(१)
१६ एप्रिल १९७४ ला मी एम.एस.ई.बी.मन क्लार्कशा जागेवर पेणला हजर झालो.
३६ दिह्यातस कमार्याया (आता अंधेरी)श्री लिलाधर त्र्यंबक चौधरी यायीन मला डहाणूला बदली करून दिली.ते तवाशा आमशा दादरशा आॅफिसात कामाला होते न सायबाबरोबर त्यांशे जवळशे संबंध होते.माये बाबा कै.का.के.राऊत (वरोर) न ते तवा संघात एकत्रस काम करत.
२२ मे १९७४ ला मी डहाणूया पाॅवर हाफिसमन हजर झालो.तवा आमशे बाबा तलासरीला तालुका मास्तर होते भगून आमसं बिर्हाड तलासरीलास होतं.
त्या काळी डहाणू ते तलासरी अवडं ५० किलोमिटर कोणी अपडाऊन नय करतोय.
हांसा आॅफिस हुटून मी नरपडा हड्डे पखाडीत माई सख्खि मावशी सखू (कै. विश्वनाथ न श्री दीपक यांशी बाय) ईया घरा गेलो न हांगटल "माई डहाणूला बदली झालीय काही दिही मी तुमशा घरास रेन"
मावशी मावशाना आनंद झाला.
मी ओहरीत बहलोया.बायेर ओट्यावर स्कर्ट ब्लाॅऊज घातलेली एक पंदरा वहरायी पोरी आली, मला पाऊन तिन घरात पाऊल न टाकतास दारातस रेलून विसारलं"बाय पाण्याला येव्याही कां? आमी साललो"
"कल्पना, आजसा दिही एक खेप आणून दे ना मला,घरा पावणा आलाय माया बयणीया पोर त्याला शा ठेवत मी."
त्या पोरीन मा तटे पावलं नय पावलं अह केलं न ती थेट रान्नित गेली न एका हातात हांडा न एका हातात कळशी घेऊन माया हमोरसन खाली मान घालुन बायेर पडली.
माया शा पेवून झालता.सखू मावशी कपबशा ओटव्या मंगारी वाड्यात गेलती.अवड्यात ती पोरी डोक्यावर हांडा न कमरेवर कळशी घेऊन ओट्याया पायर्या सडतोयी.तिया शाळेया निळा स्कर्ट न पांढरा ब्लाॅऊज बरास भिजलोया.कपाळावर घामाये थेंब होते न केंसावरसन पाणी निथळतोय.माया हमोरसन ती शिस्तित ओहरी ओलांडून रान्नित गेली न हाफतस बोलली,
"बाय ऊतरव गं हांडा कळशी,दम लागलाय"
मनसन कायव आवाज नय आला तवा मिन हांगटलं,
"मावशी वाड्यात गेलीय वाटतं,मी हात लाऊ कां?"
तिनं "हूं" का "सूं"केलं नय मी ऊठून रान्नित गेला,तवा मावशीया घरा लाईट नय होती,रान्नित जकला काळोख होता,मीन तिया हाताशी कळशी घेवून खाली ठेवली न आमी दोगवेव हांडा ठेवव्या खाली वाकले ते आमशी नकळत टक्कर झाली.कायव न बोलता तिनं बायेर धूम ठोकली.
"आणून ठेवलरं पाणी कल्पनानं?"
मंगदारासन घरामन येता येता सखू मावशीनं विसारलं.
"हो ठेऊन गेली ती"मिन हांगटल.
"कोण गं ती मावशी?"मिन परत विसारलं.
"माया धाकला देर पांड्रंगशी पोरी कल्पना,खेड पाड्यावर पारशाया वाडीत रेते त्यांस बिर्हाड.बोर्डी हायस्कूलला नववित हिकते ती ,घणी सालस पोरी हाय ती, मे मयन्यात आलेत अटे रेव्याला"मावशीनं मायती दिली.
अवड्यात बिज्या शार पोर्या घरात घुसल्या,थेट रान्नित जाऊन त्याइन मावशीला विसारलं ,
"कोण गं पावणा बाय?"
"माई धाकली बयीण मनू तिया पोर सुहास.अथीस रेव्या हाय आता,डहाणूला लाईटशा खात्यात आलाय तो नोकरीला,त्याये आय बाबा तटे दूर रेतात जंगलात,तलासरीला"मावशीन मायती दिली.
"आमी कल्पनाया बयणी शारव्या.मी मीना, ई साधना,ई रंजना न ई ऊज्ज्वला"त्याईन ओळख दिली.
"न कल्पना क्या नय आली?"मिन विसारलं.
"कव्वडं भोटं गुंबुड आलंयं तिया कपाळावर! कव्वडी भोट्यानं ढेम मारली तुन तिला?जा पावव्याला,ओगीस निजून रेलंय बाम लाऊन"मीना बोलली.
"कां का झालं?"मावशीनं विसारलं.
"अग तू नव्हती हांडा कळशी ऊतरवव्याला,मी गेलो,काळोखात ढेम लागली सुकून."मी बोललो.
"अरे साईनाथा!घणंस लागलं अहेन तिला सल जाऊ पावव्याला."मावशी बोलली.
"आमी सालल्या आगरावर मावरं घेव्या,तुया पावण्याहाटी बोंबिल कोलंबट आणव्या अहेल ते दे पैसे आमी आणून देतात मावरं."मीना बोलली.
मावशीनं पैसे दिले.पोर्या निंगून गेल्या.
(२)
"सल सुहास,कल्पनाला पावव्या जाऊ,घणंस लागलेन तिला!"मावशी मला बोलली.
मी ऊठलो,मावशी बरोबर शेजारी कल्पनाया खोपात गेलो.
"तारा, कय हाय गं कल्पना?कवडंक लागलाय तिला?कय निजलंय ती?"मावशीनं घरात खिरता खिरता प्रश्नांया भडीमार केला.
"कोणला कवडक लागलंय?कोणी हांगटलं तुमाला?कल्पनाते ई अटे मोरलीवर बहलीय भाजी शिरव्या!" एक प्रौढ बाई आमशा हम्मोर येता येता बोलली.
"ई कल्पनायी आई,मायी देराणी,तारा."मावशीनं ओळख करून दिली.
मीन नमस्कार केला.
"बहा."त्या बोलल्या.
मी बहलो.
माय लक्ष रान्नित मोरलीवर पाठमोरी बहलेल्या कल्पनावर होतं.
"कवडंक लागलं तुला?ढेम ते अवडी जोरात नव्हती!"मीन विसारलं
"कोणी हांगटलं तुमाला?"दोनव्या हातानं मांडीवरसा स्कर्ट खाली ओढतं मान वेळावून पावत तिनं प्रतिप्रश्न केला.
तिया कपाळावर गुंबुड नव्हतं,डोळ्यांत गहिरे भाव होते न टप्पोर्या ओठांत हसू फुटून तियी शुभ्र दंतपंक्ती समकून गेली.ऊजव्या हातात भाजी तहीस अहल्याने तिनं त्या हाताया दंडानं कपाळावर झुलणारी काळी बट मंगारी सारली तियी ई अदा माया ह्रदयाया पार कोपर्यांत जाऊन खोलवर रूतली.
"मी शा ठेवते"कल्पनाई आई बोलली.
"नको आत्तास पिला मीन"मी बोललो.
"तरी घ्या न लगरसा"कल्पनाई आई बोलली.
"रेवूंदे आई ,त्यांना घेव्या नहेन आपल्या घरा"कल्पना तोर्यात बोलली.
"तु करेल तर पिईन."मी बोललो.
"तिला शाव नय येय अजून,पंदरास वहराई हाय ती, या मे मयन्यात हिकव्याया हाय स्वयंपाक अहं हांगते ती,भगूनस बहलीय भाजी कापव्या."तियी आई बोलली न तिनं शा ठेवला.
शा पेवून मी न मावशी ऊठलो,परतताना मान वेळाऊन मीन पावलं,ती मोरली वरसन ऊठून रान्निया दारात ऊबी होती.आपले दोनवे हात आपल्या निळ्याशार स्कर्टला पुहत होती.आमशी नजरानजर होतास तिनं दोनव्या हातानं स्कर्ट खाली ओढून आपल्या कोंवळ्या मांड्या झांकव्याया प्रयत्न केला.तिही ती अदा माया ह्रदयात जास्तच खोलवर जाऊन रूतली.
(३)
नरपडसा पयलास दिही,पयलीस रात,आगर वरशा बोंबलाय मस्त कालवण न तळलेल्या मांदेळ्याबरोबर मी परातभर धान जेवला.माई आई मनू(तिय आजोळ नरपडसस) न मावशी सखू या दोगव्या हरक्यास सुगरणी निंगाल्या.
रातसा मी एक हरका या कुही वरसन त्या कुहीवर लोळतोया.चाहूल घेऊन मावशीनं विसारलं!
"नीज नय येय का रे सुहास?"
"नवी जागा,कही नीज येईल?"मेरेस निजेला मावसभाऊ विश्वनाथ बोलला.
पण त्या विश्वाया नाथाला काय कल्पना ,कि कल्पनाया आठवणींत मी अहा अनाथ पडेला हाय भगून मला नीज नय येय!
(४)
अहास दिनक्रम जात होता! तवा मी नरपडासन सालतस डहाणूला घाशीया मनसन पाॅवर आॅफिसला जात होता.पण हक्काळ हक्काळी पावलं नरपडासन बायेर निंगव्या तय्यार नहत.त्या काळी नरपडाशीस एक पोरी माया बरोबर आमशास आॅफिसला काम करव्या सालत निंगव्यायी ती पोरी अहून माया पुढे मैलभर जात अहे पण मला कल्पनाया आठवणी मंगारी ओढत अहत,हांशी मात्र नरपडा जाव्याहाटी पावलं लगबगीनं तय्यार होत न झट झट सालत. हांन्शे आॅफिसामनसन मी न ती पोरी हरकेस निंगून मी मात्र एक मैलभर पुडे, ते ती पोरी मैलभर मंगारी अहे.आमी हरकेस येत नय ये पाऊन कल्पनाया जीवात जीव येत अहे.
(५)
हांन्सा मावशीया घरा आला का मावशीया दारात स्वागताला ऊबी अहे ती मावशीयी पुतणी कल्पना.आता ती शा करव्या हिकली होती.मावशीया ओहरीतल्या बाकावर बहला का लगेस पाण्याया तांब्या ति हातात देत अहे.पासस मिनिटात जाडरोट दुदाया शा शी कपबशी मावशाजीया न माया हातात पडे.
"आमी बिन दुदायास शा पेत अहत आदी,तु आल्यापासून कैस दुद आणते तुयी मावशी कोण जाणे?" एक दिही मावशा बोलले.
"मी थोडा खर्स करते?ई कल्पनास घेऊन येते रोज दुद"मावशी बोलली.
"पोरा तुमशा घराशी तुयी पयलीस नोकरी, तुये आयबाबा अमशापेक्षा बरे पण काटकसरीनस दिही काडतात,तवा जकला पगार बाबाया हातातस देत जा.ते परत देतील तवड्यातस तुयं भागव.बरी शार पास वहरं नोकरी झाली का आय बाबाया पसंतीयी पोरगी पाव न मंगस लगीन कर.घाई नको करु,संसार करव्यास हाय"एक दिही मावशाजी अहं बोलले न कल्पना हिरमुसली.
सन १९७४ सालसा मे मयना कापरा हरका ऊडून गेला.न जून मयना ऊजाडला.कल्पनाला शाळेये वेध लागले.
"८ जुनला आमशी शाळा,आम्ही दोन दिही आदिस जाणार भिनारीला वाडीया घरात."एक दिही कल्पना जड अंत:करणान बोलली.
मीव हळवा झालो.बोललो,
"तु शाळा होडून दे,अथी नरपडा घरास रे.मला नोकरीवाली बायको नय पायजे."
"मी काय करणार?आप्पांना हांगा."कल्पना बोलली,"१७ जुनला माया पंदरावा वाडदिही हाय,तवा या भिनारीला तुमी."
"भेट काय आणू तुला?"मीन विसारलं
"कायव नको,तुमी भेटव्या या ईस मला भेट."कल्पना ऊत्तरली.
(६)
नंतर आलेल्या पयल्यास हुटीत मीन दादर गाठलं.पगारव झालता.दादरशा डिपार्टमेंटल स्टोअरमन मी गेला.आदी आख्ख स्टोअर पालथ घातलं,मंग एका दुकानामेरे घुटमळत रेलो.काय घेवू कल्पनाला सुसत नव्हतं.शेवटी रोज तारीख न वार बदलव्यायं टेबलावर ठेवव्याय एक प्लॅस्टीकसं कॅलेंडर मीन पॅक करव्या हांगटलं.हांनसा नरपडला परतलो.
शेवटी १७ जुन ऊजाडला.मी,माया मावशीया भोटा पोर विश्वनाथ न कल्पनाया भोटा भाहा सुनील आमी तिगवे नरपडासन डहाणू स्टेशनवर आले ,सुनील विश्वनाथजून कायबाय खरेदी केली,मीनव एक कॅडबरीयं जकल्यात भोटं श्याॅकलेट विकत घेतलं. मंग बोर्डी एस.टी.पकडून आमी तिगवे खेड पाड्याया स्टाॅपवर ऊतरून भिनारीला आप्पा रेतोये त्या पारशाया वाडीत सालत पोसलो.
जकले आमशी वाटस पावतोये.दुरवर आमाला पावून कल्पना पुडे आली,तिन आमशा मेरशा पिशव्या घेतल्या.पासस मिनिटात आमी वाडीशा कारवीया घरात खिरलो.
जकल्याई विशारपुस झाली,कल्पनानं माला गोड आवडते भगून शिरा केलता.शिरा खाऊन,शा पेऊन आमी पडवीत येवून बहलो.
"कल्पना जा,सुहासला वाडी दाखव"कल्पनाये आप्पा बोलले.
"हं न आज तू कोणत्याव कामात मदतव नको करू,वाडदिही हाय तुया,न सुहासव आलाय"कल्पनाई आई बोलली.
"तुमी येतात कां?"मीन सुनील न विश्वनाथला विसारलं.
"वाडीत काय पावव्या ते?बो वेळा हिंडलाय."विश्वनाथ बोलला.
"आमी आपल्या बंदोबस्ताई तयारी करतो."सुनिल बोलला.
आमाला बरंस झालं,आमी घरा बायेर पडलो.
वाडीत चिकू,पेरूयी झाडं होती.जरा दूर गेल्यावर मीन कल्पनाया हात धरव्याया प्रयत्न केला,घाबरत ती बोलली,
"नको,वाडीत माहणं काम करतात न शेटव अहतील."
