Suhas

Suhas Raut

मी सुहास काशिनाथ राऊत,वयाच्या पासष्टीत आहे.वरोर,तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर हे माझं गांव.वडील कै.श्री काशिनाथ केशव राऊत हे वरोरच्या वाडीआळीतील तर आई कै.सौ.शशिकला (पुर्वश्रमीची मनु पांडुरंग पाटील) ही पण वरोरच्याच पाटील आळीतील.०८ आक्टोबर १९५३ ला वरोरला आजोळी माझा जन्म झाला.आम्ही ३ भाऊ,३ बहिणी.माझा नंबर तिसरा.त्या वेळी "हम दो!हमारे दो!"चा नारा नव्हता.नाहीतर माझा तिसरा नंबर लागलाच नसता. वडील राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक,नोकरीच्या अखेरच्या कालखंडात शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत्त झाले.आई गृहीणी.वडीलांना समाजसेवेचीही आवड होती.आम्ही सोमवंशी पाठारे क्षत्रिय ( वाडवळ) समाजातले.सदर समाजाचे अध्यक्षपदही वडीलांनी भुषविले.वडील अभ्यासात हुशार होते.पुर्वीच्या फायनल ( ईयत्ता ७ वीच्या) परीक्षेत ते ठाणे जिल्ह्यात प्रथम आले होते,तर प्राथमिक शिक्षकांच्या पी.टी.सी.(आताच्या डी.एड.समकक्ष) परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले होते.त्यांना लेखनाची आवड होती.त्यांच्या २५० कथा,कविता,लेख,२५ नियतकालिकांतुन प्रसिध्द झालेल्या आहेत. मला लेखनाचा वारसा त्यांच्या कडुनच लाभला.वडीलांच्या नोकरी निमित्त आम्ही वरोर,निर्मळ,सातपाटी,तलासरी,बोर्डी,चिंचणी येथे राहिलो. माझे प्राथमिक शिक्षण वरोर व तलासरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत,तर माध्यमिक शिक्षण ठक्करबाप्पा हायस्कुल,तलासरी व के.डी.हायस्कुल,चिंचणी येथे झाले.खासदार कै.श्री चिंतामण वनगा हे माझे वर्गमित्र,आम्ही तलासरीला ईयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत एका वर्गात शिकलो.एफ.वाय. व इंटर आर्टसला मी मुंबईच्या पार्ले काॅलेजला होतो. परिस्थितीवश नोकरी करणे भाग पडल्याने मी एप्रिल १९७४ ला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मिळालेली निम्नस्तर लिपिकाची पहिलीच नोकरी पकडली.पुढील शिक्षण बाहेरुन करण्यासाठी पुणे विद्यापीठ तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठात प्रवेश घेतला पण संसार व नोकरी या मुळे बी.ए.होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पेण,डहाणु,तलासरी,पालघर,बोईसर,वसई येथे ३७ वर्षे नोकरी करुन आॅक्टोबर २०११ ला ऊच्चस्तर लिपिक पदावरून सेवा निवृत्त झालो.सेवानिवृत्ती नंतरही ५ वर्षे जानेवारी २०१६ पर्यंत विद्युत मंडळात बाह्यश्रोत पध्दतीने काम करीत राहिलो.जुलै २०१६ पासुन एका सुरक्षा एजन्सीत काम करीत आहे.सध्या डहाणु पुर्वेला कॅनरा बॅंकेत आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी १४ आॅक्टोबर १९७५ ला नरपड, (दक्षिण आळी)तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर येथील कु.कल्पना अरूण पाटील,त्या वेळचे वय वर्षे १६ हिच्याशी प्रेमविवाह झाला.एक मुलगा वय वर्षे ४१ व एक मुलगी वय वर्षे ३८ आहेत.दोघां कडुन वय वर्षे १३ व वय वर्षे ३ चे नातु आहेत. २५ वर्षे वाणगांवला वास्तव्य होते ११ वर्षांपासुन डहाणुला वास्तव्य आहे. वयाच्या १८ व्या वर्षी माझी पहिली कथा प्रसिध्द झाली.आज पर्यंत २५ नियतकालिकांतुन १०० च्या वर कथा,कविता,लेख व स्फुट लेखन प्रसिध्द झाले आहे. वाॅटसअप व फेसबुकवरही मराठी व बोलीभाषा वाडवळीत लेखन करतो.दिनांक २८ जानेवारी २०१८ ला सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ ट्रस्ट फंडाचा "सौ.जया लीलाधर चौधरी—पुरस्कृत लेखक/ कवी प्रोत्साहनपर गुणवंत गौरव पुरस्कार"मिळाला आहे. —सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु,09923004895.

