"मृत्यु संगे व्हावे मिलन!"
हातामध्ये तव हात असावा,
श्वासाला तव श्वास कळावा!
झाली असता मुक वाणी मम,
तव नेत्रांचा प्रतिसाद मिळावा!
पाश तटातट तोडीत असता,
करां नको त्या कंप सुटावा!
अंश चिमुकले वक्षी बसता,
श्वासांना ना लोभ सुटावा!
प्राक्तन पुर्ण ते खुले असताना,
नको सुचवुस तु अन्य बहाणे!
ओढून ताणून नको तु थांबवू,
निर्धारीत जे माझे जाणे!
सुभोग भोगले,कधी न त्यजीले,
सुख स्वप्नांचे प्यालो प्याले!
आकंठ मन मग डुंबत असता,
धरू कशाला जीर्ण ओंडके?
तव स्वप्नांनी दिली झळाळी,
मम स्वप्नांची मग बांधुन मोळी!
भरली असता ओतप्रोत ती,
कशास फिरवू नुसती झोळी?
"साथ हवी मज जन्मोजन्मी,"
या तव ईच्छेला देऊन मान!
एक जन्म हा ईथे संपविन,
बांधू मज दे,माझे सामान!
तव ऊरात बसली असता धडकी,
मम जाण्याला प्रतिसाद मिळावा!
होऊदे अचेतन मम ह्र्दयाला,
तव ह्र्दयी ना कंप सुटावा!
प्रिया माझी तु समीप असता,
नको भोगणे,संपविन मीपण!
मनी माझ्या ती आस एकली,
मृत्यू संगे व्हावे मिलन!
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु रोड,(पुर्व),
09923004895.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.