जरा आमी पुडे सालल्यावर एक भली भोट्टी बाव लागली.आमी कांठाजवळ आलो,मीन बावीमन डोकावलं,एक भल्ला भोट्टा मजबूत न गोरापान गो माहणू बावीत एखलास पोवतोया.
"आमशे शेट आहेत हे,रोज वाडीत येतात,पोवतात,आमालाव पोवव्या हिकवतात."कल्पना बोलली.
"तुला पोवता येते?"मीन आश्चर्यानं विसारल.
"थोडं ,थोडं ,आत्तास हिकव्या लागलिय मी."कल्पना बोलली.
"तुमाला येते पोवता?"तिन मला विसारलं.
"नय, मला पाण्याई भिती वाटते,न तूव पोवव्या नको हिकू आता,मला तुयीव धास्ती वाटेल आता."मी बोलला.
"सालेन,तुमशी मर्जी!"कल्पना बोलली.
"कल्पना,बाय ऊतरणार कां पोवव्याला?"शेटजून बावीमनसनस विसारलं.
"न दादूलाव ऊतरव पोवव्याला."ते आणखिन पुडे बोलले.
"मी नय येय न दादूलाते पोवताव नय येय."कल्पना बोलली.
"हा!हा!!हा!!!"शेट भोठ्ठयानं हाअले न बोलले,
"तय ऊतरव्या सालेन,तय पाणी घणा ओंडा नय मेळे.गळाभरस हाय."
त्याईन त्या भल्या भोट्या बावीत एक जागी बोट दाखडून हांगटलंं.
"नका आमी वाडी फिरतो."कल्पना बोलली.
"मंग खमा, मीस वर येतो."शेट बावीमनसनस बोलले न त्याईन पाण्यात एक सूर मारला.
मंग बावीया पायर्या सडत ते वर आले.
"यो विश्वनाथशा मावशीया पोर,वाडी पावव्या आलाय आज."कल्पना शेटला बोलली.
"हॅल्लो डिअर!"त्याईन त्यांसा हात पुडे करून माया हात हातात घेवुन हांगटलं.
"नमस्कार!"मीव बोललो.
"शेट, आज माया वाडदिही हाय,केक खाऊनस जा तुमी."कल्पना बोलली.
"अरे व्वा!व्वा!!व्वा!!!हॅप्पि बर्थ डे बाय"अहं हांगून त्याईन तिया हात दोनव्या हातात घेऊन हालवला न पोवण्यापुर्वी काडून ठेवलेली खालशी प्याण हुसलुन प्याणीया खिशात हात घालुन पाकिट काडलं न ऊघडून कल्पनापुडे धरत बोलले,
"घे तुला पायजेत तेवडे पैसे."
"नको,तुमिस द्या."कल्पना बोलली.
त्याईन एक शंबरायी हिरवी नोट काडून कल्पनाया हातात दिली.माया अरद्या मयन्याया पगार होता तवडा त्या वेळी.
"थॅंक्यू!"हांगत कल्पना बोलली "आता मी वाडी दाखवते यांना."
"दाखव,दाखव"हांगत शेट बोलले,
"जाताना चिकू न पेरूव दे याना."
"न ती बाथरुम मेरशा पपईवर एक पपईव पिकलाय जास्त तिव पाडून कापून खा, नयते कावळे खाऊन टाकतील ती"म्हणत त्याइन प्यांट सडवली न पाठमोरे होऊन ते सालु लागले.
ईराणी/पारशी माहणं प्रेमळ,भोळी न ऊदार अहतात याया प्रत्यय मला त्या वेळी आला.
(७)
आमी पुडशा हेतात गेलो,एका बांदावर बहत कल्पना बोलली
"बहा अटे."
"पण वाडीत ते माहणं काम करतात नं?"मीन विसारलं.
"अयशा झाडावरशी शिकू काडून झाल्यात,आता अथी कोण येणार नय."कल्पना बोलली.
मी तिला अगदी खेटून बहलो.ती सुपशाप होती.माई छाती धडधडव्या लागली,जिंदगीत पयल्यांदा मी कोणत्या पोरीमेरे सहेतुकपणे अवडा जवळ बहलो होतो.जकल्या वातावरणात स्तब्धता होती,मीन तिया हात हातात घेतला,तो होडवून घेत ती बोलली,
"खरंस तुमी मला मागणी घालणार हात ना?"
"तुला खरं नय वाटे कां?"मी बोललो.
"तहं नय पण तुमी अवडे दिखव्याला बरे,एखाद्या पिक्चरशा हीरो हरके,मी ते तुमशाहरकी गोरीव नय मेळे,त्या मुळे मला धास्ति वाटते."कल्पना बोलली.
"न अवड्या वहरात तुमाला एकव मैत्रिण नय भेटली?शाळेत?काॅलेजात?"कल्पनान पुडे विसारलं.
मी हाअलो,न बोललो,
"प्रेम का अहते ते शाळेतस मायती झालतं,पण अकरावी पर्यंत पोरींबरोबर बोलव्याही हिंमत नव्हती.न तहा मी लाजरा बुजरास हाय, आवडत्या पोरींबरोबर मनातस संभाषण करव्याहा.त्याव तवड्या फाॅरवर्ड नव्हत्या. तलासरीला एक पोरगी होती,तिया न आमशा घरात हाडवैर होतं.आमी तलासरीला न ती पोरगी मुंबयला तिया मामाघरा रेवून हिकतोयी.मुंबयला रेतोयी भगून फॅशनेबल कपडे वापरव्यायी.आमाला खेड्यात ते अप्रूपस होतं.तियावर माया जीव जडला होता.एकदा मे मयन्याया हुटीत ती तिया घरा आलती.एके दिही तिया आयजून मला शा पेव्या वारटलं.मी मस्त तयारी करून त्यांशा खोपात घुसला.आमशी दोगवाई घरं मणजे मनत फक्त एक कारविया कुड होता.माया भोट्या बयणीला आमसा पयल्या पासूनस संशय होता,तिनं आमशा आईये कान आदीस भरले होते.तिनस मी तिया घरात गेल्याई बातमी आईला पुरवली होती.माया आईया अंगाया तिळ पापड झालता,तिनं कुडाला भोक पाडून त्यांशा घरात मिस घुसल्याई खात्री करून घेतली होती. तिनं बाबांना सावध केलं होतं,कुरडया,पापड खाऊन,शा पेवून मी त्यांशा घरातून बायेर पडलो.घराया दुहर्या कोपर्यावर बाबा ऊबे होते.त्याईन मला त्यांशा घरातून बायेर पडताना पावलं होतं.मी मेरे येतास त्याईन काईव न विसारता माया मुस्कटात एक ठेऊन दिली.मीन जिंदगीत पयली न शेवटशी खालेली ती एकस थाप होती.यो वृत्तांत आमशा एका जीवलग मित्रानं त्या पोरीया घरा कथन केला. दुहर्या दिहा मला न भेटता,काईस निरोप न ठेवता ती पोरी शाळा ऊगडव्याया पंदरा दिही आदीस तिया मामाया घरा पुडील शिक्षणाहाटी निंगून गेली.
(८)
"त्या दिहा हक्काळसा मी जेवला नय,दिहीभर काईस खाल्लं नय.रास्साव मी जेवत नय अहं हांगटल्यावर दोगवे भाहा न तिगव्या बयणी विनवव्या लागल्या पण मीन त्यांना दाद दिली नय.पण त्या दिहा माया आय बाबाया ह्रदयाला पाझर फुटला नय.त्या दिहा रातशे आठ वाजता आमशा घरामेरे ,रोज सायकल वरून आपल्या घरा जाणार्या एका पारशाला एका ट्रकजुन ऊडवला,तो जाग्गेत मेला, मलाव त्या वेळी वाटलं ट्रकखाली जाऊन जीव द्यावा तहं मीन माहामेरे तळ ठोकून बहलेल्या शंकर नांवाया आमशा जीवलग मित्राला बोलुनव दाखडलं,त्यानं ती गोष्ट प्रकाश न विकास या माया दोगव्या भाहांना हांगटली मंग तिगव्याईन माहा मेरसा तळ ऊठवला नय.दिही भर ऊपाशी रेल्यामुळे राश्शि ओट्यावरस खुर्शीत कवा नीज लागली तेव मला हमजलं नय."
"नंतर पंदरा दिही गेले,आमसा अकराविया रिझेट लागला,माया भोटा भाहा प्रकाश आदी एक वहरं अकरावित नापास झाल्यामुळे आमी दोगे हरकेस अकरावित होते,आता आमी दोगवेव पास झाले,आमी काॅलेजात जाव्याहा निर्णय घेतला"
"काॅलेजहाटी मुंबयला जाण्यापूर्वी ती पोरी गोरेगांव पुर्वेला रेल्वे स्टेशन मेरे अहलेल्या 'उत्तुंग' नांवाया ईमारतीत तिया मामाया घरा रेते न गोरेगांव पुर्वेलास नंदादीप हायस्कुलमन हिकते अही महत्वाई मायती आमसा जिवश्च कंठश्च मित्र शंकर यानं मला दिली."
(९)
"सन १९७१ सा जुन मयना ऊजाडला.आमी मुंबयला पार्ले काॅलेजमन प्रवेश घेतला.माया सुदैवानं माया भोटा भाहा प्रकाश न मी वेगवेगळ्या वर्गात गेले.त्या पोरीया शोध घेव्याही हुसल माया मनानं परत खाल्ली."
"काॅलेजमन आमसा वरोर शिसणीया पोरांसा एक ग्रृप होता.काॅलेजमन येणं ,जाणं,फिरणं जकले एकत्रस करत.एक दिही जकल्याईन पिक्चर पावव्याया बेत केला.अभ्यासाय नांव हांगून मीन पिक्चरला जाणं टाळलं.जकल्यांना आश्चर्य वाटलं.अती आग्रह करून सुध्दा मी येय नय अहं पाऊन जकल्याईन माया नाद होडला.ते जकले पिक्चरला निंगून गेले.त्यांशा पाठोपाठ पुस्तकं हावटून मीन पार्ले स्टेशन गाठलं न लोकल पकडून गोरेगांवला ऊतरलो.स्टेशन मेरशीस "ऊत्तुंग" ईमारत शोधव्या मला जास्त वेळ लागला नय,मंग मीन नंदादीप हायस्कूल शोधव्या रस्ता धरला.थोड्यास वेळात मला नंदादीप हायस्कुलव हापडलं.शाळा हुटव्याई बेल ऐकली न मी रस्त्याया कडेला ऊबा रेलो.पोरींया घोळक्यात नजर टाकत मी तिला शोधव्या लागलो.
जकल्या पोर्या निंगून गेल्या,शेवटशा घोळक्या मंगारी मी जात रेलो,त्या जकल्या स्थानिक पोर्या होत्या.एक एक करता करता जकल्या पोर्या एक एक बिल्डिंगशा आवारात घुसत गेल्या.शेवटी एकस पोरी रेली.आपल्यास नादात ती कायतरी गुणगुणत जात होती.लाल रिबिन बांदलेल्या तिया दोनव्या वेण्या एका लयीत ऊडत होत्या.मीन निरखून पावलं न मला आश्चर्याया धक्कास बहला,ती तीस होती.कोलंबसाला अमेरीकेया शोध लाऊन जवडा आनंद झालता त्याया शतपट आनंद मला तिला पावून झाला.एका हाकेया अंतरावर ती होती.पण नेमक्या यास वेळी माया ह्रदयायी धडकन वाडली न मीन तिला पुकारव्याया आतस .ती "ऊत्तूंग"ईमारतीया कंपाऊंड मन लुप्त झाली.थोडा वेळ मी तयसं घुटमळत रेलो न मंग निराश होऊन मीन माया मोर्चा गोरेगांव स्टेशनला वळवला.जीन्यावर जाऊन,ऊबा रेवून मी बर्यासवेळ त्या"ऊत्तूंग"ईमारतीय अवलोकन करत होता.काळोख पडव्या लागला तहा मी प्लॅटफार्मवर ऊतरला न घरा जाव्याहाटी लोकल पकडली."
"नंतर वहरभर या भारतीय कोलंबसाला अमेरीकेया शोध घेव्याई संदी मिळाली नय."
(१०)
"सन १९७२ सालसा एप्रिल मयना ऊजाडला.काॅलेजशी परीक्षा देऊन मे मयन्यायी हुटी ऊपभोगव्या हाटी आमी आमशे आय बाबा रेतोये त्या तलासरी गावाला आले.वसंताई साऊल लागलोयी.संपूर्ण पानगळ झालेले वृक्ष नवी पालवी धारण करत होते.आंबे मोहरले होते.करवंदे ,जांभळे गर्भार राहीली होति.टप्पोर्या मोह फुलांया मादक धुंद वास जंगलभर पसरला होता.कोकिळेय कुजन सालू होतं.अह्या धुंद वातावरणात मला तिया येव्यायी आस होती.जीवलग मित्र शंकर परत आपल्या कामगीरीवर लागला होता,त्यानं एक दिही एक दुख:द बातमी आणली"
"ती या वहरा तलासरीला येव्याही नय मेळे"शंकरनं अह हांगतास माया पाया खालशी जमीन सरकली.
"पण अह क्या? "भगून मीन त्याला विसारलं पण तो बोलला,
"मला या बाबत मायती नय मेळे"
त्या मे मयन्यात ती खरंस नय आली.
तो जकला मे मयना मला शुष्क, कोरडा गेला.
ती त्या वहरा अकराविला होती,मे अखेरीला तिया रिझल्ट लागला .६५ टक्के मार्क्स मिळवून ती चांगल्या पैकी पास झाली,"
(११)
"जुन मयना ऊजाडला ,आमसाव काॅलेजसा रिझेट लागला.आमी दोगवे भाहा पास झाले.इंटरमन अॅडमिशन घेव्याहाटी आमी मुंबई गाठली."
"या वहरा तिव काॅलेजला अॅडमिशन घेव्या होती.तिया कल काॅमर्सला होता.तिन जवळपासस अॅडमिशन घ्यावं अही माई मनोमन ईच्छा होती."
"तियं हायस्कूल ते मला मायती होतंस,तिया काॅलेजसा शोध घेव्यायी कामगिरी माया पुडे येवून पडली होती."
(१२)
"जुनशा सुरवातीला प्रत्येक काॅलेजमन जकल्या विद्यार्थ्यांये नांव,नंबर न वर्गायी यादी नोटीस बोर्डवर लागत अहे.मीन परीसरातल्या जकल्या काॅमर्स काॅलेजशा याद्या धुंडाळल्या अखेर मला विलेपार्ल्याया मिठीबाई काॅलेजशा नोटीस बोर्डावर तियं नांव झळकलेलं दिखलं.कोलंबसाला दुहर्यांदा अमेरीकेया शोध लागल्याहा आनंद झाला."
