Villages Villages अल्याळी

माझे वडील कै. गजानन बाळा पाटील ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीनशे ते साडेतीनशे वर्षापुर्वी म्हणजे सतराच्या शतकाच्या उत्तरार्थात वसलेले हे गाव. वरणा सारख्या छोट्या नदी पात्राच्या तीरावर वसलेली ही वसाहत. लगतच्या सर्व जमीनी पेशवे कालीन. जमीन वतन दारांच्या, कोरड वाहू जमीनी कसायच्या आणि धान्य रूपाने शेतसारा देऊन उरलेला (भात) धान्यावर आपला उदर निर्वाह करायचा हा त्या काळातील इथल्या स्थापत्यांचा व्यवसाय.

गावाला अल्याळी नाव कसे पडले तर जमीनदार हे पालघर आणि शिरगाव येथील पोतदार, सोनार, दाडेकर, कुलकर्णी, मेहंदके या वसाहतीला नाव नसल्याने आणि शहरापासून जवळ असल्याने अलीकडची आळी म्हणुन संभोदल जायचं. पुढे अलीयाळी आणि शेवटी अल्याळी या संक्षीप्त रूपाने अल्याळी गावाला गोडंस नाव प्राप्त झालं. संबंधीत माहिती पाळेकर एक वृद्ध पौरोहित करणारे ब्राम्हण ह्यांचे तोंडून माझे कानी पडली होती.

सुरूवातीला हथे वाडवळ चौकळशी समाजाची पाच ते सहा कुटुंब वास करत होती. तद्नंतर मात्र कामा निमीत्त पोट भरण्यासाठी इथे आदिवासी, आगरी, भंडारी जातीतील एक वेगळी वसाहत वसली.

काळानुरूप बदल होत गेले. कष्टकरांची कुळ झाली. कोरडवाहू जमीनी बागायती डोलु लागल्या. विहीरी खोदुन लोकडी,बलसाही रहाट बसले. कांदा, मुळा, रताळी, चवळी, कारली, तोंडलीचे मुळे फुलले. शेतकरी वेगाने प्रगती करत होता.त्यांच्याकडे अशी सुभत्ता नव्हती अशा कुटुंबातील आया-बायका नारळांच्या सालीपासून धागे काढून दोरी तयार करत असतं.फार मेहनीच कष्टमय काम. तरीही आपल्या संसारा-प्रंपचासाठी काथ्यांच्या दोऱ्या करून बाजारात नेऊन विकणं त्यांना भाग होतं.

गावाला विहिर होण्याआधी वरणा नदीच्या जिवंत झऱ्यांच निर्मळ गोड पाणी. सर्व जिवन क्रम नदीच्या पाण्यावर त्यामुळे नदी लगतच्या सर्व भुभाग हिरवागार. कुठेतरी सखल भागात (नदी पात्राच्या) पथराळ जमीन. त्यामुळे नागमोडी वळणाने धावणारे हिरवगार, नितळ पाणी पाहून मन प्रफुल्लीत व्हायचं.

इथे कबुतर, पारवा, टीटवी, होलं, बुलबुल, रानढोग, पाणकोंबडी अशा प्रकारचे पक्षी आजही बघायला मिळतात. मात्र बारमाही ही नदी आज मीतीस एखादा नाला, ओढ्याच्या रूपात तग धरून आहे.नदीचे जिवंत झरे बुजले गेलेत. पुर पावसामुळे आलेल्या माती गाळाने तीची रूंदी ही कमी झाली आहे.

सन १९६० ते १९६५ दरम्यांन इथे सो.पा.क्ष मंडळाची पहिली वार्षीक सभा झाली असल्याची क्षक्यता आहे.गावाला देऊळ नव्हतं.त्यासाठी ५१ ते १०१ रूपये वर्गणी गोळा केली. ज्यांची ऐपत नव्हती त्यांनी एक मण व दोन मण भात देऊन वर्गणीत भर टाकुन १९६२ दरम्यान मंदिर बांधून नाशिक वरून हनुमतांची व गणपतीची संगमरवरी मुर्ती आणुन त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. त्या सोहळयासाठी नाशिक वरून ब्राम्हण मागवले होते. या कार्यात मोलाचे काम करणारे १. शांताराम आ. पाटील २.बाळकृष्ण त्र्यंबक राऊत ३. रामभाऊ त्र्यंबक राऊत ४. सखाराम हरी राऊत ५. बाळा बुधा पाटीलयांचे योगदान आहे.तर नाशिकला जाऊन मुर्ती निवडणे व आणण्यासाठी १. महादेव जि.राऊत २. गंगाधर गो.पाटील ३. हरेश्वर मु. पाटील ४. वासुदेव ल. पाटील ५. गजानन बा. पाटील व ६. मोरेश्वर का. ठाकूर अशी तरूण मंडळी गेली होती.

