सौ. प्रणिता पंकज ठाकूर यांनी २४ जुलै २०१६ रोजी संघाच्या अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेतली. संघाचे माजी विश्र्वस्त कै.श्री. भास्कर वामन ठाकूर व संघाच्या महिला विकास समितीच्या माजी कार्याध्यक्षा मा.श्रीम. शैला भास्कर ठाकूर यांच्या या स्नुषा व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच वसई विरार शहर मनपाचे नगरसेवक सन्मा. श्री पंकज भास्कर ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी. लोकनेते मा. आमदार श्री. हितेंद्र विष्णू ठाकूर, मान. आमदार श्री. क्षितिज हितेंद्र ठाकूर, वसई विरार शहर मनपाचे प्रथम महापौर व कामगार नेते श्री. राजीव यशवंत पाटील व पती श्री. पंकज भास्कर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पालघर, वसई, विरार येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. तसेच उद्योगातही त्यांना विशेष रुची आहे.
सामाजिक व राजकीय वारसा असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मान. सौ. प्रणिता पंकज ठाकूर यांच्या अंगभूत गुणामुळे त्यांनी वाडवळी जत्रा, शिरगांव महिला मेळावा यशस्वी केला. संघाच्या वधू-वर सूचक समितीची संकल्पना त्यांचीच. विरार येथील आदर्श विद्यामंदिर, सर्वोदय अर्बन क्रेडीट सोसायटी, एकविरा महिला मंडळ, जिज्ञासा महिला मंडळाच्या जबाबदारीची धुरा त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. माहीम येथील कै. गणेश वामन ठाकूर सभागृह उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
उत्तम क्रीडापटू, मनमिळावू व मितभाषी स्वभाव, कर्तव्यदक्ष आणि त्यासाठी प्रसंगी कठोर, आपुलकीने समाज बांधवाशी संवाद साधण्याचे व्यक्तिमत्व, कामाचा धडाका व उरक, पदरमोड करून समाजकार्य करण्याची वृत्ती. इत्यादी गुण अंगभूत असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली संघकार्याचा वेग वाढेल यात तिळमात्र शंका नाही.
गेल्या वर्षी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच भविष्याकडे लक्ष देऊन युवा, महिला सर्वांना हाताशी धरून कामाला सुरूवात करणारी चतुरस्त्र कार्यकर्ती. समाज बांधवाचक मोठे स्वप्न बहुउद्देशीय वास्तू पूर्णत्वास नेण्याचा निश्चय त्यांनी केला असून तो त्या यशस्वीपणे पूर्ण करणार यात शंकाच नाही. अध्यक्षीय कार्यकाल सुरू करताच शाखाशाखातून एकाच वेळी निबंध व चित्रकला स्पर्धा, दिपावलीत कंदील, पणती, शुभेच्छा बॅनर वाटप, बुद्धीबळ पट, बॅटमिंटन व कॅरमचे साहित्य, आरतीची पुस्तके वाटप, पर्यावरण संतुलता साठी रोपे व कापडाच्या पिशव्या वाटप, महिलां साठी गृहोद्योग प्रशिक्षण ई. उपक्रम त्यांनीस्व खर्चाने केले. संघाच्या पालघर येथील डॉ. मधूकर बळवंत राऊत स्मारक समाज मंदिर, कै. भाऊराव देवजी पाटील विद्यार्थीस वतिगृह, दहिसर येथील कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत वसतिगृह या वास्तू संबंधित असलेली प्रलंबित कामे जवळजवळ पूर्ण करण्यात आली. समाजमंदिर व वसतीगृहाच्या चतु:समीकुंपण पूर्ण केल्या. सरकारी कार्यालयातील नोंदी अद्ययावत करण्यात आल्या. शिक्षक मेळावा, महिला स्नेहसंमेलन, शाखा प्रतिनिधी मेळावा, शाखातील महिला बचतगट व महिला मंडळांना मार्गदर्शन, समाजातील कुटूंबाची माहिती एकत्रित करणे, संघकार्या साठी तरूणांना एकत्र करणे, समाजातील शाखांना भेट देऊन जेष्ठ व तरूणांशी सुसंवाद साधणे असे अनेक कार्यक्रम व उपक्रम माननीय अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात राबविले.
अशा या सामाजिक कार्याची तळमळ व आवड असणाऱ्या मा. प्रणिता ठाकूर यांनी सर्वांची विनंती मान्य करून पुन्हा एकदा सो.पा.क्ष.स.संघ ट्रस्ट फंडच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळून समाजाप्रती त्यांचे प्रेमच व्यक्त केले आहे.
१० सष्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व ०८ ऑक्टोबरला झालेल्या त्रैमासिक सभेत त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास दाखवून देत होती की येत्या वर्षात त्या आपल्या समाजासाठी नक्कीच भरीव कार्य करणार आहेत.
संघाच्या कार्यरत असलेल्या सर्व समिती, उपसमिती च्या सदस्यांना विश्चासात घेऊन त्यांच्या कडून एक तरी उपक्रम राबविण्यात त्यांचा प्रयत्नांना भरघो सप्रतिसाद लाभत आहे. त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे युवा विका समिती व क्रीडा समिती या दोन समित्या युवांच्या व महिला विकास समितीला सोबत घेऊन प्रथमच महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धा नाविन्य पद्धतीने आयोजित करीत आहेत. समाजातून चांगले खेळाडू निर्माण करण्याचा अध्याक्षांचा मानस आहे. त्यांच्या प्रयत्नाने समाजाच्या क्रीडा विश्वात एक नविन पर्वच सुरू होत आहे. संघाध्यक्षा महिला लाभल्याने महिला विकास समिती तर खूपच जोमाने कार्यरत झाली आहे. वनभोजन, महिलांशी निगडीत वैद्यकीय शिबीर, बचतकट व होत करू महिलांसाठी लघुउद्योग प्रशिक्षण, स्नेह संमेलन असे निरनिराळे कार्यक्रम व उपक्रम समाजातील महिलांसाठी राबविले जाणार आहेत. समाजातील उपवर युवांसाठी असलेली वधु वर समिती कार्यरत झाली आहे. संगीत व वत्कृत्व स्पर्धा समितीने यशस्वीरित्या संगीत व वत्कृत्व स्पर्धा आयोजित करून संघकार्याचा श्री गणेशाकेला आहे. इतर समित्या सुद्धा कार्यक्रम करण्याचा तयारीला आहेत. चला तर अशा या तडफदार व धडाडीच्या कार्यकर्तीला, संघाध्याक्षाला करीत असलेल्या कार्यात आपण सर्वांनी सर्वतोपरी सहाय्य करून सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करूया.