'चौकळशी वाडवळ' समाज बंधू-भगिनींच्या, सो. पा. क्ष. स. संघ ट्रस्ट फंड अयोजित, वार्षिक क्रिडास्पर्धा आगामी डिसेंबर महिन्यात योजिल्या आहेत. कोरोनाचा कठीण काळ नुकताच ओसरला आहे व त्या पार्श्वभूमीवर ह्या स्पर्धेचे आयोजन संपूर्ण समाजासाठी उत्साहवर्धक आहे. दोन वर्षांच्या खंडा नंतर होऊ घातलेल्या ह्या स्पर्धेविषयी आपल्या समाजबांधवांमध्ये उत्सुकता तसेच जल्लोष आहे.
विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंनी कसून सराव सुरू देखील केला आहे. आप-आपल्या स्पर्धांमध्ये ते जीवाचे रान करताना आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यांना योग्य ती मदत व त्यांचा हुरूप द्विगुणित करण्यासाठी उत्तेजन देणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. तरी, आपणास आवाहन करीत आहोत की आगामी स्पर्धेच्या वेळी समाजातील प्रत्येक मंडळींनी ह्या स्पर्धेचे स्वरूप वृद्धिंगत करण्यात आपला अनमोल सहभाग द्यावा.
दिनांक: २४ व २५ डिसेंबर २०२२
स्थळ: साईग्राम विकास मंडळ, उमरोळी
सांघिक स्पर्धा: 🏏क्रिकेट व 🤾व्हॉलीबॉल (स्त्री व पुरुष)
वैयक्तिक स्पर्धा: 🏃धावणे, लांबउडी, गोळाफेक, थाळीफेक, चमचा-गोटी (गटानुसार)
स्पर्धेमधील खेळाडुंना आवाहन करित आहोत की, प्रत्येक खेळ हा जोमाने खेळावा व खिलाडुवृत्तीचे प्रदर्शन वेळो-वेळी दाखवावे. प्रेक्षक वर्गातील मंडळींनी सर्वच खेळांचा मन-मुराद आनंद घ्यावा व संघव्यवस्थापक मंडळाला मदतीचा हात पुढे करावा. आपणा सर्वांचा स्पर्धेचा दर्जा उंचावण्यात मोलाचा वाटा असेल ह्यात शंका नाही. आपल्या समाजाच्या स्पर्धा ह्या ईतर समाजांसाठी आदर्श घेण्याजोग्या होवोत हीच सदिच्छा.
यंदाच्या वर्षी आपण आपल्या समाजाच्या www.ChaukalshiVadval.com ह्या वेबसाईट वर सर्वच स्पर्धांचे निकाल Real Time Updates ने देणार आहोत. ह्या वेबसाईट वर आपणास सर्वच स्पर्धांचे तक्ते व त्यांचे निकाल दिसणार असल्यामुळे आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातुन ह्या स्पर्धांना Follow करू शकाल. स्पर्धेची नियमावली व वेळापत्रक WhatsApp द्वारे सर्वांपर्यंत पोहोचविले जाईल ह्याची नोंद घ्यावी.
आपले विनम्र,
किरण नंदकुमार पाटील,
(निमंत्रक, क्रिडास्पर्धा समिती)
हार्दिक सुधाकर राऊत,
(कार्याध्यक्ष, क्रिडास्पर्धा समिती)
नोट:
१. स्पर्धेचे निकाल हे समाजाच्या संकेतस्थळावर (www.ChaukalshiVadval.com) रियल टाईम अपडेट ने प्रकाशीत करण्याचा मानस आहे. ह्या बाबत आपल्यास विवीध WhatsApp ग्रुपस् वरून कळविण्यात येईल.
२. संकेतस्थळावरील Sports ह्या मॉडुल मधे संपुर्ण माहिती उपलब्ध आहे. विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडुंनी जरूर भेट द्यावी व आपले प्रोफाईल पिक्चर अपलोड करावीत.