तद्नंतर अलीकडे एकवीसाव्या शतकात या हनुमान मंदिराचे पुन्हा नुतणी करुन गाभारा व मंडपाला चांगला आकार देऊन प्रतिस्थापना करण्यात आली.त्यामध्ये खालील व्यक्तींच मोठ योगदान आहे. १. गंगाधार गो. पाटील २. अशोक मो. पाटील ३.विश्वनाथ रा. राऊत ४. विनय र. राऊत ५. किशोर व. राऊत ६. जयप्रकाश य. राऊत ७. भुषण वा. पाटील ८. पांडुरंग बा.पाटील आणि संपुर्ण गावाचे त्या सोहळ्यात हीरीरीने सहभागी होऊन एक वेगळीच मजा आणली.

अल्याळीच आणखी एक वाखाणण्या जोग स्थळ म्हणजे मोठी वाडी, रानमेव्याच भंडार. इथे ताडगोळे, काळी जांभळं, आंबे, उंडे, करवंदे, काजू, टेंभरूणं, विलायती ताडफळ, रांजणं (अमदाबादीमेवा) बोरं, बकुळं, आवळे, चिंचा, मोहं, खजरं, बोरं, बीब्बे आणि लव. या सर्व फळाचं भांडार म्हणजे मोठी वाडी.बर इथे कोणाही एकच मालकी नाही.वाडवळं जातीतील निम्म्या पेक्षा जास्त लोकांची त्या मोठ्या वाडीवर मालकी.त्यामुळे गावातील सर्व जातीतील मुला-बाळांवर मनमुराद या रान मेव्याचा स्वाद घ्यायला मोकळीक. माझ्या बालपणी कुणाही कोणालाही मज्जाच करत नसे.मोहाची फुलं, उंडीची फुलं, कुरा-किंवा अकुऱ्याची फुलं आपल्या सुगंधाने वाडीच्या चारी दिशा दरवळून टाकतं असे.

संघाचे माजी विश्वस्त रामचंद्र बा. पाटील (R.B.) हे नरपड हुन सुट्टीत त्यांच्या मावशीकडे अल्याळीला येत. त्यांच्या तोंडुनही वरण्याच पाणी, टोकण्याच्या गाडीतून प्रवास, आणि मोठ्या वाडीतील ताड गोळे घ्याच वर्णन. त्यांच्या बालपणीच्या आठवणीत ते आवर्जुन करतात. पण निसर्ग कोपाल्याने त्या वाडीचाही आता वाळंवट झाला आहे.सन १९७४ / ७५ पर्यंत डोकीवर भाज्यांच ओझं घेऊन वाई पालघर पर्यंत विक्री करणाऱ्या बाया-बापड्या बैल गाड्यातून प्रवास कय लागला.खजलवाड, भिंवडी येथून बैल गाड्यावर घोटी, म्हसा, तुळजापुर येथुन नमुने दार बैल जोड्या येऊ लागल्या.

ज्यांच्याकडे येवढी आर्थिक सबलता नव्हती. त्यांची छोटे छोटे व्यवयास नोकरी पत्कारली. १९५५ ते १९७० पर्यंत पालघर तालुक्यात मोटार दुर्मीळ होती. त्यामुळे बहुतांश माल वाहातुक बैल गाडीने, वसई, वाडा, डहाणू तालुक्यांच्या शिवे पर्यंत सामानाची वाहतुक बैल गाडीने. उपजिवेकेचा तो ही एक मार्ग होता. त्या काळातील बाया-बापड्यांचा मेहनतालासमीमा नव्हती. अल्याळीवरून पहाटे पाईचालत जाऊन माहीमच्या बाजारातुन कच्ची केळी खरेदी करून ओझीडोकवरून आणायची आणि ती पीकऊन पालघरच्या बाजरात नेऊन दिवसभर बसुन विकायची. मावळ्या सुर्याचा अंदाज घेऊन आपल्या संसाराला लागणाऱ्या जीनसा घेऊन परतीचा मार्ग. असा दैनंदिन कार्यक्रम.

