Trust Editorial जान है तो जहान है
03-Apr-2020

श्री. विनय रघुनाथ राऊत (अध्यक्ष) 1017

सोपाक्ष ज्ञातीबंधु-भगिनी आणि बाळगोपाळ,

 

आपण सारेच जाणतो की, समस्त विश्वावर आलेले कोरोना वायरसरुपी संकट आत्ता कोणत्याही घरात यायच्या टप्प्यावर आहे. शासनाकडुन आपल्याला योग्य निर्देश मिळतच आहेत. त्याचे आपण पालनही करीत आहोत. पण या काळजी घेण्याच्या टप्प्यावर निष्काळजीपणाची एक छोटीशी कृतीही आपल्याकडुन होणार नाही याची दक्षता घेणे आत्यंतिक गरजेचे आहे.

 

शासनाने अत्यावश्यक कामासाठी दिलेली सुट वापरताना त्याबाबतीतले निर्देशही आपण व्यवस्थित पाळले पाहिजेत. विशेषतः देवाणघेवाणीतल्या वस्तु, पैसे हाताळतानाही विशेष खबरदारी घेतली पाहिजे.

 

ज्याच्यावर इलाज नाही, तो रोग दुर ठेवणे हासुध्दा एकप्रकारे इलाजच म्हणता येईल.

 

जान है तो जहान है या उक्तीनुसार सर्वात महत्वाचे आहे ते स्वतःला सुरक्षित ठेवणे.

 

आणि विशेष म्हणजे या व्हायरस विषयीचे कुठलेही व्हिडिओ, मॅसेज खात्री न करता, त्याची वैधता न बघता फॉरवर्ड करू नका, त्यापेक्षा फक्त शासनाचेच निर्देश पाळा. गैरसमज पसरविणे हा सुद्धा एक आजारच आहे नव्हे तर गुन्हाच आहे. 

 

चला तर सर्व मिळून या विश्वव्यापी संकटावर सर्व निर्देश पाळून मात करूया.

 

आपणा सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा.

 

आपला नम्र, 

विनय रघुनाथ राऊत

अध्यक्ष

(सो.पा.क्ष.स.संघ ट्रस्ट फंड)