"लेबल!"
चेहरा हे एक लेबल असतं,
माणूस नांवाच्या खोक्यावर लावलेलं!
सर्वच खोक्यातील माल सारखाच असतो,
परंतु आपण ठरवत बसतो प्रतवारी प्रत्येकाची,
बर्या वाईट अशा त्या लेबलावरून!
रक्त लालच असतं सर्वांचं,
ह्रदयंही सारखीच ठोके देत असतात सर्वांची!
पण आपण रंग शोधत बसतो काळा आणी गोरा,
जेव्हा ह्रदयातून पाझरणार्या प्रेमाला नसतो रंग कुठलाही!
मनाचे रंग असतात इंद्रधनुष्यी सर्वांच्याच!
पण किती जणांच्या मनात डोकावतो आपण?
दुसर्याच्या मनात शिरण्यासाठीही आपण शोधत बसतो चौकट सुंदर महिरप कोरलेली!
पण त्या मुळेच मुकतो आपण कित्येक सुंदर मनाला भेटण्याचे!
आईबापाची निखळ माया,
बहिण भावाचे निर्व्याज प्रेम,
पत्नीचे बेधुंद मादक समर्पण,
आप्त स्वकियांचा जिव्हाळा,
मित्र मैत्रिणींचा लळा,
सर्वच असतात निर्रंग मुळातुन!
पण आपणच देत बसतो इंद्रधनुष्यी रंग त्यांना,
आपल्याच मनाला भावणारे!
आपल्याच मनाच्या रंगात मिसळणारे!
जीवन रंगमय तेंव्हाच होतं,
जेंव्हा एक दुसर्याच्या मनाचे रंग मिसळून निर्माण होत असतात सप्तरंग!
पण अशा रंगांची ऊधळण करून सर्वांनाच इंद्रधनष्ये वाटण्यासाठी
गरज असते ती प्रत्येक मनात डोकावण्याची!
न कि माणूस नांवाच्या खोक्यावरील चेहर्याचे बरे वाईट लेबल पाहून त्याची प्रतवारी ठरवण्याची!
कवि:—सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,डहाणू,०९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.