:माझी कविता:
स्पेन मध्ये अघटीत घडले. श्री गणेश मिरवणुक जाण्याचा मार्ग गिरीजाघरावरुन जात होता. सहिष्णु श्री गणेश भक्तांनी चर्च मार्गावरुन श्री गणेशाची मिरवणुक नेता येईल का म्हणुन संबंधितांना विचारले.
"अहो श्री गणेशाला चर्च समोरुन न्यायचंच काय विचारता? श्री गणेशाला चर्चमध्ये घेऊन या, मगच जा."
असा सर्व धर्म समभावात्मक दुजोरा मिळाला. या घटनेवर मला सुचली ही माझी कविता.
"भेट श्री गणेशाची आणि मायबाप येशुची !"
गणपती आणि येशुची,
आज स्पेनला झाली भेट !
"नेऊ का चर्चच्या दारावरुन?" विचारले फादरला,
म्हणाले "आणा कि चर्च मध्येच थेट !"
गणपती आणि येशुचा,
आधी झाला असेल का संवाद ?
म्हणाले असतिल का एक दुसर्याला,
"पाहु या,काय होतो वितंडवाद ?"
गणपती आपला विश्वव्यापी,
येशुही जगत आधार !
भक्त दोघांचे विशाल हृदयी,
केला एक दुजांचा सत्कार !
"गणपती बाप्पा मोरया !" ची साद,
ऐकली मेरी बाळ येशुने !
भरुन आले हृदय दोन देवांचे,
उभय भक्तगण नाचती खुषीने !
म्हणाला असेल फादर त्यांचा,
" 'मदर', 'माय',एकच असते !
भक्ती देवाची असो वेगळी,
शक्ती भक्तीची सारखीच असते !"
ईथे मात्र श्री गणेशाच्या देशात,
बसतो गणपती अनेक रुप,वेशात !
प्रत्येकाचा गणाधीश असतो वेगळा,
देव एकच पण का आत्मा वेगळा ?
लालबागचा राजाच का असतो श्रेष्ठ ?
शेजारचा गणोबा का मानावा
कनिष्ठ ?
आकृती वेगळी,प्रकृती एक,
अलग निष्ठा सकलांच्या,
पण असते भक्ती नेक !
मंदिर, मस्जिद कि असो गिरीजाघर,
गुरुव्दारा वा अन्य प्रार्थना घर !
नमते मान भक्तांची तेथे,
जिथे भक्ताचे स्वत्व संपते !
मानव जात मानुनी एक,
जगु सकल बनुनी नेक !
गणेश येशुच नव्हे,
देव सकलांचे एकत्र नांदतील,
भक्त आरती प्रेअर अन्य प्रार्थना गातील !
नमन असो त्या सर्व देवा,
वाटो न कुणाला कुणाचा हेवा !
मन असेल घर देवाचे,
अमूर्त रुप जिथे भगवंताचे !
अशा भक्तीस्तव एकत्र येऊ,
भगवंताचे सकल गुण गाऊ !
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,
डहाणु रोड, (पुर्व).
मो.०९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.