नुकताच आपण मुंबई हल्ल्याच्या नवव्या वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम झालेले पाहिले. हल्ला झाल्याच्या रात्रीच विविध ठिकाणाहुन सुरक्षा दलांना पाचारण करावे लागले. खंडप्राय आपल्या देशात आपत्ती कुठेही आणि कधीही येऊ शकते. आशा अनेक आपत्तीना तोंड देण्यासाठी एक केंद्रीय संस्था भारतात कार्यरत आहे. ती संस्था आहे NDMA. केंद्रीय गृह विभागाच्या अधीन ही संस्था काम करते; अर्थातच नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी किंवा राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरण.
कुठल्याही नवीन गोष्टींची निर्मिती ही गरजेपोटी होत असते. १९९९ च्या गुजरात भूकंपानंतर अशा एक व्यवस्थेची गरज वाटु लागली की, ही व्यवस्था आपत्ती काळात पीडित क्षेत्रात जाऊन तेथील जनतेला सर्वकष मदत पोहचवून वेदनांची किंवा पीडेची दाहकता कमी करू शकते. भारतीय सरकारने त्याकरिता एक उच्चाधिकार समितीचे गठन ऑगस्ट १९९९ मध्ये केले. ह्या संस्थेने आपत्ती काळात संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी काही सूचना केल्या, ज्यांना अनुसरून २३ डिसेंबर २००५ साली भारतीय सरकारने राष्ट्रीय आपत्ती कायदा संमत केला व त्या कायद्याला अनुसरून NDMA ची राष्ट्रीय स्तरावर तर SDMAs स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटीस् ची राज्य स्तरावर निर्मिती केली. राष्ट्रीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख पंतप्रधान तर राज्य स्तरावर राज्यांचे मुख्यमंत्री प्रमुख असतात.
NDMA चे मुख्य कार्य आहे ते आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार असण्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करणे, त्यासाठी विविध धोरणांची निश्चिती करणे, आर्थिक पाठबळ देणे, राष्ट्राला आपत्ती अभिमुक बनवणे, म्हणजेच कुठल्याही आपत्तीसाठी तयार राहणे, आपत्ती येऊच नये म्हणुन उपाययोजना करणे, एकाचवेळी अनेक आपत्ती आल्यास त्यांना सामोरे जायला जनतेला तयार करणे आणि पीडित जनतेला आपत्तीतून उभारी घ्यायला मदत करणं.
आपत्तीचे दोन मुख्य प्रकार आहेत, १. निसर्गनिर्मित आणि २. मानवनिर्मित.
१. निसर्गनिर्मित आपत्ती:
- भूकंप
- पूर
- दरडी कोसळणे
- चक्रीवादळ
- नागरी पूर
- त्सुनामी
- उष्माघात इ.
२. मानवनिर्मित आपत्ती:
- अणुऊर्जा आपत्ती
- रासायनिक आपत्ती
- जैविक आपत्ती
- मानवनिर्मित आपत्ती मध्ये मुख्यत्वे दंगली, बॉम्बस्फोट, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
National Institute of Disaster Management ही आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या कौशल्य विकासासाठी कार्यक्रम राबवित असते. त्यांच्या वेबसाईटवर आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच DMC म्हणजेच जी आपत्ती व्यवस्थापन केंद्रे, जी प्रत्येक राज्यात अस्तित्वात आहेत, तिथे आपणास संपूर्ण माहिती मिळू शकते. महाराष्ट्रातील केंद्र पुणे येथे आहे.
NDMA आणि NIDM ही देखील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनेची मुख्य अंग असली तरी आपला किंवा संकटात सापडलेल्या जनतेचा सबंध येतो तो NDRF शी, म्हणजेच मगाशी म्हटल्याप्रमाणे नॅशनल डीजास्टर रिस्पॉन्स फोर्स. जसा आपल्या भरवशाच्या डॉक्टरकडे गेल्यावर आपला अर्श आजार गायब होतो, तसंच काहीसं NDRF च्या बाबतीत आहे, इतका भरोसा लोकांना त्यांच्यावर आहे. NDRF च्या वेबसाईटला भेट दिल्यास मागील काही वर्षांतील त्यांच्या कार्याची महती कळते. पूर, पुल कोसळलेला असताना केलेलं कार्य, इमारत कोसळली असताना केलेलं कार्य, डॅम तुटणे, बोट बुडणे, रेल्वे अपघात, कुंभमेळा इत्यादी सर्व ठिकाणी आपत्ती निवारणाचे कार्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेने केले आहे. इतकेच नाही तर परदेशात देखील नेपाळमध्ये भूकंपावेळी व जपानच्या अणुकेंद्र गळतीवेळी आपल्या आपत्ती व्यवस्थापनाने काम केले आहे.
आपत्ती आल्यावर आपण अनेक उपाय करतो. होणाऱ्या त्रासाला, संकटांना सामोरे जात अनेक प्रसंगांमध्ये लोकांना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिलेली अनेक उदाहरणे आहेत. हिरोशिमा आणि नागासाकी ही तर प्रमुख उदाहरणे आहेत. आपत्ती किंवा इतर कुठलेही लहानसहान संकट येऊच नये, यासाठी प्रयत्न करणे केव्हाही चांगले. आपले आपत्ती व्यवस्थापन देखील त्यासाठी प्रयत्न करते. आपणही आपल्या परीने आपत्ती येऊच नये ह्यासाठी निसर्गाचा ऱ्हास थांबवून व एक सजग नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावून हातभार लावून मदत करू शकतो, आणि तरीही आपत्ती आलीच तर त्याला धीराने तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपल्या बरोबर आहे ह्याची आठवण ठेवावी. ते कुठल्याही क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचतील ह्याची खात्री असू द्यावी. NDRF चे ब्रीदवाक्य आहे, saving lives and beyond....
वेबसाईट:
http://www.ndma.gov.in/en/
http://www.ndrf.gov.in
http://nidm.gov.in/default.asp
हरेश क राऊत, पोफरण,
hareshraut69@gmail.com
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
अलीकडेच, वसई-विरार येथे जी पुर स्थिती निर्माण झाली होती तेव्हा ह्याच NDRF च्या टिमचे कार्य जवळुन पहाता आले. ब्लॅाग वर सविस्तर महिती मिळाली. धन्यवाद.