त्या काळात अल्याळीचे काही तरूण मुबंईचे चाकर मानी झाले. नरपडचे वामनरावपाटील, आणि इतर समाज बांधवांच्या मदतीने भगवंत राव म्हात्रे ह्यांच्या ओकखीने गोइरेज सीअेट सैकी, जि,के,उब्ल्यु. अशा नामांकात कंपन्या नोकचा मिळाल्या.तर काहीजण लाल बाग, तीन बत्ती अशा ठीकाणी दुकानात किंवा सोन्यांच्या पेढ्यावर कामगार होते.

ऐतीहासिक स्थळ :- इथे वसाहत करण्यासाठी मोहात-पाडझारी निर्माळ आणि गोड पाण्याचे झरे असलेली वरणा नवाची छोटी नदी. नदीलगत समर्थ पद्मनाभ स्वामींचे पादुका मंदिर, या नदीतुन मासे मारी करून काही आदिवासी, आणि आगरी समाज बांधव आजही आपली उपजीवीका भागवतात. एक तपापुर्वी या पवित्र नदीवर दशक्रिया, हती-विसर्जन सुतकी केश बपन. अशा धार्मीक क्रिया पार पडत होत्या. आडवणतील आणि मजेशीर गोष्ठ म्हणजे. स्वर्गीय कर्मवीर ज.पा. राऊत हे अल्याळीचे जावई.त्यांची वरात गावात ज्या टांग्यात आली त्या टांग्याची दोन्ही चाक गावक्यानी गमत म्हणुन वरणा नदीत टाकली होती.अलीकउच्या काळात वराची चप्पला लावतात. तसला प्रकार असावा.

काळानुरूप बदल होत गेले. मोट रहाट यांच्रूा जागी इलेक्ट्रीक मोटार पंप आले. काबडीला दुधाच्या घागरी बांधुन पायी दुध विकणार बळीराजा सायकलनी वाहतुक करू लागला. उसाचे मळे फुलते. शेतीतल्या भाज्या मुंबई च्या भायखळा मार्केट तर सुरतेतील नामवंत व्यापरी-कुबर जेठा याना चवळी मीरचीचे दाग जाऊ लागले. सन १९६४ ला अल्याळी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत-अस्तीत्वात आली. पहीले सरपंच म्हणुन महादेव जिवन-राऊत ह्याना तो मान मीळाला.

सण-उत्सव व क्रिडा स्पर्धा- गणेशोत्सव, होळी हे उत्सव पुर्वापार पासून आहेत. गावात हनुमान, गणेश मंदिराची स्थपना झाल्यापासून हनुमान जयंती उत्सवी-जत्रा मोठ्या भावार्थाने पार पाडली जाते. त्याच दरम्यान श्रीकृष्ण जयंती दहीहंडी उत्सवी साजरा होतो. गावाला दोन गावं दैवत. गावाच्या पुर्वेला ब्रम्हदेवाचे स्थान तर पश्चिमस शेड्या. शेड्याला दरवर्षी दसऱ्याला गावाळीच्या रुपाने बकऱ्याचे बळी दिले जातात. आजही परंपरा चालु आहे.

या गावात नाट्य कलेची ओळख फार जुनी पुर्वी पुरूषांनी स्त्री पात्र रूपी पौराणिक भुमीका केलेली नाटकं ही आजच्या पीढीच्या स्मृतीत आहेत. पण त्याच पीढीतले एक कलाकार कै. विष्णु लक्ष्मण पाटील यांनी पुढे जाऊन या गावात भावनिक, ह्दय स्पर्शी आणि मार्मीक विनोदी नाटकांची जवळून गावाला ओळख करून दिली.माझ्या आदीचे जनरेशन आणि माण्‌या पर्यंतचे नाट्य कलाकार या गावात त्यानी स्टेजवर नाचवले.प्रत्येक नाट्य पात्रातला जिवंतपणा कसा आणायचा ह्याचे धडे दिले.