"लगीन मायं!सेलिब्रेशन सायबाय.!!"

2312


         "लगीन मायं! -  सेलिब्रेशन सायबायं!!"


लेखक:—सुहास काशिनाथ राऊत-वरोरकर, डहाणु,०९९२३००४८९५.

(१)
     आमशा घरसं पयलं लगीन दि.२७ मे १९६७ ला आमशी भोटी बयीण प्रतिभा ताईयं झालं.  दुहरं लगीन वास्तविक पावता सिनिआॅरीटी परमाणे माया भोटा भाहा प्रकाशसं होव्या पायजे होतं,पण त्याया कुंडलीत तवा बाशिंग बळ नव्हतं.मीनस त्याया आदी पोरगी पटवली न लग्नाहाटी मी सिध्द हाय अह जाहीर केलं.माया प्रेम विवाह.माया प्रेमायी गाडी कवडीक अडवुन ठेवव्यायी भगुन त्यानं हिरवा बावटा फडकवुन मला सिग्नल देत हांगटलं,
     "तु लगीन करून मोकळा हो,मायं लगीन होवव्यायी  वाट नोको पावु."
     तवा मी पक्का नास्तिक न रुडी न मानणारा होता.(आता मात्र पक्का आस्तिक हाय.)तुळशिया लग्ना आदी १४ आॅक्टोबर १९७५ ला मीन रजिष्टर पध्दतिनं डहाणु किल्ल्यावर जाऊन लगीन नोंदलं.लग्नायी सरकारी फि होती आठ आणे.आता आठ आणे कोणी घेतव नय पण तवा आठ आण्यात मीन लगीन केलं.लग्नाया पत्रिका छापल्या नय,कोणाला तोंडीव बोलावण केलं नय,तवा आमी तलासरीला रेतोये,तलासरीहुन माया बोरबर आलेली वर्‍हाडी मंडळी मणजे माये बाबा,मायी आई,भोटी बयीण प्रतिभा न तिये यजमान नांदगांवकर भावोजी विद्याधर,प्रकाश न विकास ये दोन भाहा न  माधुरी न अलका या दोन बयणी.माया हगट फक्त ९ माहणं.वर्‍हाडा हाटी नय कार का लाॅरी.जकले तलासरीहुन येस्टीया लाल डब्यात बहुन आले.प्रत्येकी १ रुपया १० पैशे तिकिट होतं.डहाणु स्टेशनार ऊतरले.टांग्यात बहले,टांगा प्रत्येकी ८ आणे.किल्यामेरे ऊतरले न टांगा टाकत किल्ल्यावरशा रजिष्ट्रार आॅफिसमन पोसले,वधु मंडळी त्यांशा मालकिया रिक्षात आलती,ते पासस जण होते.नवरी कल्पना,तिया बाबा पी.अरुण,(त्यांस त्यांशा बाबानं ठेवेलं नांव पांडुरंग पण त्या काळी नरपडशा नवतरुण मंडळीत आधुनिकतेयं वारं वावतोय तवा त्यायीन जुनी वाटणारी नांवं बदलुन नविन नांवं धारण केलती. माया हअर्‍यान नवं नांव घेतलोय अरुण भगुन पांडुरंग मनसा पी. न नवं नाव अरुण लाऊन ते पी.