लग्न विधीला लागणारे साहित्य :
१) गणेश पूजन :
(हे साहित्य ब्राह्मणाने दिलेल्या यादी नुसार आहे.)
- हळद-कुंकू
- अबीर
- गुलाल
- कापूर
- उदबत्ती
- कापूस
- नारळ -३
- सुपारी -१०
- खायची पाने -१०)
- केळी -१२
- दूध
- तूप
- साखर
- मध
- दही
- तांदूळ -एक किलो
- गूळ
- खोबरे वाटी
- खडीसाखर
- फूले
- दूर्वा
- वेणी
- गजरा
- आंब्याच्या डाहाळाची फांदी
- तांब्याचे तांबे -२
- ताम्हण -१
- संध्यापळी
- पंचपात्रे
- ताटे -२
- पराती -२
- वाटी किंवा द्रोण -६ नग
- चौरंग -१
- पाट -६
- समई -१
- निरांजन -२
२) घाणा मेढी साठी लागणारे साहित्य :
- सागाची मेढ -१
- उंबराची मेढ -१
- हिरव्या सालाचा नारळाचा जोड -१
- कोहळे -१
- सालासह सुकडी नारळ
- सुके आख्खे भात
- नाचणी
- कोरी सुपे -४
- उखळी -१
- मुसळं -४
- (घरात मुलाचं लग्न कार्य असल्यास सागाची आणि उंबराची मेढी प्रत्येकी दोन घेणे.)
३) हवनासाठी :
- हळद
- कुंकू
- अबीर
- गुलाल
- कापूर
- कापूस
- उदबत्ती
- नारळ -५
- केळी
- इतर फळे (पाच प्रकारची)
- दूध
- तूप
- साखर
- मध
- दही
- गहू -सव्वा किलो
- तांदूळ -२ किलो
- अक्रोड -९
- बदाम -९
- खारीक -९
- हळकुंडे -९
- गुळ
- खोबरे वाटी -२
- समिधा
- होमपुडी
- शहाळी -४
- सागाच्या सीलक्या
- गोवर
- लाल कापड -एक मीटर
- सफेद कपडा -एक मीटर
- फुले , दूर्वा, वेणी, गजरा
- जान्हवं जोड
- आंब्याचं डहाळं
- कच्च्या सुताचा गुरा
४) पाटा पूजन :
- पाटा -१
- मातीचे मडके -१
- नारळ -१
- तांदूळ ,पैसे, सुपारी व लग्नातील लाडू
- पापड -९
- तांदळाचे पापड (हाकोळ्या)-९
- तांदळाच्या पिठाचे पेढे -९
- हळकुंड -९
- सुपाऱ्या -९
- आंब्याची पाने
- पाट्याला बांधण्यासाठी कच्चा दोरा
५) मयारासाठी :
- मातीचे मोठे मडके -१
- लहान मडके -१
- कोडे -१
- बोरुची काडी -१
- कापसाची लांब ज्योत
- तांदळाचं पीठ व तांदूळ
- हळकुंड
- सुपारी
- बदाम,अक्रोड,खारका
- पापड
- लग्नातील बुंदीचे लाडू
- ब्लाउज पीस
- मयारं चालविण्यासाठी ओली हळद.
- बोरुच्या काडीला बांधण्यासाठी कच्चा दोरा.
६) काकणासाठी :
- नवरा / नवरीसाठी फुलांचा हार -१
- फुलांची मुंडावळ -१
- हातावर बांधण्यासाठी काकण
- हातात घेण्यामसाठी सजविलेल्या नारळाचा तोटा
- भाचा / भाचीला देण्यासाठी कपडे
- बहिणीला व भावजीला देण्यासाठी कपडे
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.