सण उत्कर्ष :होळी सणाची या गावाला १९८० च्या दशकापर्यंत वेगळी ओळख होती.होळीच्या आधी पंधरा दिवस तीच्या स्वागताची तयारी.पोर मोठृया होळीसाठी रानातील लाकड गोळा करून ठेवायची.तर गावातील पोरी-बाळी रोज रात्री गावाच्या मध्यावर अंगणात फेर धरून गाणी बोलणं, पिंगा धरून गमतीने गावातील लोकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणं.असा गावातील कार्यक्रम.पण होलीका उत्सवानंतर मात्र या उत्सवाला गाल-बोट लागायचं.कोणाच्या किंमती लोकडी वस्तू पेटवल्या जायच्या.तर धुलीवंदनाच्या दिवशी एखाद्याला नको असुन त्यांच्यावर रंग उधळल्याने मोठमोठी भांडण व्हायची.

जेव्हा दूर-दर्शन नव्हतं :आकाश वाणीही दुर्मीळ. त्यावेळेला श्रावण महिन्यांत भात लावणी, आवणीची काम आटोपून शेतकऱ्याला थोडी उसत मिळायची.अशा वेळेला गावातील कै.बाळा बुधा पाटील (माझे आजोबा) आणि कै.सखाराम हरी राऊत.हे दोघे अध्याय वाचन कयन रामायण, महाभारत, आणि पौराणातील पुरूवा, उर्वशी, रंभा हे अगदी ययाती, कचदेव, देवयानी ते शुक्राचार्यापर्यंतच्या कथा रसभरून सांगायच्या. उपास तापासाचे दिवस कथनाच्या शेवटाच्या दिवशी माझी आजी सर्वांसाठी मोठा पाणंगा (गुळ तुपघालून केलेी तांदळाची मोठी रोटी) तयार करून प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायची.

या गावात तर्क-तीर्थ वजा जोतीषीच्या रूपातील व्यक्ती म्हणजे कै. काशिनाथ रामा ठाकूर. इथल्या सप्तक्रोशी त्यांचा बोलबाला होता. कोणत्या जागेत विहिर खोदल्यास पाणी लागेल, कुणाची वस्तू जनावरे गहाळ झाल्यास कोणत्या दिशेला सापडतील यांचा अचुक अंदाज ते सांगायचे. आजचं गोवर-कांजणं म्हणजे त्या काहात देवीच्या कोप होणं, देवी येणं आणि देवीला शांत करणे म्हणजे तीचा जागर गावातील के. तुकाराम सरडु पाटील, कै. केशव बुधा पाटील आणि इतर मिळून टाळ मृदुंगाच्या गजरात देवीच्या नावाने भाट, ओव्या गात असतं.अशा प्रसंग कार्यक्रमाची सुपारी त्यांच्या कडेच असायची.

लोकसंख्या : गावाच्या आकार मानाच्या तुलनेने वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रुप ग्रामपंचायत काळात. तेव्हाचे सरपंच टेभोंडा गावचे कै. केशव नाना पाटील यांना बरोबर घेऊन नविन वस्तू हद्दीसाठी गावकऱ्यांनी जागा आरक्षित केली. पुढे १९६९ साली निवडूण आलेल्या ग्रामपंचायत बौडीचे सरपंच कै. वासुदेव लक्ष्मण व उपसंरपच कै. गजानन बाळा पाटील ह्यांनी ग्रामपंयाचत मध्ये ठराव मंजुर करून घेतला. आणि मा. प्रांत कार्यालय डहाणू यांच्या कडुन १९७१ ते १९७२ दरम्यान नवीन गावठण वसाहतीस मंजुरी मिळवुन घेतली. आज मीतीस त्या नवीन वसाहतीचं आनंद आणि सुख बहूसंख्य आल्याळीचा नागरिक उपभोगतोय.