अरुण नावानं वावरत.),कल्पनायी भोटी बयिण मीना,तिया लाडका भाहा सुनील न माया सखुमावशीया पोर/सुनीलसा सख्खा सुलत भाहा(पण त्यांसं नातं भाहापेक्षा मित्रत्वाय घणं होतं) अह्या एकुण चौदा जणाया ऊपस्थितीत सरकारी रजिस्टरवर सह्या करुन आमी सात फेरे न मारता एकमेकाये कायदेशीर नवरा बायको झाले. माया बयणीईन त्यांशा वयनीया गळ्यात मंगळसुत्र बांदलं,माया हअर्‍यानं ऊपस्थितांना पेडे वाटले  न थंडगार गोल्डस्पाॅट पाजलं.दोन रिक्षात बहुन आमशी नावळ नरपडा गेली,माया हअर्‍यानं मला   पुर्व कल्पना न देता भोट्या भक्तिभावानं लग्नानिमित्त सत्यनारायणायी पुजा ठेवलोयी पण माया त्या वेळशा नास्तिक मनानं पुजेवर बहव्याला ठाम नकार दिला,शेवटी माया कोवारा मेवणा सुनील एखलास पुजेवर बहला,लग्नाया पुजेत नवरा बायको ऐवजी मेवण्याला बहवं लागलं,मला वाटते अही हिंदुस्थान मनशी ती पयली न शेवटशी पुजा अहवी.पुजा खपव्या आदीस आमी नरपडासन पोरी घेऊन निंगाले न डहाणु स्टेशनार आले,हांशी डहाणु—ऊधवा येस्टी पकडुन तलासरीला घरा गेले.
     हान्शे सात वाजता तलासरीला घरा मेरशा बस स्टाॅपवर ऊतरले.तयस आमशा घरा बाजुला रेणारे वाडवणकर आप्पा ऊबे होते,त्यायीन माया बाबांना विसारलं,
     "कय जाऊन आले राऊत गुरूजी सहकुटुंब?"
     "सुहासशा लग्नाला!"माये बाबा ऊत्तरले.
     आश्चर्यचकित झालेल्या त्यांशे पुडशे सवाल जबाब आयकव्या मी तय ऊबास नय रेला.
     लग्नानंतर मी तलासरीयास माया लाईटशा हाफिसमन हजर झाला.जकल्या स्टाफमन माया लग्नाया चर्चा रंगल्या.हान्शे पास वाजता हाफिसशे बाॅस श्री सरमंडळ सायेब साईट वरसन आॅफिसला आले,त्यायीन मला त्यांशा कॅबीनमन वारटलं.मी गेल्यावर त्यायीन मला बहव्या हांगटलं न विसारलं,
     "काय राऊत एकदम गपसुप लगीन केलं?आमाला वारटल पण नय?"
     मीन त्यांस बोलणं हअण्यावारी नेलं.
     त्यायीन लक्ष्मण शिपायाला वारून जकल्या स्टाॅफहाटी थंड मांगवलं न मला हांगटलं,
     "परवा रयवार हाय,त्या दिहा हान्शे तुमी बायकोला घेऊन दापचरीला माया क्वार्टरवर या शा पाण्याला."
     मीन होकारात्मक मान डोलवली.

