"तू अजिंठा कोरून गेली!"
रंग तुझा गोरा,
नितळ तुझी काय!
ओठांवर गुलाबांनी,
पसरविली साय!
दंतपंक्ती अति शुभ्र,
केशसंभार तो काळा!
कमनीय खांद्यावर,
घेतो यथेच्छ हिंदोळा!
नेत्र टप्पोरे,काळे तुझे,
तया काजळाची धार!
आणि खाली शोभे ती,
लंब नासिका धारदार!
गाल गोबरे,गुलाबी,
सफरचंदी तया लाली!
त्यांना देखता,पाहता,
सय काश्मिरची आली!
टंच छातिचा उभार,
दृष्टी झेले क्षणभर!
लपविता पदराने,
खेद वाटला अपार!
लांब ,नाजूक बोटांनी,
तुझ्या,पांघरला नखरंग!
सुंदर त्या मनगटी,
शोभे सुवर्ण कंकण!
अंगकाठी ती शेलाटी,
गजगती तुझी चाल!
काय पाहणार्यांचे केले,
अति विलक्षण हाल!
दिसली तू क्षणभर,
आली आणि निघून गेली!
पाषाण मम ह्रदयावर,
तू अजिंठा कोरून गेली!
—कवी:—
सुहास काशिनाथ राऊत
/वरोरकर,सी—१०,रामजी पार्क सोसायटी,इंटीग्रेट रोड,
डहाणू रोड ( पुर्व),४०१६०२.
मोबाईल०९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.