"माता मी,तु बालक व्हावे!"
रक्ता मांसाचे तव,घेऊन दान ,
नव मास,नऊ दिनाचे उठवुन बस्तान !
श्वासात तुझा हुंकार घेउन ,
अवतरलो जगी या बालक होऊन !
पहिला मायेचा स्पर्श तु दिला ,
प्रथम अविट घेतले तु चुंबन !
ऊरी कवटाळुनी दिधले मजला ,
प्रथम प्रदीर्घ तु दृढ आलिंगन !
अवतरलो जेंव्हा मी या जगती ,
ना राहिलिस तु कन्या,भगिनि !.
सखीपण तुही विसरली कणकण ,
मातारुप सरस ठरे कांकणभर !
ममतेने मज स्तनपान करवुन ,
दुग्धामृताचे झरे पाझरवुन !
प्रथम कण अन्नाचा भरवुन ,
घेतले अन्नपुर्णेचे रुप साकारुन !
दिन रातीला एक करुनी ,
देहभान संपुर्ण विसरुनी !
शिंपत गेली माझी काया ,
जीवनपुष्ष मम आले ऊमलुनी !
मायेचे अधिकतर पाश तोडुनी ,
घेतले जीवन मज संगे जोडुनी !
देह,रुप, मम भरली काया ,
हरखे तव जीवन मम निरखाया !
स्रित्वाचे नव रुप मी देखिले ,
तरुण मन मम मग लागु बावचळे !
उसवली नाजुक मायेची विण ,
लागल्या जाऊ दिन रात्री तुजविण !
जगताची ही रीत निराळी ,
वाढे खोड,विसरते पाणी !
घरटे माझे स्वतंत्र आणि ,
झोपडीत तव करूण कहाणी !
परी नैराश्याचा लवलेषही नाही ,
दुखले मला,तव डोळा पाणी !
आयुष्य माझे धुंद फुंद अन ,
कण्हत असे तव मंजुळ वाणी !
मनात माझ्या असे किती पण ,
सोडुन स्वार्थ आणि मीपण !
तुझाच फक्त मी बालक होऊन,
संपवावे मी माझे जीवन !
पण घडले नाही असे कधीपण ,
आक्रमित मी होतो जीवन !
नियती क्रुर मग हसली एक दिन ,
ठेऊन गेली मजला तुजविण !
मायेचे अस्तित्व उडाले ,
तव रुपच केवळ मनी राहिले !
कितिही पुजीन जरी ते मनोभावे ,
दु:ख माझे हे मजलाची ठावे !
मानव जन्म का मिळे फिरुनी ?
भटकुन येऊ मग सहस्र योनी !
माता मी,तु बालक व्हावे ,
मातृ दु:ख किती ते मीही पहावे !
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,
रामजीपार्क सोसायटी,
डहाणुरोड,(पुर्व),
मो.09923004895.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.