(२)
     रयवार ऊजाडला,दापचरीला सायबाघरा जाव्या हाटी आमी दोगं तयारी करून हान्शे साडेपास वाजता घरा बायेर पडले.
     तलासरी ते दापचरी अंतर अहेल अंदाजे ४ ते ५ किलोमीटर,तवा तय रिक्षाव नवत्या,माया मेरे फटफटीव नवती,तहा कोवारा अहताना मी मित्रांबरोबर अवडं अंतर रोज गप्पागोष्टी करत आरामात तुडवत अहे.कल्पनाला तलासरीव दाखडव्या होतं भगुन आमी पाईस निंगाले,रस्त्यारसन येणारे जाणारे आमाला कुतुहलानं न्याहाळतोये,मंगारसन माना वेळाऊन पावतोये.ओळखीये भेटले त्यांना कल्पनायी ओळख करून दिली,अवेळी,तडका फडकी न कोणाला न हांगता लगीन केलं भगुन जकलेस असंभीत होते.बर्‍यास बायका कल्पनाला मयने तर नय रेले न?अह्या दृष्टीनं न्याहाळतोये.
     तलासरी गांवायी शीव ओलांडली तहे आमी एक दुहर्‍याला खेटून सालव्या लागले.एकमेकाये हात हातात घेतले.अजुन दापचरीला पोसव्या हाटी ३ किलोमीटर अंतर कापव्या होतं.
      अवड्यात एक कार रस्ता होडुन आमशामेरे येऊन करकचुन ब्रेक मारत थांबली.कल्पना घाबरून मला बिलगली.आमी रस्त्याया कडेला होव्या लागले तवड्यात कारसा ड्रायवर मुंडी बायेर काडून बोलला,
     "अरे पळतात क्याला?तुमशा हाटीस थांबवलीय मीन कार."
     तो मोहीते शेटसा पोर विजय होता.
     आमी कारमन बहले,मीन विजयला कल्पनायी ओळख करून दिली.
     "कय सालले तुमी?"
     त्यानं आमाला विसारलं.
     "दापचरीला."
     मीन हांगटलं.
      "बापरे! तलासरी पासुन पास किलोमीटर न, नव्या नवरीला घेऊन सालत?अह्यान ते नवी नवरी घरा जाता खोटीस निजुन जाईल!"
     विजयशा बोलण्यार आमी तिगवे खळाळुन हाअले न त्यानं गाडी सालु केली.
     आमाला दापचरी नाक्यार पोसव्याला पास मिनटंव नय लागली.आमी ऊतरले,
     "वयनीला घेऊन आमशा घरा जेव्व्याला ये."
     अहं निमंत्रण देऊन त्यानं कार सालु केली.
     आमी सायबाया घरायी बेल वाजवली तवा हान्शे साडेसहा वाजलोये.दरवाजा उंगडला गेला,दारा मंगरायी सायेब ऊबे होते, बवतेक दुफारशा लांब्या निजेसनस ऊठले होते.
     "अरे राऊत तुमी?या! या!!मी ते विहरूनस गेलता तुमाला वारटलोयं ते."सायेब बोलले.
     आमी मनत जाऊन बहले.सायबानं हाक मारली,
     "माणक!"
     तही लाल रेशमी हाडी निहलेली,बिन बाह्यायं पोलकं घातलेली, एक गोरी,नाजुक,सुंदर बाई आपले मोकळे,लांबहडक काळे केस हावरत मनशा खोलीसन हाॅल मन आली.
     "मायी बायको माणक."सायबाईन ओळख करून दिली.
     आमीन नमस्कार केला.
     "ये राऊत दांम्पत्य!त्या दिहा मीन तुला वार्ता केलती ते.आज मीन त्यांना वारटलंय ये मी तुला हांगव्याव विहरलो."सायेब आमशातटे पावत त्यांशा बायकोला बोलले.
     "तुमी हातस तहे विहरभोळे!हान्शे न विहरता बरोब्बर घरा येतात ये मायं नशीब."सायबायी बायको लटक्या स्वरात त्यांना बोलली.
     तियं बोलणं सायबानं हअण्यावारी नेलं.
     मंग सायबाया बायकोनं मनत जाऊन आमशा हाटी शिवडा,लाडु न सरबत आणलं.त्याहा समाचार घेऊन वार्ता करता करता हान्शे साडे सात वाजले.काळोख दाटव्या लागला.सायबाया निरोप घेत मीन हांगटलं,
     "आता निंगतात आमी."
     "सला आमी होडतात तुमाला,आमालाव एका फंक्शनला जाव्या हाय."अहं हांगुन सायबानं बायकोला तयारी करव्या हांगटली.
     अरद्या तासात सायबायी बायको नटुन थटुन बायेर आली.ती पयल्या पेक्षा घणीस आकर्षक न खुष दिखत होती.
     सायबानं ड्रायवरला हाक मारली.तो मनत आला,हाफिससास ड्रायवर होता शंकर, त्यानं आमाला नमस्कार केला.सायबाया बायकोनं त्याया मेरे काय सामान दिलं ते घेऊन तो बायेर गेला.आमीव बायेर पडले.
     "बहा कारमन."
     कार मेरे येतास सायबानं आमाला हांगटलं.आमी दोगवे कारमन बहले.मंगारसन सायेब न सायबायी बायकोव कारमन सडल्यावर सायेब ड्रायवर शंकरला बोलले,
     "सल शंकर."