"मीन तिया वर्ग,नंबर टिपून घेतला न तिला पत्र लिवून पोष्टात टाकलं."
"अपेक्षे प्रमाणे तिनं लिवलेल पत्र एक दिही मला आमशा पार्ले काॅलेजशा लेटर बोर्डवर लावलेलं दिखलं.मीन अधीरतेनं ते पत्र फोडलं न वासलं.तिनं मला काॅलेजशा हुटीयी तारीख न वेळ देऊन जुहूया समुद्र किनार्यावर वारटलं होतं."
"जुहूया समुद्र किनारा!प्रेमिकांयं मीलन स्थान!तो दिवस कवा ऊजाडेन अह मला होऊन गेलतं."
"अखेर तो दिही ऊजाडला,भोट्या भाहा प्रकाशला खोटं कारण हांगून मी बोरीवलीहून विलेपार्ल्याला थांबणारी लोकल पकडली.वेळेया आदीस आल्यानं मीन पार्ल्यापासून जुहू पर्यंतस अंतर पायीस कापलं.मी जूहूया समुद्र किनार्यावर पोसलो.ती अजून आली नव्हती.मी समुद्रातटे पावत ऊबा रेलो."
"जुनशी १० तारीख होती ती,पावसाये तिन दिही निंगून गेलते तरी पाणी पडला नव्हता भगून कव्वाव पाणी पाडव्याया ऊद्देशानं काळे पांडरे ढग आकाशात ठाण मांडून बहलोये.उधाणायी भरती होती,खवळलेल्या समुद्राया फेंसाळलेल्या लाटा बेभानपणे किनार्याला धडका देत होत्या.पावसाळी रंगामुळे गर्दीही तुरळकच होती.मावळतीया सुर्यायी किरणं ,सोनेरी होवव्याहाटी धडपडत होती."
(१३)
"सुर्य मावळतीला झुकव्या लागला होता,पृथ्वीवर प्रकाशाया दबदबा कमी होत सालला होता.प्रकाश कण गिळून अंधाराया अजगर आपलं अस्तित्व दाखवव्या लागलोया,अवड्यात मंगारसन आवाज आला,
"लवकर आलास तू?"
पुडे साक्षात ती ऊबी होती.तिला पयल्यांदा वन पीस ड्रेसमन पाऊन भाराऊन जाऊन मीन तियी तारिफ केलती तहास अरध्या मांड्या ऊघड्या टाकणारा वनपीस ड्रेस घालुन ती आलती.तिया गोर्यापान रंगाला तो ड्रेस खुपस खुलुन दिखत होता."
"मी भानावर आलो.बोललो,
"हो थोडा वेळ आदीस आलो."
"सल चौपाटीवरशी भेळ खाऊ,भुक लागली अहेल तुला?"ती बोलली.
आमशी पावलं भेळेया दुकाना कडे वळली.पयलं दुकान येतास मी थबकलो.ती बोलली,
"अथी नय,तटे कोपर्यावरशा दुकानात जाऊ,'लव्हर्स , भेळ डीश काॅर्नर' त्या दुकानाय नांव हाय.तय भेळ मस्त मिळते"
आमी कोपर्यावरशा त्या दुकानामेरे गेलो,भरल्या भेळेया डीश ठेवव्या तय ऊश्शी टेबलं होती, एक टेबलामेरे आमी जाऊन ऊबे रेलो.आमी आॅर्डर देव्याया आदीस दोन समशे भेळेत घुसवलेली एक भेळेनं भरलेली डीश आमशा टेबलावर ठेवली गेली.मी बिज्या डीशसी वाट पावत रेला.
"दुहरी डीश येव्याही नय,यो लव्हर्स , भेळ डीश काॅर्नर हाय अटे दोगांहाटी एकस डीशमन भेळ मिळते,तिस भरवव्यायी अहते एकमेकांईन ऐक दुहर्याला."ती बोलली.
मंग तिनं समसा भरून भेळ माया तोंडात कोंबली,तोस समसा बिज्यांदा भेळेन भरून आपल्या तोंडात घातला.मीन पण एक समसा भेळ भरून तिया तोंडात घातला बिजा समसा भेळ भरून माया तोंडात रिसवला,अहं करता करता आमी ती भेळ बिज काईव न बोलता मुकाट्यानं खपवली."
"सल आपण दूर, तय वाळूत जाऊन बहू."ती बोलली.
आमशी पावलं मुकाट्यानं वाळू तुडवव्या लागली.थोडं दूर गेल्यावर ती थबकली,तिन अाजू बाजूला पावलं,जवळपास कोणीस नव्हतं.हमोरस एक सुंदर शिंपला पडलोया ,वाकून तिनं तो हातात घेतला न ओल्या वाळूमन एक रेघ मारली.
"तू या रेघेया पलीकडे बह ,मी या रेघेया अलिकडे बहते ." ती बोलली.न मंग आपल्या दोगव्या गोर्यापान अर्ध्या ऊघड्या मांड्या ,खांद्या पर्यंत ऊघड्या अहलेल्या आपल्या गोर्यापान लांब हातात धरून ती बहली.मीव वेथभर अंतर राखून बहलो.
अंधार दाटू लागला होता.नि:शब्द शांतता होती.दोघांया ऊरांत कांहूर माजलं होतं.मंग शांततेया भंग करत ती बोलली,
"हि वेळ अत्यंत कठीण हाय,अंधार दाटत सालला हाय,निर्जन एकांत हाय,दोगव्याया मनांत विचारांय काहूर ऊठलय,दोन वहरापासून मनं जुळल्यावर अस्पर्श अहणारे आपण भावनेया बांध फुटणारी ह्रदयं घेवून एकत्र आलेत,अह्या वेळी कायव होऊ शकते,हजारो चुंबनाया वर्षाव होऊ शकतो,लक्ष आलिंगने पडू शकतात.बिजंव काय पण होऊ शकते.पण तू मला स्पर्श करू नको, अहीस अस्पर्श ठेव,हि रिती, अही मी गेली दोन वहरं कहं माय आयुष्य रेटते ते माय मलास ठावुक,तुया स्पर्श झाला ते मी ते ओझं घेऊन नय रं जगू शकणार!तू माया पासून दूरस रे,मला मायीत हाय ,आजवर पुराणात, ईतिहासात वैर अहणार्या दोन घराण्याशे प्रेमिक कव्वास एकत्र येवू शकलेले नय,आपण पण कव्वास एकत्र येवून सुखात रेवू शकणार नय,तुला सुखी रेव्या अहेन ते तू तुया आय बाबाय म्हणणं आयकत रे,न त्यांशा पसंतीयी पोरी पाऊन लगीन करून सुखी रे."
(१४)
"मंग झपाटलेली ती एकदम शांत झाली न क्षणातस ढसढसा रडू लागली.मी तिला मेरे घेऊन ओगीव करू शकत नव्हता."
"थोड्या वेळानं ती शांत झाली.बोलली,
"सल आता अंधार दाटव्या लागलाय,आपल्याला घरा परतव्या हाय."
"तुन जो हांगटला तो तुया अंतिम निर्णय हाय?"मीन काकुळतिला येवून विसारल.
"हो काळ्या दगडा वरशी रेघ हाय ती!"ती बोलली.
"मंग ते मी जगूस शकणार नय!"मी बोललो.
"न आपण एकत्र आले ते दुनिया आपल्याला जगू देव्यायी नय"ती बोलली.
मी नि:शब्ध झालो.
आमशी पावलं परतिला लागली.
थोडा वेळ सालल्यावर ती बोलली,
"तु जा आता,मी जाईन मंगारसन"
माया मनात शंकेयी पाल सुकसुकली,मनात विसाराय काहूर,जाणवलेलं एकलेपण,रातसा अंधार,मंगारी खवळलेला समुद्र,यी घरास जाईल का या समुद्रात खिरेन?
मी तिला नकार दिला,दोगवे एकत्रस जाऊ अहं सुसवल पण तिनं मानलं नय.अखेर मिव हटून बहलो तवा ती तयार झाली.आमी जुहु बस स्टॅंडवर आलो.बोरीवली बस ऊबी होती ,मंगारशा दारासन आमी बसमन सडलो,तिन मला मंगारीस बहव्या हांगटल,मी बहल्यावर ती पुडे जाऊन बहली.तिन एकदाव मंगारी वळून पावलं नय,गोरेगांव स्टेशनसा स्टाॅप आल्यावर ती माया बरोबर नय बोलता,मायातटे नय पावता बसमनसन ऊतरली न अनोळख्या गर्दीत अनोळख्या हरकी लुप्त झाली.
(१५)
"त्या नंतर तिनं माया बरोबर कोणत्याव प्रकारसा संपर्क केला नय,मनात दाटून रेलेल्या तिला भेटवं अहं क्षणोक्षणी मला वाटत रेलं पण तिया निग्रह मोडव्यायी हिंमत मला कव्वास झाली नय.मंग अब्यासात मन लागेनासं झालं. मुंबयसं जीवन निरस वाटव्या लागलं,त्याया वीट आला.परीणाम होव्याया तोस झाला,मी ईंटरला नापास झाला."
"मंग एक दिही पेपरात एम.एस.ई.बी.यी जाहिरात वासली ,अर्ज केला,परीक्षा दिली,मुंबय,ठाणे,रायगड तीन जिल्ल्याया पोरात तिहरा आलो,ईंटरवी दिली,दोन मयन्यात बिन वशिल्यानं नोकरी लागली ,न १६ एप्रिल१९७४ ला पेणला नोकरीवर हजर झालो.
"पेणसं वास्तव्य एकाकी,तहं चांगलं शहर ,जकल्या आठवणी एकदम दाटून अाल्या न आॅफिस मनस घळघळा रडून पडलो.जकलं आॅफिस स्तब्ध झालं."
"हान्स साडेपासला आॅफिस हुटलं,
"आता तुमी कय जाणार राऊत?"गोर्यापान,सुंदर टायपिस्ट मलबारी बाईनं जिव्हाळ्यानं विसारलं.
"रेन एखांदया लाॅजवर."मी बोललो.
"माया घरा सला."तिनं हांगटलं.न लग्गेस घरा फोन केला.शिपायानं बॅग हुसलली.आमी आॅफिसशा बायेर आलो."
"पासस मिनटात आमशामेरे एक काळी फटफटी येवून ऊबी रेली.तियावर तहास एक काळा कुळकुळीत रावडा माहणू बहून आलता.त्यांशा घरसा नोकर बिकर अहेन मला वाटलं."
"माये मिस्टर!"तिनं मला हांगत ओळख करून दिली."
"न ए राऊत..."
"ओळखलं मीन,तु फोनवर बोललोयी"तियं बोलणं तोडून तो बोलला.
त्यानं माया मेरे बॅग मांगटली ,मीन हुसलून दिलेली बॅग फटफटीवर ठेवत त्यानं बायकोला विसारलं,
"तुमाला घेव्या येवू का?"
"नको, आमी येतो सालतस."मलबारी बाई बोलल्या.
फटफट आवाज करत,धुळ ऊडवत त्याई फटफटी निंगून गेली.
आमी सालव्या लागलो.
"बाई,तुमसं लव्ह मॅरेज कां?"
नय रेवून मीन विसारलं.
आपल्या लाल सुटूक ओठांतून आपली सुंदर शुभ्र दंतपंक्ती दाखवत बाई मधाळ हाअल्या न बोलल्या,
"अहो,लव्ह मॅरेज केलं अहतं ते तुमशा हरका गोरा गोमटा न चिकना चोपडा नवरा पटकावला अहता.तहं मायं माया सख्ख्या आते भावावर घणं प्रेम होतं,पण गडगंज संपत्ती पाऊन वडलांनी या घराण्याशी संबंध जोडले,मी पदवीधर हाय पण माया नवरा अवीते म्याट्रीकव पास नय,तिनदा एस.एस.सी.ला नापास झालाय तो."
"बाई तुमी अवड्या सुंदर,हिकलेल्या एम.एस.ई.बी.या टायपिस्टस टेबल तुमाला बरं नय वाटे."मी बोललो.
"नोकरीयी बिलकुल गरज नय मला ,पण गांवातस हाय भगून टाईमपास करव्या हाटी मी नोकरी करतं "मलबारी बाई बोलली.
"तुमाला भीती नय वाटत तुमशा नवर्यायी?स्वभावानं खुप कडक अहतील ते?"मीन विसारल."
"कडक?बिलकुल नय, एकदम आज्ञेत हाय तो माया."मलबारी बाई हाहत बोलल्या.
सालत सालत आमी एका हाॅटेलमेरे थांबले,तिया नवरा तय गल्ल्यावर बहलोया,त्यानं मला तय वारटलं,त्याह्या मेरशा खुरशीवर बहब्या हांगटलं न एक कोड्रिंगशी आॅर्डर दिली.मलबारी बाई हाॅटेललास शिकटून अहलेल्या घरात खिरली.
"ये आमसं हाॅटेल,बाजुलास ये घर,त्याया बाजूया बार पण आमसास हाय,त्याया बाजूला एक रीकामी खोली हाय,तुमाला पसन अहेल तर रेवू शकतात तुमी भाड्यानं त्यात."मलबारी बाईया नवरा बोलला.
माया रेव्याया प्रश्न सुटकी सरशी हुटला होता मीन बॅग खोलीत नेवून ठेवली."
(१६)
"पेणशी पयली रात्र जकल्याया आठवणी काडण्यातस गेली.वारंवार नजरेपुडे येत रेली ती तिस!"
"बिजे दिह्या रयवारस होता तरी मी लवकरस ऊठून तयार झालो."
"हक्काळी शा पेव्या मलबारी बाईया नवर्यायास हाॅटेलमन गेलो,शासी आॅर्डर दिली,त्यानं हांगटलं आदी नाश्ता करा न मंग शा प्या.न हो,आजसा शा ,न नाश्ता मायातर्फे फुकट हाय तुमाला.न बिजं,तुमाला आवडेल ते तुमी रोजसा शा,नाश्ता,रोजसं जेवण खावणं आमशा हाॅटेलातस करू शकता ,पैसे पगार झाल्यावर देत जा.न बिजं,पगार होई पर्यंत काय पैशायी गरज लागली ते बिनधास्त ऊहने मांगा मायामेरे.न गांवात कयव गेले ते अवि मलबारीया मित्र हाय भगून हांगा,तुमाला कायव धास्ती नय.आमशा राणीसरकारनं तुमशी खास बडदास्त ठेवव्या हांगटलिय मला.तियी कोणतिव आज्ञा मी कवाव मोडे नय.न तुमी कवडे हळवे हात तेव हांगटलंय तिनं मला.तवा धास्ती करू नका,घरशावाणी मजेंत र्या."
