"माड खजूरीयं हपान !"
बांधा वरशा ऊश्शा माडानं,
मेरशास बाठ्या खाजरीला पावलं !
हुरळून गेला तव्वास मनोमन,
लग्गेस त्यानं तियं हपान पावलं !
हाय नय कां हुय नय करतोया,
भंडारी जवा त्याया कोरत अहे गळा !
खाजरीला रोज होकलताना पाऊन मात्र,
रडत रेव्याहा रोज घळघळा !
दिहीभर थेंब गळून गळून,
बोळक्याया पुरा भरतोया गळा !
मरण सोसत उबा रेव्या पण,
खाजरीया नय त्यानं होडला लळा !
वारा आला का हावळी हालत,
तवा वाटव्या त्याला मनोमन !
खाजरीया पात्यानाव नक्कीस,
कळत अहेल त्यायंव मन !
खाजरी बुजरी,हेठी मान,
वाटव्या तिला,त्याला हांगू कहं ?
"मायीव ईच्छा "तहीस" हाय पण,
मान ऊस्सावुन बोलव्या कहं ?"
भंडारी येव्याहा, बोळकं होडव्याहा,
बांडीसन पडत अहे ताडीया पूर !
पेवट्यायी पण तवडीस गर्दी
तय जमव्यायी रोज महाम्मोर !
माड रडते,खाजरीव रडते
हांगतात, "रगत रोज आमसं जाते आटून !"
"आमशा जीवनात "तहं" प्रेमस नय मेळे,
ऊबे जरी आमी अवडे खेटून,खेटून !"
कवि:—सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर, डहाणू रोड(पुर्व)
हिंड्याफोन:— ०९९२३००४८९५
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.