संपादकीय

सो.पा.क्ष. वार्षिक क्रिडा स्पर्धा २०१९-२०
17-Dec-2019
हार्दीक सुधाकर राऊत (निमंत्रक) व संजय सदानंद राऊत (अध्यक्ष), क्रिडा समिती

नमस्कार वाडवळ बंधु-भगिनिंनो,

दरवर्षी आपल्या 'चौकळशी वाडवळ' समाजातर्फे होणाऱ्या विवीध कार्यक्रमांपैकी दोन विशेष कार्यक्रम म्हणजे वार्षिक अधिवेशन व क्रिडास्पर्धा. ह्या दोन्ही सोहळ्यांची वाट सर्वच ज्ञाती बंधु-भगिनी आतुर्तेने पाहत असतात. त्यातच, अलीकडच्या काळात हे सोहळे नाविन्यपुर्ण पद्दतीने होत असल्याने त्यामधे सहभागी होणाऱ्यांचा हुरूप वाढलेला आढळतो. ह्या सर्वांचे श्रेय हे समाज धुरणांनी ठेवलेल्या दुरदृष्टिला जाते.

यंदा होऊ घातलेल्या क्रिडा स्पर्धेचा बिगुल वाजलेला आहे. Indoor स्पर्धा ह्या स्पर्धकांच्या उत्साहाने परीपुर्ण पार पडल्या. येत्या शुक्रवार दि. २० डिसेंबर २०१९ पासुन मैदानी क्रिडा स्पर्धांना सुरूवात होत आहे. ह्या स्पर्धा संपुर्ण तीन दिवस उमरोळी येथील मैदानात होणार आहेत. समाजातील मुले-मुली, तसेच लहान-थोर स्पर्धक, वैयक्तिक व सांघिक सामन्यातुन जिवाचे रान करतात.

Read more

बातमी आणि कार्यक्रम