"त्याया बोलण्यानं माया डोळ्यांत टसकन पाणी आलं.काल यास माहणाला आपण कवडं सुकियं हमजलो होतो. माया डोळ्यासं पाणी त्याया नजरेतून हुटलं नय,मेरे येवून त्यानं मला मिठीस मारली.एक भाहा,एक जीवलग मित्र मला अविया रूपानं भेटला होता."
"जा गांव फिरून या,बाजार पाऊन या."अविनं मला सुसवलं.मायी पावलं बायेर पडली."
"मीन बाजाराया फेरफटका मारला.एक कॅलेंडरवाला बहलोया,त्याया मेरे तर्हेतर्हेयी कॅलेंडरं होती,मायं लक्ष शर्मिला टागोरशा एका कॅलेंडरवर पडलं,मला त्यात तियं प्रतिबिंब पडलेलं दिखलं.तिया बर्यास अदा शर्मिला टागोरशी मिळत्या जुळत्या होत्या.मीन ते कॅलेंडर विकत घेतलं,घरा आणून भिंतिवर टांगलं.त्या मुळे ती सदैव माया सान्निध्यात अहल्याया भास मला सतत होत रेला."
"दिहीभर काम करून मी खोलीवर येव्याहा.जेवून खाऊन भिंतीवरसं शर्मिला टागोरसं कॅलेंडर काडून ते पाऊन तिया आठवणीत बुडून जाव्याहा.नीज कवा लागतोयी ती कळव्यायी नय.हक्काळसा ऊठून शर्मिला टागोरसं कॅलेंडर परत भिंतिवर टांगून ठेवव्या."
(१७)
"अहेस दिही जात होते,२१ मे १९७४ शी तारीख,मी आॅफिसमन नुकतास येवून बहलोया,पाटील शिपाई माया मेरे आला न बोलला,
"काल दादरला सर्कल आॅफिसला टपाल घेऊन गेलता,तयशा लिलाधर चौधरी सायबाईन तुमशाहाटी ये पाकिट दिलय."
"पाकिट घेवून मीन फोडलं,त्यात एक शिठ्ठी होती,शिठ्ठीत लिलाधर भाऊनं लिवलोय,
"तुयी बदली डहाणूला करून दिली हाय,सोबत बदलीयी आॅर्डर हाय ती मुर्ति सायबाला दे,मी त्यांशाशी फोनवर बोलुन तुला आजस होडव्या हांगत.फाॅरम्यालिटी भगून बदलिया अर्ज मायामेरे धाडून दे."
"बदलीयी आॅर्डर घेवून मी मूर्ति सायबाया कॅबीनमन घुसला,त्याईन मला त्यांशा हमोरशा खुरशीत बहव्या हांगून ते बोलले,
"अरे राऊत,तुमी ते छुपे रूस्तम निंगाले,एका मयन्यात बदली घेतली, चौधरी सायेब बोलले मला आता फोनवर,आजस मी होडून देतो तुमाला."
"त्याईन शिपायाला वारटलं,मीन त्यांना दिलेल्या बदलीया आर्डरवर शेरा लिवून त्याईन सई केली न शिपायाला हांगटलं,
"मलबारी बाईंना हांगा राऊतशी अाजशी रिलिव्ह आॅर्डर काढा."
"बदलीयी आॅर्डर घेऊन शिपाई बायेर गेला.मीव सायबाला "थॅंक यू!"हांगुन बायेर पडला."
"बायेर येतास मला मलबारी बाईनं वारटलं.तिया टेबला मेरशा खुरशीवर मी बहलो."
"काय राऊत ,अवड्या तडका फडकी बदली घेतली तुमी?आमसं पेण आवडलं नय वाटते तुमाला?"न मीन काय ऊत्तर देव्याया आतस तियी गोरी,नाजूक,लांबसडक बोटं टाईप रायटरवर आवेगानं फिरव्या लागली.त्या स्तब्ध वातावरणात अहं वाटतोय,जणू आपल्या स्वप्नायं घरकुल विमनस्कपणे ती तोडून मोडून टाकतेय."
"रिलिव्ह आॅर्डर घेऊन,जकल्याया निरोप घेवून मी आॅफिस बायेर पडलो.बायेर अवि त्याई फटफटी घेवून ऊबा होता,त्यानं मला तीवर बहव्या हांगटलं,मी बहतास भुर्रकन त्यानं मला खोलीवर आणुन होडलं"
"पासस मिनिटांत तो त्याया बायकोलाव घेऊन आला.त्याईन मला त्यांशा घरात बोलावलं. थोड्या वेळात मलबारी बाई शिर्याई बशी घेऊन आली,
"मी स्वत: बनवलाय शिरा."
माया हाती शिर्यायी बशी देत ती बोलली.
"शिरा खाऊन झाल्यावर मी अविला विसारलं,
"अवि आपला हिशोब?"
"हिशोब कैसा?अवडे दिहि बेरजा मारलेल्या हिशोबाला तुमी आज अहा अनपेक्षित धक्का देऊन जकली वजाबाकिस करून टाकली,आज बाकि रेलंय ते शून्य!"
" त्यायी शून्यवत नजर त्याया बायकोया नजरेला भिडली होती."
"तिव विमनस्क स्थितीत हातात शासा कोप घेऊन ऊबी होती,तिनं शासा कोप माया पुड्यात धरला,मीन तो घेऊन ओठांना लावला.मायी नजर स्तब्ध ऊब्या रेलेल्या मलबारी बाईया मिटलेल्या लालसुटूक ओठांवर खिळून रेली."
"द्या तो कोप."मलबारी बाईया बोलण्यानं मी भानावर आलो.शासा रिकामा कोप मीन तिया हातात दिला.तो घेऊन ती मनत निंगून गेली."
"थोड्यास वेळात बायेर येवून तिनं माया पुड्यात एक भेट वस्तू धरली.मीन पावलं, पार्कर कंपनीया पेनशी ती किंमती जोडी होती."
"यी पेनशी जोडी हाय,निळ्या न लाल रंगाया शाईयी.लाल रंग माया जकल्यात आवडीया रंग हाय.तुमी लिवलेल्या निळ्या रंगाया ओळींखाली खास आठवण भगून कवा कवा त्या ओळ्या अधोरेखीत करव्या हाटी यातील लाल रंगाया पेनलाव हात लावत जा."
"भाराऊन मलबारी बाई बोलली."
"ते स्तब्ध वातावरण ,सोन्याच्या बांगड्यांनी गच्च भरलेल्या आपल्या गोर्यापान दोनव्या हाताया, लांबसडक नाजूक बोटांया, वाढवलेल्या नखांवर पांघरलेला लाल चुटूक नखरंग पावता पावता मला वाटत रेलं तो क्षण कायमसास अहास थिजून जावा."
"अविव एक भारी ईम्पोर्टेड कि चेन मला देत बोलला,
"या कि चेनमन आपल्या मैत्रिया किल्ल्या कायम एकत्रस रेवून द्या."
(१८)
"तुमाला ऊद्यास डहाणूला जाऊन कामावर हजर होवव्या हाय न रेलवेयाते संप सालू हाय तवा तुमी कहेक काय जाणार?"मलबारी बाईनं मला विसारलं.
"अटलन एष्ट्याव नय मेळत तवा मी विसार करत हायवेमार्गे ट्रकमन जावं."मी बोललो.
"खमा, मी पावतं काय सोय होते कां."अवि बोलला न त्यान दोन तिन ठिकाणी फोन फिरवले.पासस मिनिटात त्याया फोन खणाणला.फोन ठेवून तो बोलला,
"झाली सोय जाव्याही,अहमदाबादला जाणारा एक ट्रक हाय,तो होडील तुमाला हायवेवर."
"अर्ध्यातासात एक ट्रक त्यांशा दारात येवून ऊबा रेला.मायी बॅग अविनं क्लिनरशामेरे दिली,मीव ड्रायवरशा कॅबीनमन सडून बहला.ट्रक हालला,मलबारीबाई,अविया न माया डोळ्यात पाणी आलं,पाणी भरल्या डोळ्यात गेल्या छत्तिस दिहायं प्रतिबिंब तरळत रेलं."
"रातशा साडेबारा वाजता ट्रक तलासरीया नाक्यावर येवून ऊबा रेला.मी बॅग घेऊन खाली ऊतरलो,ड्रायवरला भाडं विसारलं.
"आप अविशेटके दोस्त है,आपसे क्या भाडा लेना?"ड्रायवर बोलला.
मी त्याला "थॅंक्यु"हांगटल.
"अच्छा है."तो बोलला.
त्यान ट्रक सालू केला."
(१९)
"हायवेया तलासरी नाक्यापासून ऊधवा रोडवर एक किलोमीटरवर आमी रेतोये.काळोखी रात होती,रस्ता निर्जन होता,एक कुत्रं केकाटलं,त्याया आवाजानं दहा भटकी कुत्री जमा झाली.त्यांशा गराड्यात मी जपून एक एक पाऊल टाकतोया.अवड्यात रस्त्यावरशा पांडेया टूरींग टाॅकिजसा शेवटसा शो हुटला, माहणं बायेर आली,रस्ता फुलून गेला,कुत्र्यांयी पळापळ झाली,मला हायसं वाटलं,माया जीवात जीव आला.मी घरा पोसला.बॅग खाली ठेवली,बांबूया दारावर मुठ्यान मारत, दरवाजा वाजवला,भोट्यानं हांक दिली,
"बाबा दरवाजा ऊघडा!"
"कोण रं?"मनसनस बाबानं विसारलं.
"सुहाससा जहा आवाज वाटते?"आईयं बोलणं ऐकू आलं.
"हो मी सुहासस,दरवाजा ऊघडा."मीन हांगटलं.
"बाबानं कंदिलायी वात भोटी केली,दरवाजा ऊघडला.जकली भावंड जागी झाली.
"तु कहा रं मनतस?"बाबानं विसारलं.
"नोकरी होडून ते नय आला न.?"आईनं काळजीनं विसारलं.
"नय मायी बदली झालीय डहाणूला."मीन हांगटलं.जकल्यांना आनंद झाला.
"न बिज्या दिहास मी डहाणूला हजर झालो.न आपली भेट झाली."
कल्पना भानावर आली,
"बापरे कवडा वेळ झाला."ती बोलली.
"बह ग,माई कर्म कहाणी आयकली तुन आता तु ,तुयी गोष्ट हांग."मी बोललो.तिनं लाजून खाली मान घातली.बरास वेळ ती कय खोऊन जही गेली."
(२०)
"ठीक हाय, काय हांगव्या हरकं नहेन ते नको हांगू,न हांगण्या हरकं अहून पण नय हांगव्या अहेन तरी सालेन.पण माय मत हाय ज्या दोन जीवांना एकत्र येवून मरेपर्यंत एकत्र संसार करव्याया हाय त्यायीन एकमेकाला जन्मापासून जाणलेलं बरं."मी बोललो.
" शून्यात लावलेली आपली नजर आपल्या पायामेरे वळऊन ती ऊजव्या पायाया बोठ्यानं जमीन खणव्या लागली."
"तय दाटून ठेवल्यात वाटते तुया जकल्या आठवणी?"मीन विसारलं.
"ती हाअली,खणेली माती तिनं पायानं एकत्र करून दाबली.न तहिस ओगी रेली."
"तु प्रेम करते कां कोणावर?"मीन विसारलं."
"प्रेम? न मी?नय रे बाबा,प्रेम का अहते ते मला आतास हमजव्या लागलंय तु भेटल्यापासून."ती खाली मान घालत बोलली.
"पण शाळेत मला एका पोराया नांवानं शिडवतात.मणजे त्या पोराला माया नांवान शिडवतात." ती बोलली.
"तुया वर्गात हाय का तो पोर?"मीन विसारलं.
"माया पुडे हाय एक वहर."ती बोलली.
"गेल्या वहरा आमशी सहामायी परीक्षा खपलोयी,मी शेवटसा पेपर देऊन बस स्टाॅपवर एस.टी.यी वाट पावत ऊबी होती.बाजुला ग्राऊंडवर पोरं क्रिकेट खेळतोयी.टाइमपास भगून मी त्यांसा खेळ पावतोयी अवड्यात शेवटसा शेंडू टाकला गेला न त्यानं सिक्सर मारला.तवड्यात काहीं पोराईन गलका केला,
"जिकले!$$$जिकले!!"
थोड्या वेळानं ग्राउंड वरशी जकली पोर पांगली,त्याई टीम मी ऊबी होती तयसन जाव्या लागली.त्याय लक्ष मा तटे गेलं तहं एकदम मी बोलुन गेली.
"शाब्बास हिरो!"
तो हाअला पण पोरांबरोबर त्यानं रस्ता क्राॅस केला. मी त्या तटेस पावतोयी.जकली पोरं बरीस पुडे निंगून गेली,पण तो थांबला न वळला,मी ऊबी होती तय आला.ऊबा रेतास त्यान मला विसारलं,
"कय रेते तू?"
"भिनारीला वाडीत."मी बोलली.
"आज बस नय आली अजून.वाट पावते मी."मी पुडे बोलली.
तवड्यात बस आली,मी बसमन सडली,कंडक्टरजून बेल मारली,बस हुटली,त्यानं मला हात केला ,मीनव त्याला हात केला."ती बोलली.
"दिवाळीयी हुटी खपली न शाळा सुरू झाली.मीन पावलं,पयल्यास दिहा पासून तो आमशा वर्गावरून फेर्या मारव्या लागला"ती पुडे बोलली.
"त्याया टीमशी पोरं त्याला माया नांवानं शिडवव्याव लागली."तिनं हांगटल.
"यालास प्रेम हांगतात."मी बोललो.
"पण तो कव्वाव मला काय बोलला नय तहं."ती बोलली.
"याला मुक प्रेम हांगतात."मी बोललो.
"जाऊ दे,वेडा हाय बिसारा"ती बोलली.
"वेडास अहेन ते सालेल,नयते खरंस वेडा होईल तो तुया शिवाय."मी बोललो.
"अहं नका न हांगू बिसार्याला."ती बोलली.
"सल आपण जाऊ? बरास वेळ झाला,जकले वाट पहात अहतील आपली."ती बोलली.
"सल."मी ऊठलो न बोललो.आमशी पावलं घरातटे वळली.
(२१)
"आमी दोगव्याईन घरात पावलं टाकली, ते जकलेजण आमशीस वाट पावतोये. सब्बन घरभर मावरं, मटणाया मसालेदार घमघमाट पसरला होता.आमी दोगव्याईन बाथरूममन घुसुन हात,पाय,तोंडं धवली.बाविया हेळ्या लोखंड पाण्यानं तरतरी आली.
