:माझी कविता:
"तव साथ असणेच
म्हणजे जीवन आहे!"
"का आज चंद्र नभिचा,
उदास मजला भासे?"
"असुनी साथ चांदण्याची,
एकांत नभि का दिसे?"
"का गाज सागराची,
काढी चिरुन हृदय?"
"का मंद वात आज,
असा वाटतो अदय?"
"चंदेरी शितल वाळु,
ना दाखवी चकाकी!"
"का ओळखुन आहे,
असणे मम एकाकी?"
"भरगच्च बाग सुरुची,
आहे ऊभीच ईथे!"
"का वृक्ष आज भासती,
ना वृक्ष परी भुते?"
"एकांत जो हवासा
मज नेहमीच वाटे!"
"आज असुनी एकटा तो,
ऐकतो दीर्घ उसासे!"
"का साथ ना प्रियेची?
पुसे आसमंत सारा!"
"मेघ एकले नभिचे,
कुठे शोधती निवारा!"
"असुनी माझे असणे,
प्रिये नगण्य आहे!"
"तव साथ असणेच,
म्हणजे जीवन आहे!"
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,
सी—१०, रामजीपार्क सोसायटी,
रामवाडी,इंटीग्रेट रोड,
डहाणु रोड ( पुर्व),९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.