महिला मंडळ : काळाची गरज ओळखुन जुन्या पीडीतील स्त्रीया लग्न कार्यासाठी धार्मीक कार्यासाठी भांडी खरेदी केली.त्यासाठी लागणारी आर्थिक मदतीची त्यांना गरज होती.त्या काळातल्या बाया-बापड्या गावभर फिरून वर्गणी गोळा करीत होत्या.त्यात हीरीरीने भाग घेणारी एक पुतळ आतु (कै. पुतळाबाई पांडुरंग पाटील- अल्याळी. पोफरण) हीने म्हणे तीचे जेष्ठ बंधु कै.सखाराम रामजी पाटील ह्यांचे धोतर, सदरा, कोट, काळी टोपी घालून होळीमध्ये पोस्त किंवा फुगवी रूपात बरीचशी रक्कम महीला मंडळाला मिळवून दिली.पुढे ती गेल्यानंतर नात्याने तीचे भाचे असलेले श्री.लीलाया त्र्यंबक चौधरी कुमारे यांनी तीच्या स्मृती रूपाने महीला मंडळाला स्टील ताटे दिली होती.तद्नंतर मात्र या गावचे तत्कालीन सरपंच श्री.अशोक मोरेश्वर पाटील यांनी महिला मंडळाचा चेहरी-मोहराच बदलून टाकला.शासकीय अनुदान मिळविण्यासाठी महिला मंडळ रजिस्टर होणे गरजेचे होते.त्या वेळीच्या या तरूण संरपचांने फार मदत केली आणि सन १९९३ साली माझी आई कै. शालीनी गजानन पाटील हीच्या अध्यक्षेखाली महीला मंडळ रजिस्टर झालं. आजमीतीस आजच्या महिला मंडळानी त्या रोपट्याचा वट वृक्ष केला. महिला मंडळ रजिस्टर असल्याने महिला समाज होत हॉल शासनाच्या योजनेतून बांधून मिळाला. त्याचे उद्घाटन तत्कालीन मैत्री मा.राम नाईक यांच्या हस्ते झाले.मा.राम नाईक यांच या गावासाठी आणखी एक योगदान म्हणजे समुद्राच खार पाणी अडविण्यासाठी वरणा नदीच्या खाडीवर बांधलेला बंधारा.

पडझड : मागे उल्लेख केल्या प्रमाणे बागायती, जिरायती अल्याळी व रान शिवार जोमाने डोलत होतं. पण कुठे दृष्ट लागली आणि ग. दि. माडगुळकरांच्या भाषेत सांगायचं तर जिथे फुलं वेचली तिथं गोवरी वेचण्याची वेळ अल्याळीच्या बळीराजावर आली. झालं असं १९७१ चा दुष्काळ सगळीकडे दुष्काळ. तळी –वरणा नदी तील पाणी या मुळे भरघोस पीक आलं. अल्याळी गावाला दुष्काळ नव्हतं. पण दुष्काळावर मात करणेसाठी इतर योजना बरोबर समुद्र शेती त्यातीलच १. मत्स शेती २. मीठागङ, खारं पाणी अडऊन केली जाणारी प्रक्रिया-परिणामी विहिरीतच गोड्या पाण्यात क्षारयुक्त पाणी वाढु लागलं. शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला. हिरव्या गार शालीन बहरणार शेत-ओसाड वाळवट झालं. थोड्याशा दुधदुपत्यावर इथला शेतकरी उपजीविका भागऊ लागला.तेव्हा मात्र इथला तरूण खडबडुन जागा झाला.मिळेल तशी नोकरी शोधु लागला.आशेचा किरण म्हणजे शहरात औद्यागिक क्षेत्रे वाढत होतं. तत्कालीन सरपंच कै. सुरेश शां. पाटील यांनी काळाची गरज ओळखून पाणी नळ योजनेचा फायदा घेतला आणि गावात नळाद्वारे पाणी व्हाऊ लागले.

तत्पूर्वी एक डाक हंडा कळशी पाण्यासाठी दोन ते तिन किलोमीटर पायपीट करूनही पाणी मिळवताना काय कष्ट यातना भोगायला लागत होत्या ते त्या अल्याळीच्या आया-बहीणीचं जाणोत. या घटनेच्या साक्षीदार त्या वेळच्या या गावच्या सर्व कन्या आणी आल मातीस ५० ते ६५ वयोगटातील अल्याळीच्या माहेर पाशीणीच्या तोंडुन ऐका. त्यांनी अनुभवलेलं भयाण वास्तव तुमच्या कानी पडेल.