"कल्पनानं माया हातात टाॅवेल दिला,मी ओहरीत आलो,तय भल्या भोट्या सतरंजीवर जकला सरंजाम मांडलोया.तळेलं मावरं,मटण,चिकनशा भरेल्या डीश मांडून ठेवलोया.थंडगार बिअरशा बाटल्यांवर पाण्याये थेंब जमा होवव्या लागलोये.प्रत्येकि लिटरभर दारूये तिन खंबे ऊबे होते.काचेया दोन भोट्या बाटल्यात गावठी दारू होती.गळ्या पर्यंत भरलेलं हुरेयं बोळकं होत.सोडा न कोड्रिंगशी रेलशेल होती.मला बहव्याया आग्रह केला गेला,मी बहलो,माया मेरेस आप्पाहे शेट बहले,मंग कल्पनाये वडील आप्पा,भाहा सुनील न माया मावशीया पोर विश्वनाथ भेंडोळे करुन बहले."
"बोला काय घेणार?"माया तटे पावत सुनील बोलला.
"मी अजुन यातलं कायव घेतलेलं नय मेळे,पण गोड अहेन ते गलासभर हुर मी घेन." मी बोललो.
जकले हाअले.
"आज पयल्यांदा थोडी व्हिस्कि टेस्ट करून पाव."सुनील बोलला.
"नोको."मीन हांगटलं.
"मंग एखान बिअर तरी?"विश्वनाथ बोलला.
"मीन त्यालाव नय हांगटल."
"मंग माया हाटी हुरीया गलास भरला गेला.मीन एक घोट घेऊन पावला पण हुर निर्याहरकी गोडी नव्हती.मीन गलास बाजूला करून ठेवला. न एक कोकाकोल्यायी बाटली घेतली."
"तुमी काय घेणार शेठ?"आप्पानं शेठला विसारलं.
"आपली नेहमीयी अस्सल शिकूयीस."शेठ बोलले.
"आप्पानं शेठशा न सोतायाव गलासात शिकूयी दारू ओतली."
"सुनील विश्वनाथजून आपल्या गलासात व्हिस्कि ओतून घेतली.जकल्याईन माया नांवानं "चिअर्स!"केलं न मंग गप्पा गोष्टीया ओघात गलासा मंगारी गलासं रिकामी होत गेली.मावरं,मटण,चिकन खपत गेलं तहं येत रेलं.दोनक तास यो कार्यक्रम सालला.मंग ताटं भरून आली तहे जकले जण तेट्टाऊन जेवले न हात तोंडं धऊन ओट्यावर टाकलेल्या बिछान्यावर लवंडले,पावता पावता जकल्यांना निजेनं घेरलं न एकमेकात घोरण्यायी स्पर्धा सुरू झाली.कल्पनानं येवून मला हांगटलं,
"सला आपण बेडरूममन बहू."
"आमी दोगं बेडरूममन आले."
"जेवणं झाली का तुमा जकल्यायी ?"मीन कल्पनाला विसारलं.
"हो जकले जेवले,न जकल्या पोर्या भांडी घअव्याव लागल्यात."कल्पना बोलली.
"तुमी मला काय प्रेझेंट आणलाय वाडदिहाय?"कल्पनानं मला विसारलं.
"मीन मायी ब्रिफकेस ऊगडली न ते कॅलेंडर काडलं'"
"यी काय भेंट?"तिनं जराशा नाराजीनस विसारलं,
"ये कॅलेंडर हाय!याया वार ,तारखां रोज बदलत रेतीन, यायी गरज जगाया अंता पर्यंत खपणार नय,आपल्या यास अस्तित्वात ते रोज नव्या दिहाया रंग धारण करीत रेन.ये कालचक्र आपल्या संसाराय सुखदु:ख रोज पावत रेन !जाणारा दिही कहाव जावो ते आपल्याहाटी रोज नवा दिही घेऊन येईल.जन्मभर साथ देईल ते आपल्याला.रोज तारीख वार बदलताना आपण याला हात लावू तवा आपल्याला आपल्या जीवनासा यो अनमोल दिही आठवत रेन."
"तुमसं मनव वेगळं हाय न तुमशा कल्पनाव वेगळ्या हात!"ती बोलली.
"जेवणा आदीया पार्टीत तुमीन "काय" घेतलव नय?"तिनं पुडे विसारलं,
"तुया प्रेमायी नशा मला जीवनभर पुरेल,मदिराक्षी अहली का मदिरेयं स्थान दुय्यम अहते,ती नहली तरी प्रेमायी धुंदी माहणाला बेभान करते.मी तुला कव्वास माया पासून दूर करव्या नय मेळे.दारूला मीन कव्वास स्पर्श नय केलता भगून मीन दारू घेतली नय,पण प्रेमाया स्पर्श तून आज मला पयला दिलाय तो मी कव्वाव विहरव्या नय."मी बोललो.
"यी नशा ते दारू पेक्षा भयानक वाटते."अहं हांगून ती हाअली न हावरून बहली.
(२२)
"मीन तुयाहाटी बिजीव एक गोड भेट आणलाय."मी बोललो.
"काय ?"तिन ऊत्सुकतेनं विसारलं.
"मीन ते भलं भोट्ट कॅडबरीयं शाकलेट तिया हातावर ठेवलं.
"व्वा मस्त!"ती उदगारली."तुमी मला यीस भेट द्या,न ते कॅलेंडर ठेवा दपवून,नयते जकल्याजणी मला हाअतील ते पाऊन."ती पुढे बोलली.
"ठीक हाय,तुयी ईच्छा."मी बोललो.
"अवड्यात,
"कल्पना, शा पेव्या बायेर या."कल्पनाया आईनं भोट्यानं हांगटलं.
"आमी बेडरूम बायेर आलो.मी शा पेव्याहाटी ओटीवर येवून बहलो.जकल्याया निजा पुर्या झालत्या,जकले तोंडावर पाणी मारून परत येवून बहले."
"जाड्यारोट दुदाया मस्त शा आला.जकल्याईन तो फुरक्या मारून पिला."
(२३)
"शा पेवून झाल्यावर कल्पनाया वाडदिहाया केक कापव्यायी तयारी सुरू झाली.छानसा स्कर्ट न ब्लाॅऊज घालुन कल्पना तयार झाली.नेहमी हरका केसाया तिरपा भांग पाडून तिनं केसायी एक बट गालावर होडली होती.तियं ते शाळकरी रूप घणंस खुलुन दिखत होतं.मोगर्यायी नाजुक कळी दिखते तही ती मला भासत होती."
"केक कापून झाल्यावर जकल्याईन तियं अभिष्टचिंतन केलं,भेटी दिल्या,मीव कॅडबरीया भोट्टया शाॅकलेट बरोबर शंभराई हिरवी नोट देऊन हांगटलं,
"तुला काय आवडेल ते घे."
"केक बरोबर वेफर न शाॅकलेट खाऊन झालं,कोड्रिंक पिलं, वाडदिहाया सोहळा खपला."
"शेट जाव्या निंगाले.
"दादू येत रहा वाडीत परत परत."ते मला बोलले.
"मीनव "हा "हांगटलं.
"त्याईन फटफटीला किक मारली,फटफट आवाज करीत ती दिसेनासी झाली."
"त्या दिहायी रात वाडीतस गेली.रातशे जेवून गप्पा मारव्याया मुडमन आंगण्यात होडलेल्या बैल गाडीवर जाऊन बहलो,तवड्यात सोसाट्याया वारा हुटला,पाण्याई रिपरिप सुरू झाली,आमी घरात येवून खिरलो.ढगांया गडगडाट सुरू झाला,एक वीजेया लोळ जमीनीवर येवून पडला न जोरात पावसाला हुरवात झाली."
"त्या वहराया तो पयला पाऊस,दहा दी पावसाळा ऊशीरा सुरू झालता पण दहास मिनिटाया पावसानं पूर काडला.जकली माती भिजून गेली,मातीया धुंद सुगंध हुटला,हवेत गारवा आला,जकल्यांई मनं प्रफ्फुल्लित झाली,मेरेस ऊब्या अहलेल्या कल्पनाला घट्ट मिठी मारवी अहं मनात वाटलं, पण बिज्यांया ऊपस्थिती मूळे मनाशी ईच्छा मनातस जिरली."
"गुड नाईट!"जकल्याईन एकमेकांना हांगटलं न जकल्या पोर्या घरात गेल्या,आमी पुरूष मंडळी ओट्यावर टाकलेल्या बिछान्यावर लवंडली.बायेर परत धों धों पाऊस सुरू झाला,तापलेली धरित्री थंड होवव्या लागली.पण माया मनात मात्र प्रेमाया आगीया डोंब ऊसळला,आख्खि रात मला नीज लागली नय.आख्ख्या दिहाये प्रसंग नजरेपुडे तरळव्या लागले.पातेरातसा जरा डोळा लागला."
(२४)
"हक्काळशी कल्पनाया हालवण्यानं मला जाग आली.मीन डोळे ऊगडून पावलं,कल्पना मला हालवून ऊठवत होती."
"ऊठा ,आॅफिसला जाणार नं?"तिनं मला विसारलं,मीन पावलं तय्यारी करून ती मला ऊठवव्या आलती,शाळेया निळा स्कर्ट न पांढरा ब्लाॅऊज तिनं घातलोया,दोन वेण्या घालून एका वेणीत तिनं मोगर्याया पांढर्या फुलांया गजरा घातलोया.मोगर्याया धुंद सुगंध माया नाकात खिरला,मीन दीर्घ श्वास घेतला,तिया त्या शाळकरी रूपानं मला परत एकदा भुरळ घातली."
"मी ऊठलो,तयारी केली,नाश्ता करून चहा घेतला,विश्वनाथ,सुनीलला विशारलं,
"येणार कां रे तुम्मी?"
"आमी?मरव्या येतात अवड्या हक्काळ हक्काळ!"विश्वनाथ बोलला.
"न तुव क्या जाते?मार आज दांडी,हांन्शे जाऊ!"तो पुढे बोलला.
"नय रं,मला ते जाव्यास पायजे,नवी नवी नोकरी हाय मायी,न हुट्याव नय जमल्यात अजून."मीन हांगटलं.
"मंग जा ते,आमीव येवू हांजविरी."अहं हांगून विश्वनाथ माथ्यावरसन गोदडी घेऊन बोखाडून परत निजला."
"जकल्याया निरोप घेवून मी न कल्पना जाव्या निंगाले,
"या परत."
"आप्पा न कल्पनाया आईनं मला हांगटलं.
"बिज्या पोर्या न पोरं मेरेस घोलवड प्लाॅटात शाळेत जातोयी त्याना उशीरा निंगव्या होतं,मी न कल्पना सालव्या लागले."
"वाडीया झापा उगडून आमी बायेर आले.रस्त्याला लागले.वळणा वळणाया रस्ता एकदम निर्जन होता.पाणी पडून गेल्यामुळे रस्त्यावरशी धुळ बहून गेलती.पांखराया किलबिलाट सालू होता.शांततेया भंग करत कल्पना बोलली,
"मायी भेंट,ते कॅलेंडर द्या मला."
"मीन ब्रिफकेस ऊगडली,कॅलेंडर काडून तिया हातात दिलं.तिनं ते ओठांना लाऊन दप्तरात ठेवलं."
मंग तिनं स्कर्टशा खिशात हात घालुन एक पिवळाजर्द पेरू काढला,
माया पुडे धरत बोलली,
"घ्या यो न आॅफिसला खा."
"तु ऊष्टाऊन दे."मीन हांगटलं.
"तिनं पेरूला एक बारकास सावा मारला.न मला बोलली,
"तुमीव खा."
"तुया हातान भरव तू."मी बोलला.
तिनं पेरू माया तोंडापुडे धरला.
"अहंनय मेरे येवून भरव."मीन तिला हांगटलं न तिया पेरू अहलेला ऊजवा हात मी माया खांद्यावर ठेवला न मान वळवून पेरूया एक सावा घेतला."
तवड्यात एक फटफटीवाला आमाला खेटून जहा गेला न पुडेव जाऊन त्यान मान वळवून आमाला पाऊन घेतलं."
"आमशा वाडी बाजूया वाडीसास हाय तो,सावे त्याय नांव, आपल्याला पाऊन घेतलं त्यानं,आता यो आप्पांना जाऊन नक्किस हांगणार."कल्पना बोलली.
"घाबरू नको,या रयवारी तलासरीला घरा जाऊन मी जकल्यांना हांगणार हाय न मंग तुला मागणी घालव्याला येणार हाय."मी बोललो.
"बोलत बोलत आमी खेड पाड्याया येस्टी स्टाॅपवर येऊन ऊबे रेलो.तय आदीस ऊब्या अहलेल्या तिन पोरी कल्पना बरोबर हाअल्या न आपसात कुजबुजल्या."
"माया वर्ग मैत्रिणी हात त्या."कल्पना बोलली.
"मंग त्यांशामेरे जाऊन ऊबी रे जा."मीन हांगटलं.
"नको, रोजशास हात त्या,मी ऊबी रेते तुमशामेरेस,न तुमशी येस्टीव आमशा आदी येईल."कल्पना बोलली.
"पण कल्पनायी येस्टीस लवकर आली.ती येस्टीमन खिरली,लगबगीनं खिडकीमेरे येवून तिनं मला हात केला.जकल्या गाडीशा लोकांया नजरा मायातटे वळल्या.बेलसा आवाज आला,येस्टी हुटली.येस्टी नंदरेआड होईपर्यंत मी पावत रेलो.
मंग मायी येस्टी आली ,तित बहून मी डहाणूला आलो.आॅफिसला गेलो."
(२५)
" त्या दिहानंतर आलेल्या पयल्यास हुटीला मी तलासरीला घरा गेलो. तय जेवणा खाण्याया वेळे व्यतिरिक्त आमसा जीवलग मित्र शंकर आमशा घरास पडेला अहे.रोज हानशापारा शार वाजता ऊधवा रोडवर फिरव्या जाव्या अहा आमसा पयल्या पासुनसा ऊपक्रम होता.मी,माया भोटा भाहा प्रकाश न शंकर आमी जीवश्य कंठश्य मित्र होतो.भोटा भाहा प्रकाश सख्खा भाहा अहला तरी आमशात मित्रत्वाय नातं होतं.आमी तिगवे कायव गोष्टी करत,कोणात कायव आडपडदा नहे. घराया कंपाऊंड बायेर पडतास मीन त्याना हांगटलं,
"मी लगीन करणार हाय!"
"मायं बोलणं आयकून दोगवे शाटस पडले.
