्यमापनाची संधी असा सकारात्मक दॄष्टीकोण पालक व विद्यार्थ्यांमध्ये निर्मांण होण्यासाठी राबविली जाणारी परीक्षा पध्दती म्हणजे पारदर्शक परीक्षा पध्दती होय”.
“शिक्षण क्षेत्रातील अयोग्यता दूर करून शिक्षण क्षेत्राचे पावित्र कायम राखण्यासाठी विद्यार्थ्यांचे पारदर्शकपणे मूल्यमापन करणारी परीक्षा पध्दती म्हणजे पारदर्शक परीक्षा पध्दती होय”.
“छोटे कुटुंब - आदर्श कुटुंब” हया संकल्पनेत आजचे पालक आपल्या पाल्याप्रती खूप जागृत झाले आहेत त्यांना अधिक सजग करणारी, तसेच पालक व विघ्यार्थी यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी व समाजाला शिक्षण प्रक्रियेत समाविष्ट करून घेणारी ही पध्दती असल्यामुळे या मुल्यमापन पध्दतीचा अभ्यास करणे, जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज आहे.
आपल्या देशामध्ये सर्व स्तरावर विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाचे ‘परीक्षा’ हेच योग्य माध्यम मानले जाते हयामध्ये लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये लेखी परीक्षा जास्त गुणांची असल्यामुळे सहाजिकच विद्यार्थी - पालक - शिक्षक हया सर्वांचे लक्ष ‘लेखी परीक्षे’ कडे वेधले जाते. कदाचीत असे असल्यामुळेही आजही अनेक ठिकाणी कॉपी केल्याची अनेक प्रकरणे वृत्तपत्रातून वाचावयास, टि.व्ही वरून पाहावयास मिळतात. हे पूर्णपणे कसे थांबविता येर्इल.
• अभ्यास न करता गुण मिळविण्याची प्रवृत्ती नष्ट करता येर्इल का ?
• आजच्या परीक्षा पध्दतीत पारदर्शकता दिसते का ?
• प्रश्नपत्रिका काढल्या पासुन विद्यार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत ती सहाजणाच्या हातून जाते. हया सहांपैकी कोणी प्रश्नपत्रिका फोडू शकते अशी शंका कोणाला वाटते का ?
• शाळेबाहेरील एखादी व्यक्ती प्रश्नपत्रिका फोडू शकते का ?
अशा असंख्य प्रश्नांचे टेन्शन घेत बसण्यापेक्षा चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेत सन २००२ या सालापासून प्रायोगीक तत्वावर पारदर्शक परीक्षा पध्दती यशस्वीरित्या राबविली जात आहे. या पध्दतीतून वरील सर्व प्रश्नाचे उपाय मिळतील.
पालघर जिल्हयातील, डहाणू तालुक्यातील, १०७ वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेली चिंचणी तारापूर शिक्षण संस्था, चिंचणी या संस्थेचे चेअरमन शिक्षणव्रती आदरणीय श्री. रजनीकांत भार्इ श्रॉफ यांनी चिंचणीच्या संस्थेत सन २००२ यासालापासून ‘पारदर्शक परीक्षा पध्दतीस’ सुरूवात केली. या अभिनव प्रयोगाचे मुंबर्इ विद्यापीठाच्या माजी कुलगुरू मा.डॉ. स्नेहलता देशमुख यांनीही कौतुक केले.
• ही पध्दत आहे तरी काय ?
• ही पध्दत कशी राबविली जाते ?
याचे मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेतील पाच मंडळाच्या सदस्याला मुंबर्इ विभागीय मंडळाच्या अध्यक्षा मा. श्रीमती विजयशीला सरदेसार्इ यांनी पाचारण केले होते. याचे फलित म्हणजे मुंबर्इ विभागीय मंडळाच्या प्रमुखांनी याची दखल घेऊन इयत्ता १० ला गणित विषयासाठी व इयत्ता १२ वी ला इंग्रजी विषयासाठी (अ,ब,क,ड)संच काढण्यास चालू केले व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार उत्तर पत्रिकेची छायांकीत प्रत देण्यास सुरूवात केली.
पारदर्शक परीक्षा पध्दतीची अंमलबजावणी पाच टप्यात करता येते.
१. माहिती देणे
२. प्रश्न पत्रिकांचे तीन संच काढणे
३. नमुना उत्तरपत्रिका तयार करणे
४. प्रत्यक्ष परीक्षा घेणे
५. उत्तरपत्रिका तपासणे.
