स्थिर आरोग्याकडे वाटचाल...
आपलं आरोग्य गंभीर आजार (उदा- कॅन्सर, किडनी निकामी होणं, अर्धांगवायू, उच्च व कमी रक्तदाब, चौथ्या क्रमांकावर गेलेला क्षय,व इतर) बरा होण्याचं प्रमाण खुपच कमी आहे, म्हणून आपण आजार होवू नयेत ह्यासाठी खूप काळजी घेणं आवश्यक आहे. शिवाय मोठे गंभीर आजार झाल्यावर त्या व्यक्तीच्या जीवनातला आनंद नाहीसा होतो, कुटुंब दुःखी होते, आपण मर-मर राबून कमावलेला पैसा दवाखान्यात व औषधात निघून जातो, वाट्याला फक्त दुःख.
आजकाल आपण वाढवलेल्या अनावश्यक गरजा व स्पर्धा ह्या गोष्टींमुळे आपण पंधरा ते वीस वर्षे शिक्षण व तीस ते चाळीस वर्षे नोकरी किंवा व्यवसाय करत असतो. ह्या सर्व प्रकारच्या कामात आपण कष्ट/श्रम/शारीरिक मेहनत ज्याला आपण व्यायाम असे म्हणतो ते होत नाहीत. झाले तरी खूपच कमी. शुद्ध व वेळेवर अन्न पाणी नाही, प्रदूषित वातावरण, कामाचा, प्रवासाचा त्रास, तणाव; माझे कसे होईल, नोकरी लागेल की नाही, लागली की टिकेल की नाही, लग्नाचा ताण, घराच्या कर्जाचा ताण, गाडीच्या कर्जाचा ताण घरातील इतर अनेक गोष्टीचा ताण. अशात अवेळी जेवण व अवेळी झोप तीही अपुरी ह्या सर्व गोष्टींमुळे आपले आरोग्य खूपच लवकर खराब होऊन आपल्या जीवनात निराशा व दुःख वाढते व मागच्या सर्व चुका आपल्याला आठवतात. पण काही इलाज नसतो. म्हणून आपण आपल्या सवयी थोडया बदलू शकतो व खूप आनंदी राहू शकतो तेही सहजपणे व हे खूपच सोपं आहे, फक्त दिसताना कठीण दिसते एवढेच.
चांगल्या आरोग्यासाठी
1. भरपूर शारीरिक कष्ट/श्रम/व्यायाम (आपल्या वयानुसार व शारीरिक क्षमतेनुसार) उदा. चालणे, धावणे, व्यायाम, मैदानी खेळ, रोजची घरातील कामे, विहिरीतून पाणी काढणे व ते वाहून आणणे, हाताने कपडे धुवणे व इतर पारंपरिक सुतारकाम , लोहारकाम, मच्छीमारी व अन्य कष्टाची कामे व शेतीची कामे करणाऱ्याला वेगळ्या व्यायामाची आवश्यकता नसते. ह्या कामात माणूस तल्लीन होऊन काम करतो. अंगावर ऊन पडते त्यामुळे ड जीवनसत्त्वे कमी पडत नाहीत. खूप घाम निघतो; आपोआपच भरपूर पाणी प्यावे लागते. स्वतः अन्न पिकवल्यामुळे शुद्ध व भरपूर अन्न मिळते व आपोआपच चांगली झोप लागते व आपले आरोग्य खूप चांगले राहते. आपण आपल्या घरातील गावातील वडीलधारी व्यक्तींकडे पाहिल्यास आपल्या सर्व लक्षात येते. आपल्या शरीरात खूप चरबी आहे ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याला अजिबात कष्ट नाहीत किंवा खूप कमी आहेत. चरबी हे आजाराचं बीज आहे. म्हणून स्तुलपणा नको काटकपणा हवा.
2. वेळेवर व शुद्ध अन्न (ज्यामध्ये रसायने मिसळली नसावीत, कच्च अन्न सर्वोत्तम जे शक्य आहे ते उदा. गाजर, बिट, मुळा, मेथी, कोथिंबीर व इतर, उकडलेले ही उत्तम व कमीत कमी प्रक्रिया केलेले) जंक फूड, बाहेरील अन्न टाळावे. आधीच आपल्याला कष्ट नसल्याने आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यात आणखी चूक नको. दारू, सिगारेट, तंबाखू व इतर कोणत्याही प्रकारचे व्यसन नको.
