Community
संघकार्यास मिळालेली नवी दिशा
संघकार्य व कार्यकक्षा विस्तार योजना १९९३
दि. २१ जून १९९२ रोजी पालघर येथे झालेल्या संघाच्या ८१ व्या वर्षी सर्वसाधारण सभेत संघाचे एक क्रियाशील कार्यकर्ते श्री. रामचंद्र बाळकृष्ण पाटील यांची संघाने विश्वस्त म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संघाने स्वीकृत केलेल्या प्रचलित कार्याव्यतिरिक्त शेती, उद्योग, व्यापार इत्यादी क्षेत्रांतही आज काही कार्य करता येईल का, तसच विद्यामान परिस्थिती लक्षात घेऊन संघाचे प्रचलित कार्य, कार्यपद्धती व व्यवस्थापन यात काही सुधारणा करता येईल का? याचा अभ्यास करून व्यवस्थापक मंडळास आवश्यक ती शिफारस करण्यासाठी प्रत्येक विश्वस्ताच्या अध्यक्षेतेखाली एक अशा पाच अभ्यास समित्या नेमण्यात याव्या असा प्रस्ताव व्यवस्थापक मंडळाच्या दि. ६-९-१९९२ रोजी झालेल्या सभेत अशा समित्या नियुक्त करण्यात आल्या.
या सर्व समित्यांनी अभ्यासपूर्वक सादर केलले अहवाल संकलित करून काही जबाबदार कार्यकर्त्यांच्या सहकार्यांने एक परिपूर्ण योजना संघाचे त्या वर्षाचे अध्यक्ष श्री. लीलाधर त्र्यंबक चौधरी यांनी तयार केली व ती व्यवस्थापक मंडळाच्या दि. ३-१०-१९९३ रोजी झालेल्या खास सभेपुढे विचारार्थ व योग्य त्या निर्णयासाठी सादर केली. सभेत या प्रस्तावावर प्रदीर्घ चर्चा झाली. व काही किरकोळ दुरूत्यांचा स्विकार करून या योजनेस व्यवस्थापक मंडळाने मान्यता दिली. व ही योजना संघकार्य व कार्यदक्षता विस्तार योजना १९९३ या नावाने अस्तित्वात आली.
अभ्यास समित्यांनी सूचविलेल्या तसेच त्या त्या समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विविध कार्याची आखणी करून कार्यवाही करण्यासाठी अकरा सदस्यांची एक अशा पाच कार्यकारी समित्यांची व्यवस्थापक मंडळाने नियुक्ती केली. त्यानंतर आरोग्य सेवा क्षेत्रात कार्य करण्यासाठी एक आरोग्य सेवी समिती नियुक्ती करण्यात आली. यथावकाश संघ कार्यात कार्यरत असलेल युवक मंडळ व महिला मंडळ यांचे युवा विकास समिती व महिला विकास समिती या कार्यकारी समित्यात रूपांतर करण्यात येऊन आज सात कार्यकारी समित्यात संघाच्या विस्तारीत कार्यक्रमात कार्यरत आहेत. या कार्यकारी समित्यांची व त्यांच्या प्रथम नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
समितीचे नाव |
अध्यक्ष |
कार्याध्यक्ष |
निमंत्रक |
स्थावर मालमत्ता निर्मिती समिती |
श्री. पुष्पकांत अ. म्हात्रे (विश्वस्त) |
ॲड. लक्ष्मण पां. पाटील |
श्री. गंगाधर जी. पाटील |
कृषीविकास समिती |
श्री. शंकर ना. राऊत (विश्वस्त) |
श्री. हरिच्श्रंद आ. पाटील |
श्री. भास्कर स. राऊत |
संघटना व सर्वसाधारण व्यवस्थापन समिती |
श्री. रामचंद्र बा. पाटील (विश्वस्त) |
श्री. दिनेश रा. पाटील |
श्री. श्रीनिवास का. पाटील |
व्यापार उद्योग विकास समिती |
श्री. रामचंद्र बा. पाटील (विश्वस्त) |
श्री. शरद ह. पुरव |
श्री. हेमचंद्र ज. राऊत |
शिक्ष्ण, कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्य समिती |
श्री. हरिशचंद्र मा. पाटील (विश्वस्त) |
श्री. राजाराम र. पाटील |
श्री. अनंत दा. राऊत |
आरोग्य सेवा समिती |
श्री. भालचंद्र मुकुंद राऊत (विश्वस्त) |
श्री. श्रीकांत ल. राऊत |
श्री. अरविंद रा. पाटील |
महिला विकास समिती |
श्री. हरिशचंद्र मा. पाटील (विश्वस्त) |
सौ. शालिनी श्या. पाटील |
सौ. आशालता म. पाटील |
युवाविकास |
श्री. पुष्पकांत अं. म्हात्रे (विश्वस्त) |
श्री. भूषण वा. पाटील |
श्री. किशोर रा. ठाकूर |
या संघकार्य व कार्यकक्षा विस्तार योजनेतील काही महत्वाच्या तरतुदी खाली देण्यात येत आहेत.
