" आमशी केरळशी सहल!"
(१)
१९८३ साल,मी बोयसरला एम.एस.ई.बी.आॅफिसात कामाला होता,तय दिवाकरन नांवाया आमसा सायेब होता,मी त्याया हाताखाली कामाला होता,त्याया मायावर घणास जीव.आमशे घरगुती संबंध होते,तो आमशा घरा येव्याया,वहतीला रेव्या,त्याय लगीन जमलं,लग्नाहाटी तो आमाला त्याहा घरा,अंचालुमूड,क्विलान या केरळशा त्याया गांवी घरा घेवून गेला.तवा आमाला दोन पोरं होती.पोर स्नेहशील वय वर्ष ७ न पोरगी स्वप्नमाला वय वर्ष ३ याना आमी नरपडला हअर्या घरा ठेवलं न आमी दोगंस मज्जा करव्या दिवाकरन बोरबर त्याया गांवी गेलो.तय त्याया स्वतंत्र बंगला होता,त्यात आमाला स्वतंत्र खोली दिलती.तय मस्त केरळी कलाकुसर केलेल्या कुंड्यांत रंगीबेरंगी फुलझाडं लावेली होती,मायी बायको कल्पना /अस्मिता त्याला बोलली
"तुमशा कुंड्या घण्यास मस्त हात!'"
तो बावरला,त्यानं आजुबाजुला पावलं न तो बोलला,
"अहं तुमी दूहर्या कोणाला बिलकुल हांगू नका."
"क्या? माया बायकोनं विसारलं.
"आमशा भाषेत "कुंड्या"मणजे "कुल्ले"तो बोलला.
आमी हाऊन हाऊन पोटं दुखवली."
"तय आमी पंदरा दिही पाहुणचार घेतला.नविनस लग्न झालेलं भगून त्याला घण्या ठिकाणी वारणं होत,त्याला जय जय वारटलं तय तय त्यानं आमालाव नेलं,आमीन केरळसा यथेच्छ पाहुणचार घेतला.जकले लोक कुतूहलानं आमशा विषयी विसारतोये,आमाला कायव हमजव्या नय.तो आमाला मंग मराठीत हांगत अहे,मंग जकलेज्याम हाअत."
"त्याया एक मेवणा होता,अगदी कमल हसन या नटा हरका तो दिखव्याया,तंबाण ये त्यायं घरगुती नांव.एक दिहि दिवाकरनजुन त्याला हांगटलं,
" या दोगवाना घेवून तू कुट्रालम या धबधब्यावर जा."
आमी हक्काळीस ऊठले,दिवाकरनशी आय बोलली,
"तुमी आंगं तयस धवा,पुण्य मिळते तय."
"मला वाटलं मस्त एकांत अहेन तय नदीकाठी,मी न कल्पना मस्त एकांतात आंग धवून एक वेगळा अनुभव घेवू."
"पण तय गेले ते ई गर्दि!मीन तंबाणला विसारलं,
"अथी अही कय जागा नय कां जय मी न मायी बायको एकांतात एकमेकाया आंगावर पाणी ऊडवून आंग धवू शकू?"
"हा:! हा:!! हा:!!!"तो सात मजली हाअला!"मोडक्या तोडक्पा हिंदित बोलला,
"मीन आयकटलेलं,तुमी मुंबयशी माहणं घणी रोम्याॅंटीक अहतात,पण आज पावलं.""पण तुमाला अथी अहा ऐकांत मिळव्या नय ,न तुमी जकली लाज होडूनव वागलेलं अथी शोभव्या नय.तवा बाकी कपडे ऊतरवून जी काय, लंगोटी,अंडरवेअर अहेन त्यावरस धबधब्याखाली ऊबे र्या न थंडगार पाणी आंगावर घेवून पुण्य पदरी पाडून घ्या,"
"अवड्या लोकांत अह आंग धव्य्यायी कल्पना मलाव रूसली नय न कल्पनालाव पटली नय.तंबाणजून कपडे काढून नुसत्या अंडरवेअरवर पाण्यात बुडकी मारली.आमी दोगवं आंगं न धवतास परत आलो."
"आल्या आल्या दिवाकरनशा आईनं,
" पावण्याईन पवित्र धबधब्यात आंग धवून पुण्य कमावलं कां ?"अहं तंबाणला विसारलं. "खो$खो"हाअत त्यानं जकला किस्सा कथन केला.आमाला वरमल्या हरकं झालं,दिवाकरन सायबानं काय तरी हांगून आमशी बाजू हावरल्यायं दिखलं'"
(२)
"एक दिही आमाला दिवाकरनशा हाऊरवाडीला जेवव्या वारटलं,स्वैयंपाक तयार झाल्यावर त्यांशात कुजबुज सुरू झाली,काय तरी आमाला विसारवं अहस वातावरण होत,दिवाकरन न त्यायी बायको "नको $नको"अहस कायतरी हांगतोयी पण त्याया हअर्यान हट्टस केला,आमाला विसारव्या हांगटलंस,
दिवाकरनजुन शेवटी धीर करून आमाला विसारलंस,
"आज जी मांसाहारी मुख्य भाजी केलिय ते बैलायं मटण हाय,तुमाला सालेल का ते अहं माया हाऊरवाडीशी माहणं विसारतात."