पारदर्शक परीक्षा पध्दतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना नियोजीत अभ्यासक्रम शिक्षकांनी योग्य वेळेत शिकवून पूर्ण केल्यानंतर त्या अभ्यासक्रमांवर प्रत्येक विषयाचे तीन प्रश्नसंच काढणे. त्याचवेळी त्या तीन प्रश्नसंचाच्या उत्तरपत्रिका काढून संबंधीत परीक्षा प्रमुख किंवा मुख्याध्यापक हयांच्याकडे दयाव्यात.
शिक्षकांनी प्रश्नपत्रिका काढल्या पासून परीक्षागृहात ती विद्यार्थ्यांच्या हातात पडे पर्यंत प्रश्नपत्रिका खालील व्यक्तींच्या हातून जाते.
प्रश्नपत्रिका काढणारी व्यक्ती, परीक्षा प्रमुख, शिपार्इ, मुद्रणालयाचे मालक, छपार्इ कामगार, छापलेल्या प्रश्न पत्रिका शाळेत पोहचवणारा कामगार, शिक्षक, विद्यार्थी.
या साखळीतील एखादी व्यक्ती गैर मार्गाचा वापर करीत असेल तर पेपर फुटी सारखे प्रकार घडू शकतात हयाची खबरदारी घेतली पाहिजे.
बैठक व्यवस्था - परीक्षाकक्षात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नंबरप्रमाणे करावी. एक नंबरला ‘अ’ दोन नंबरला ‘ब’ तीन नंबरला ‘क’ पुन्हा अ, ब, क संच अशा प्रश्नपत्रिका वाटाव्यात. हयामुळे मागचा विद्यार्थी पुढच्याचा पेपर पाहून लिहू शकणार नाही तसेच विचारून उत्तरे लिहणार नाही व परीक्षागृहात गोंधळ होणार नाही, शांततेत परीक्षा घेता येते. हयामुळे कॉपी करून, पेपर पाहून, पेपर मिळवून, फोडून सहज पास होता येर्इल हया गैरमार्गाला आळा बसेल. विद्यार्थ्यांना अभ्यास केल्याशिवाय पास होता येणार नाही, असा प्रामाणिकपणाचा संस्कार विद्यार्थ्यांवर करून अध्ययन व अध्यापन सुकर करता येर्इल.
जेष्ठ नागरिकांची भुमिका - थर्ड अंम्पायर ची असेल.
परिसरातील जेष्ठ नागरिक संघाशी सपंर्क साधून त्यांना त्याची भुमिका समजावुन सांगणे. परीक्षागृहात जेष्ठ नागरीक एका बाजुला खुर्चीत बसून परीक्षागृहातील निरीक्षण करतील. शिक्षक पर्यवेक्षक कामे करतील. कोणत्याही प्रकारची अयोग्य गोष्ट आढळल्यास जेष्ठ नागरीकांनी परस्पर विद्यार्थ्यांना ओरडू नये, ती गोष्ट शिक्षक पर्यवेक्षकाच्या लक्षात आणून देणे व योग्य ती कारवार्इ केली जार्इल.
परीक्षागृहात शिक्षक पर्यवेक्षक व जेष्ठ नागरीक निरीक्षक नेमल्यामुळे जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गातही दोन पर्यवेक्षकांमुळे विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे सोपे जाते. जेष्ठ नागरिक उपस्थित असल्यामुळे विद्यार्थी कॉपी करणार नाहीत व विद्यार्थ्यांवर वचक बसेल ह्यामुळे शिक्षणाविषयी सामाजिक जागृती निर्माण करण्याचे उद्दिष्टे साध्य होते.
परस्पर विद्यार्थ्यांनी संच अदला -बदल केल्यास ती नकल (कॉपी) समजली जार्इल याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दयावी.
नमुना उत्तर पत्रिका -
शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासून दिल्यावर विद्यार्थ्यांना व पालकांना जर काही शंका असल्यास तो पेपर विषयांचे तज्ज्ञ व नियामकाकडून पुन्हा तपासला जार्इल. तरीही विद्यार्थी व पालकांचे समाधान झाले नाही तर शिक्षकांनी तयार केलेली ‘आदर्श नमुना उत्तरपत्रिका’ पालकांना दिली जार्इल. ते आपल्या मुलाची उत्तरपत्रिका पडताळून पाहू शकतात ह्यामुळे, माझ्यावर अन्याय झालाय ही विद्यार्थ्यांच्या मनातील शंका निघुन जार्इल.