मीन पुडे हांगटलं,
" नरपडा आपल्या सखु मावशीया देरायी एक पोरी हाय,कल्पना तियं नांव.कोसबाड जवळ खेडपाड्यामेरे भिनारीत वाडीत त्यांशा घरा रेवून ती बोर्डीला एस.पी.एच.हायस्कूलला नववीत हिकते.ती मला घणीस आवडलाय ,न मी तिया बरोबरस लगीन करणार हाय.मीन तिला तहं वचनपण दिलाय."न मीन कल्पनाया तिया मेरसन घेतलेला ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो त्यांना दाखडला.दोगवाईन तो निरखून पावला."
"गोरी हाय का तुया हरकी?"शंकरजून विसारलं
"वयानं पण बारकीस दिखते."भोटा भाहा प्रकाश बोलला."
"तही घणीस गोरीव नय ती ,सावळीस वाटेल तुम्हाला,पण तिया चेहरा खुपस भावूक हाय,स्वभावानं पण एकदम भोळी हाय ती.न पंदरा वहरायीस हाय ,मला खुपस आवडलाय ती.घरशे कोणी संमत्ती देवो ,नय देवो, कोणी कवडाव विरोद जरी केला तरी मी कोणसव आयकणार नय.मी तिया बरोबरस लगीन करणार."मीन त्यांना निक्षुन हांगटलं."
"दोनक मिनिटं ते दोगवे ओगेस रेले."
"पण प्रकाश ते तुयापेक्षा भोटा हाय,न त्याला ते अजून नोकरीव नय,त्याया आदी लगीन करणार तू?"शंकरजून विशारलं."
"मायी कायव हरकत नय शंकर,मला नोकरी मिळेल, न मी लगीन करीन तव सुहासजून थांबव्यायी मुळीस गरज नय."भोटा भाहा प्रकाश बोलला.
"पण ती नववीतस हिकते ,तिला अकरावी तरी पास होऊन दे,तिलाव कवा नोकरी लागली ते संसाराला हातभार लागेल तुया."शंकर बोलला.
"शंकर, मला नोकरीवाली बायको नको,बायकोन घरसंसार करवा अवडीस मायी माफक अपेक्षा हाय.न मी लगीनव लग्गेस करव्याया विसारात हाय ,मावशीया घरा मी कवडाक रेणार?न खोली घेवून एकटा रेव्या ते मला शाव नय करता येय,तवा मला लवकर लगीन करण भागस हाय."मी बोललो"
"सुक नय तुय म्हणणं "भोटा भाहा प्रकाश बोलला.
मंग"अभिनंदन तुय!"हांगत दोगवायीन मला मिठी मारली."
"हांज होवव्या लागलोयी आमी घराकडे परत फिरलो."
"घरामेरे येतास शंकर बोलला,
"मी जातं घरा"
"शंकर तु आज आमशा घरास जेव."
हांगुन भोटा भाहा प्रकाश घरात घुसला.मी न शंकर तासभर बायेरस बोलत उबे रेले."
(२६)
"स्वैपाक तयार झाला तहा भोटा भाहा प्रकाश मला न शंकरला जेवव्या वारव्या आला.हातपाय धवून आमी पाटावर बहले.बाबा न जकली भावंड आपल्या रोजशा जागेवर पाटावर बहून ताटं वाडव्यायी वाट पावतोये."
"कहिक हाय रं पोरी?"
ताटं वाडता वाडता आईनं विसारलं. तिला जकली हकिगत प्रकाशजुन हांगटली होती.मीन खिशामनसन फोटो काडून आईमेरे दिला.तिनं पाऊन तो बाबांमेरे दिला,आलटून पालटून जकल्या भावंडायीन फोटो पावला.बयणी फोटो पाऊन खुष झाल्या ,फिदीफिदी हाअल्या. आई बोलली,
"तोंडवळा तिया बाबा हरकास दिखते, रंगानं पण गोरीस अहेल न तिया आयशाहरकी?"
"नय तुमाशा अवडी गोरी नय मेळे ती पण आकर्षक हाय,मला आवडलिय फार."
"कोणला न विसारता तु हो पण हांगुन आलाय?"आईनं पुडे विसारलं.
"हो म्हणजे फक्त तिलास हांगटलंय.बिज्या कोणालाव काय हांगटलेलं नय मेळे."मी ऊत्तरलो.
"पण सखु मावशीला ते विसारवं लागेल ,मंग शार माहणं घेवून आमाला जावं लागेल तिया आयबाबाला विसारव्या."आई बोलली.
"कोणाला कायव विसारव्यायी गरज नय.पोरीयं मत हाय न तिये आय बाबाव नय हांगणार नय."मी बोललो.
"पण जन रीत ते पाळव्या लागेल आपल्याला?"आई बोलली.
"ए रीती रिवाज मी कायव माने नय,न मी नास्तिक हाय,लग्नव मी धार्मिक रुढी झुगारुन रजिस्टर पध्दतिनं करव्या हाय.न पावसाळा खपतास आॅक्टोबरमयन्यातस मी लग्न करव्या हाय"मी तावात बोललो.
"पण आदी पत्रिका,जोडतं ते पाऊ,जुळलंते बर्या मोरतावर वहरा दोन वहरानं लगीन धरू.पैसाव कय हाय आपल्या मेरे? न तुव ते आतास नोकरीला लागलाय.तवड्यात प्रकाशलाव नोकरी लागून त्यायव जमवता येल.न पोरीव म्याॅट्रिक पर्यंत हिकेल.न लगीन मणजे काय खाव्यायी चिज हाय?"आई बोलली.
"लगीन करव्यायस हाय मंग पत्रिका न जोडतं पावव्यायी गरजस काय?न ये थोतांड ते मला बिलकुल मान्य नय."मी तावातावानं बोललो.
"न पैशाईव अवडी काय गरज हाय?,मी पुडे बोललो.
"अरे बायकोया गळ्यात मणी मंगळ सूत्र ते बांदेल?एक गंठण ते करेल?त्या हाटी नय का लागणार पैसा?"अवडे वेळ ओगेस बहलेले बाबा बोलले."
"बाबा ये मणी मंगळसूत्रव बांदव्याया मी विरोधात हाय.बायकोन पुरूषाया दास्यतेयी कोणतीस वस्तू वापरू नये अह माय ठाम मत हाय.मला त ते गायशा गळ्यात बांदलेल्या ढेण्या हरकं वाटते."मी बोललो.
"मंग कुकूव नय लावव्या काय?बांगड्याव नय भरव्याया का?"आई शिडून जहीस बोलली.
"कुकू जरूर लावावं,बांगड्याव जरूर भरव्या त्यानं सौंदर्य खुलून येते बायकांय,पण कुकाऐवजी बिंदी लावावी,ती अधिक खुलुन दिखते,रंगी बेरंगी,आकर्षक बिंदयाव मिळतात तर्हेतर्हेया. न बांगड्या होन्यायास क्याला पायजेत?बांगड्याव रंगी बेरंगी न आकर्षक ,तर्हेतर्हेया मिळतात.त्या भरल्यामुळे जास्त ऊठाव येतो बायकाया हातांना."मी बोललो.
"बायकायी मनं नय मायती तुला."आई हताश होउन बोललीं.
"न हाड्या तरी घेन का नय?का तहीस आणव्या हाय परणवून शाळेशास स्कर्ट ब्लाॅऊजवरस?"आई पुढे बोलली.
"हो,हाड्या घेऊस,हाडीत मस्त दिखेल ती!"मी आनंदून बोललो.
"तवडं तरी बरं."आई बोलली न कोणाला कायकाय पायजे ते वाडून तिनं स्वत:यं ताट वाडून घेतलं.
" अह्या प्रकारे मीन, माया लग्नाला घरशा जकल्यांयी मुक संमती मिळवली "
(२७)
"सोमवार ऊजाडला,डहाणूला आॅफिसला जाव्याहाटी मीन तलासरीहून हक्काळशी ऊधवा— डहाणू येस्टी पकडली.कव्वा परत एकदा रयवार ऊजाडून मी कल्पनाला भेटतो ,न जकल हांगतो अह मला होऊन गेलं."
"तो आठवडा मीन जीवावरसं काडला,रयवार ऐवजी मी शनवारी हानशीस डहाणू बोर्डी येस्टी पकडून खेडपाड्याया स्टाॅपवर ऊतरला.हांज टळून गेलती,अंधार दाटव्या लागलोया.मीन वाडीया रस्त्यावर साल मांडली.दोनस पावलं साललेन नय साललेन ते मंगारसन एक फटफटी फटफटत आली,न जरा पुडे जाऊन थांबली,फटफटी वाल्यानं मान वळवून पावलं,मीन ओळखलं,आठ दिह्यापूर्वी मला न कल्पनाला मान वळवून पावणारा सावेस होता तो."
"मिनू शेटशा वाडीत जाव्याय हाय नं,अरूण पाटलाया घरा?"त्यानं मला विसारलं"
"हो."मीन हांगटलं,"
"मंग बहा माया मंगारी."त्यान हांगटलं"
"मी त्याया मंगारी बहला,त्यानं फटफटीला किक मारली."
"मी वसंत सावे,बोरडीया,त्यांशा बाजूलास मायी वाडी हाय."त्याईन ओळख दिली."
"मी सुहास राऊत,मुळ गांव वरोर,डहाणूला एम.एस.ई.बी.त नोकरी करतो.माये बाबा का.के.राऊत,तालुका मास्तर हात तलासरीला."मीनव ओळख दिली.
"अायकून हाय नांव त्यांस."ते बोलले."
"मायी मामीव बोरडीयीस,गांवदेवी मनशी,अनसूया तियं नांव."मीन हांगटलं.
"मीव गांवदेवी मनसास,आमशे कुटूंबिस हात ते."सावे बोलले."
"मायाव तीन पोरी हात,बोर्डी हायस्कुललास हिकतात त्या,"सावे पुढे बोलले."
"अरूण पाटील माया मावशीये दीर."मीन हांगटलं."
"हं मागशा सोमवारीस मला बोललोये ते."सावे बोलले.
"अवड्यात वाडी आली.त्याईन मला झाप्यामेरे ऊतरवलं."
"मी झापा ऊगडला.कर्रर्र वाजत झाफा खुलला.मीन झापा बंद केला.कल्पनाया घरातटे सालू लागलो."
"पास पावलं सालला तव कल्पना पुडून येताना दिहली."
"कय सालली तू?"मीन विसारल."
"तुमालास घेव्या आली,झापा करारला,तव्वा मला वाटलंस तुमीस अहतिल."कल्पना बोलली."
"असूक अंदाज हाय तुया."मी बोललो."
"ती नुसती हाअली."
"काय हांगटलं तुया आईबाबांन?"तिनं ऊत्सुकतेनं विसारलं."
"मी थोडा वेळ गप्पस रेलो,मंग बोललो,
"त्यांसा विसार नय दिखे."
"ती एकदम चरकली,तिया काळ्या,टप्पोर्या डोळ्यात टसकन पाणी आलं."
"आमी घरात खिरलो,जकल्या बरोबर हाय,हल्लो झालं.मी ओहरीत बहलो."
"कल्पना क्या गं रंजी जही दिखते?"तिया आईनं विसारलं."
"तिया काळ्या टप्पोर्या डोळ्यामनसनं टपकन अश्रु ओघळले."ती झटकन रान्नीत खिरली.
"बरं नय कां ईला?"मीन विसारलं."
"आता परयंत ते बरी होती,आतास काय झालं तिला कोण जाणे?"तियी आई बोलली."
तवड्यात तियी भोटी बईण मीना ओहरीसन रान्नीत गेली न परत येवून बोलली,
"ती ते रडव्या लागलंय,काय हांगेव नय क्या रडते ती."
"अरे ,बोलाव तिला,काय झालंय बगू."मी बोललो."
"मीना परत रान्नीत खिरली.रान्नीसन परत ओहरीत आली.
"कल्पनाव रान्नीया दारात येवून खाली मान घालुन स्तब्धपणे उबी रेली."
"क्या गं, कां झालंय तुला?तब्येत बरी नय का तुयी?न रडव्या कां लागलिय?"मीन तिला विसारलं."
"ती कायव बोलली नय,तिये काळे टप्पोरे डोळे परत पाण्यानं भरून आले."
"आज मला कोणी शाव विसारला नय,करून आणते कां तू?"मीन तिला विसारलं."
"हो, आणते."आपले डोळे पुहत,मा तटे न पावतास ती रान्नित वळत बोलली."
"सर्वत्र स्तब्धता पसरली."
(२८)
"थोड्या वेळात कल्पना शा घेवून आली.माया पुड्यात कोपबशी घेवून ऊबी रेली.मीन तिया हातासन कोपबशी घेतली,शासा कोप तोंडाला लावला,एक घोट शा पिला न आप्पा तटे पावत विसारलं,
"आप्पा अथी रेशनवर हाकर नय मिळे का?"
"मिळते ती,पण पुरते का ती?पण कालस मीन डहाणू स्टेशन वरशा काळ्याया दुकानामनसन पास किलो हाकर आणून दिलाय."आप्पा बोलले"
"नय या शात हाकर नय टाकली भगून मीन विसारलं."मी बोललो.
"आज काय झालंय कल्पनाला कोण जाणे?"कल्पनायी आई माया हाताशी कोपबशी घेत कल्पनाकडे जरा रागानंस पावत बोलली."
"थोड्या वेळानं शा घेवून परत कल्पना माया पुड्यात ऊबी रेली.मीन शासी कोपबशी तिया हातामनसन घेटली न शासा कोप ओठाला लावत एक घोट शा पिला न आप्पाकडे पावत बोललो,
"आप्पा मी कल्पनाला मागणी घालायला आलोय."
"साईनाथायी कृपा!"आप्पा हम्मोर कुडावर टांगलेल्या साईनाथाया फोटोला हात जोडत बोलले."
"तिनं कल्पना दिलती मला मागे तुमी गेल्यावर."आप्पा बोलले,
"सुखी र्या तुमी!"
आप्पा पुढे बोलले.
वातावरणातली स्तब्धता एकदम निवळली.जकल्याया चेहर्यावर हाआ फुललं.कल्पनानं मायातटे लटक्या रागातस पावलं न ती रान्नीत निंगून गेली."
"मीन शा खपवला,
"कल्पना ,कोपबशी घेऊन जा सुहासमेरशी."कल्पनायी आई बोलली.
"कल्पना ओहरीत आली,माया मेरशी कोपबशी घेऊन रान्नीत गेली न परत ओहरीत येवून आमशात बहली."
"आप्पा लगीन मी लवकरस करव्या हाय,यो पावसाळा खपला का लग्गेस लगीन करव्याया माया विसार हाय."मी बोललो.
"पण आमशी एक अडसण हाय,यी भोटीपोरी मीना, तिया लग्नायी बोलणी सालु हात,पोरीयी जात हाय ,तियं पयलं लगीन झालेलं बरं."आप्पा बोलले.
