माझी कविता
"मिटु नको जीवनाचे पुस्तक तु वाच!"
दांत म्हणाले रसदार जिभेला,
कधी संपणार तुझे चोचले?
आम्हाला तर आता वाटते,
आमचे आता आयुष्यच संपले!
होतो आम्ही दुधाचे तेंव्हा,
दुधाहुनही शुभ्र होतो!
कुंदकळ्या म्हणत आम्हाला,
आम्ही जेंव्हा गोजिरे होतो!
पडलो आम्ही अलगद तेंव्हा,
बाल्यावस्था गेली दुर!
जवानीत अवर्णनीय होता,
पालटलेला आमचा नुर!
ओठ विलगुनी आम्ही दिसता,
प्रत्येक चेहरा हसत होता!
पडणार आम्ही एकदिनी आता,
का तुम्ही असे विषण्ण होता?
जीभली बाई आवरा आता,
वाट्टेल ते खाण्याचा तुमचा सोस!
आता पडल्या नंतर पुन्हा न येणे,
नसेल हा परी आमचा दोष!
"किती सुटली रे तुझी ढेरी!"
पोटोबाला म्हणाली आतडी,
पचवत नाही अविरत खाणे,
विश्रांती आम्हाला दे ना थोडी!"
"असुन वाटते फुटलो आम्ही!"
ओरडुन सांगे कानाची जोडी,
"लांबवरुन का कुजबुजता हो?
या जवळ बोला,दया दाखवा थोडी!"
"डोळ्या वरती आली झापडे,
काय कुठे आम्हा न सापडे!
पाणीदार अति होतो आम्ही,
पाणीच गाळतो डोळ्यांतुन दोन्ही!"
केंस पांढरे,विरळ मग म्हणती,
"कधिही ऊठवु आमुचे ठाणे!
जाऊ लागली आता अक्कल,
पडेल आता तुम्हाला टक्कल!"
ओठ गुलाबी तेंव्हाचे म्हणती,
"तारुण्यात किती केल मस्ती!
करकचुन चावलो ओष्ठ तुझे द्वय,
विसरावे सारे असे का आता झाले वय?"
कमर तुझी चोविसची होती,
वय तुझे ग होते सोळा!
इंच विसरुन आता फुटात मोजु?
चरबी,मांस किती झाले गोळा!
काय छातीचा होता तो बाज,
ना ऊणे अधिक छत्तिसच्या पुढे,
वजाबाकीच का होईल आता?
घसरगुंडीचेच का गणित मग पुढे?
छत्तीसचे होते नितंब दोन्ही,
अजिंठ्याची तु होती मुरत!
पसरु लागली बैठक आता,
कोमेजु लागली मादक ती सुरत!
जवानीचा तो ओसरला जोर?
लागेल जीवाला भयानक घोर?
संपले आत्ता का जीवन असली?
रंगेल नाही ती दुनिया कसली?
मन म्हणाले "कारे भाबड्या,
पत्ते सारे ऊघडे करतो?
आहे मी ना तुझ्या सवे रे,
का अवसान असे तु टाकुन देतो?"
"सदा हिरवी असते माझी काया,
तत्पर मी तुज ऊत्तेजन द्याया!
भोग भोगुनी संपत नाही,
न भोगले असे काही ऊरले नाही!"
"तृप्तता तनाची होतच नाही,
जरी आकंठ पिल्या दिशाही दाही!
सजीव जन्म हा मिळे एकदाच,
मिटु नको जीवनाचे पुस्तक तु वाच!"
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,
सी—१०,रामजी पार्क सोसायटी,
डहाणु रोड,(पुर्व),पिन—४०१ ६०२.
मोबाईल/वाॅटसअप—९९२३००४८९५.
८७८८९१९७८३.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.