मायी सख्खी धाकली बईण ,अलकायं दि.०८—०९—१६ ला वयाया ५९ व्या वहरास ,अकाली दु:खद निधन झालं.
तीया आठवणीहाटी या काही दु:खद ओळी.
मायी वाडवळी कविता
"दुखदायक वाटेल लोढणें"
अंत तुया जीवनाया, अलका,
दु:खद, तहास ,अकल्पित हाय!
होडून गेली तू ,भोठी भावंडं,
दिला देवानं अजबस न्याय!
तीन भाहा न तीन बयणींय,
कुटूंब आपलं खुषीत होतं!
आय बाबायं प्रेम न माया,
नियतीया होता, वरदहस्त!
फुटले पंख, न उडून गेली,
आपण पाखरं ,आपापल्या घरी!
भेटत रेलो, सुख दु:खाला,
आलं गेलं जे ,आपल्या वरी!
बाबा गेले,गेली आई,
तून ते केली ,घणीस घाई!
भोट्या आमशा ,चार भावंडांया,
हक्क मात्र तू, हिरावून नेई!
रक्षाबंधन न भाऊबीजेया,
स्तब्ध होईल ,आता सोहळा!
आठवण तूयी ,येवून हरघडी,
ओघळतील आमशे ,अश्रू घळघळा!
निहली तून, मायेरशी साडी,
धन्य झाली तुयी, पार्थिव कुडी!
आय बाबाया मेरे, पयली जाऊन,
जकल्यावर केली ,तून ,वरकडी!
दिही येतील,दिही जातील,
आठवणीं तुया ,निंगत रेतील!
भगिनि आमशी ,आम्हात नाही,
शल्य उराला टोसत रेईल!
भेंट आपली तवास होईल,
खपेल ,आमशेपण, दु:खद जीणें!
तव परयंत, ये जीवन मणजे,
दुखदायक वाटेल ,लोढणें!
—सुहास काशिनाथ राऊत,(वरोरकर),09923004895. डहाणू रोड,(पुर्व).
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.