Achievers Achievers Politics

Kshitij Thakur

नव्या दमाचे तरूण तडफदार व सुविद्य आमदार श्री. क्षितीज हितेंद्र ठाकूर यांनी अमेरिकेतून व्यवस्थापनातील पदवी प्राप्त केली असून परदेशी कायम वास्तव्याचा मनात आणू न देता जन्मगावी विरार येथे राहूनच आपले इच्छित कार्य करण्याचे निश्चित करून गेली ६ वर्षे ते विरार येथील विवा इंजिनिअरिंग महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे प्रवेश व त्या संदर्भातील सर्व कामे त्यांनी प्रसिद्धी पराडमुख राहून सांभाळली असून महाविद्यालयाला नावारूपास आणले आहे.


त्यांचे वडील लोकनेते आमदार श्री.हितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण वसई तालुक्यात विकासाची गंगा आणली. वडिलांच्या दोन निवडणुकीच्या प्रचार कार्यात श्री.क्षितीज ठाकूर हे नेहमी त्यांच्याबरोबर फिरत होते. त्यामुळे त्यांना या मतदारसंघाची, तिथल्या लोकजीवनाची, संस्कृतीची ओळख होऊन समाजकारणाची आवड स्वाभाविकच निर्माण झाली. आपल्या वडिलांनी केलेल्या आधारावर आपल्या कार्याची ब्ल्यूप्रिंट नजरेसमोर ठेवून वडिलांप्रमाणेच समाजकार्य व मतदारसंघाकरिता वाहून घेणार असल्याचे मनोमनी निश्चित करून जाहिर केले.


विधानसभा मतदारसंधाची पुर्नरचना झाल्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या 'नालासोपारा' मतदार संघातून बहूजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवून श्री.क्षितीज ठाकूर वयाच्या २६ व्या वर्षी सर्वात तरूण आमदार म्हणून प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले. त्यांचे विधानसभेतील पहिलेच भाषण राज्यकर्ते व विरोधकांचे लक्ष वेधणारे ठरले. अमेरिकेत टाटा-बिर्लांचे आचरविचार अभ्यासले जातात. परंतु भारतात त्यांचे आचरण वास्तवात उतरत नाही म्हणून त्यांनी त्यावेळी खेद व्यक्त केला. पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते या मानवी सुविधांना प्राधान्यक्रम देऊन मतदारसंघ व परिसराचा संपूर्ण विकास हे ध्येय त्यांनी निश्चित केले. रेल्वे व रेलवेप्रवासी समस्या व सुविधा, विभागांतील प्राचीन किल्ले, चर्च, बौद्धस्तुप, गणेशपुरी व परिसरातील गरम पाण्याची कुंडे, तिर्थक्षेत्र व समुद्रकिनारा, तुंगारेश्वरसारख्या थंड हवेच्या स्थळांचा विकास करण्याचा निर्धार आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला असून राज्य शासनाच्या विकासाला विविध योजना आपल्या मतदारसंघात प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी प्रसत्न करतानाच केंद्रशासनाच्या योजनांमधून स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे या आमदार महोदयांनी ठरविले आहे.


हायटेक जीवनशैली आपल्या मतदारबंधूंनी आत्मसात करावी यासाठी त्यांना योग्य अशी साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी असा त्यांचा मानस असून यासाठी नव्या युगाचा प्रतिनिधी तरूण, तडफदार आमदार क्षितीज ठाकूर यांना लाख लाख शूभेच्छा!