रात पावसाळी....
भरलं आभाळ हांज वेळी
आला यो पाऊस अवकाळी
शिंंब भिजुन गेली बाळी
रातशे घर सोताये धुंडाळी
खपेना ती रात वादळी
विजेेया कडकडाटाही खेळी
रात घणीस भिन्न काळी
अडकली बाय कातरवेळी
घाबरवती तिज विजेया ज्वाळी
ढग देती एकमेकां टाळी
दसकून पोर आवंढा गिळी
रडवेली ती पित्यास खोळी
खपली रातीही ती खेळी
आयकली जवा बाबायी हाळी
बिलगली पित्यास कळी
खुलली गालावरशी खळी
बिपीन पाटील , वरोर-विरार
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.