समितीची रचना
- प्रत्येक समितीत एक विश्वस्त व दहा निवडुन दिलेले सभासद असतील, विश्वस्त हा या समितीचा अध्यक्ष राहील.
- समितीमधील एका सभासदास कार्याध्यक्ष व एकास निमंत्रक नेमण्यात येईल.
- समितीतीलएका सदस्याची नेमणूक स्त्री सभासदामधून करण्यात येईल.
- या समित्यांची फेरनिवड प्रत्येक तीन वर्षांनी करण्यात येईल.
समित्यांचे कार्य
- आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या विषयावर विचारविनिमय करून कामाची आखणी करणे व व्यवस्थापक मंडळाने मान्य केलेल्या कार्याची कार्यवाही करणे व त्या संदर्भात अहवाल सादर करणे.
- आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यासंबंधी व्यवस्थापक मंडळास अंदाजपत्रक व वेळोवेळी ठराव सादर करणे.
विश्वस्तांना देण्यात आलेल अधिकार
- प्रतिवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच ज्यावेळी विश्वस्ताची जागा भरावयाची असेल तेव्हा त्या त्या जागांसाठी शिफारस करण्याचा अधिकार विश्वस्तांचा राहील. अशावेळी संबंधित कार्यकारी समितीकडून विश्वस्तमंडळास दोन तीन नावे सूचविण्यात येतील. समितीने शिफारस केलेल्या सभासदाव्यतिरिक्त एखादा अन्य सभासद काही विशिष्ट कारणासाठी विश्वस्तमंडळास पात्र वाटला तर त्या सभासदाची त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी शिफारस करण्याचे स्वातंत्र विश्वस्त मंडळास राहील.
- कार्यवाही समितीच्या शिफारसीने किंवा अन्यथा आवश्यक वाटल्यास विश्वस्त मंडळास कोणत्याही ठाराव व्यवस्थापक मंडळ किंवा सर्वसाधारण सभा यांच्या विचारार्थ मांडण्याचे स्वातंत्र्य राहील. अशा ठरावास विश्वस्त मंडळाचा ठराव असे संबोधण्यात येईल. असा ठराव नामंजूर करण्यासाठी २/३ मतांची आवश्यकता राहील. व त्या सभांना गणसंस्थेची आवश्यकता राहील.
संकीर्ण तरतुदी
- निरनिराळ्या निमित्ताने संघास एकूण रूपये पाच हजार किंवा अधिक रोख रक्कम देणाऱ्या दात्यांचीच नावे मानाच्या पानात छापण्यात येतील. या यादीस दात्यांच्या नावाचा क्रम त्यानी ज्या वर्षात रू. ५०००/- किंवा अधिक दान येणाऱ्या मानाच्या पानातील रू. ५०००/- किंवा अधिक दान देणाऱ्या दात्यांच्या नावाचा क्रमांक वरील तत्वानुसरून बदलण्यात येईल.
- प्रत्येक समितीने आपल्या कार्यकक्षेत येणारे कार्यक्रम कार्यान्वित करण्सासाठी निधी स्थापन करून त्या निधीच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नातून विधायक कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा.