Community
काही महत्वाची अधिवेशने
कोणत्याही संस्थेच्या कार्यकालातील विशिष्ट वर्षे ज्यांना महोत्सवी वर्षे म्हणून संबोधिेले जात ही वर्षे त्या संस्थेच्या कार्यकालीन महत्वाचे टप्पे मानले जातात. अशा संस्थांची त्यार्षातही अधिवेशने मोठ्या प्रमाणात व विशिष्ट पद्धतीने साजरी करण्याची प्रथा रूढ झाली आहे. या वर्षी आपल्या संघाच्या कार्याची ९० वर्षे पूर्ण होत असून या काळात संघाची २५ व्या वर्षी, ५० व्या वर्षी, ६० व्या वर्षी अनुक्रमे रोप्यमहोत्सवी, सुवर्ण महोत्सवी व हीरक महोत्सवी अधिवेशने साजरी करण्यात आली या अधिवेशनांचा संक्षिप्त वृत्तांत व यावर्षी साजरा होत असलेला अमृत महोत्सव यांच्या नियोजित कार्यक्रमाची रूपरेखा खाली देत आहोत.
संघाचे पंचविसावे वार्षिक अधिवेशन रौप्यमहोत्सवी अधिवेशन म्हणून दि. ९-३-१९५२ रोजी समाजसविता डॉ. मधुकर बळवंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नरपड येथे साजरे झाले. समाजाच्या सर्व शाखातून आणि एकीकरणामुळे एक झालेल्या समाजातील बरीच बंधूभगिनी मंडळी उपस्थित होती. अधिवेशनासाठी भव्य मंडप, आगतांचे स्वागत, भोजेनादि आणि इतर व्यवस्था या बाबतीत नरपडकर मंडळींनी अत्यंत मेहनत घेतली होती. भोजन व्यवस्थेचे अत्यंत जिकारीचे काम श्री. रामजी बुध्या पाटील, श्री. लखुजी लक्ष्मण राऊत इ. मंडळींनी उत्त्म प्रकारे पार पाडले. रौप्यमहात्सवाच्या आनंदा प्रीत्यर्थ गावातील प्रत्येक पाखाडी, आळी सडा संमार्जन करून व पल्लव पताका लावून शृंगारली होती. एकंदरीत सर्वत्र आनंद व उत्साह यांना उधाण आले होते. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष श्री. पांडुरंग रामचंद्र राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना १९१० साली संघाची स्थापना नरपड गांवीच झाली आहे. व रौप्यमहोत्सवहि नरपड गांवीच साजरा होत आहे. या घटनांच्या मोठ्या अभिमानाने उल्लेख केला.
क्षात्रैक्य परिषदेच्या निशाणाखाली एकीकरणामुळे एकत्रित झालेल्या समाजातील एक थोर नेते डॉ. पुरूषोत्तम गजानन वर्तकख् विलेपार्ले हे अधिवेशनाचे उद्घाटक् होते. संघ करीत असलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली व एकीकरणासारखा पुरोगामी विचारसरणीचे त्यांनी स्वागत केले. अधिवेशनांचे अध्यक्ष डॉ. राऊत यांची औपचारिक ओळख संघाचे चिडणीस श्री. चिंतामण रावजी राऊत करून दिल्यावर अध्यक्षांनी आपल्या भाषणांत संघ करीत असलेल्या कार्याचा परामर्ष घेतला व केलेल्या कार्यातच संतोष न मानता सतत कार्यरत राहून समाजाची शीघ्रगतीने उन्नति साधण्यासाठी झटण्याचे समाज बंधूभमिनींना आवाहन केले. चौकळशी –पांचकळशी सामील झालेल्या पांचहि शाखेतील बंधूभमिनींना आपल्या संघाचे सभासदत्व खुले केले आहे.या पुरोगामी घटनेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. समाजाची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी समाजबांधवांनी शेती बागायती बरोबर काही जोड धंदा केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. ज्या कार्यकर्त्याच्या वयाला ६० वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत अशा व्यक्तिंच्या बद्दल महोत्सवाच्या निमित्ताने कृतज्ञता दाखवावी या उद्देशाने अधिवेशनाने सर्वश्री काशिनाथ पिलाजी राऊत (मुंबई), हरेश्वर भास्कर राऊत (दादर), माधवराव रामजी राऊत (मुंबई), जगन्नाथ रामजी राऊत (मुंबई), दोमोदर कान्हा राऊत (नरपड) यांना अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. क्षात्रैक्य परिषदेचे माजी व आजी अध्यक्ष श्री. परयशुराम धर्माजी चुरी व श्री. आत्माराम लक्ष्मण चौधरी यांचहि सत्कार करण्यात आला.