"मला ते शिसारीस आली,मीन बायकोतटे पावलं तिनंव खाव्याला नकार दर्शवला.आमीन
"नय"
हांगटलं ,पावण्याया खास पाहुणचार होणार नय भगून जकल्यायास हिरमोड झाला,दिवाकरनशा बायकोनं जेवणाया मेनू आदी त्यांना विसारला नय भगून मायेरशाना दोष जहा दिला अह वाटलं."
"पण प्रत्यक्ष जेवणावर मी जवा काजू,बदामाया खास केरळी खीरेवर ताव मारून तेट्टाऊन जेवला तवा दिवाकरन त्यांना बोलला ,
"यो गोडाया भक्त हाय,त्याहं समाधान झालेन जेवणानं."
"पण त्याया बायकोय काय?"दिवाकरनशा हावून विसारलं."
"तिय ऊलट हाय ,ती हाय तिखटायी भक्त.तिला गोड नय आवडे अवड."दिवाकरन बोलला."पण पावा तिनं आतापर्यंत डझनभर बटाटेवडे फस्त केलेत."
"त्या मुळे जकल्यांना थोडतरी बरं वाटलं"
"बाकी जकल्याईन मात्र ताव मारून बैलाय मटण खाल्ल."
"आता यांशाहाटी ऊद्या बकर्याय मटण आणून भाजी करू."दिवाकरनशी हाऊ बोलली."
"दुहर्या दिहा आमशाहाटी खास बकर्याया मटणायी भाजी केली गेली,आमीन भितभितस ती खाल्ली ,पण दिहीभर मला वाटत रेलं,माया घाटीत बकरं नय बेंम्बाटते पण बैलस हिंग मारते."
"१७ जुलै १९८३ त्या दिहा आमी कन्याकुमारीला जाव्या निंगाले पण आश्चर्य मणजे त्यांशा घरापासुन अडीसशे मैलावर अहूनसुध्द्दा त्या लोकाईन कन्याकुमारी नय पावलोय.भगून जकलेस तयार झाले.हांनसा सूर्यास्त आमाला पावव्या होता भगून ड्रायवरजून आमाला वेळेवर आणून होडलं पण वातावरण ढगाळ होत भगून सूर्यास्त आमला दिखला नय,आमसा हिरमोड झाला."पण अरबी समुद्र,हिंदी महासागर न बंगालसा ऊपसागर या तिनव्या समुद्राया संगम पाऊन आमाला संतोष वाटला."
"ऊद्या वातावरण ढगाळ नहेन तरस तुमाला पूर्वेया समुद्रासन सूर्य ऊगवताना दिखेल अह हाॅटेलवाल्यान आमाला हांगटलोय भगून धाकधुकितस आमी निजले."
"हक्काळसा शार वाजता मी ऊठलो,कल्पनाला ऊठवलं,हाॅटेलशा गच्चिवर गेलो,तय बरीस गर्दी होती,एक मुंबयवालं जोडपव भेटलं,मराठीत बोललो,मराठी बोलणारे भगून कवड्याकाळाये ते मित्र जहे वाटले."
"आकाश ढगाळ हाय,पूर्वेसन समुद्रातून ऊगवणारा सूर्य दिखेन का नय कोण जाणे? "मंगारसन आवाज आला,मीन मंगारी वळून पावलं,मराठी माहणायी चंद्राहरकी सुरेख बायको बोलली होती."
"आज पौर्णिमा ते नय?" तिया तटे पावत मीन कल्पनाला विसारलं"
"सला साव्वटपणा बस करा,मराठी माहणू हाय तो,त्याला काय हमजणार नय तुमी काय बोलतात ते? न तय पावा काय दिखते ते!"
"मीन पूर्वेला पावलं,सूर्याया लाल भडक गोळा पूर्वेया समूद्रासन वर येत होता.जीवनात पयल्यांदा मी समुद्रासन सूर्य ऊगवताना पावत होतो.सर्वत्र जल्लोष ऊडला!मीन पावलं माया मंगारसा पौर्णिमेया चंद्रव रोमांचित झाला होता."
"त्या दिहा कन्याकुमारी पाऊन आमी परत फिरले."
"वाणगांवला परत आलो त्या दिहा कळलं १८ तारखेलास माया मांडेकर यशवदा मावशीयं निधन झालत."
