:माझी कविता:
"या साजरा करुया, मरण सोहळा!"
बांधुनी घेतले मी सामान,
माझीया खांद्यावरी!
यायचे असेल तर सत्वरीया,
भेटण्या मला माझ्या घरी!
जन्मताच जुळली नाती,
गणगोत सारा लाभला!
मनोभावे जुळल्या तारा
ठरले कोण दुजा? कोण आपला?
साथ आणि संगतीने,
भवसागर तरला सारा!
मिटे अंतर मिळे पामरा,
एकट्याचा जो किनारा!
एकटाच आलो ईथे,
मन स्पर्श भावे गुंतले!
जाईन पण एकटाच,
करु कोण माझे नी दुजे?
आलो रिता,भरलो ईथेच,
उसने माप आपले ओतले,
हिशोब नाही ठेवला पण,
कोणा दिले,कोणा ठेवले!
मुळे रुजली खोल,
होइल त्रास,एक एक तोडता!
नव्हते भान होईल असे,
एक एक जोडता!
गेले उडुन,पक्षी मम,
घरटे उजाड पाडले!
एक ती वेडी लता,
आलिंगन नच तिने सोडले!
उन्मळुन पडता खोड,
फाटेल धरती,फुटेल मन!
शहाणी असता, वाटेल वेडी ती,
बघत राहील,कधी फुटे कोंब!
जाण्याने मम होईल रिते,
काय कुणाचे मोजु कसे?
दु:ख सरता फिरतील मनी,
नित्त्याचिच मग मोरपिसे!
तिरडीवर मम देह आणि,
भोवताली गोतावळा!
रुदन कुणाचे मुक आणि,
कुणी फाडील आपुला गळा!
"होता एक विलक्षण जो,
आज नाही आपला!
जग थबकेल त्याच्या विण,"
कुणी बोलेल तेथे बापडा!
ऐकण्यास मी नसेन,
ऐका तुम्हीच मम गुण सारे!
पहा जोखुन जुळती का,
त्याने तोडले जे तारे!
असेल ईतका चांगला मग,
आधी कसा ना भावला?
व्यर्थ हा कल्लोळ सारा,
दु:ख,भावनांना आवरा!
ऊठवतील कलेवर माझे,
मग ठेऊनी खांद्यावरी!
फेडतील मम पांग,
जे खेळले या खांद्यावरी!
झेलतील भार दुजे,
ज्या दु:ख वा आनंदही!
अवतरेल रम्य सोहळा,
मम प्रिय ग्राम भुमिवरी!
पार्थिव माझे सजविल शेज,
जी ऊभी चार खांबावरी!
पेटता ज्वाळ, नश्वर देह तो,
जाईल त्याच्या निजघरी!
राख माझ्या शरीराची,
लाटेत जाईल मिसळुन!
दु:ख सारी पचऊन मग ती,
पुन्हा ऊठेल ऊसळुन!
दिन बारा अंतीम ते,
असतील मम हक्काचे!
धावतील सारे जन,
ऊधळतील बोल फुकाचे!
होउन काक येईन मी,
प्रिय मज ते चरण्याला,
होईल सात्विक आनंद तो,
मम प्रिय ते भरवणार्यांना!
कोण रडले?कोसळले कोण?
कळणार नाही या पामरा!
म्हणुनी या रे सारे सत्वरीया,
धाऊनी आत्ताच माझ्या घरा!
कवि:—सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर, डहाणु.
भ्रमणध्वनी - 09923004895.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.