शाखेत भरविण्यात आलेले ग्रामिण व्यवसाय प्रदर्शन ही एक उल्लेखनीय कार्यकर्ते श्री. वासुदेव नथुराम राऊत व श्री. माधव रामजी पाटील द. तरूण कार्यकर्त्यांना बरीच मेहनत घेतली होती. रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने व्यवस्थापक मंडळाच्या निर्णयास अनुसरून श्री. अरविंद हरि राऊत यांनी संघाच्या कार्याची पंचवीसवर्षे नावाच्या इतिहासवजा लिहिलेल्या पुस्तिकेचे अध्यक्षांच्याहस्ते प्रकाश्न झाले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रांत सव्रश्री. जनार्दन पां. राऊत, तात्यासाहेब चुरी, आत्माराम पंत चौधरी, भगवंतराव म्हात्रे, नानाभाई तथा, डॉ. हरिभाऊ सावे, महादेव रा. म्हात्रे , मुकुंदराव सावे, शांताराम पाठारे, रघुवीर पाटील, रघुनाथ स. राऊत तसेच सौ. रमाबाई चेंबुरकर, कु. रेवती राऊत या वयोवृद्ध व तरूण युवक-युवतींची मार्गदर्शक व कृतज्ञता व्यक्त करणारी प्रासंगिक भाषणे झाली. संघाच्या कार्यकालातील पहिल्या टप्प्याची सांगता अत्यंत प्रभावी व प्रबोधकपणे पार पडली व त्यामुळे संघकार्यात नवी उमेद,नवी दिशा व नवा उत्साह दृग्गोचर झाला.
संघाचे ५० वे वार्षिक अधिवेशन सुवर्ण महोत्सव अधिवेशन म्हणून दि. ३० जानेवारी १९७७ रोजी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व नेते चालनाकार अरविंद हरि राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जुहू येथे संपन्न झाले. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री ना. प्रभाकर कुटे हे उपस्थित होते संघाचे ज्यावर्षाचे अध्यक्ष श्री.रामचंद्र बा. पाटील यांनी महोत्सवी अधिवशन समारंभाचे अध्यक्ष चालनाकर अरविंद राऊत यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे तसेच प्रमुख पाहुणे, गौरव पात्र व्यक्ति, माजी अध्यक्ष व कार्यवाह तसेच उपस्थितांचे स्वागत केले. चालनाकार अरविंद राऊत यांचा परिचय करून देताना ॲड. भास्कर ल. पाटील म्हणाले की, श्री. अरविंद राऊत हे कुशल संघटक, समाजसेवक व समाजसुधारक व समाजाचे जेष्ठ नेते आहेत. 'जीवनगुंजी' या पुस्तकाने साहित्तिक म्हणून ते महाराष्ट्रांत प्रसिद्धीस आले. समारंभाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक ना. प्रभाकर कुंटे यांचा परिचय समाजातील नवोदीत कार्यकर्ते व मुंबई महापालिकेचे नगरसेवक श्री. पुष्पकांत म्हात्रे यांनी करून दिली. हा समाज जुन्यातला जुना असून नवीन विचार आत्मसात करणे हे या समाजाचे वैशिष्टय आहे. उत्कृष्ट बौद्धिक पातळी, उत्तम शिष्टाचार, टापटीप व स्वच्छता इ. बाबतीत समाजातील महिला आदर्शभूत आहेत अशा शब्दात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात आपलया समाज बंधूभगिनींची प्रशंसा केली.
समारंभात ७५ वर्षाहुन अधिक वय झालेले समाजबंधु श्री. जनार्दन पां. राऊत, डॉ. पु. ग. वर्तक, भगवंतराव म्हात्रे, जर्नादन भा. भायदे, चितांमण म. राऊत, यशंवत रा. राऊत तसेच दानशूर व विद्याविभूषित समाजभगिनी डॉ. हिराबाई भाऊराव पाटील व जुन्या पिढीतील समाजसेविका श्रीमती माणकबाई पाटील यांना चंदनमाळा व रौप्यचिन्हे देऊन त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. संघाचे विद्याविभूषित तरूण कार्यकर्ते श्री. श्रीकांत राऊत यांनी जुहू शाखेतर्फे संपादित केलेल्या स्वागतपत्रिकेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकटीकरण करण्यात आले. या समारभांचे प्रमुख पाहुणे ना. प्रभाकर कुंटे, संघाचे अध्यक्ष श्री. रामचंद्र बा. पाटील. सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष व समाज शिल्पकार-चालनाकार अरविद राऊत, कै. गंगाधर पिलाजी चौधरी, नगरसेवक पुष्पकांत म्हात्रे व माणकबाई पाटील यांचा या स्वागतपत्रिकेत थोडक्यात परिचय करून देण्यात आला आहे. समारंभानिमित्त जुहू शाखेच्या विद्यमाने मांडण्यात आलेलया कला-वस्तु प्रदर्शनाचे उद्घाटक संघाचे जेष्ठ नेते कर्मवीर ज. पा. राऊत यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात पाककला, हस्तकला, शिवणकला, चित्रकला इ. चे सुबक तऱ्हेचे दर्शन घडविण्यात आले. आदल्या रात्री समारंभाच्या विषयनिययमक समितीच्या सदस्यांना श्री. पुष्पकांत म्हात्रे यांनी भोजन दिले. तर समारंभास उपस्थित असलेल्या समाजबंधूभगिनींना संघाचे माजी अध्यक्ष कै. गंगाधर पिलाजी चौधरी यांचे सुपुत्र वसंत, सूर्यकांत, जयवंत व प्रकाश यांनी दोन्ही वेळचे भोजन व चहापान दिले. समारंभाचे अध्यक्ष श्री. अरविंद राऊत यांनी आपल्या भाषणद्धारे समाजाला अमुल्य मार्गदर्शन दिले.
