माझी कविता : प्रेमाचा पहिला मेळ
तो:—"धुंद सागरी किनारा,
फूटे भरतीची लाट!
उचंबळे मन माझे,
धांवे वेगे ते सुसाट!"
ती:— "डोह यौवनाचा ईथे,
फूटे तारूण्याचा बांध!
घे तू ,आकंठ पिवून,
मन झाले रे सैराट!"
तो:— "मज प्रथमच भेटे,
तारूण्य तरणे बांड!
कसा आवरू मला मी?
मला कोणाचेन भान!"
ती:— "घे रे ऊतू नको देवू,
सांभाळले आजवर!
थेंब थेंब अमृताचा,
घाल त्याला तू आवर!"
तो:— "झाला आसमंत काळा,
भरूनी आले काळे मेघ!
कसा आवरू मी आता?
माझ्या मनाचा आवेग!"
ती:— "थेंब थेंब झाला जड,
त्यांना धरतीची ओढ!
आता सांगती,वेगाने,
राहू नका,पड पड!"
तो:— "रूपेरी ती मऊ वाळू,
खेळ प्रणयाचा खेळू!
टाकू ओवाळून जीव,
घालू सुरेख तो मेळ!"
ती:— "आला जोशात पाऊस,
भिजे माझे अंतरंग!
गेले तुझ्यात विरून,
तप्त माझे गोरे अंग!"
तो:— "लाज आकाशाला आली,
टाके काळोखाची झूल!
मन दंग तुझे माझे,
कसे डोलते अजून!"
ती:— "निलाजरे मन माझे,
प्रेम मागते अजून!
जागे राहू आपण दोघे,
जावो जग ते निजून!"
कवी:—श्री सुहास काशिनाथ राऊत,
वरोरकर,
डहाणू,जिल्हा—पालघर.
भ्रमणध्वनी—०९९२३००४८९५
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
छान रेखाटली जीवन रेखा, खुप छान लेख, सुहास