3. वेळेवर, पुरेशी व शांत झोप किमान आठ तास. सोळा वर्षाखालील मुलांना दहा तासापेक्षा अधिक. अलार्म ची झोप नको. आपल्याला सात-आठ तास झोप लागत नाही ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रचंड ताण आहे, किंवा शारीरिक श्रम खुपच कमी आहेत. शक्य झाल्यास पंखा व AC शिवाय झोपायचा प्रयत्न करणं. खोलीच्या खिडक्या बंद करून कधीही झोपू नये. मच्छर असल्यास मच्छरदाणी मध्ये झोपावे. फ्रिज, पंखा व एसी मुळे स्थूलपणा लवकर येतो. एसीसाठी खिडक्या बंद ठेवतो त्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिजन सोबत कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण वाढुन कॅन्सरचा धोका निर्माण होतो. टिव्ही व मोबाईल जास्तीत जास्त अर्धा ते एक तास.
4. स्वच्छता/सफाई
बाहेरील - आंघोळ, परिसर, हवा व इतर सर्व.
आतील - आंगातील घाम निघणे, लघवी संडास तुंबून न ठेवणे, नख, केस व इतर सर्व.
5. तणाव/ताण - कुठल्याही प्रकारचा ताण घेवू नये. ताण शरीराची करतो घाण। शरीरशास्त्र हा खूपच मोठा विषय आहे पण सर्वसाधारण पणे खालील अतिमहत्त्वाचे साधे निसर्ग नियम पाळले तरी आपण आजारांपासून सहजपणे लांब राहू शकतो. ते म्हणजे भरपूर शारीरिक श्रम, वेळेवर व शुद्ध अन्न, लघवी संडास साफ, अंगातून घाम फुटला पाहिजे, अंगावर ऊन पडलेच पाहिजे, तणाव नको व शांत व पुरेशी झोप. हे असेल तर इतर कोणत्याही प्रकारचे नियम पाळले नाहीत तरी चालतील. पण हे निसर्ग नियम पाळले नाहीत तर कुठल्याही प्रकारचे उपाय निरर्थक ठरतील.
सर्वसाधारण आहाराच्या वेळा प्रत्येक चार तासाने
सकाळचा नाश्ता 0800
दुपारचं जेवण 1200
दुपारचा नाश्ता 0400
रात्रीचे जेवण. 0800
लहानांनी ९ वाजे पर्यंत व मोठ्यांनी दहाच्या आत झोपल्यास उत्तम. जेवणाची व झोपण्याची वेळ एकच ठेवा. अशा महत्वाच्या गोष्टी आपल्याला काही डॉक्टर व इतर वडीलधारी मंडळी समजून सांगत असतात, पण आपण ते मनावर घेत नाहीत. तस न करता आपल्या शरीराला खूपच महत्त्व दिले पाहिजे व गंभीर आजारा पासून तर दूर राहिले पाहिजे. तर आणि तरच आपण जीवनातीला सर्व प्रकारचा आनंद शेवटपर्यंत घेवू शकू.
स्पर्धा हे दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. गरजा कमीत-कमी करून निसर्गाचे नुकसान न करता किंवा कमीत-कमी करून जगल्यास जीवनात फक्त आणि फक्त आनंदच आहे. माणसाला गंभीर आजार झाल्यावर तो सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न करतो व दगदग बंद करतो, किंवा कमी करतो व तो बोलतो 'आता बस झाली ही दगदग, त्रास'. पण वेळ निघून गेली की काहीच फायदा होणार नाही. म्हणून आजपासूनच मी हे निसर्ग नियम पाळीन व माझ्या कुटुंबातील सदस्य व मित्र, समाजालाही पाळायला लावीन असा आपण सर्व प्रयत्न करु.
- कुंदन मधुकर राऊत, नरपड ता-डहाणू, पालघर 7276613732
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.