संघाचे ६० वे म्हणजे हीरक महोत्सव अधिवेशन दि. ८-२-१९८७ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व संघाच्या विश्र्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. पुष्पकांत अनंत म्हात्रे यांच्या अध्येक्षतेखाली माहीम येथे कर्मवीर ज. पा. राऊत नगर असे नामाभिमान केलेल्या खास मंडपात संपन्न झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. रघुनाथ सखाराम राऊत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या स्वागतापर भाषणात माहीम गावचा इतिहास विशद करतांना ते महणाले, "माहीम म्हणजे इतिहास प्रसिद्ध महिकावती नगरी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पूनित झालेले गाव असून प्रतापबिबांची ही राजधानी. आज हे गाव केळी, पोफळी, नारळ, पानवेळी इत्यादी कृषी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे."
एक साहित्यिक व नवशक्ती दैनिकाचे वृत्तसंपादक श्री. चंद्रकांत भोगटे हे अधिवेशनाचे उद्घाटक होते. उद्घाटकांची ओळख ॲड. लक्ष्मण पांडुरंग पाटील यांनी करून दिली. 'मी अशी अनेक सामाजिक अधिवेशने पाहिली आहेत, पण आजच्या अधिवेशनातील आबालवृद्धांचा समूह या निसर्गरम्य जागी अधिक बहरलेला वाटतो. आपला सांस्कृतिक वारसा जोपासून अंतिम समाजहित साधण्याचा कामी सामाजिक संस्था अधिक प्रभावी कार्य करतात. आपली संस्था या कामी अग्रभागी आहे.' अशा शब्दांत प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणात आपल्या संस्थेची प्रशंसा केली. संमेलनाचे अध्यक्ष श्री. पुष्पकांत म्हात्रे यांनी, "मुंबईत संघाचे वसतीगृह व कार्यालय असावे, आपल्या शेती बागायतीच्या मूळ व्यवसायात व्यक्त केले. संघकार्याच्या ६० वर्षाच्या काळातील काही प्रमुख घटनांची माहिती देणारी एक पुरवणीहि प्रसिद्ध करण्यात आली होती. हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने गावातील समाजभगिनींनी पाककलेचे व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. माहीम शिक्षण संस्थिेच्या भुवनेश कीर्तने विद्यालयातून मुंबई बोर्डाच्या शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या कु. सुचिता सुरेश पाटील आणि शुभदा अरविंद वर्तक या द्वय विद्यार्थीनींचा विशेष सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी भोजनाची व मंडपाची उत्तम व्यवस्था ठेवली होती. त्यात महिला वर्गाचाही सहभाग मोठा होता. श्री. शंकर नारायण राऊत, श्री. शंकर नारायण राऊत, श्री. रघुनाथ सखाराम राऊत, श्री. भालचंद्र मुकुंद राऊत, श्री. नागेश ज. राऊत, श्री. विलास ब. राऊत, श्री. श्रीकांत ल. राऊत. श्री. हेमचंद्र ज. राऊत इ. कार्यकर्त्यांनी या अधिवेशनासाठी फार परिश्रम घेतले.
सारा गांव स्वच्छ झाला. रस्ते, अंगण शिंपडले, गुढ्या उभारल्या होत्या. रस्त्यावर कमानी घातल्या
होत्या, फुलांची तोरणे लोंबकळत होती. आकाशकंदिल झगमगत होते. घरोघर रांगेत पणत्या तेवत
होत्या. रोषणाईने डोळे दीपून जात होते. चैत्र कृष्ण अष्टमीची पहाट झाली आणि सारा गांव खडवडून
डागा झाला. कार्यकर्ते तर झोपले नव्हतेच. आदल्या दिवशीच दवंडी पिटवल्याप्रमाणे सारा गाव
पाहुण्यांच्या स्वगताला सज्ज झाला. ४ मे २००२ शनिवार अधिवेशनाचा पहिला दिवस.
ठिक ८ वाजता कार्यक्रमाला सुरवात झाली. कृषी व उद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री. हरेश्र्वर दिवे,
सभापती समाजकल्याण जि.प. ठाणे यांचे हस्ते झाले. तत्पूर्वी श्री. महेश राऊत यांनी प्रास्ताविक करून
प्रदर्शनाची माहिती सांगीतली. प्रदर्शनाची पाहणी करून मान्यवर मंडळी शोभा यात्रैत सहभागी झाली.
उंटांच्या गाडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. समाजाची पारंपारिक शेतकी अवजारे गाडीत ठेवली होती.
अनंत जनार्दन म्हात्रे विद्यालयापासून शोभा यात्रेला सुरवात झाली. अग्रभागी संघाचे अध्यक्ष श्री.
राजीव पाटील व स्वागताध्यक्ष श्री. पुष्पकांत म्हात्रे, विश्र्वस्त श्री. रा. बा. पाटील होते. नरपड गावाच्या
उत्तरेला असलेल्या साईबाबा मंदिराला वळसा घालून शोभा यात्रा राऊत आळी, पाटील आळी मार्गे
दक्षिण टोकापर्यंत गेली व नंतर मुख्य रस्त्यावरून चाचली होती. गावात ठिकठिकाणी कमानी उभारल्या
होत्या. कमानिच्यादुतर्फा उभे राहून महिला व मुली मान्यवरांना पुष्पवृष्टी करीत होत्या. शोभायात्रा
दिवंगत माजी अध्यक्षांच्या घराजवळ आल्यावर मा. अध्यक्षांनी फुले वाहून त्यांना आदरांजली वाहीली.
शेवटी सभा संकुलाजवळ शोभा यात्रा आल्यावर ती विसर्जित झाली.