"ते तुमस तुमी पाऊन घ्या,मी मावशी घरा कवडाक रेणार,मी डहाणूला खोली पावतोय भाड्यानं,ती मिळेलस लवकर. मंग संसाराहाटी बायको पायजेस लग्गेस."मी बोललो.
"पण लग्नाये मोरतं ते सालु होऊन देत,न समाधानाहाटी पत्रिका न जोडतव पाऊन घेवू."आप्पा सासरतस बोलले.
"मायी पत्रिका माया बाबान बनवलेली नय मेळे न जोडत नहेन ते क्या तुमी मला तुमशी पोरी नय देणार?मीन जरा उश्शा आवाजातस विसारल."
"पत्रिका करून घेवू आपण आगरारशा ऊध्दव बामणामेरे न जोडत नहेन ते काय होम हवन करून घेवू त्याया मेरसन."आप्पा बोलले.
"आप्पा तुमी सुधारणावादी अहुन अह्या भाकड कथांवर विश्वास ठेवता?मला आश्चर्य वाटते तुमस."मी बोलला.
"पण रूढी,परंपरा हात त्या,पाळलेल्या बर्या ,लोकलाजेस्तव."आप्पा बोलले.
"आप्पा मी लोकांंयी पर्वा करे नय,न लगीनव मी रजिस्टर पध्दतीनस करव्या हाय या जकल्या रूढी परंपरा मोडव्या हाटी."मी निग्रहान बोललो.
"ये ते घणस झालं,मीन कवड्या भोट भोट्या लोकांयी लग्न खाल्ल्यात,त्यांना ते मला बोलवावस लागेन ,आमशा घरात अजून एकव लगीन झालेलं नय ,न जन लोकव काय हांगतील अहंसोरगुपीन लगीन केलं ते?"आप्पा अगतिकतेनं बोलले.
"तुमी काईव करा, मी मायी मत होडणार नाय."मीन निक्षुन हांगटलं.आप्पा विसारात पडले."
"मी ओट्यावर येवून बहलो."
(२९)
"बायेर धों धों पाऊस कोंसळत होता.वीजा समकत होत्या,सोसाट्याहा वारा हुटला होता,ओट्यावर खुरशीत मी एखलास विशारात विमनस्कपणे बहला होता.अवड्यात माया खुरशीमेरे येवून कल्पना ऊबी रेली."
"तुमी एखलेस क्या बहलेत अहे बायेर येवून?"कल्पनानं मला विसारलं"
"या जगात माहणू एखलास येते न एखलास जाते,ये जीवन सुखानं जगव्याहाटी त्यानं कोणशा साथ संगतीही अपेक्षा धरली ते,ती त्याला मिळेलस अहं हांगता येय नय.अथी बायेर धों धों पाणी पडतेय पण माया मनात लागलेला आगीया वणवा उग्ररूप धारण करव्या लागलाय.माया जकल्या आशा आकांक्षेवर ये पाणी पडतेयं , या पाण्यात मायं जकलं वावून जाईल कि काय अही मला भीती वाटव्या लागलीय.माया मनात रूजलेल्या प्रेमाया बीजाला उखडून टाकणारं ये पाणी वाटतं.."मी उद्विग्नपणे बडबडत होतो."
"कल्पनानं ओट्यावरशी लाईट घालवली,मी बहलेल्या खुरशीमंगारी येवून ती उबी रेली.तिनं तिये हात माया खांद्यावर ठेवले.मला गहिंवरून आलं,मी खुरशीवरून उठून तिया पुड्यात उबा रेलो,तिया हाताये दोनवे तळवे माया ह्रदयावर ठेवत मी तिला बोललो,
"ये हात तु माया खांद्यावर नको ठेवू,खांद्यावर ठेललेले हात मला या क्षणी सांत्वनाये वाटतात,ये हात अहे माया ह्रदयावर ठेव न तू शपथ घे."कोणी कवडाव विरोध करो,कोणतिव परिस्थिती येवो,तू डगमगणार नाय,सदैव मलास साथ देईन."
"सुहास,मी अननुभवी हाय,नियतीनं मला तिया पंजात धरून ठेवलाय,पंदरा वहरं आयबाबानं वाडवलेल्या या शरीराय मन बंडखोरी करव्या पावतेय, मायी साथ तुला लाभेल,नय लाभेल ते यी दुष्ट नियतिस ठरवेल,पण अवडं खरं,मी तुयी झाली नय ते या वाडीशी बाव या वहरा पडलेल्या पाण्यानं काठोंकांठ भरलीय,जमिनी लगत आलेल्या त्या पाण्यात ऊडी मारव्यायीसुध्दा गरज लागणार नाय,कवड्यांदा अह्या पाण्यात उडी मारून हात हालवून मी पोवव्या हिकत होती,पण या वेळी ये हात बिलकुल हालणार नाय,ते जोडलेले अहतील न त्या वेळी माया नजरे हमोर अहेल ती फक्त तुयीस मूर्ति!"कल्पना भावनावेगानं बोलली. "तियं बोलणं खपतास आकाश फाटलं!धों धों पाऊस कोंसळव्या लागला,कानठळ्या बहतील अहा ढगांया गडगडाट झाला, वीजेया एक तिव्र लोळ धरतीया छातीत भाल्याहरका घुसला.जकली लाईट गेली.आख्ख्या परीसरात दाट काळोखायं साम्राज्य पसरलं"
"आमी भानावर आलो तवा एकमेकाया मिठीत होतो.आमशी दोगवायी ह्रदयं एकमेकायी धडकन
आयकत होती."
"दारासन बायेर कंदिलाया प्रकाश येताना दिखला तहे आमी एकमेकापासुन दुर झालो.आप्पा कंदील घेवून बायेर आले.कंदिल डोळ्यापुडे धरून त्याईन वात भोटी केली,त्या मिट्ट अंधारात ती ईवलीशी ज्योत येणार्या उजेडायी खात्री देत होती."
"सुहास,कल्पना जेवुन घ्या सला,लाईट येव्यायी आशा नय मेळे आत्ता."आप्पा बोलले.
"सला."कल्पना मला बोलली.
"आमी घरात खिरलो,रान्नीत आलो."
"रान्नीत मनोमन एक कंदील जळत होता,भाणूसावरसा दीवा त्याला साथ देत होता."
"कल्पनाया आईनं सुलीवरसा भाताया टोप उतरवला.मीनानं भाजीयं पातेलं खाली घेतलं.बिज्या पोर्याईन ताटं घेतली,पाण्याये गलास भरून प्रत्येकाया पुड्यात ठेवले.जकले मांडी घालून बहले.कल्पना माया मेरेस बहली होती.ताटं वाडून झाली,पयलं ताट माया पुड्यात ठेवलं गेलं,जकल्यापुढे ताटं आल्यावर आप्पा बोलले,
"सला,जेवा."
"जकल्याया नजरा आपापल्या ताटावर खिळल्या,कल्पनानं तिया ताटात मावर्यायं कालवण वाडलेल्या भातात ,एक मावर्याया तुकडा मिसळला न हळूस पयला घास मला भरवला.मला मात्र तहं करव्याई संधी मिळाली नय."
"जकले पोटभर जेवले.आमी ओहरीत येवून बहले.बायका भांडोरा ओटव्या लागल्या."
"थोड्यावेळानं मला घालुन दिलेल्या अंथरूणावर मी कलंडलो,कल्पनानं पाण्यानं भरलेला तांब्या न पेला माया उशीमेरे आणून ठेवला.उशी झटकव्यायं निमित्त करून माया हात हातात घेउन तिनं दाबला.त्या आश्वासक स्पर्शाया हुतावरून स्वर्गात जाता जाता मी झोपेया कवा अधिन झालो ते माय मलास कळलं नय."
(३०)
"दुहर्यादिहा हक्काळी मला जाग आली ती माहणांया कलकलाटांनं.मीन घड्याळ पावलं,हक्काळशे आठ वाजलोये,आजुबाजुला पावलं,माया आजुबाजुला आंथरलेले जकले बिछाने गुंडाळले गेले होते.मीन कल्पनाला हांक मारली.ती आली.मीन तिला विसारलं,
"अजून निजून क्या ठेवलंय मला?उठवलं क्या नय हक्काळीस?"
"आज रयवारस तर हाय नं?रजास हाय, तुमाला कय जाव्या होतं हक्काळमन ऊठून ?"तिनं मला प्रतिप्रश्न केला.
"नय आज मी रेणार नय,तुया आप्पांनं त्यांसा निर्णय हांगटलेला नय मेळे अजून मला.त्या मुळे अथी जास्त रेणं योग्य नय वाटे मला."मी बोललो."
"खमा न,जकलं होईल मनाहरकं."कल्पना हमजावणीया सुरात बोलली."
"न बायेर यो गलका जहा क्याला पडलाय?"मीन विसारलं."
"वाडीत काम करणारी माहणं हात जकली.आज रयवार,आठवड्यायी मजूरी घेतात जकले रयवारी."कल्पना बोलली.
"मी बायेर आलो,आख्खा घोळका मला न्याहाळू लागला,ओळख नहताना एक दोघानं नमस्कारव केला मला,मीनव मान डोलवली.मजूरकर बायकां एकमेकिया कानांत कुजबुजल्या.त्यांशाकडे हाऊन पावत कल्पना मला बोलली,
"सला मनत,तोंड धवून घ्या,मी शा आणत."
"मी मनत गेलो.तोंड धवलं,ओहरीत येवून बहलो,थोड्या वेळानं कल्पना रान्नीसन शिर्यानं भरलेली बशी घेऊन आली,माया पुडे बशी धरत ती बोलली,
"गोड शिरा!मीन केलाय,गोड आवडतेन तुमाला?"
"जव पर्यंत तुया बद्दल होकार नय मिळे तव पर्यंत मला कायव गोड नय लागणार."तिया हातासन बशी घेत मी बोललो.ती हाअली,रान्नीत जात बोलली,
" खा,मी शा आणतं."
"मीन शिरा खाव्या सुरवात केली,ती शा घेऊन आली.तिया मेरसन शाशी कोपबशी हातात घेत मी बोललो,
"तु नय खाणार शिरा?"
"मला गोडापेक्षा तिखट जास्त आवडते."ती बोलली.
"मणजे पाव ,आपल्या आवडी निवडीव जमणार्या नय मेळत."मी बोललो."
"खरंस मला ते वाटते एकव गुण जुळणार नय आपला."ती हाअत हाअत बोलली."
"भगून तुया आप्पांना हांग,ऊध्द्धव बामणामेरे जाऊन पत्रिका नको पावू."
मी बोललो.न शा पेव्या लागलो.
"शा पेवून होता होता आप्पा बायेरसन आले त्यांशा हातात पिशव्या होत्या,त्या कल्पनानं घेतल्या,मा तटे पावत हाअत हाअत ते बोलले,
"अरे लवकर ऊठले?निजून रेव्यायं होतं न अजून,आज रयवारस ते हाय,कय जाव्याय?.आजसा दिही र्या,उद्या हक्काळशे जा"
"नय मी सालला आता आंग धवून."मी बोललो.
"अहं कहं होईल?मी ते हक्काळसा प्लाॅटामन जाऊन फक्कड मटणव घेऊन आलो.जेवा न हांनशे जा."
"रे न आता,क्याला भाव खाते?"रान्नीसन आपल्या स्कर्टला हात पुहत मीना आली ती बोलली."
"आता तियं तरी ऐका."कल्पना बोलली."
"ठीक हाय,आंग धव्व्या पाणी काढ जा."मी कल्पनाला बोललो न आप्पानं पुढे केलेला पेपर ऊघडून पावव्या लागलो.
"सला आंग धव्व्या.उनं पाणी काडलाय"पास मिनिटात कल्पना आली,ती बोलली."
"मी पेपर ठेऊन ऊठलो.मंगदारासन बायेर आलो.
"पावसानं एकदम ऊघाड दिली होती.लख्ख निंबर पडलोय.मी बायेरस बांदलेल्या,दरवाजा नहलेल्या झांवळ्याया बाथरूम मन खिरलो.दगडाया भोट्ट्या हिळेवर ऊबा रेवून,तांब्याभर पाणी भरून डोख्यावर ओतणार अवड्यात कल्पना आली न बोलली,
"टाॅवेल घेऊन आली ,विहरली होती."
"मीन तिया मेरसा टाॅवेल घेऊन ओलाणीवर ठेवला.न तिया तटे पावलं,कल्पना मायातटे स्तब्ध होऊन पावत होती,मायी नजरा नजर होतास भाराऊन ती बोलली,
"कवडे गोरे हात तुमी!"
"गोरा अहुन का ऊपयोग?कोणी आपली काळी पोरी देव्याव ते तय्यार नय मेळे"मी बोललो.
"ती हाअली,बालदीसं पाणी आपल्या दोनव्या खोब्यामन भरून तिनं माया ऊघड्या आंगावर फेंकलं,ते पाणी गरम अहूनपण त्यानं माया अंगावर शहारे ऊठवले.मी तिया आंगावर पाणी ऊडवव्या आदीस तिनं घरात धुम ठोकली."
(३१)
" जकल्याहं दुफारसं जेवण झालं,मी कल्पनाला बोललो,
"मी निंगत आता,"
"अवड्यात तय जाऊन काय माख्या मारणार हात?, आज ते हुटीव हाय नं?.उद्या हक्काळसे जा ना?हां,तहीस कोणी खास भेटव्याला येणार अहेन ते जा बाबा."तिन तोर्यातस हांगटलं."
"आता जिंदगीत कोणालास भेटव्याय नाय मला.एखलास रेणार हाय मी या पुडे.डहाणूला पौर्णिमा टाॅकिजला "कोरा कागज"पिक्चर लागलाय,जातं न पावतं मायीस कर्मकहाणी."मी बोललो.
"बिजा कोणता पिक्चर लागलाय चंद्र टाॅकिजला?"तिन विसारलं."
"जय संतोषी माॅं!"मीन हांगटलं."
"आय्या खरंस?माला पावव्या हाय तो,मीन सोळा शुक्रवारसं व्रत केलतं माया बर्या हाटी."कल्पना बोलली.
"पण काय फायदा झाला त्याहा?बाबा ते मानेव नय लग्नाला?"मीन हांगटलं"
"नय नक्किस प्रसन्न होते संतोषी माॅं,तुमीव पावा सला?"कल्पना बोलली."
"तुया बरोबर लगीन होईल तव्वास मानेन मी,मंग शिनेमातस क्याला प्रत्यक्ष आशागडला जोड्यानं जाऊनस पाया पडु संतोषीला."मी बोललो.