(३)
एकदा दिवाकरनशी हाऊ शिसणीला त्याया घरा आलती,तिला जेव्व्या वारवी भगून मीन कल्पनाला हांगटल. पण त्यास दिहा आमसा पोर स्नेहशील तापानं फणफणला."
"पोर ते तापानं फणफणलाय तवा पावण्याहाटी साग्रसंगीत जेवण करण कहं जमणार?"कल्पना बोलली.आमाला प्रश्न पडला,वाणगांवला पावण्यांना जेवण घालवं अह हाॅटेलव नव्हतं,डहाणू,बोयसरला पावण्यांना घेऊन हाॅटेलात जावं ते तापानं फणफणलेल्या पोराला घेऊन जाणं शक्य नव्हतं.मीन दिवाकरनशा शिसणीया खोलीवर फोन लावला,तो बायेर गेलता,फोन त्याया बायकोनं घेतला,मीन तिला हांगटलं,
"दिवाकरन सायबाला हांगा ऊद्या तुमी तुमशा आईला घेवून वाणगांवला जेवव्या या."
"मम्मी केरला ऊद्या."तिनं मोडक्पा तोडक्या मराठीत हांगटलं."
"मंग आजतरी तिला तासाभरात नाश्ता करव्या घेऊन या."मीनं हांगटलं"
"अच्चा."अह हांगत तिनं फोन ठेवला."
"तीन तास झाले तरी दिवाकरन आला नय.अखेर दुफारसा बारा वाजता तो कोणशी तरी जीप घेवुन आला,बायको,हाऊला ओहरीत बहडवून तो डायरेक रान्नीत घुसला."
"माया हाऊहाटी पुरणपोळ्या केल्यात का खास महाराष्ट्रीयन?
अह त्यान कल्पनाला विसारलं"
"अरे माया पोर ते अटे तापानं फणफणते,तुमाला ऊद्यास वारव्या जेव्व्याला भगून सुहासजुन फोन केला तुला,तु नव्हता भगून तुया बायकोन हुसलला तो,ती बोलली तिही आय जाव्याय ऊद्या केरळला ,भगून सुहास बोलला आज नाश्त्याला तरी घेऊन या,आमी तिन तास झाले तुमशी वाट पावतात नाश्त्याहाटी."कल्पना बोलली.
"कप्पाळ तूय न माया बायकोय,तीनं मला हांगटलं आत्तास जेव्व्या वारटलंय तुमीन.येव्या साधन नव्हतं,गाडी खोळतानास अडीस तास गेले,आत्ता मायी खैर नय!मायी बायको घरा जाऊन मला पक्क जेवडणार."दिवाकरन बोलला."जाऊदे तू आत्ता अह कर,फक्त काॅफिस कर,मी पटवतं त्यांना."तो पुढे बोलला.कल्पनानं काॅफि ठेवली."
"यांशा पोराला ताप भरलाय अचानक,हे आत्तास आले दवाखान्यासन,हांगतात बोयसरला जाऊ जेवव्याला,पण तापात पोराला हिंडवणं योग्यनय तवा आपणस जाऊ बोयसरला."दिवाकरनजून त्याया बायकोला न हाऊला हांगटलं न नुस्ती काॅफि पेवुन ते निंगून गेले.आमाला खुपस लाजीरवाणं वाटलं."
(४)
"३४ वहरं झाली या गोष्टींना,पण जकल्या घटना माया डोळ्यापुढे आज जह्याशा तह्या ऊब्या हात."
"तवा विद्यार्थि नेता अहलेला, दिवाकरनसा कमल हसन हरका दिखणारा मेवणा ,आज आमदार हाय.त्यान दिवाकरनला केरळला वारुन घेतल भगून एम.एस.ई.बी.यी ईंजिनिअसशी नोकरी होडून तो केरळला गेला.क्विलाॅन या जिल्ह्याया ठिकाणी बंगला बांदून तो भोटा बिल्डर होऊन वावरते.दिवाकरनशे आयबाबा न हाऊहअरा देवाला प्यारे झाले.दिवाकरनशा पोर न पोरीय आमशा पोरा न पोरी हरकं लगीन होवुन दोगवांना आमशा पोर न पोरीला हात अहे एकेक गोंडस पोर हात.बरीस वहरं संपर्क नहलेल्या दिवाकरनसा मोबाईल नंबर मीन त्याया एका गांववाल्या मेरसन मिळवला.वाॅटसअप,फेसबुकवर संपर्क साधला.गेल्या आठवड्यातस तो मोबाईलवर बोलला,त्यान आमाला केरळला वारटलंय,योग आला ते आमी जाऊव पण त्याया हाऊला आमशा घरा जेव्व्या वारता नय आलं याय शल्य माया न कल्पनाया मनात कायम टोसत रेन."
:—समाप्त:—
लेखक:—सुहास काशिनाथ राऊत/
वरोरकर,
मो.९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.