सभा संकुलाच्या प्रवेशव्दाराजवळ प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, स्वागताध्यक्ष येताच त्यांना पांच सुवासिनींनी
ओवाळले व त्यांचे स्वागत केले. तदनंतर ध्वज प्रदानासाठी पाहुणे, उद्घाटक मा. आमदार हितेंद्र ठाकुर
संघाचे अध्यक्ष श्री. राजीव पाटील यांना ध्वज प्रदान केला. अध्यक्षांनी टाळ्यांच्या कडकडात ध्वजारोहन
केले. त्यावेळी ध्वजगीत गायीले गेले. फटाक्याची आतषबाजी झाली. शाखेतील एन.सी.सी. व स्काऊट
पथकाने अध्यक्षांना व ध्वजाला मानवंदना दिली व हा कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमाचे सुत्रधार
शशिकांत राऊत यांनी केले.
सर्व मान्यवर व्यासपिठाजवळ आल्यावर आमदार हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष राजीव पाटील यांनी डॉक्टर व
राऊत, कर्मवीर ज. पा. राऊत, चालनाकार अरविंद राऊत यांच्या तसबीरीला हार घातले व उद्घाटन
केले. उद्घाटक मा. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दीपप्रज्वलित करून अमृत महोत्सवी अधिवेशनाचे
झाल्याचे जाहीर केले. विश्वसत श्री.रा.बा. पाटील यांनी समाजसविता डॉ. मधुकर ब. राऊत यांच्या
स्मृतीला अभिवादन केले व आदरांजली वाहिली.
अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व विश्वस्त व पदाधिकारी मंचावर स्थानापन्न झाल्यावर स्वागताध्यक्ष व
विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. पुष्पकांत म्हात्रे यांनी नरपड शाखेतर्फे व संघातर्फे सर्व पाहुण्यांचे व
उपस्थितांचे मन:पुर्वक स्वागत केले व नरपड गाव सर्व सुविधांनी यक्त आहे. प्रत्येक गावाचे नातेवाईक
ह्या गावात आहेत. हा गाव सर्वसमाजाला आवडता आहे. अनेक उत्साही कार्यकर्ते ह्या गावात आहेत.
मनुष्यबळ आहे म्हणून यंदाचे अमृत महोस्तवी अधिवेशन या गावांत घेण्याचे ठरते." तदनंतर
स्वागताध्यक्षांनी मनुष्यबळ देवून अध्यक्ष मा. राजीव पाटील, उद्घाटक मा. आमदार हितेंद्र ठाकूर,
प्रमुख अतिथी मा. मानदार वसंतराव डावखरे , उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र, डॉ. जयंतराव
पाटील, आमदार कृष्णा धोडा, विरार नगरपरिषदेचे अध्यक्ष मुकेश सावे, ठाणे जि. कॉग्रेस अध्यक्ष
आनंद ठाकूर, क्षात्रैक्य परिषदेचे अध्यक्ष श्री हेमंत सातारे, डहाणू, पं.स. अध्यक्ष श्री देवू बालशी,
विश्वस्त श्री रा. बा. पाटील, श्री. भास्करराव ठाकूर, श्री. ह.मा. पाटील, श्री. भा.मु. राऊत शिबीर
समितीचे अध्यक्ष श्री. माधवराव पाटील, उपाध्यक्ष श्री. अ.दा.राऊत, सौ. वसुधा वसंत राऊत,
मुख्यचिटणीस सुधीर राऊत, त्रैमासिक वृत्तपत्रिकेचे संपादर श्री श्रीनिवास पाटील, महिला मंडळाच्या
अध्यक्ष सौ. शोभना शरद राऊत, युवा विकास समितीचे अध्यक्ष श्री. तरंग पाटील, सहा. चिटणीस
किशोर ठाकूर, दिनेश पाटील, गृहपाल रविंद्र राऊत, सहा. गृहपाल नरेंद्र राऊत, दीपक पाटील, ग्रंथपाल
मंगेश पाटील यांचे स्वागत केले. नंतर मान्यवरांनी भाषणांत आपले विचार व्यक्त केले.
आमदार धोडा – "७५ वर्षात आपल्या समाजाने खुप प्रगती केल आहे. मी माझ्या आमदार निधीतून
समाज मंदिराला देणगी देण्याचे आश्वासन दिले. आमदार हितेंद्र ठाकूर, आपली प्रगती निश्चितच झाली
आहे. परंतु रूढी मोडल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना आपली बौध्दिक पातळी ओळखून विद्याशाखेची निवड
करावी. आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे. पर्यटनाला आपल्याकडे वाव आहे. त्याचा फायदा उठवा,
मतभेद जरूर असावेत, पण टोकाची भूमिका घेऊ नये. विरारला जर समाजाची वास्तु करत असाल तर
आम्ही सहकार्य देवू. अधिवेशन दरवर्षी घेतलेच पाहीजे का? याचा विचार व्हावा. अध्यक्ष श्री. राजीव
पाटील यांची कळकळ व धावपळ प्रामाणिक होत व तशी राहील."
मुकेश सावे – "क्षात्रैक्य परिषदेच्या माध्यमातून अनेक ज्ञाती एकत्र आल्या तरीही अनेक ज्ञाती आपली
अधिवेशन वेगवेगळी घेतात. ठोस कार्यक्रम नजरेसमोर ठेवून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली
पाहिजे."