अन्याय दूर-
मुल्यमापनासाठी घेतल्या जाणा-या परीक्षांमध्ये पारदर्शकता नसल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला दिसून येतो. असे असून फक्त ‘अन्याय झालाय त्याला वाचा फोडली पाहिजे ’ किंवा गैरमार्ग वापरणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. या निष्कर्षा पर्यंत आपण पोहचतो, परंतु हयाचा खोलवर विचार करून अन्याय किंवा गैरमार्ग होणारच नाही यासाठी ठोस प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. ह्याच विचारांना प्राधान्य देत पारदर्शक परीक्षापध्दतीची निर्मिती झाली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -
जेष्ठनागरिक, पालक, शिक्षक, संस्थाचालक ह्यांना या कामात अधिक कष्ट घ्यावे लागतात. परंतु या कामातून सर्वांना चांगले काम केल्याचे समाधान व आनंद मिळतो. कारण शिक्षण क्षेत्राशी संबंधीत सर्व व्यक्तीचे ध्येय ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे असते. त्यावर लक्ष केंद्रीत कराल तितके पारदर्शक परीक्षा पध्दतीचे अधिक समर्थन कराल.
अधिक सराव - निकाल उंचावेल -
प्रत्येक शाळेत प्रश्नपत्रिकेचे तीन संच काढले तर आपल्या शाळेतील प्रश्नपत्रिकांचा संच आपण दुसऱ्या शाळांमध्ये द्दयायचे व त्यांच्या शाळेतील प्रश्नपत्रिकांचा संच आपण घ्यायचे असे प्रश्नपत्रिकांचे संच अदला - बदल करून घेता येतील यामुळे विद्यार्थ्यांकडून अधिक सराव करून घेता येर्इल व परीक्षांचा निकाल उंचावेल.
संविधान तक्त्ता -
तीनही प्रश्नपत्रिका काढताना त्या संविधान तक्त्यावर आधारीत असाव्यात. त्यातील काठिण्य पातळी समान असावी. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत घटकनिहाय गुण सारखे असावे. एका प्रश्नपत्रिकेत विचारलेला सेम प्रश्न दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत नसावा. तीनही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सारखेच असावे याची खबरदारी शिक्षकांनी घ्यावी.
पारदर्शक परीक्षा पध्दतीचे फायदे -
१. शिस्तीच्या वातावरणात परीक्षा घेता येते.
२. मुल्यमापन योग्यपध्दतीने होते. विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही.
३. पेपर पुन्हा तपासण्याची सोय.
४. कॉपी करण्यास आळा बसेल. दोन पर्यवेक्षक या भीतीने विद्यार्थी कॉपी करणार नाहीत.
५. एकाग्रतेने पेपर लिहिता येतो. अनेक विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांना हाका मारून उत्तरे विचारतात त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचा वेळ जातो व त्यांचा लिखाणाचा वेग कमी होतो. विचारात अडथळा निर्माण होतो. या सर्व समस्यांना दिलासा मिळतो.
६.पेपर फुटीच्या गैरमार्गापासून मुक्ती मिळते. कारण पेपर फुटला तरी आपल्याला कोणता संच मिळेल याची कल्पना नसते.
७. जेष्ठ नागरिकांना व पालकांना सहभाग घेता येतो. समाधान व आनंद मिळतो.
८. स्वयंअध्ययनामुळे मनातील परीक्षांची भीती कमी होते व त्याचे मनोबल वाढते.
९. परीक्षांचा निकाल उंचावतो. व यशाबाबत विश्वास वाढतो.
१०. विद्यार्थी समर्थ व सक्षम बनतात त्याच्यातील आत्मविश्वास वाढतो.
११. विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण मिळते.
पारदर्शक परीक्षा पध्दतीचे अनन्यसाधारण महत्त्व व लक्षात घेता पुढच्या काळात या परीक्षा पध्दती शिवाय पर्याय नाही हे चित्र स्पष्ट दिसते. त्या दृष्टीने या पध्दतीत अजून काही वेगळेपण आणणे, पारदर्शक परीक्षा पध्दतीची प्रक्रिया सहज कशी होर्इल याकडे लक्ष देणे गरजचे आहे, म्हणून शिक्षण प्रक्रियेशी संबंधीत व्यक्ती, पालक, विद्यार्थी, शिक्षक, संचालक यांना यापध्दतीचे महत्व पटवून दिल्यास या पध्दतीतील अडथळे दूर होतील व फायदे प्राप्त करून घेता येतील. म्हणून ही पध्दत अनेकांपुढे मांडणे व त्यावर चर्चा घडवून आणणे त्यात सुधारणात्मक विचार होणे. प्रचार आणि प्रसार होणे या हेतुने पारदर्शक परीक्षा पध्दती - काळाची गरज या लेखाचा प्रपंच.
तर मग करणार ना विचार !
आमच्या चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेत ‘पारदर्शक परीक्षा पध्दतीचा’ प्रायोगिक तत्त्वावर अवलंब केला. शिक्षणाचा या पवित्र कार्यात सहभागी झाल्याचा आनंद संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. रजनीकांतभार्इ श्रॉफ यांनी आम्ं सर्वांना दिल्याबदल त्यांचे आभार मानते.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.