Dr. Ninad

Dr. Ninad Raut

Plants, Traveller, Blogger

औषधी वनस्पती

आयुर्वेद (Ayurveda) हा संस्कृत शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.


आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. आपल्याला होणारे बरेचसे आजार हे आजार नसून लक्षण असतात... उदारणार्थ सर्दी हा आजार नसून ते एक लक्षण आहे... आणि म्हणूनच कोणतेही औषध घेताना वैद्यकीय सल्ला अतिशय महत्वाचा असतो. आपल्या नेहमीच्या माहितीतली पण तरीही दुर्लक्षित अशा काही औषधी वनस्पतींची माहिती आपण इथे घेऊयात. 

 

Tulsi

तुळस :
तुळस हीउष्ण, हलकी, कोरडी, तीक्ष्ण, शरीरातील प्रत्येक कणापर्यंत तात्काळ पोहोचणारी असते. तुळशीच्या औषधासाठी विशेषतः रसाच्या रुपात वापर करावयाचा असेल तेव्हा ताजीच पाने वापरावीत व ही पाने तुळशीला मंजिर्या  येण्याअगोदर घ्यावीत. कारण मंजिर्यार येण्याअगोदर पानांमध्ये गुणांची तीव्रता अधिक असते. तुळशीचे बी तिच्या मंजिर्यांरमध्ये असते. मंजिर्याह काळ्या स्निग्ध, चमकदार होऊन आपोआप गळायला लागतात. तेव्हा गोळा कराव्यात. हे बीज बल देणारे व मूत्रप्रवृत्ती वाढविणारे असते. ताप आल्यास तुळशीची ३०-४० पाने व ३-४ काळी मिरी ४ तांबे पाण्यात उकळून १ तांब्या उरवून रात्री गरम प्यायल्यास घाम येऊन ताप उतरतो. उचकी लागल्यास एक चमचा तुळशीच्या रसात तेवढाच मध घेऊन चाटल्यास उचकी थांबते. खोकल्यातून कफ पडतांना त्रास होत असल्यास दिवसातून ४-५ वेळा एक-एक चमचा तुळस रस घेतल्यास कफ सुटतो. नायट्यासारख्या रोगात व कीटक दंशावर तुळशीचा पानांचा रस उपयोगी पडतो. पोटामध्ये वायू झाल्यास तुळशीचा रस तुपाबरोबर घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही त्यांनी सकाळी तुळशीचा एक चमचा रस साखरेबरोबर घेतल्यास सात दिवसांत फरक जाणवतो.


kadu limbuकडूलिंब :
एक उत्तम जंतुनाशक, त्वचा विकारांमध्ये उपयोगी आणि नैसर्गिक कीटकनाशक असे बहुगुणी कडुनिंब. खरुजेच्या फोडामधून अधिक प्रमाणात पू बाहेर येत असेल तर कडूलिंबाची साल जाळून त्याची राख त्या ठिकाणी लावावी.पू तयार होणे थांबते.

 

korfad

कोरफड :

लहान मुलांच्या कफावर कोरफड फार उत्तम गुण देते.कोरफडीची पाने विस्तवावर थोडी गरम करुन त्याचा अंगररस काढावा आणि त्यात किंचिंतसे मीठ टाकून लहान मुलास पिण्यास द्यावे. म्हणजे परसाकडे साफ होऊन कफ नाहीसा होतो.

 

haladहळद :
हळदीचे बरेच औषधी उपयोग आहेत. हळद एक उत्तम जंतूनाशक आहे. जखमेवर हळद दडपल्यावर रक्त येण्याचे थांबून पुढे पू होण्याची भीती रहात नाही.हळद हि एक रक्त शुद्धीकारक आहे घसा दुखणे, खोकला यासाठी गरम दूध व हळद पिणे किंवा गूळ हळद खाणे, हे उपचार आपण नेहमी करतो. याशिवाय खरुज किंवा ज्या इतर काही त्वचारोगात अतिशय कंड. त्यामध्ये हळद आणि कडूनिंबाच्या पानांचे वाटून केलेले मिश्रण पोटात घेण्याने आणि वरून लावण्याने उपयोग होतो.

 

ambaआंबा :
आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

 

anjirअंजीर :
अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात. अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

 

awlaआवळा :
आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.

 

Ussऊस :
कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर मिळणार्याा उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो.

 

drakshaद्राक्षे :
द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

 

limbuलिंबु :
लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

 

jambhulजांभूळ :
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण घ्यावे, लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.

 

dalimbडाळींब :
डाळिंबात अनेक औषधी गुण आहेत. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते. आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार (संगहणी) बरा होतो. काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

 

keleकेळे :
केळे हे शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते. हे लक्षात ठेवावे. तसेच ते थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो.

 


boreबोरे :
आंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी जीवनाश्यक सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण, वातविकार यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. निम्या प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा. हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्तच प्रभावी ‘ब्रेनटॉनिक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस टाकून मलग तयार करा. हे मलम चेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.

 

अनेक संकेतस्थळांवरून आणि काही पुस्तकामधून हि माहिती संकलित केली आहे. म्हणून त्यात दिलेला वापर अतिशय सावधानतेने करावा अथवा त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा. आधुनिकतेच्या जगात आपण आपल्या अवतीभवती आढळणाऱ्या वनस्पतींना विसरतोय म्हणून हा लेखप्रपंच... पुढच्या लेखात अशाच काही वनस्पतींचा मागोवा घेऊयात.


 

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Meenal
Meenal Patil
01-Aug-2018 08:24 AM

खुप महत्वाची माहिती आहे. डाॅ. निनाद, धन्यवाद.

Narendra
Narendra Patil
07-Sep-2018 12:44 AM

औषधी वनस्पतींचे उपयोग चांगले आहेत.

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

0 + 9=    get new code
Post Comment