मा. नामदार वसंतराव डावखरे- "आजचा समारंभ शुभेच्छा व सदिच्छेचा आहे. मा. हितेंद्र ठाकूर हे
जिल्ह्याचे नेतृत्व करतात. ते समाजाते नेतृत्व निश्चितच करतील. मा. पुष्पकांत म्हात्रे हे सुद्धा
अनुभवी ने आहेत. मुबई महापालिकेत त्यांनी नेतृत्व केले आहे. बरे आणि वाईट दोघांचीही जाण
असलेला हा नेता तुमच्या समाजाला तारूण नेईल. आमदार साहेबांचा विचार विनिमय करून मी योग्य
मी देणगी समाजाला देईन."
मा. अध्यक्ष राजीव पाटील – "कै. नाना विठ्ठू राऊत, कै. लक्ष्मण राऊत इत्यादी नेत्यांनी आपल्या
समाजाआधी स्थापना केली. समाजाच्या प्रगतीमध्ये काही अडथळे जरी आले, तरी समाजाची प्रगती
जास्त झाली आहे. मी लहान आहे, समाजाला मार्गदर्शन करणारा मी काही ज्ञानी नाही. परंतु
समाजाची जी वाटचाल झाली त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. आपल्या धुरिणांनी काही चालीरीती
बंद केल्या तेव्हाच प्रगतीला सुरूवात झाली. आपण अनेक समित्या निर्माण केल्या परंतु त्यांची प्रगती
फार संथ आहे. महिला समितीने महिलांसाठी उद्योग उपलब्ध करून घ्यावेत. भगिनींनी मार्गदर्शन
करावे. दहा हजार लोकसंख्या असलेला आपला वाडवळ समाज पण वाडवळ शब्दाला अनेक वळणे
आहेत. जनरेशन गॅपमुळे आपल्यात किरकोळ मतभेद आहेत की दूर होतील. पद गेल्यावर मान जातो
असे मी मानीत नाही. पदावर नसतानाही अनेक कामे करता येतात. तत्रज्ञान फार पुढे गेले आहे.
आधुनिक शेतीकडे वळायला पाहिजे. आपल्याला शेती परवडत नाही असे तर शेती व्यवसायाला कमी
खर्च येईल. मस्त्यपालन हा जेाडधंदाही करता येईल. आपल्या समाजातील अनेक लोकांनी नेत्रदीपक
प्रगती केलेली आहे. ओ.बी.सी. दाखल्याचा फायदा आपल्या अनेक समाज बांधवांना झाला आहे.
त्याप्रमाणे धृवतारा प्रकाश देत नाही परंतु दिशा मात्र निश्चित दाखवू शकतो. त्या प्रमाणे आमदार
साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सन २०१० साली आपला शताब्दी महोत्सव साजरा करू तेव्हा
आमदार साहेबांचे नेतृत्व असेल. मात्र स्वत:चा विचार करून समाजाची प्रगती होत नाही हे त्यांनी
ब्रम्हदेवाला गोष्ट सांगून पटवून दिले. नरपड आवांत अधिवेशन व्हावे ही माझी इच्छा होती, येथील
ग्रामस्थ पदाधिकरी कार्यकर्ते यांनी जिवापाड मेहनत घेऊन हे ऐतिहासिक अधिवेशन घडवून आणले व
आपले स्वागत केले त्याबद्दल नरपडकरांना धन्यवाद दिले."
अध्यक्षांच्या भाषणानंतर श्री राजाराम पाटील यांनी समाजबांधवांना मदत करण्यासाठी आपल्या
आईच्या नांवे एक योजना सादर केली व समाजाला रू. ५ लाखाचा निधी देत असल्याचे जाहीर केले.
मानवी अध्यक्षांनी उभयतांचे मंचकावर पुष्पगुच्छ देवून आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले.
अमृत महोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने समाजातील दीनबंधू श्री. पांडुरंग माधव पाटील,
समाजसुधारक अँङ भास्कर लक्ष्मण पाटील, लोकहितदक्ष आमदार हितेंद्र विष्णु ठाकुर यांना त्यांच्या
सामाजिक, शैक्षीण राजकीय योगदानाबद्दल अध्यक्ष श्री राजीव पाटील यांचे हस्ते मानपत्र प्रदान केले.
मानपत्राचे वाचन न शैलजा अशोक पाटील, सौ. वसुधा विजय पाटील व श्री. किशोर ठाकुर यांनी केले.
यावेळी सौ. पुर्वा पांडुरंग पाटील व सौ. प्रिणिता हितेंद्र ठाकुर यांना सौभाग्य लेणे व पुष्पगुच्छ प्रदान
करून सन्मानित करण्यात आला.
संघाचा ७५ वर्षाचा इतिहास दर्शविणारे 'संघाची ७५ वर्षाची वाटचाल' या पुस्तिकेचे प्रकाशन मा. वखरे
यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी श्री. वाळकृष्ण नथुराम राऊत यांनी या पुस्तीकेची ओळखउ होऊ
लागली. समाज बांधवांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे.
दुपारी २.३० वाजता व्दितीय सत्राला सुरूवात झाली. विशेष अतिथी मा. श्री. दा. कृ. सोमण यांचे
स्वागत करण्यांत आले. सुरूवातीला त्यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी अधिवेशनानिमित्त प्रसिद्ध
करावयाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यांत आले. श्री. लीलीधर चौधरी यांनी या स्मरणिके बाबत
प्रास्ताविक केले.
