Community
संघाची वार्षिक अधिवेशने
१९३७ साली केळवरोडे येथे घेण्यात आलेल्या सभेत संघाचा पुनश्च पुनरोध्दार झाल्यावर संघाच्या तिसऱ्या व विद्यमान कालखंडास सुरूवात झाली त्यांनतर १९३८ सालापासून आजपर्यंत संघाची अधिवेशने शाखा शाखांतून अखंडीतपणे साजरी करण्यात येत आहेत. सुरूवातीच्या काळात बेटेगाव, पोफरण यासारख्या लहान शाखांना स्वतंत्रपणे अधिवेशन घेणे अशक्यप्राप्त होते. अशावेळी अधिवेशनासाठी या शाखा शेजारच्या शाखेस जोडल्या जात असत. मात्र कालातराने शिरगांव व चिंचणी-तारापूर या लहान शाखा वगळत पोफरण, कमारे, बेटेगांव या सारख्या लहान शाखाहि वार्षिक अधिवेशने घेऊ लागल्या आहेत. ही अधिवेशने समाजंपर्काची महत्वाची माध्यमे मानली जाताता. सर अधिवेशनाच्या निमित्ताने त्या त्या शाखेत ग्रामीण स्वच्छता, घरांची सुधारणा व रंगरंगोटी केली जात असे. व शाखेत चैतन्यमय वातावरण निर्माण होत असे. हा एक सामाजिक सोहळा मानला जात असे.
प्रतिवर्षी सातत्याने अधिवेशन घेणे हे काम सोपे व सुलभ नव्हते. आर्थिक अडचणी, नैसर्गिक संकटे, गांवातील हेवेदावे या कारणाने काही शाखा अधिवेशन घेण्यासाठी टाळाटाळ करीत असत. अशावेळी संघाच्या काही घुरीण कार्यकर्ऱ्यांना त्या त्या शाखांत जाऊन स्थानिक कार्यकर्त्याना उत्तेजित करावे लागत असे. व ज्यांच्या विरोध असे अशांची समजूत काढावी लागत असे. त्या काळात आपल्या समाजीची आर्थिक स्थिती खरोखरीच हलाखिची, तरीही गरीब कुटुंबेही मोठ्या मिनतवारीने का होईना, पण गांवाने ठरविलेली वर्गणी देण्यांत धन्यता मानीत असत. शाखाच्या या आर्थिक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जुहू येथील एक समाजभगिनी श्रीमती दमयंती गंगाधर चौधरी यांनी आपल्या कुटुंगियांच्या सहकार्यानी आपल्या पतींच्या नांवे ९७६ सालीकै. गंगाधर पिलाजी चौधरी वार्षिक अधिवेशन निधीची स्थापना केली. व यानिधीवर मिळणारे व्याल प्रतिवर्षी अधिवेशन घेणाऱ्या शाखेस देण्यात येऊ लागले. त्यामुळे अधिवेशन घेणाऱ्या शाखेला थोडाफार दिलासा मिळु लागला.
पुढे या योजनेची उपयुक्तता व आवश्यकता लक्षात घेऊन अनेक दानशुन समाजबंधुभगिनींनी वार्षिक अधिवेशन निधीत भर घातली आहे. आज हा निधी रू. १,२५,१२५/- पर्यंत वृध्दीगत झाला असून प्रतिवर्षी अधिवेशन घेणाऱ्या शाखेस रू. १०,०००/- चे सहाय्य दिले जाते. या निधीदात्यांची नावे विश्वस्त मंडळाच्या स्वाधीन असलेले निधी या परिशिष्ठात देण्यांत आली आहेत. अधिवेशन घेण्याचे सातत्य जरी टिकून राहीले असले. तरीही शाखाशाखांतुन अधिवेशन घेण्याची क्रम मात्र निश्चित करण्यात आला नव्हता. त्यामुळे ज्या शाखेने अधिवेशन घ्यावे अशी अपेक्षा असते. अशी शाखा बऱ्याचवेळी आपला क्रम नाही या सबबीवर अधिवेशन घेण्यास नकार देत असते. सबब सन १९९६ साली संघाने धोरणात्मक निर्णय घेतला.अधिवेशनाचा शाखावर क्रम व इतर नियम निश्चित करण्यांत आले. संघाच्या अधिवेशनाचा क्रम जरी निश्चित करण्यात आला आहे. तरीही ज्या शाखेत अधिवेशन घेतले जाते. अशा शाखांना निधी संकलनाचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतेा. यासाठी प्रत्येक शाखेनी अशा, खर्चाच्या तरतुदीसाठी शाखा निधीची स्थापना करावी. अशा तऱ्हेची संकल्पना कार्यान्वित करण्यास संघाने शाखांना प्रवृत्त केले आहे. या योजनेच्या अग्रणी राहण्याचा मान दादर, मुंबई, माहीम, माटुंगा शाखेस लाभलेला आहे. या शाखेव्यतिरिक्त, जुहु, नरपड, मधुकरनगर, कुर्ला-कल्याण व उमरोळी या शाखांनी शाखानिधी, योजना कार्यान्वित केली आहे. अधिवेशनाचा शाखावार क्रम व शाखानिधी संबंधी संघाने केलेले नियम परिशिष्ठा मध्ये देण्यात आले आहेत.
सन १९९२ पूर्वी संघाचे आर्थिक वर्ष १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असे गणले जात असे. त्यामुळे प्रतिवर्षी जानेवारी–फेब्रुवारी होणारे वार्षिक अधिवेशन व संघाची सर्वसाधारण सभा हे दोन उपक्रम संसुक्तरित्या आयोजित करण्यात येत असत. पहील्या सत्रांत अधिवेशन सोहळ्याचा कार्यकम व दसऱ्या संत्रांत संघाची वार्षिक सभा आयोजित करण्यात येत असे. त्या काळात कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित असल्यामुळे या कार्यक्रमात सुटसुटीतपणा असे व उपस्थितांना आपले विचार सभेपुढे मांडण्यास भरपूर वाव मिळत असे. मात्र १९९३ सालापासून शासनाच्या आदेशानुसार संघाचे आर्थिक वर्ष १ एर्पिल ते ३१ मार्च असे गणले जाऊ लागले. त्यामुळे संघाची सर्वसाधारण सभा व संघाचे वार्षिक अधिवेशन हे उपक्रम निरनिराळ्या दिवशी साजरे होऊ लागले. याच सुमारास संघाची कार्यकक्षा विस्तारित करण्यात आल्यामुळे तरूणवर्गाच्या संघकार्यातील सहभागात लक्षणीय वाढ झाली. नवीन नवीन सन्मान पूरस्कार स्थापन करून पुरस्कार प्रदानाच्सा उपक्रमांचा अधिवेशनाच्या कार्यक्रमांत समावेश करण्यात आला. दात्यांच्या सत्कारांच्या कल्पना पुढे आल्या व या उपक्रमांचाही समावेश अधिवेशनाचा कार्यक्रमात होऊ लागला. उद्घाटक, अतिथी, सामाजिक प्रबोधने, पारिषोतिक वितरणे, दतर सत्कार इत्यादी गोष्टींचा समावेश या अधिवेशनांत करण्यात आल्यामुळे अधिवेशनांत सर्वसामान्यांना आपले विचार मांडण्यास वेळ मिळेनासा झाला आहे. तरीही अधिवेशनाचा कार्यक्रम सोहळामय व आनंददायक होत आहे. व या उपक्रमाव्दारे उत्तम प्रकारचा सामाजिक संपर्क साधला जात आहे. याबद्दल समाजात समाधान व्यक्त केले जात आहे.