Vijaya

Vijaya Chaudhari

Reading & Writing

पालकांसाठी

2054

स.न.वि.वि.

आज आपल्याशी  गप्पा माराव्याशा  वाटल्या. सर्वांना भेटणार कसे? म्हणून हा पत्र प्रपंच.

आजचे पालक सुशिक्षित आहेत. पैसाही भरपूर आहे. पण समस्या संपत नाहीत. पहिली मोठी समस्या मुलाचं शिक्षण. कळतंय पण वळत नाही; कारण वेळ नाही अशी अवस्था सर्वांचीच आहे. आपण लहान असताना एवढया स्पर्धा नव्हत्या, प्रलोभने नव्हती. घरात भरपूर माणसे होती; त्यामुळे मुलांना एकटेपणा नव्हता त्याच्या खाण्यापिण्याचीही चिंता नव्हती. मुख्य म्हणजे मातृभाषेतून शिक्षण, इगंज्री माध्यम असले तरी एस.एस.सी. बोर्डाचे शिक्षण. त्यामुळे पांगुळगाडयाची गरज नव्हती. सारे काही आल-बेल हाते. मग आत्ताच काय बिघडले?

मुळातच आपले काही नैसर्गिक गुणधर्म असतात. अर्थात् मुलांचेही. त्यांना खूप बोलायचे असते. मोठ्या मुलांना आपण बोलते करायचे असते. त्याच्यां मनातील सारे काही त्यांनी भडाभडा व्यक्त केले पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तींनी त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांना मोकळेपणाने त्यांच्या मनातील चागंले-वाईट विचार आपल्याबरोबर घडाघडा बोलावे म्हणून त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. घरातील मोठया व्यक्तीं बद्दल त्यांना आदर असावा, धाक वा भिती नाही. त्यांना खूप खेळायला वेळ दया. जवळ मैदान असेल तर उत्तम; न पेक्षा हल्ली मुलांना क्रिकट, फुटबॉल इ. खेळ खेळायचे कोचींग क्लासेस असतातच. एक तासभर टी.व्ही. बघू दे. पण मोबाईल, ई पॅड, कॅलक्युलेटर ही साधने त्यांना देऊ नका, आता उरलेला एक-दीड तास अभ्यासाला पुरे. रोज शाळेत शिकलेला अभ्यास आणि गृहपाठ करायला एवढा वेळ पुरे. फक्त त्यात सातत्य हवे. त्याचं यावर फार दडपण आणू नका. आपले विचार त्याच्यावर लादू नका. त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवायच्या त्याने त्या सगळया पूर्ण केल्याच पाहिजत असा आग्रह असू नये. त्याला त्याचे निर्णय घऊे दे. त्याच्यात चागंले-वाईट ह्याची निवड करण्याची निवड क्षमता निर्माण झाली पाहिजे. फक्त त्याची वाट तर चुकणार नाही ना? ह्याच्याकडे तुमचे लक्ष असू दे. त्यांच्या भूमिकेत शिरा म्हणजे त्यांच्या मनाचा थागं तुम्हाला लागेल. हाताची पाच बोटे सारखी नाहीत, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची धाव, आवड भिन्न असेल. निवडू दया चोखंदळपणे त्याला त्याचा मार्ग. नका घेऊ टेन्शन. त्याला सगळे देता त्याबरोबर चांगले संस्कार दया. थोडे स्वातंत्र द्या.

इ. ८वी पर्यंत शिकवणी, क्लास नको. त्यांना त्यांचा अभ्यास समजून घेऊन करु दे, ह्यानं गुण कमी मिळतील का? ह्याची चिंता करु नका, पाण्यात पडू दे त्यांना. आपोआप धडपडता धडपडता शिकतील ती पोहायला. त्यांच्या जवळ त्यांचा अल्लादिनचा जादूचा दिवा आहे - त्यांचा मेंदू. घासू देत त्याला. येईल ब्रह्मराक्षस मदतीला. त्याची वैचारिक पात्रता, निरीक्षणशक्ती तर्कज्ञान वाचू दे. शिकवणीचा पांगुळगाडा नको. आणि दुसऱ्याच्या पानातील लाडूकडे तर अजिबात बघू नका. आजुबाजुचा दुसरा विदयार्थी काय करतो? त्याचे पालक काय करतात? गरज नाही. आपलं मूल कुठे चुकतंय तेवढचे बघा. त्या चुका स्विकारा, त्यालाही त्या शिकायला शिकवा आणि सुधारणाही प्रेमाने करा. आपण म्हणतो ना... अपयश ही यशाची पहिली पायरी. मग त्याच्या यशाचे कौतुक कराच, पण जर तो अपयशी झालाच तर त्याला पोटाशी धरा. त्याची समजूत घाला. त्याला अपयश पचवण्याची शक्ती दया.
म्हणूनच शिक्षक-पालक व विद्यार्थी सतत एकमेकांच्या संपर्कात असणे आवश्यक; त्यामुळेच त्याचा खरा उत्कर्ष होईल. माझी शाळा, माझे गरुजन ह्यांच्याविषयी वाटणारी नितातं श्रद्धाच त्याला मोठे करत असते. खूप विद्या मिळवण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, नावलौकिक मिळवण्यासाठी सगळयासाठीच अतिशय मेहनत करणे आवश्यक आहे. त्या मेहनतीला विनयाची व संस्काराची जोड असेल तर आपल्यापुढे सर्व सुखे हात जोडून उभी असतात. तेव्हा हे सगळे तुमच्याच हातात आहे. कारण सर्वांत मोठे गरु तुम्हीच आहात.

तेव्हा-

शुभम् करोति कल्याणम्

आरोग्यम् सुख संपदा म्हणा.

धनापेक्षा  - आनंद, सुख, समाधान व तृप्तीच आयुष्याला स्थैर्य देते.


 

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Charushil
Charushil Patil
20-May-2018 05:24 AM

चांगले विचार आहेत.....मुलांना मशीन बनविण्यापेक्षा मुलामधील माणूस घडविणे गरजेचे आहे .

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

5 + 2=    get new code
Post Comment