वाडवळ कट्टा: उद्देश, यश, अपेश

2219

व्हाट्सअँप वाडवळ कट्टा आयोजित "वाडवळ कट्टा-उद्देश, यश न अपेश," स्पर्धा २०१७ मधील प्रथम क्रमांक विजेता लेख, डिजिटल टीम - चौकळशीवाडवळ.कॉम च्या इच्छेनुसार खास आपल्यासाठी...

 

वाडवळ कट्टा: उद्देश, यश, अपेश

 

‘कट्टा’ यो शब्द जरी तोंडात घेटला तरी घरशी भोठी माहण कपाळावर आठ्या आणतात कारण कट्टा हांगटलं का दोन शार तरुण पोरं एकमेकाइ थट्टा मस्करी करता करता अवडी गुंतून जातात की त्यांना थट्टा मस्करीया बिज्या लोकांना तरास होथे का नय याया विहर पडते. कवा कवा भांडण होऊन ते विकोपाला जाऊन मारामारीइ परिस्थिती येते. त्यामुळे कट्टा यो शब्द तहा बदनामस. तरी पण २२.०२.२०१६ ला वाडवळ बोलीभाषेया वाडवळ लोकाना वाडवळीत व्यवार करव्याहाटी 'वाडवळ कट्टा' जलमला. आपल्या मायबोलीया प्रेमाखातीर एका वाडवळणीन आजश्या इलेक्ट्रॉनिक दुनियेमन वाट्सअपसा आधार घेत वाडवळ कट्याई मूर्तमेड रोवली. पावता पावता त्याला दिड वहर पूर्णव जाल. गरीबापासून शिरीमनतापर्यंत न होकऱ्यापासून डोकऱ्यापर्यंत जकले वाडवळ फक्त वाडवळ कट्ट्यामुळे एकोट जाल्यात. त्याला कारणव तहस हाय, जी वाडवळी भाषा/मायबोली पयली घरामन डोकरी/डाय माहण बोलव्याई, तरणी माहण बोलताना लाजव्यई, शाळेमनश्या बारक्या पोरांना ते सुशिक्षितपणाया नावाखाली घरामन वाडवळी बोलव्याई अघोषित बंदीस् होथी; ती वाडवळी भाषा/मायबोली वाडवळ कट्ट्यावर वासव्या मिळव्या लागली, हमजव्या लागली, लिव्व्या मिळव्या लागली. वाडवळ कट्ट्याया उद्देश तोस हाय, आपली मायबोली परतेक वाडवळाया घरात परतेक वाडवळाला बोलता आली पायजे, हमजली पायजे तवास मायबोलीही गोडी हळूहळू वाढत जाईन.

 

वाडवळ समाज अठरा गावामन विखुरलेला हाय अहं हाँगतात, आता ते वाडवळ देशाइ सीमा पार करून परदेशातव जाऊन पोसलय. पण एकास वेळी एकास मुद्द्यावर एकास मंसावर (कट्टा) अनेक गावामनसे अनेक वाडवळ आपल सुख-दुख, विसार, मनोगत इलेक्ट्रॉनिक माध्यमाया आधार घेऊन 'वाडवळ कट्या' द्वारे वाडवळीमन मांडतात तवा वाडवळ कट्ट्याया उद्देश साध्य जाला अहं वाटते. कारण अस्खलितपणे वाडवळी न येतासुद्धा तोडक मोडक वाडवळीत लिवणे, लिवव्या प्रयतन करणं यो एक परकारे वाडवळीया/मायबोलीया प्रसारस हाय न तो परतेक कट्टेकरी वाडवळ करते. मोडक तोडक लिवणार्याला त्याई सुक दाखवून योग्य वाडवळी शब्द हमजाऊन हांगणार्यामेरे जो वाडवळी शब्दसाठा हाय तो आपसूकस एका पिढीमेरसन बिज्या पिढीमेरे जतन केला जाते ये वाडवळ कट्ट्याय बोठ यश हाय.

 