(३)     
     डायवर शंकरजुन गाडी स्टार्ट केली,सायबानं त्याया कानात कायतरी हांगटलं,आमाला ते आयकव्या नय आलं.त्यानं गाडीया स्पिड वाडवला.दोनक फर्लांग गेल्यावर गाडी तलासरीया रस्त्या ऐवजी दापचरी डॅमशा रस्त्यार वळली,मीनं शंकरसा खांदा हालऊन  हांगटलं,
     "अरं शंकर,अटे कय वळते?आमाला ते तलासरीला जाव्या हाय."
     "सायबांना होडव्या हाय डॅमवर."तो हाअत बोलला.सायेबव हाअले.
     तिन किलोमीटर जाऊन गाडी डॅमसं सडण सडुन कुर्झे डॅमवरशा दापचरी रेस्ट हाऊसशा दारात ऊबी रेली.
     डायवर शंकर ऊतरला.सायेबव ऊतरले.
     "सला राऊत,ऊतरा."सायेब मला बोलले.
     "नय सायेब,फंक्शनसं आमंत्रण तुमाना हाय,आमाला येव्याला ओसब वाटेन. तुमी आमाला तलासरीला होडव्या हांगा शंकरला."मीन हांगटल.
     "अरे राऊत,तुमशा लग्नानिमित्त मीनस ठेवलाय यो फंक्शन,तुमीस आजशे मुख्य पावणे,सला जकलेजण आपली वाट पावत अहतील."सायेब बोलले.
     आमाला आश्चर्य वाटलं,गाडीसन ऊतरून आमी जकलेजण गेस्ट हाऊसशा मुख्य हाॅलमन आले.तय आॅफिससा चित्रे सिनिअर क्लाॅर्क, राऊत ज्युनीअर क्लाॅर्क,स्मार्त नांवाया टायपिस्ट,लक्षी काकड नांवाया शिपाई न शिंत्रे नांवाया लाईनमन न लक्ष्मण प्रजापती नांवाया आफिससा ट्रक डायवर अवडे मोजकेस लोक होते.मस्त पैकी टेबल सजऊन त्यावर आमशा नांवाया दोन ह्रदयाया आकाराया केक ठेवलोया.आजु बाजुला फुलायं डेकोरेशन करुन आमशा स्वागताया बोर्ड लिवलोया.
     "तुमाला वारटलोयं ते विहरला."अहं घरा हांगणार्‍या सायबानं आमशा लग्नानिमित्त अॅरेंज केलेली पार्टी पाऊन आमी अचंभित तर झालेस पण आमाला गहिंवरून आलं.
     जकले टेबला भोवती गोळा झाले, केकवर एक एक मेणबत्ति ठेवली गेली,लक्षी शिपायानं खिशाशी आगपेटी काढुन दोगव्या  मेणबत्त्या पेटवल्या न आमशा हातात एक एक सुरी दिली.आमी मेणबत्त्या बिजवव्याहाटी फुका मारल्या न केकशा ह्रदयात सुरी खुपसुन त्या दोनव्या ह्रदयरुपी केकशे तुकडे केले.सायबानं एक तुकडा माला भरवला न सायबाया बायकोनं एक तुकडा कल्पनाला भरवला.
     सायबानं दोन शब्द हांगव्या सुरूवात केली. 
     "मी मध्यप्रदेशशा ऊज्जैनसा. आमसं घराणं कर्मठ बामणायं घराणं.मायी बायको बंगाली.ते सहकुटुंब ऊज्जैनला ज्योर्तिलिंगायं दर्शन घेव्या आलते.मीन त्यांना गर्दीत दर्शन घेव्या मदत केली.जाताना मीन तिया हातात मायं कार्ड दिलतं.त्या कार्डावरसा पत्ता खोळत त्या वहराया दिवाळीत पोस्टमन आमशा घरा आला न माया हातावर एक शुभेच्छा कार्ड ठेवलं.तिनं दिवाळी निमित्त धाडेलं ते शुभेच्छा कार्ड होतं,त्या कार्डावर एका अबोध पोरीयी निरागस तसबीर होती न बाजुला लाल गुलाबायी एक नाजुक कवळी कळी छापेली होती.क्या कोण जाणे पण ती तसबीर न गुलाबायी  कळी पाऊन मायं मन फुलुन आलं.मीन खुष होऊन पोस्टमनला भरघोस दिवाळी दिली न ऊत्तरादाखल तिला पाण्याया थेंबाहाटी आसुसलेल्या चातक पक्षायं शित्र अहलेलं  एक सुब्बेच्छा पत्र धाडलं.त्याहा परिणाम होवव्याया तोस झाला, त्या वहरा मुसळधार पाणी कोंसळला,ऊज्जैनशी क्षिप्रा नदी पात्र ओसंडुन वावली,आमशात मैत्री वाडली,प्रेमपत्राया धुंवाधार पाऊस सुरू रेला पण बिजी दिवाळी येयी पर्यंत जकल्यावर साप विरजण पडलं.बिज्या दिवाळीत तिया सुब्बेच्छा पत्रा ऐवजी तिनं निराशेनं लिवलेलं पत्र मला मिळालं,गणगोत,जातपात नहलेलं आमसं नातं त्यांशा कर्मठ घराण्यानं साप नाकारलं होतं,अवडस नय ते तिया बाबानं तियं लगीन लवकरात लवकर बिज्या ठिकाणी करव्याया घाट घातला.निराश मनाया मी क्षिप्रानदीया घाटावर जाऊन जीव देव्याया पवित्र्यात ऊबा रेला,पण त्या भोळ्या शंकराया देवळाया कळसायं अंतीम दर्शन घेता घेता मला एकदम साक्षात्कार झाला,जीव देव्याया विसार पार नदीत बुडवुन मायी पावलं घरातय वळली.