विशेष अतिथी खगोलतज्ञ श्री.दा.कृ. सोमण यांनी "कसं जगायचं? असं जगायचं?" या विषयावर
व्याख्यान दिले. जीवनात वागताना बोलताना कोणती काळजी घ्यावी याचे रसभरीत वर्णन त्यांनी केले.
सुमारे दीड तास त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध वाणीने श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. तृतीय सत्रात संघाच्या
सांस्कृतिक समिती व संगीत व वक्तृत्व स्पर्धा समिती तर्फे संगीत व वत्कृत्व स्पर्धा पार पडला.
संध्याकाळी दा.कृ. सोमण यांच्या विद्यामाने समुद्रकिनारी 'आकाश दर्शन व त्याची माहिती'
नयनमनोहर असा कार्यक्रम झाला त्यास अलोट गर्दी लोटली होती. फटाक्याची आतषबाजी झाली. रात्री
सभा मंडपात आकाशदर्शनाचा स्लाईड शो.दा.कृ. सोमण यांनी दाखविला. नंतर नरपड शाखेतर्फे दिगंबर
राऊत् यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सचित पाटील या
दुरदर्शन मालीकेतील अभिनेत्याची मुलाखत झाली. सांस्कृतिक कार्यक्रम रात्री २.०० पर्यंत चालले.
आपल्या संस्थेच्या स्थापनेला दिनांक ३ एप्रिल २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण होण्याचे
औचित्य साधून २००९-१० हे शताब्दी महोत्सवी वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने
साजरे करण्यात आले. संस्थेच्या डॉ. मधुकर बळवंत राऊत, समाजमंदिर पालघर या
वास्तूमध्ये दिनांक ३ एप्रिल २००९ रोजी एक कार्यक्रम आयोजित करुन शताब्दी महोत्सवाची
सुरुवात करण्यात आली. याचदिवशी संघाच्या शाखा शाखांमध्ये गुढी तोरणे उभारल्यांने
उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महिला विकास समितीतर्फे पालघर येथे वाडवळी जत्रोत्सवाचे
आयोजन करण्यात आले होते. समाजातील महिलांना व्यवसायाचे दालन उघडून देणाऱ्या या
उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. युवा विकास समितीतर्फे पालघर येथील वेवूर या गावी
समाजबांधवांसाठी एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील सर्व
थरातील आबालवृद्धांनी सदर सहलीचा आनंद लुटला.
शताब्दी महोत्सवा निमित्त कृषी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. मध्यप्रदेश येथे
गेलेल्या ह्या सहलीत श्री.राजाराम पाटील आणि इतर अनेक मान्यवर सहभागी झाले
होते.
डॉ.मधुकर बळवंत राऊत समाजमंदिर या वास्तूचे नूतनीकरण शताब्दी महोत्सवी वर्षात
पूर्ण करण्यात आले. त्यासाठी आलेला सुमारे चार लाख रुपये खर्चाचा निधी समाज
बांधवांकडून देणगी रुपाने जमविण्यात आला.
संघाच्या एक सक्रीय कार्यकर्त्या आणि भावी आधारस्तंभ असलेल्या सौ.प्रणिता ठाकूर
यांनी या शताब्दी महोत्सवी वर्षात व्यक्तिगतरित्या कार्यान्वित केलेली एक योजना म्हणजे
शाखा शाखांतील ग्रंथालय. समाजातील मुलांमुलींमध्ये वाचनाची सवय जडावी आणि त्याव्दारे
ज्ञानार्जन व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी सफाळे ते डहाणू भागातील प्रत्येक शाखेमध्ये अनेक
पुस्तकांचे वितरण केले.
शिरगाव – सातपाटी शाखेमध्ये झालेले महिलांचे स्नेहसंमेलन हा शताब्दी महोत्सवातील
एक उल्लेखनीय कार्यक्रम. महिला विकास समितीच्या कार्याध्यक्षा सौ. रुपा विनय राऊत
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ह्या मेळाव्यातील महिलांचा सहभाग म्हणजे संस्थेच्या
शताब्दी वाटचालीच्या यशाचे द्योतकच होय.
शताब्दी महोत्सवी समितीने आयोजित केलेला आणि संघाचे मान. अध्यक्ष श्री.शशांक
पाटील यांनी प्रायोजित केलेला सहस्त्रचंद्रदर्शन सत्कार सोहळा म्हणजे वयोवृद्ध
समाजबांधवाप्रती संस्थेने प्रकट केलेली कृतज्ञताच होय.
शुक्रवार दिनांक २ एप्रिल २०१० रोजी मान. अध्यक्ष श्री. शशांक पाटील यांच्या प्रेरणेने
आणि शताब्दी महोत्सवी समितीचे कार्याध्यक्ष श्री. भरत ठाकूर यांच्या पाठिंब्याने श्री. विनय
राऊत व सहकारी यांनी शताब्दी ज्योतीचे आयोजन केले होते. जुहू या शाखेतून सुरुवात
झालेल्या चैतन्यमय ज्योतीची सांगता विविध गावातील प्रवासानंतर नरपड येथील संघाचे
प्रथम अधिवेशन झालेल्या ठिकाणी झाली.
