माझी कविता
"नऊ मेलेल्या उंदरांना पाहुन!"
नऊ मेलेल्या ऊंदरांना पाहुन,
हृदय हळवे मम गेले गलबलुन!
गेले मामा,गेल्या मामी,
सात बछड्यांना पोटाशी ओढुन!
कुणी टाकले जहर विषारी?
कोण अनभिज्ञ तो यांचा शिकारी?
कुटुंब प्यारे,सारे उध्दस्त करुनी,
कोण हासेल तो खो खो करुनी?
म्हणतो मामा आम्ही लडीवाळे,
परी न सोसती त्यांचे चाळे!
पुजती त्याला गणेशासवे,
असे क्रुरतेने मारता येती न आसवे!
गणेश मंदिरी नेहमी जाता,
कानी लागुनी सांगतो व्यथा!
प्रिय वाटे तेंव्हा तो गणेश दूत,
एरव्ही मानगुटीवर आमुच्या बसते भुत!
जगतो वर्षभर उंदिर काळा,
असता बदामी,दुप्पट वेळा!
बिळात राहुनी करतो नासाडी,
सहन न आम्हा त्याची हि खोडी!
कुठे पांढरा उंदिर दिसतो,
भावुक मानव मग त्याला पूजतो!
दुध,फुटाणे खाऊ घालती,
वाटतो प्रति परमेश्वर,वाटतो वाली!
हुशार आम्ही मानव सारे,
म्हणवितो स्वत:ला दूत शांतीचे!
घेतो फुकाचा पण जीव दुसर्याचा,
ठेवतो गुंडाळुन तत्त्वची सारे!
ओलांडुन जाता चौर्यांशी योनी,
होऊ कदाचित उंदीर ही आपण!
दबकुनी मग बिळात राहु,
भिती अंतरी,सभोवताली पाहु!
उंदीर असतिल कदाचित तेंव्हा मानव,
बदलले असेल पण,आजचे सारे त्रिभुवन!
सुखात नांदतील मानव,वनचरे,
विश्वात सुखशांती अन्य काही न उरे!
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,
सी—१०,रामजीपार्क सोसायटी,
इंटीग्रेट रोड,डहाणु रोड (पुर्व),
पिन—४०१६०२.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.