*मायी वाडवळी कविता*
"मरण जगतात भीत! भीत!!"
"पोरा,क्याला कवडा दूर गेला,
आमाला तू होडून?
आमी तूयी आठवण काडतात,
अटे,दररोज, रडून ! रडून !!"
"रोज पातेरात होवव्या आदीस,
बाय तूयी ऊठून बहते !
हांगते "हेत पडला आत्तास माला,"
मायं पोरं माला दारात दिखते !"
"हमजूत तियी काडता ,काडता,
माया,डोळ्यासं पाणी खमे नय !
बरंस हाय तूया बायला,
आता ,जास्त काय दिखे नय !"
"हांगते,"लाना होता तवा त्याला,
घास, घास भरून वाडवलं !
बोट, हात धरून आणी,
सालव्याला,मीनस हिकवलं !"
"हात आमशे कापतात आता,
पोरा,घास ओठात जाय नाय !
पाय गेले ताठून आता,
सालव्याय काय नाव नाय !"
"हगे,होयरे,जकलेस हांगतात,
"पोर,रेव्या थोडा येव्या हाय?
दूर देशी गेला त्याला,
कायम,तटेस रेणं भाग हाय !"
"कळते पोरा,जकलंस माला,
काय हाय जन रीत!
पण अटे,असहाय आमी दोगवे,
मरण जगतात ,भीत! भीत!"
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर
डहाणू रोड,(पूर्व).
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.