बोलून बोलून थकते तरी
हबडं तीयं दुखे नय
आल्या गेल्याई विसारपूस
करते आमशी पाटलीण बाय ।
तिला कवाव कोणसं
काय केल्या पटे नय
मनात आलं बोलून गेली
भीड भाड कवा ठेवी नय ।।
पोरा टोराया विसार करते
जकल्यात ती पुडे हाय
फणसावाणी काटे तरी
मनात ती गोड गरा हाय ।
वय जालं सालवे नय
हेतामन ती धावत जाय
शा, रोटी, विडी-काडी
विसार पूस ती करव्या जाय ।।
नागऱ्या दादा खेडते तय
बांदावर ती ऊबी हाय
अटे खेडलं, तटे रेलं
काय केल्या ओगी नय ।
गावामन ते तिया पुडे
बोलव्या कोणशी हिम्मत नय
तिला पावता बोबडी वळते
अहि आमशी पाटलीण बाय ।।
-- चारुशील पाटील, वरोर
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.