आजीबाईचा बटवा : त्याकाळी डॉक्टर दुर्मीळ शिवाय पालघर शहरापर्यंत जाण्यासाठी पायपीट शिवाय दुसरा मार्ग नव्हता.त्या मुळे आजीबाईच्या बौद्धिक बटव्यातील औषध शिवाय पर्याय नव्हता.त्यापैकी माझ्या माहीतीतल्या दोन आजीबाई. कै. बाळीबाई बाळा पाटील (सोनी बायू.) श्री. सौ. हेमा दिपक ठाकुर ह्यांची आत्या तर दुसरी कै. बाळीबाई बाळा पाटील (कासूताई) गावच्या पोलीस पाटलाची पत्नी – त्या काळात गरोदर महिलेचे बाळंतपण घरीच व्हायच त्यामुळे मार्गदर्शक म्हणुन या दोघीपैकी एकीच तरी वास्तव्य त्या खोलीत असायचं. लहान शिशुला सर्दी-पडस, जुलाब किंवा पोटाचा आकार मोठा होऊन, नारगोळ, मुडदुस सारखा प्रकार असेल तरी पोटावर हलकासा-चुपका किंवा डाम त्या अगदी हळूवार पणे द्यायच्या. खास करून आदिवासी किंवा गरीब कुटुंब त्यांच्या त्या सेवेचा लाभ घ्यायचे.

पुन्हा प्रगतीकडे – काळानुरूप बदलामुळे अल्याळी गावाचा तरूण सुद्धा झपाट्याने बदलला.

शिक्षण : शैक्षणिक बाबतीत आजचा तरूण बऱ्यापैकी प्रगतीवर आहे. हाताच्या बोटावर मोक्या इतके विद्यार्थी का असेनात. अमेरीका, न्युझीलँड सारख्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. एखाद दुसरा वैद्यकीय क्षेत्रासारखा भाग सोडला, तर इंजिनियरींग प्राध्यापक, कायदे तज्ञ, शिक्षक, टेक्नीकली तज्ञ या क्षेत्रात विद्यार्थ्यांची चांगली प्रगती आहे.

उद्योगधंदे : वीट उत्पादन, बील्डींग मटेरियल सप्लायर, जे.सी.बी.डंपरर ट्रक्टर या धंद्यातही काही जणांनी जम बसवलेला आहे.थोडे फार अजुनही ही शेती व्यवसाय करतात. एखाद दुसरा बिल्डर क्षेत्रात आहेत.

कुष्ठप्राय व्यवसाय : शेतीची खारी माती झाल्याने दुध-दुपत्याचा व्यवसाय कांडेनी पत्करलाय, तर पालघर शहरात केळी, भाजीपाला फुल-फळ विकुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांची संख्या ही कमी नाही.

कला-क्रिडा : मागे उल्लेख केल्याप्रमाणे कला आणि क्रिडा क्षेत्राातही प्रगती केली आहे.

कलाक्षेत्र : गावात स्नेहवर्धक नाट्य मंडळ कार्यरत आहे.कौटुंबिक तसेच विनोदी नाटकं या गावात सादर केलेली आहेत. गणेशोत्सव काळात महिला विद्यार्थी ह्यांच्या विविध स्पधा्र इथे पार पाडल्या जातात.

मैदानी खेळात इथे क्रिकेटर जास्त भर दिला जातो.संगम क्रिकेट क्लब अल्पाकी इथे कार्यरत असुन मंडळाने क्रिकेट ग्राऊंडची छानसी रचना गावात केली आहे.तीथे टेनि व साझन च्या टुर्नामेंट मिरवल्या जातात. कबड्उी, खो-खो, व्हालीबॉल इथे अल्पप्रमणात खेळले जाणारे खेळ आहेत.

संबंधीत माहिती माझ्या आठवणीत असलेला इतिहास. थोडक्या माझ्या लेखणीतुन मांडला असुन अनबधनाने किंवा चुकुन एखाद दुसरी माहिती राहुन गेली असल्यास या गावच्या माहिती विचार वंतांची व उपेक्षीतांची क्षमा मागतो. धन्यवाद.