Trust Editorial सो.पा.क्ष. वार्षिक क्रिडा स्पर्धा २०१९-२०
17-Dec-2019

हार्दीक सुधाकर राऊत (निमंत्रक) व संजय सदानंद राऊत (अध्यक्ष), क्रिडा समिती 1138

नमस्कार वाडवळ बंधु-भगिनिंनो,

दरवर्षी आपल्या 'चौकळशी वाडवळ' समाजातर्फे होणाऱ्या विवीध कार्यक्रमांपैकी दोन विशेष कार्यक्रम म्हणजे वार्षिक अधिवेशन व क्रिडास्पर्धा. ह्या दोन्ही सोहळ्यांची वाट सर्वच ज्ञाती बंधु-भगिनी आतुर्तेने पाहत असतात. त्यातच, अलीकडच्या काळात हे सोहळे नाविन्यपुर्ण पद्दतीने होत असल्याने त्यामधे सहभागी होणाऱ्यांचा हुरूप वाढलेला आढळतो. ह्या सर्वांचे श्रेय हे समाज धुरणांनी ठेवलेल्या दुरदृष्टिला जाते.

यंदा होऊ घातलेल्या क्रिडा स्पर्धेचा बिगुल वाजलेला आहे. Indoor स्पर्धा ह्या स्पर्धकांच्या उत्साहाने परीपुर्ण पार पडल्या.येत्या शुक्रवार दि. २० डिसेंबर २०१९ पासुन मैदानी क्रिडा स्पर्धांना सुरूवात होत आहे. ह्या स्पर्धा संपुर्ण तीन दिवस उमरोळी येथील मैदानात होणार आहेत. समाजातील मुले-मुली, तसेच लहान-थोर स्पर्धक, वैयक्तिक व सांघिक सामन्यातुन जिवाचे रान करतात. त्यांनी केलेल्या शारीरिक मेहनतीची कसोटी ह्या प्रसंगी लागते. सांघिक सामन्यातुन त्यांचे टिमवर्क दिसुन येते. तसेच, गेल्या दोन वर्षांपासुन स्पर्धेच्या बदललेल्या स्वरूपामुळे खेळाडुंची खिलाडुवृत्ती संपुर्ण बदललेली आहे. प्रत्येक खेळाडु हा जिंकण्याच्या जिद्दीने मैदानात उतरत आहे. ह्यामुळे संपुर्ण क्रिडास्पर्धेचा दर्जा कैक पटीने उंचावला आहे. खेळाडु देखील नाहक वाद-विवाद टाळुन आयोजकांना योग्य साथ देत आहेत. हे सर्वच आपल्या समाजासाठी शुभ-संकेत आहेत हे नक्की.

यंदा होऊ घातलेल्या क्रिडा मेळाव्यात मुला-मुलींच्या वैयक्तिक स्पर्धा; धावणे, लांब उडी, गोळा फेक ई. ह्या खेळांबरोबर क्रिकेट, कबड्डी व वॉलीबॉल हे सांघिक खेळ आयोजीत केले आहेत. सर्वच स्पर्धकांमधे उत्साहाचे वातवरण आसुन त्यांचा कसुन सराव सुद्धा सुरू आहे. निव्वळ खेळावर लक्ष केंद्रित न करता स्पर्धकांनी फिटनेस व डावपेचांनवर सुद्धा मेहनत घेतलेली आहे.

आम्ही संघातर्फे सर्वच ज्ञाती-बांधवांना आव्हान करितो की तुम्ही वेळात वेळ काढुन स्पर्धेच्या काळात उमरोळी येथील क्रिडांगणाला भेट देऊन स्पर्धकांचा उत्साहा वाढवावा. आपण लावलेल्या हजेरीमुळे स्पर्धकांचा हरूप द्विगुणीत होईल व कदाचीत आपणास उद्याचा होणारा शार्दुल पहायला मिळेल... स्पर्धक आपली वाट पाहत आहेत!

आपले विनम्र,

हार्दीक सुधाकर राऊत,
(निमंत्रक, क्रिडा समिती)

संजय सदानंद राऊत,
(अध्यक्ष, क्रिडा समिती)


नोट:

  • स्पर्धेचे निकाल हे समाजाच्या संकेतस्थळावर (www.ChaukalshiVadval.com) रियल टाईम अपडेट ने प्रकाशीत करण्याचा मानस आहे. ह्या बाबत आपल्यास विवीध WhatsApp ग्रुपस् वरून कळविण्यात येईल.
  • संकेतस्थळावरील Sports ह्या मॉडुल मधे संपुर्ण माहिती उपलब्ध आहे. विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडुंनी जरूर भेट द्यावी व आपले प्रोफाईल पिक्चर अपलोड करावीत.