(४)     
      त्या रातसा मी कुह्या बदलत रेला,हक्काळी आयजुन रातभर तळमळण्यायं कारण विसारलं.बाबा नहताना आयशामेरे मन मोकळं केलं.
     "पोरा आपलंव घराण कर्मठ हाय.आज पर्यंत रिती रिवाज न होडता तुया बाबा शेकडो लोकांना शंकराये अबिषेक घालत आलाय,तुयं ये रामायण आयकलं ते त्यांशा मनसा शंकर रूद्रावतार धारण करून तांडव नृत्य केल्या शिवाय रेणार नय.त्या पेक्षा तु तुया विसार क्षिप्रा नदीत बुडऊन  आंग धऊन पवित्र होऊन ये.
     त्यास दिहा मला एम.एस.ई.बि.त नोकरीया काॅल आला.मी मुंबयशा हाफिसात हजर झाला,जकली कथा रिटायरमेंटला आलेल्या कुलकर्णी सायबाला हांगटली.त्यानं सल्ला दिला,
     "तुमशी नवी पिडी,कर्मठ बामण अहुन तुन काॅलेज हाॅस्टेलमन अहताना मित्रांया संगतीनं मांस भक्षण केलं,काश्मिर सहलीत हिंव ऊडवव्याहाटी मजे खातर मद्यायी सव घेतली,सिगरेटसा धुर होडुन पावला,यावरून तुन मनपसंत पोरी बोरबर लगीन नय केलं ते तुया चित्तवृत्ती कवास ठिकाणावर रेणार नय,तुयं मन कायम भरकटत रेन,तवा तु जात,पात,रूडी,परंपरेयी जकली जोखडं भिरकाऊन दे,न त्या पोरी बोरबरस लगीन कर, नयते अही हिंम्मत न केलेल्या माया हरका रिटायर होईपर्यंत कोवारास रेन."
     न त्यायीन मला पंदरा दिहाया मेडीकल रजेया अर्ज देव्या हांगटला.
     त्या पंदरा दिहात मीन मित्रांबरोबर कलकत्याला जाऊन माणक बोरबर कालीमातेया देवळात लगीन केलं,पण आमशा दोगवाया घराण्यानं निर्दयीपणे आमाला थारा दिला नय.आदिस तुळतुळीत गोटा ठेवणार्‍या माया बाबानं किही वाडले नहताना मी त्यांना मेलाय अहं हांगुन परत नाव्या मेरसन माथ्यार मशीन फिरऊन घेतलं,जन्मभर रूडीनं पिसुन, आपलं व्यक्तीमत्व विहरलेल्या माया आयशे थरथरते हात ओ ला आशिर्वाद देव्या हाटी हुसलले गेले पण कर्मठ,रुक्ष बाबाया ऊपस्थितीत धाकापोटी,डोळ्यावर  खमुन आसवं पुहव्या मजबुर झाले.माया बायकोया घरशी परीस्थिती पावव्या तय जाव्यायं धैर्य आमाला झालं नय.
    मुंबयला आल्यावर मी लग्गेस कामावर हजर झाला.सड्या फटिंग कुलकर्णी सायबानं आठ दिही आमाला त्यांशा घरांत ठेवलं,न तवड्या दिहात मी दुर,एकांतात,जंगलात नोकरीहाटी मांगटलेली तलासरी हरकी जागा शोधुन अथी मायी बदली करुन देऊन मला, ते रिटायर होव्या आदी तलासरीला हजर होव्या हाटी मुंबयशा हाफिस मनसन होडुन दिलं."
(५)
     सायबायं भाषण ऐकता ऐकता जकले स्तब्ध झालते,सायबाया ते लक्षात आलं,भानावर येत हाअत ते बोलले,
