Trust Community ञैमासिक वृत्तपञिका

संपादक विनय रघुनाथ राऊत
मो. - ९८२३२५१९४७, ८२०८६३००३०
सहसंपादक वंदेश दे. पुरव,
तरंग ज. पाटील,
सुचिता प्र. पाटील,
बिपीन य. पाटील,
स्वज्वल व. राऊत,
जयप्रकाश वा. पाटील

संपादकीय

एक पाऊल प्रगतीकडे ....

पुन्हा एकदा सर्व समाज बंधुभगिनींनी सौ. प्रणिता ठाकूर यांच्या वर विश्वास टाकून सलग दुसऱ्या वर्षी संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड केली. आपल्या समाजाला लाभलेले एक बहुआयामी व्यक्तीमत्व. गेल्या वर्षी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच भविष्याकडे लक्ष देऊन युवा, महिला सर्वांना हाताशी धरून कामाला सुरूवात करणारी चतुरस्त्र कार्यकर्ती. समाज बांधवांचे मोठे स्वप्न बहुउद्देशीय वास्तू पुर्णत्वास नेण्याचा निश्चय त्यांनी केला असून तो त्या यशस्वीपणे पूर्ण करणार यात शंकाच नाही. अध्यक्षीय कार्यकाल सुरू करताच शाखाशाखातून एकाच वेळी निबंध व चित्रकला स्पर्धा, दिपावलीत कंदील, पणती, शुभेच्छा फलक वाटप, बुद्धीबळ पट, बॅटमिंटन व कॅरमचे साहित्य, आरतीची पुस्तके वाटप, पर्यावरण संतुलता साठी रोपे व कापडाच्या पिशव्या वाटप, महिलां साठी गृहोद्योग प्रशिक्षण ई. उपक्रम त्यांनीस्व खर्चाने केले. संघाच्या पालघर येथील डॉ. मधुकर बळवंत राऊत स्मारक समाज मंदिर, कै. भाऊराव देवजी पाटील विद्यार्थीस वसतिगृह, दहिसर येथील कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत वसतिगृह या वास्तू संबंधित असलेली प्रलंबित कामे जवळजवळ पूर्ण करण्यात आली. समाजमंदिर व वसतीगृहाच्या चतु:सिमा कुंपणाचे काम पूर्ण केले. सरकारी कार्यालयातील नोंदी अद्ययावत करण्यात आल्या. शिक्षक मेळावा, महिला स्नेहसंमेलन, शाखा प्रतिनिधी मेळावा, शाखातील महिला बचतगट व महिला मंडळांना मार्गदर्शन, समाजातील कुटूंबाची माहिती एकत्रित करणे, संघकार्यात तरूणांना एकत्र करणे, समाजातील शाखांना भेट देऊन जेष्ठ व तरूणांशी सुसंवाद साधणे असे अनेक कार्यक्रम व उपक्रम माननीय अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात राबविले.

अशा या सामाजिक कार्याची तळमळ व आवड असणाऱ्या मा. प्रणिता ठाकूर यांनी सर्वांची विनंती मान्य करून पुन्हा एकदा सो.पा.क्ष.स.संघ ट्रस्ट फंडच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळून समाजाप्रती त्यांचे प्रेमच व्यक्त केले आहे.

१० सष्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व ०८ ऑक्टोबरला झालेल्या त्रैमासिक सभेत त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास दाखवून देत होती की येत्या वर्षात त्या आपल्या समाजासाठी नक्कीच भरीव कार्य करणार आहेत.

संघाच्या कार्यरत असलेल्या सर्व समिती, उपसमिती च्या सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या कडून एक तरी उपक्रम राबविण्यात त्यांचा प्रयत्नांना भरघोस सप्रतिसाद लाभत आहे. त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे युवा विका समिती व क्रीडा समिती या दोन समित्या युवांच्या व महिला विकास समितीला सोबत घेऊन प्रथमच महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धा नाविन्य पद्धतीने आयोजित करीत आहेत. समाजातून चांगले खेळाडू निर्माण करण्याचा अध्याक्षांचा मानस आहे. त्यांच्या प्रयत्नाने समाजाच्या क्रीडा विश्वात एक नविन पर्वच सुरू होत आहे. संघाध्यक्षा महिला लाभल्याने महिला विकास समिती तर खूपच जोमाने कार्यरत झाली आहे. वनभोजन, महिलांशी निगडीत वैद्यकीय शिबीर, बचतकट व होत करू महिलांसाठी लघुउद्योग प्रशिक्षण, स्नेह संमेलन असे निरनिराळे कार्यक्रम व उपक्रम समाजातील महिलांसाठी राबविले जाणार आहेत. समाजातील उपवर युवांसाठी असलेली वधु वर समिती कार्यरत झाली आहे. संगीत व वत्कृत्व स्पर्धा समितीने यशस्वीरित्या संगीत व वत्कृत्व स्पर्धा आयोजित करून संघकार्याचा श्री गणेशा केला आहे. इतर समित्या सुद्धा कार्यक्रम करण्याच्या तयारीला आहेत. चला तर अशा या तडफदार व धडाडीच्या कार्यकर्तीला, संघाध्याक्षाला करीत असलेल्या कार्यात आपण सर्वांनी सर्वतोपरी सहाय्य करून सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करूया.