शताब्दी महोत्सवी वर्षातील वार्षिक अधिवेशन दिनांक १० व ११ एप्रिल २०१० रोजी विरार
येथील विवा महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. दोन दिवस आयोजित केलेल्या या
अधिवेशनात १० वी, १२ वी नंतर करिअर, डॉक्टरांचे चर्चासत्र, संगीत व वक्तृत्व स्पर्धा,
विविध शाखांतर्फे सादर केलेले सांघिक/वैायक्तिक नृत्य खासदार व आमदारांशी हितगुज,
विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, विविध सन्माय पुरस्काराचे वितरण, गुणवंताचा गौरव समारंभ
अशा कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. वाडवळ समाजातील घरगुती वापरातील
वस्तू, परंपरागत शेती, अवजारे, कृषी अत्पादनेक तसेच परंपरागत व्यवयाय, निवाऱ्याचे विविध
प्रकारे यांचे एक प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनानिमित्ताने संघातर्फे
विरार शाखेच्या सहयोगाने एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येऊन रु. ६,६०,०००/- निधी
जमा करण्यात आला.
शताब्दी महोत्सवी सिमितीने अस्तंगत होत जाणाऱ्या वाडवळी बोलीभाषेचे जतन
करण्याचा पहिला प्रयत्न करताना वाडवळी बोलीभाषेचे पुस्तक प्रकाशित केले. सदर पुस्तकात
वाडवळी वाकप्रचार, शब्दप्रयोग, लेख यांचा समावेश करण्यात आला आहे.
शताब्दी महोत्सवी समितीतर्फे इयत्ता १ली ते ७वी च्या विद्यार्थ्याना विविध विषयांवरील
पुस्तके देण्यात आली. या योजनेला सौ. प्रणिता पंकज ठाकूर यांचे आर्थिक सहाय्य
लाभले.
शताब्दी महोत्सव निधी संकलनांतंर्गत समाजबांधव आणि हितचिंतकांकडून उत्स्फुर्तपण रु
१,७०,०००/- रुपयांच्या देणग्या मिळाल्या तसेच शताब्दी महोत्सव शैक्षणिक निधीस सुमारे रु.
१,००,०००/- रुपयांचे भरीव योगदान मिळाले.
३ एप्रिल २०१० रोजी संघ स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होण्याचे आणि संघाच्या व्दिशतकी
वाटचालीचा शुभारंभ असे दुहेरी औचित्य साधून संघाच्या दहिसर येथील कार्यालयात संघाचे
मान. अध्यक्ष श्री.शशांक रघुवीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तरुण आणि वयोवृद्ध
कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी वक्त्यांनी
संघाच्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहून तरुणांना या नेत्यांच्या कार्यापासून स्फुर्ती घेण्याचे
अहवाल केले.
शताब्दी महोत्सवी समितीने शताब्दी महोत्सवाची आवठवण म्हणून आपल्या समाजातील
प्रत्येक कुटुंबाला एक कास्य पदक (मुद्रा) देण्याचे ठरविले असून सदर योजनेची कार्यंवाही
येत्या वर्षात (२०१०-११) करण्यात येईत.
शताब्दी सोहळा उद्घाटन :- संघाच्या दैदिप्यमान भूतकाळाचे साक्षीदार वयोवृद्ध
समाजसेवक श्री. वामनराव रामचंद्र पाटील (वय वर्षे ९५) यांच्या शुभहस्ते ३ एप्रिल २००९
रोजी करण्यात आले. त्या दिवशी शाखाशाखांत शताब्दी वर्षाच्या स्वागताचे फलक लावण्यात
आले होते. तसेच रांगोळ्या काढून गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.
शताब्दी सोहळा :- वर्तमानाचे कर्तबगार प्रतिनिधी, तरूण उद्योजक आणि संघाचे अध्यक्ष
मान. श्री. शशांक रघुवीर पाटील (वय वर्षे ४६)यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर विविध कार्यंक्रमांचे
आयोजन.
शताब्दी सोहळा सांगता :- २ एप्रिज २०१० रोजी संस्थेच्या उज्वल भविष्याची प्रतिनिधी
कुमारी पूर्वा विनय राऊत (वय वर्षे १४) हिच्या हस्ते चैतन्यमय शताब्दी ज्योतीचा
प्रवास.
संस्थेच्या दैदिप्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेल्या व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन करुन,
कर्तव्यदक्ष तरुणाईच्या साथीने वर्षभर विविध कार्यक्रम राबवून भावी पिढीच्या हाती संघाची
धूरा सोपविण्याचा इरादा व्यक्त करणाऱ्या शताब्दर ज्योतीचे आयोजन करून भूत, वर्तमान व
भविष्य या तिनही पिढ्यांचे प्रतिनिधि असलेल्या अनेक समाजबंधू भागिनींच्या सहकार्याने
शताब्दी महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संघाचे ९० वे अधिवेशन रविवार, दि. २२ जानेवारी २०१७ रोजी संघाचे सन्माननीय अध्यक्षा श्रीम. प्रणिता पंकज ठाकूर ह्यांच्या अध्यक्षते खाली श्रीमंत तारामती हरिश्चंद्र ठाकूर नगरी, मांडे येथे दिमाखात संपन्न झाले. सदर अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून शेतीतज्ञ सन्माननीय श्री. मकरंद चुरी व श्रीम. अंजलीताई मकरंद चुरी उपस्थित होते. अधिवेशनाची सुरूवात सकाळी ९.00 वाजता ध्वजरोहणाने झाली. या प्रसंगी संघाच्या अध्यक्षा, विश्र्वस्त, पदाधिकारी, स्वागताध्यक्ष, मांडे शाखेतील ग्रामस्थ व समाज बंधु-भगिनी उपस्थित होते. तद नंतर अल्पोपहार झाल्या वर अधिवशनास सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रत्यक्ष सुरूवात झाली. समाजसविता डॉ. मधुकर बळवंत राऊत यांना शब्दसुमनांनी आदरांजली वाहण्यात आली व मांडे शाखेतील महिलांनी स्वागतगीत सादर केले. स्वागताध्यक्ष श्रीम. मोनाली भूपेश राऊत ह्यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना मांडेगाव व परिसराचा इतिहास तसेच परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडविले. या अधिवेशनात मान. अध्यक्षां तर्फ सर्व उपस्थितांना झाडाचे रोपटे भेट देण्यात आले. प्रमुख पाहूणे श्री. मकरंद चुरी व श्रीम. अंजलीताई चुरी यांचा परिचय करून त्यांचा तसेच मान. अध्यक्षा श्रीम. प्रणिता पंकज ठाकूर व विश्र्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. अनंत दा. राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे श्री. मकरंद चुरी व श्रीम. अंजलीताई चुरी ह्यांनी आपल्या भाषणात शेतकरी बांधवांना शेती व भाजीपाला यांचे आधुनिक पद्धतीने उत्पादन घेणे, बाजार पेठेत त्याची विक्री तसेच समस्त ग्राहकांसाठी खरेदी-विक्री विषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजबांधवांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांना यासंबंधी प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. त्यांनी उत्पादित केलेला ऑरगॉनिक भाजीपाला यावेळी अवलोकनार्थ ठेवून त्याची प्रत्यक्ष माहिती दिली. कमी जागेत अधिक उत्पादन करणाऱ्या शेतीप्रणाली चे विवेचन केले. याप्रसंगी मांडे गावातील १५ शेतकरी बांधवांनी अशा प्रशिक्षणा साठी इच्छा प्रदर्शित केली. अधिवेशात अध्यक्षा श्रीम. प्रणिता पंकज ठाकूर ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत समाजकार्याचा आढावा घेतला व आगामी योजनांचे सुतोवाचन केले. अधिवेशनात आपल्या ज्ञातीचे नांव उज्वल करणाऱ्या ज्ञाती बांधवांचा संघा तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन (एम.सी.ए) च्या उपाध्यक्षपदी निवड झालेले सन्मा.श्री पंकज भास्कर ठाकूर, राष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करून भारतीय संघा तर्फे वेस्टइंडिज कसोटी दौऱ्यासाठीच्या चमुत जागा पटकविणारा उदयोन्मुख क्रिकेटपटू श्री. शार्दुल नरेंद्र ठाकूर, पोलंड येथे कराटे या खेळात भारता चे प्रतिनिधित्व करणारी कु. स्वरदा स्वरूपकुमार पुरव तसेच पाचवी एशियनबीच स्पर्धा, व्हिएतनाम येथील पेटेन्क्यूमेटलबॉल या खेळात सहभागी असणारी कु. निधी प्रमोद राऊत यांचा समावेश होता. मांडे गावचे सुपुञ समाजबंधू श्री. संजय रामराव राऊत ह्यांनी यावेळी मानपञ देऊन सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या सञात समाजात विविध क्षेञात विशेष कामगिरी केलेल्या समाज बंधूभगिनींनी सन्मान पुरस्कार व गुणवंत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मांडे शाखेतील ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. समाजातील इयत्ता १०/१२ वी तसेच उच्च शिक्षित विद्यार्थी / विद्यार्थींनीना तसेच संगीत, वक्तृत्व व क्रिडा स्पर्धा मधील यशस्वीतांना पारितोषिक वितरण. या सर्व कार्यक्रमां दरम्यान लोकनृत्या द्वारे उपसिथ्तांचे मनोरंजनही करण्यात आले. श्री. भुपेश राऊत यांच्या पुढाकाराने मांडे शाखेने आयोजित केलेल्या अधिवेशनासाठी समाजातील श्री. चंद्रकांत नारायण राऊत आणि श्री. नथुराम नारायण राऊत याबंधूनी व त्यांच्या कुंटुंबियांनी निशुल्क जागा उपलब्ध करून दिली. तसेच श्री. नवनीत पाटील, श्री. कुंदन राऊत, श्री. संतोष पाटील, श्री. दिनेश पाटील, श्रीम. दर्शना पाटील व मांडे गावातील अधिवेशना साठी देणगी देणाऱ्या समाज बंधूभगिनींनी विशेष सहकार्य केले. शाखाध्यक्ष श्री. कामनिश राऊत व शाखाचिटणीस श्री. कुंजल राऊत, यांनी अधिवेशन यशस्वी होण्यास मेहनत घेतली. अधिवेशन स्थळी चिञकला स्पर्धेतील चिञांचे व संघकार्यातील विविध कार्यक्रमांच्या क्षणचिञाचे प्रदर्शन भरविले होते. यासाठी कु. जुई राऊत या विद्यार्थीनीने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूञसंचालन मुख्य चिटणीस श्री. अभिजीत प्रकाश राऊत, सौ. रूचिता दर्पण ठाकूर व श्री. बिपीन पाटील ह्यांनी केले. आभार प्रदर्शन आणि ध्वजावतरणा नंतर अधिवेशनाची सांगता झाली.