     "अरे यी मी कय आमशी रडकथा हांगत बहलो?आपण ते राऊतशा लग्नायी पार्टी एन्जाॅय करव्या आलेत,घ्या घ्या केकसा तुकडा हुसला एकेकाईन न लक्षी,लक्ष्मण,शंकर तुमी टेबलावर गलास मांडा झटपट,चित्रे,राऊत तुमी बिअर,ब्रॅंडी,कोल्डड्रींकशा बाटल्या खोला न शिंत्रे,स्मार्त तुमी बामण लोक चिकन,मटणाया डीश भरून आणुन ठेवा टेबलावर."
     सायबानं भराभर आॅर्डरी दिल्या तहे जकले जण झटपट कामाला लागले.दहास मिनिटांत टेबल खाण्या पिण्याया जिन्नसानं भरून गेलं.जकल्याकडे पावत साहेब हाअत बोलले,
     "सला गड्यांनो,बहा आता चिअर्स कराव्याला."
     एकेक जण टेबला भोवतालशा खुरशा पकडुन बहले,सायबाया रिवाजा परमाणे ज्याला ज्याला जे जे पायजे त्यायीन ते ते तवडं तवडं घेतलं,"चिअर्स"च्या आवाजात गलास किणकिणली,न हास्य कल्लोळात रंगी बेरंगी मद्याये प्याले जकल्याया आसुसल्येल्या ओठांना भिडले.
     पण एकस घोट पेऊन सायेब ऊठला न मनत दोगव्या बायका बहलोया त्या रुममन गेला,दोनस मिनटांत तो हाअत बायेर आला न   दोन बिअरशा बाटल्या न दोन गलासं घेऊन परत मनत गेला.परत बायेर येऊन मटण,चिकनशी एक एक डीश मनत ठेऊन आला न आमशा घोळक्यात बहुन आमाला ऊत्तेजन देव्या लागला.
     खाण्या पिण्यात कवडा वेळ गेला ते कळलं नय,बाटल्या आडव्या झाल्या,पिणारे लोक आडवे होवव्याया आत जकले जेव्या बहले न तेट्टाऊन जेवले.
     मध्यरात्र ऊलटुन गेली,सायेब जकल्यांना बोलले,
     "आजशी आपली वहती अथिस हाय,जकल्या हाटी खोल्याय बुकिंग हाय,कोणी घरा जाव्यायी गरज नय,तवा नीजा आता आरामशीर.
     सायेब न आमी होडीत जकले त्यांशा खोल्यांत गेले.
     "बहा."
     सायेब आमाला बोलले.
     "तुमीव बहा."
     मीव सायबाला बोललो.
     आमी चौघे तय अहलेल्या खुरशांवर बहले.
     "राऊत,आज तुमशा लग्नाया निमित्तानं आमी आमशा लग्नायं रेलेलं सेलीब्रेशन केल्यायं समादान आमाला लाभलं."सायेब बोलले.
     "सायेब आमीव तुमशा आदरातिथ्यानं घणे भाराऊन गेलो." मी बोललो.
     मंग एक मेकाया निरोप घेऊन आमी आपापल्या रूममन खिरले.
     आमशी रुम डॅमशा बाजून होती,हम्मोर डॅममुळे अडलेल्या अथांग पाण्यावर पौर्णिमेया फुल्ल "मून" समकत होता न कल्पनाया रुपात "हनी"यी मादक धुंद सुराई माया पुड्यात ऊबी होती!


                                                                      ********कथन समाप्त*******

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Kunal
Kunal Raut
31-May-2018 07:50 AM

घणंस लोभसवाणी लेखन. तुमसी स्टोरी फक्कड हाय 🤗

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

0 + 1=    get new code
Post Comment