आपल्या मायबोलीय विसमरण नय जाल पायजे, तिया प्रसार, उद्धार जाला पायजे या विसारान झपाटलेले कट्टेकर वाडवळ कट्ट्यावर मायबोलीही गोडी साकता साकता वेगवेगळ्या विषयांवर बोलव्या लागले, लिवव्या लागले, आपले विसार मांडव्या लागले. पदरमोड करून वेगवेगळ्या लेखन स्पर्धा भरव्या लागले, वाडवळी वार्तापत्र वासव्या मिळव्या लागलं, विवा प्रश्न मंजुषामन कट्टेकरी हिरहिरीन भाग घेव्या लागले. समाजात नय ते समाज्या बायेर बरी वाईट कोणतीव घटना घडली का त्या घटनेवर आपल्या वाडवळी शैलीत प्रतिक्रिया देणाऱ्या, प्रेम व्यक्त करणाऱ्या, जाब विसारणार्या, प्रसंगी शाब्दिक आसूड ओडणाऱ्या शीघ्र कवीन ते आपल्या कवितेद्वारे वाडवळ कट्टा न मायबोलीला एका वेगळ्यास उंचीवर नेऊन ठेवलंय. अहे हरहुन्नरी साहित्यिक कट्ट्यावर अहंताना वाडवळी साहित्य नावारूपाला आल्याशिवाय रेनार नय. 'शिमकोटा' ते अवडा भारी अहते का खऱ्या वाडवळाई ओळख देऊन जाते. संस्कृत भाषा हमजताना मारामार, पण संस्कृत सुभाषीताया अर्थ आज घरबहल्या मायबोलीत वासव्या मिळते फक्त वाडवळ कट्ट्यावर. वेगवेगळ्या शहरात, राज्यात न देशामन प्रवास करणाऱ्या वाडवळी कट्टेकऱ्यान आपल्या वाडवळी शैलीत केलेल्या प्रवास वर्णनात जकल्या कट्टेकर्यांना खुर्चीला खिळवून ठेवत घरबहल्या परदेश वारीव करून आणली. वादविवाद ते घणे होथात, वादविवाद होथाना कवडेतरी अस्सल वाडवळी शब्द नविनस हमजतात. ये जकले कट्टेकरी वेगवेगळ्या तरेन वाडवळ कट्ट्यावर आपले योगदान देत अहताना या जकल्याना दिलखुलास दाद देणारे, आपली घरशी काम, जबाबदारी हंबाळून वाडवळ कट्ट्यावर हजेरी लावणारे पक्के हाडाये वाडवळ आपापला खारिया वाटा उसलत अहतातस. 'तुन हांगटल न मिन आयकटल' या उक्तीनुसार आपल्या  मायबोलीया प्रेमाखातर कोणी कट्टेकरी सोताया खिशात पयला हात घालून  मायबोलीला समाजाया मुख्य प्रवाहात आणव्याहाटी आवाहन करते न त्याला रुपये 80 हजारावर निधी गोळा करून कट्टेकरी साथ देतात ये आपल्या मायबोलीवरश्या प्रेमाला न वाडवळ कट्ट्याला मिळलेलं यश नय ते का हाय ? लवकरस यो आकडा लाखावर जाईन यात शँकास नय.

 

एका बाजूला वाडवळ कट्याई गाडी हळूहळू आपला वेग वाडवत अहंताना काईजण स्पीडब्रेक र वाणी मनतस बिज्या भाषेमन घुसखोरी करतात. सोता एक वाडवळ अहूनसुद्दा आपल्या मायबोली बद्दल अवडी उदासीनता केव ? का मायबोली बोलताना कमीपणा वाटते ? वाडवळी येत नहेल ते हमजू शकते पण परयत्न करव्या का हरकत हाय ? तरी पण  त्यास त्यास सुका करणाऱ्यामूळे, वाडवळी कट्ट्याला अपयशाय गालबोट लागलंय अह वाटते. वाडवळ हाँगटला का त्याया हाडाला वळ अहतातस अहं बारकेपणी घरशी डोकरी माहण बोलताना एकटलोव. त्याया अर्थ काय ते तवा कळव्याय नय, पण हमजूतदारपणा वाढला न हाडाया वळाया अर्थ हमजला. अहे हाडाला वळ अहणारे बरेस जण वाडवळ कट्ट्यावर हात, त्यांना कट्याया उद्देश, उपेग हमजाऊन सुदा पालथ्या घड्यावर पाणी. पण वाडवळी मायबोली होडून बिज्या भाषेमन आपली हजेरी लावणाऱ्याना बायेरसा रस्ता दावडून आपल्या हाडाये वळ सत्कारणी लावण्यात वाडवळ कट्टेकरी कमी नय मिळत. त्यामुळे अपयश्याया विसार न करता, यशाया धुंदीमन जास्त वेळ न रेता, वाडवळ कट्याया उद्देशाला यशोशिखरावर नेव्याहाटी तमाम कट्टेकरी कटिबद्ध हात न रेतीन ये वेगळं हाँगव्याई गरज नय मिळे.

 

यास कट्ट्यावर येऊन गेलेला एक वाडवळी शेर या वाडवळ कट्याय मनोगत हांगुन जाते.

"दोस्ता तुन दगड जरी मारले अहते
तेव माया झोळीत भरून ठेवले अहते
जकल्याना मायतीस हाय, मी दोस्ताये तोफे नाकारे नय
पण तुन ते फुलाया हारस गळ्यात घाटला"

 

जय वाडवळ !!!

चारुशिल यशवंत पाटील,
वरोर.


 

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Jayprakash
Jayprakash Raut
20-May-2018 07:38 AM

घण मस्त वाडवळीत लिवल "जय वाडवळ"

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

5 + 3=    get new code
Post Comment