"कसा मी सांगू बायको पुढे?"
कसा मी सांगू बायको पुढे?
भर श्रावणातही,
सुक्या बोंबिल,खार्याचा,
स्वाद मला आवडे!
चहु बाजुला हिरवी हिरवळ,
हरित भाज्यांची आवक बक्कळ!
परि पत्र्याच्या डब्यातील,
बोंबिल सोड्यांचा वास मला चाळवे!
वर्षा ऋतुत परीसर सुंदर!
तु ओलेती अती वाटे सुंदर!!
गौर हस्त परी तव सुगरणीचे,
प्रतिदिन, मोळे मज चाटवे!
वाटे श्रावण भुर्रकन जावा,
भादवा धाऊनी लवकर यावा,
गणराय गौरीचे दिन ते सरता,
राशींनी माशांनी घरी यावे!
बोंबिल,मांदेळी,कोलंबी कालवण,
पापलेट,दाढा खार्याने पण,
अलगद तळूनी कढईतुन त्या
सत्वर ताटी विराजीत व्हावे!
सोशिन "कळ" ग मी महिनाभर,
परि व्रत वैकल्यास तुझ्या येईल बहर!
दुष्ट दुरावा जीवनी अपुल्या
येऊन, कितीतरी करील कहर,
मन:स्थिती ती अवघड माझी
मांडु कोणा पुढे?
फेकुनी द्यावे, वाटे हे पंचांग,
निरखावे रातदिन तुझे गोरे अंग!
साल, ॠतुंच्या जोखडातुन या
मुक्तच कायम व्हावे!
कसा मी सांगू बायको पुढे?
कवि:—सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु रोड ( पुर्व),०९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.