"तु येते का "कोरा कागज" पावव्या?पावू ,तो पाऊन तरी तुला दया येते का मायी?न आली दया ते आप्पामेरे घेऊन ये तो "कोरा कागज"सही करव्या?"मीन हांगटलं.
"ती विसारात जही पडली,"
"आप्पांना विसारा." ती बोलली.
"आप्पा,कल्पनाला धाडता का आता माया बोरबर डहाणूला शिनेमाला?"दुफारसा शा पेता पेता मीन आप्पाला विसारलं."
"कोणता हाय शिनेमा?"आप्पान विसारल."
"जय संतोषी माॅं!"मीन हांगटल.
"फुर्रर्र!"आवाज आला,कल्पनाला हाऊ फुटलं होतं,शा पेता पेता तिया तोंडासन फव्वारे ऊडाले."
"न्या ,पण एखलिलास नेऊ नका."
"आमी जकले येतो."आप्पांयं बोलणं पुरं होवव्या आदीस जकल्या पोर पोराईन गलका केला."
"संतोषी मातेयी आरती अथीस घेतली ते बरं होईन अहं मला वाटलं"
(३२)
"तुमी कय जातात जकली बारकी पोरं?पाण्याये दिही हात,येताना रातव होइल."आप्पांन जकल्यांना दटावलं.जकल्या बारक्या भाहा बयणी हिरमुसुन ओग्यासरेल्या.
"कल्पना सोबत मीनालाव घेवून जा,एखलिला धाडणं योग्य नय."आप्पा मला बोलले.
"ठीक हाय."मी बोललो.
"तयारी करून आमी तिगवे बायेर निंगाले,येस्टी स्टाॅपवर येवुन डहाणू येस्टी पकडली न डहाणूला आलो.पौर्णिमा टाॅकिजला जाऊन "कोरा कागज" शिनेमा पावला.रातसा नव वाजता शिनेमा खपला.आमी टाॅकिज बायेर आलो.बायेर कल्पनाया भाहा सुनील न विश्वनाथ भेटले.सुनिल त्यायी रिक्षा घेऊन आलता,आमी रिक्षात बहले,सुनीलजुन मला न विश्वनाथला नरपडला आणून होडलं,दोनव्या बयणींना घेऊन तो वाडीत भिनारीला निंगून गेला."
"त्या राती माया डोळ्यापुढे गेल्या दोन दिहाया घटनेया शिणेमा सुरू झाला."
(३३)
"सोमवार ऊजाडला,नेहमीप्रमाणे मी आॅफिसला येवून कामावर बहलोया,अवड्यात आॅफिससा शिपायी चिमण दुबळा आला न मला न आमशे वरिष्ठ श्री डी.के राऊत,नरपडकर याना,
"सायबानं वारटलंय "
अहं हांगून गेला.आमी सायबाया कॅबिनमन खिरले तय बोयसरला रेणारा पण तलासरी आॅफिसमन कामाला अहणारा एम.के.जोशी बहलोया,आमाला पावतास तो बोलला,
"पाव सुहास,आणलीन आपल्या आपसात बदलीयी आॅर्डर?"
"त्यान आमशा विनंती वरून निंगलेली बदलीयी आॅर्डर माया हातात ठेवली.डहाणूला आल्या आल्या जोशीया विनंती वरून आमीन विनंती बदलीया अर्ज दिलता ,
"माया भाहा मुंबयला हेड आॅफिसमन सायबाया शिपाई हाय त्याहा वशिल्यानं मी आपली बदली करून आणत "
अहं त्यान मला हांगटलोय पण अवडी तडका फडकी बदली होईन अह मला वाटलं नव्हतं."
"जोशी तलासरीहून हुटून आलेत तवा त्यांना कामावर हजर करून घेवून राऊतना आज होडून द्या."
अहं अर्कशाली सायबानं ईनचार्ज डी.के.राऊत सायबाना हांगटलं."
"व्वा सुहास!लक्कि हाय तू,दोन मयन्यात दुहरी बदली झाली,आत्ता घरा रेवून रोज आयशा हातसं उनं उनं जेवण खाव्या मिळणार." डी.के.राऊत बोलले.
"पण या बदलीनं आनंद होवव्यापेक्षा मला दु:ख्खस जास्त झालं.पण आता ईलाज नव्हता.
"दिनांक २१ जुलै १९७४ ला हांन्शेपारा मला डहाणूया आॅफिस मनसन होडून निरोप दिला गेला.दुहर्या दिहास तलासरीला आॅफिसमन हजर होवव्या होतं भगून मी
"नरपडला येणार नाय"
अहा निरोप दिनू भाऊमेरे दिला न माया मावशीला हांगव्या हांगटला न डहाणू उधवा येस्टी पकडून तलासरीला आलो.
"तलासरीला आमी रेतोये तयस बदली होऊन मी घराआला भगून घरशा जकल्यानास अत्यानंद झाला."
"दुहर्या दिहा २२ जुलै १९७४ ला मी तलासरी हाफिसला कामावर हजर झाला."
"मीन कल्पनाला पत्र लिवून जकली हकिगत कळवली."
"तिया आप्पानं ऊत्तरा दाखल लगेस पत्र लिवलं ,त्यात लिवलोय ,
"लग्नायं नक्कि ठरवण्या हाटी तुमी तुमशी शार माहणं घेवून भिनारीला वाडीत आमशा घरा या."
"मीन आमशा घरा ते पत्र दाखडलं.जकले बोलले,
"आप्पांन बरोबर लिवलंय,आपण त्यांशा घरा जाऊन समाजाया रिती रिवाज ,रूढीयं पालन करव्या पायजे न काय ते नक्की करव्या पायजे."
"समाज,रिती,रिवाज,रूढी या शब्दांन माया डोख्यात घण जहे हाणले.त्यास सणकित मीन हांगटलं ,
"मी अह कायव करणार नाय,मी आप्पांनास आवश्यकता अहेल ते अटे या अह कळवत."
"मीन कळवल्याप्रमाणे एका रयवारी आप्पा,कल्पना,सुनील,मीना,विश्वनाथ तलासरीला आमशा घरा आदी कळवून आले,कल्पना न मीना हाड्या निहून आलत्या.हाडीत कल्पना मला एका वेगळ्यास रूपात दिखली.सुंदर बावली हरकी वाटली."
"शा पाणी झालं पण कोणी विषय काडव्या धजावत नव्हतं."
"भोटा भाहा प्रकाश न जीवलग मित्र शंकर यायीन आख्खा पाडा फिरून मस्त कोंबडा खोळून आणलोया,बाबानं कोंबडा मारून दिलता,आईनं कोंबडा हिजवव्या लावलोया त्याया घमघमाट जकल्या घरभर पसरलोया."
"तुमी पेत अहतील ते गोडी हूर आणेली हाय."बाबानं आप्पांना हांगटल."
"सालेन."आप्पा बोलले.बाबानं हूरेये गलास भरले,तीन गलास भरून झाल्यावर बाबांना थांबवत सुनिल बोलला,
"बस."आमी बायेर जाऊन येतात." न ,तो न विश्वनाथ ऊठला,प्रकाश न शंकरव ऊठले न त्यांशा बरोबर बायेर गेले."
"लवकर या रे."आप्पा त्यांना बोलले."
"बाबानं हुरेया गलास हुसलून आप्पाया हातात दिला,स्वताव घेतला,मीनव माया गलास हुसलला,कल्पना मीना रान्नीत गेल्या."
"आमशा सुहासला काडीय व्यसन नाय.हूरव गोडी अहेन तरस पेते"बाबान आप्पांना हांगटलं."
"मायीत हाय आमाला."आप्पा बोलले,"व्यसन नहवस."आप्पा पुडे बोलले."
"अवड्यात लहान भाहा विकास बाफेल्या सण्यायी बशी आमशा पुड्यात ठेवून गेला."
(३४)
"थोड्या वेळात मीन रान्नीत खिरून डोकावलं.आई ,न मुद्दाम वारटलेली, लगीन झालेली भोटी बयीण प्रतिभाताई पुर्या लाटून तळतोया.कल्पना,मीना न धाकल्या बयणी अलका,माधुरी खाली पाटावर बहलोया."
"पावा न आई मला मदत करून देत नय स्वैपाकात."कल्पना मला बोलली."
"तुला आजशा दिहा जेवण घालून जन्मभर आयत खाव्या हाय तिला."मी बोललो."
"पण करता येते का तिला जेवण?"आईनं मला विसारलं"
"हो जकलं करव्या हिकलंय ती."मीनास बोलून पडली."
"नय जरी येतेन काय तरी आमशी आई सुगरण बनवेल तिला."भोटी बईण प्रतिभाताई बोलली."
"आमी दोगव्या बयणी तुला मदत करू जकल्या कामात."धाकटी बयीण अलका बोलली,धाकल्या बयीण माधुरीनव हाऊन तिला प्रतीसाद दिला."
"मी बायेर आलो,प्रकाश,शंकर,सुनील,विश्वनाथ येवून बहलोये."
"हात पाय धवा सला,जेवण तयार हाय."थोड्यास वेळात रान्नी बायेर येवून आई बोलली."
"जेवणाआदी आपण बोललेल बरं."धीर करून आप्पा बाबांना बोलले."आदीस आमी जेवणार नाय."आप्पा पुडे बोलले."
"मीन जेवण व्यायी भगून तुमाला केलेलं नय,माया बयणीये देर भगून केलेलं हाय, तवा हातपाय धवा न आदी जेवव्याला बहा."आईनं हांगटलं"जकले हातपाय धवव्या ऊठले.पाटावर येवून बहले.जकल्या गो माहणांना वाडलं गेलं."
"जेवण ते घणस फक्कड हाय!"पयला घास खातास आप्पा बोलले."
"आठ वहरायी होती तवा लगीन करून आली,जकलं हाऊन हिकवलं माया."आई बोलली."
"तहस तुमी कल्पनालाव हिकवा न हंबाळून घ्या."आप्पा बोलले.
" जकले जेवव्या लागले."
(३५)
"जकल्यायं जेवण झाल्यावर आमी घरशी मंडळी एका खोलीत बहले,पावणे मंडळी दुहर्या खोलीत होती,"
"सुहास तुया ठाम निर्णय त्यांना तू आजस हांगून टाक'"बाबा बोलले."
"पोरीया बाबाला ऊगीस धाकधूक नको,"आई बोलली."
"तुला पसन हाय नं?मंग हांगून टाक."प्रतिभाताई बोलली.
"माई ते कायव हरकत नाय."भोटा भाहा प्रकाश बोलला."
"बरी हाय वयनी."धाकला भाहा विकास बोलला."
"भोळी हाय बिचारी,मला ते घणीस आवडली.आपल्या मैत्रिणि हरकी रेन आपल्या बरोबर."लहान बयीण अलका बोलली."
"एकदम गोरी अहती ते जास्तच शोभून दिहली अहती सुहासला."जकल्यात धाकटी बयीण माधुरी बोलली."
"रंग क्या साटून खाव्या अहते कां?"लहान बयीण अलका बोलली."
"अह्या प्रकारे जकल्यायीन संमती दिली."
"ठीक हाय,मी माया निर्णय शा पेताना हांगत आप्पांना."मी बोललो."
"आईनं प्रतिभाताईला शा ठेवव्या हांगटला."
"आमी जकले पावणे बहलेल्या खोलीत आलो."
"झाला कां आराम?"बाबानं अप्पाला विसारलं."
"हो,आमी वार्ता करतस बहलोये."आप्पा बोलले.
"प्रतिभा शा घेवुन ये जा."आई बोलली."
"भोटी बयीण रान्नीत गेली न शा घेवून आली.जकल्यांना शा दिला,जकल्याईन शा पिला."
"आप्पा माया निर्णय ठाम हाय,मी कल्पना बरोबरस लगीन करणार.तुमाला वाटते तहा एक वहराहाटी खमेन पण मी."मी बोललो."
"वा, वा आनंद झाला,लवकरस आपण एक रित करून टाकू."आप्पा बोलले."
"आप्पा,या रिती,रिवाजाला माया ठाम विरोध हाय,खण पातळ,साक्षी विडा,हाकरपुडा काय करणार नय मी,पण माय वाक्य ब्रह्मवाक्य हाय ,पायजे ते स्टॅम्प पेपरवर लिवून न्या तुमी."मी बोललो."
"आप्पा तुमशी पोरी मणजे माया बयणीयी पोरी,निर्धास्त र्या तुमी."आई बोलली.
"साई बाबायी कृपा!"आप्पा बोलले."
"अह्या प्रकारे आमशात लग्नाया अलिखित करार झाला."
"कल्पना जकल्याया पाया पडली.बाबानं पुढे केलेल्या मुठीसन पैसे घेऊन आईनं कल्पनाया हातावर ठेवले,प्रतिभाताईनं पण तिया मेरशे काही पैसे कल्पनाला दिले.अलकानं तिया केंसात वेणी माळली,माधुरीनं तिला रूमाल दिला.आप्पानं खाव्या भगून आणलेली मिठाई आईनं जकल्यांना वाटली.एक नव्या प्रकारे आमसा वाङमनिश्चय पार पाडला गेला.हान्शी डहाणू गाडी पकडून आप्पा न मंडळी परत गेली."
(३६)
१४ आॅक्टोबर १९७५,दहर्याया दिही होता तो,सतरा मयने निस्सिम प्रेमात गुरफटलेले आमी डहाणु किल्ल्यावरशा रजिष्ट्रार आॅफिसमन लग्नाया कायदेशीर बंधनात गुंतलो.
आज ४४ वहरं झाली या जकल्या गोष्टींना.वहरभरापुर्वी लिवेलं ये भारुड 'लगीन कहं जमल?ते "वाडवळ कट्टया"वर लिवा अहं जयप्रकाशजुन आवाहन केलं भगुन कट्टयावर टाकव्याया मोह झाला.
आज माये बाबा,आई,धाकली बयीण अलका,तलासरीकर मित्र शंकर,कल्पनायी आई काळाया पडद्या आड गेलेत.
१८ वहरांपुर्वी माया अस्पर्श मैत्रिणियाव शोध लागला, १५ वहरापुर्वी वयाया पन्नाशीत एका कार्यक्रमाहाटी पेणला गेलता तवा मलबारीबाईव मनमुराद भेटली. कल्पनाया शाळा सोबतीव ४५ वहरान फेसबुकशा माध्यमातुन न मंग प्रत्यक्ष भेटला. आज ४४ वहरं मी व कल्पना (सौ.अस्मिता) पतीपत्नी पेक्षा मैत्रिया कोषात गुरफटुन हात. आमशा प्रेमाये रेशमी बंध नाजुक अहले तरी अभंग हात.
—सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,
सी—१०,रामजीपार्क,डहाणुरोड (पुर्व).
+91 99230 04895
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.