"मधुकर नगर" ह्या आमच्या गावाचे वर्णनच मुळी भवानगडच्या छायेत वसलेला चिमुकला गाव असे केले
आहे. मधुकर नगर आणि आमचे डॉ. भाई यांचे ह्या गावाशी एक अत्यंत जिव्हाळ्याचे नाते. गावाचे पूर्वीचे
नाव दहिसर हे मुळी भवानगडावरील श्री. दधिचेश्वरा (श्री शंकर) मुळे पडले आहे आणि आता या गावाने त्यांचे
आराध्य दैवत डॉ. मधुकर म्हणजे डॉ. भाईंचे नाव धारण केले आहे, "मधुकर नगर".
राकट देशा, कोसल देशा, दगडाच्या देशा,
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा!
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा,
बकुळ फुलांच्या प्राजक्तिच्या दळदारी देशा!
कवि गोविंदाग्रजांची कविता आमच्या गावाचे यथार्थ वर्णन करते. निसर्गाच देखणं वैभव प्राप्त झालेल असं
आमचं छोटस चाळीस घराच गांव. गावांत सर्व वाडवळ जातीचे बांधव असून तीन घराणी पुरव, पाटील व राऊत
ह्यांची आहेत. फक्त एक भंडारी कुटुंब असून ते गावाशी एकरूप झालेले आहे.
गावामध्ये पूर्वी भातशेती आणि चार कुटुंबे दुधाचा व्यवसाय करीत, परंतु आता गावातील बहुतेक लोक
नोकरी निमित्त सफाळ्यापासून दादर, डोंबिलीपर्यंत राहण्यास गेल्यामुळे शेती व्यवसाय जवळजवळ बंद
होण्याच्या मार्गावर आहे. तीन चार कुटुंबे बागायती करतात.
शशांक रघुवीर पाटील – ह्यांची सिक्युरिटी व्हिजन' ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आहे.
जयवंत प्रभाकर पाटील – ह्यांची "shree Laxmi Engineering" हि कंपनी कलकता, मुंबई, हैदराबाद येथ
त्यांचे प्रोडक्ट पाठवित आहे.
मधुकर नगर येथे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेने सफाळा स्टेशनवर उतरून बस किंवा रिक्शा उपलब्ध
असतात.
तसेच ज्यांचे स्वत:चे वाहन असेल ते मुंबई अहमदाबाद द्रुतगती मार्गाने वरईनाक्यावरून सफाळ्यावरून गावात
पोहचू शकतात. तसेच नरपड पासून बोईसर-पालघर-केळवा ह्या रस्त्याने मधुकर नगराला बाय रोड जाऊ
शकतात.
हवामान: सुखद... लाल काळी माती, काजू, आंबे, चिंचा, बोरे, जांभुळ माड करवंद बकुळी, वड, पिंपळ
वगैरे गर्द झाडीने संपूर्ण गाव वेढलेल आहे.
भवानगड – ऐतिहासिक वास्तु – किल्ला – बुरूज
भवानगडावर असलेले श्री. शंकराचे देवालय
गावात असलेले श्री शंकराचे देवालय
गावात असलेले माताई मंदीर
गावात असलेले श्री शेडेदेव मंदीर
"नवयुग मित्र मंडळ" हि रजिस्टर संस्था गावामध्ये सांस्कृतिक कामाबरोबर सामाजिक कामे करीत असते.
गावामध्ये एक गाव एक सार्वजनिक गणेशोत्सव असतो त्यावेळी विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसेच दहिहंडी
हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भवानगडावर जत्रा असते त्यावेळी श्री शेडेदेव मंदीर मंडळातर्फे
स्नेहमिलन-महाप्रसाद असतो ते औचित्यसाधून नवयुग मित्र मंडळातर्फे गावामधील" जेष्ठ नागरिकांचा" सत्कार
केला जातो.
गावामध्ये मधुकर नगर-भादवे अशी ग्रुपग्रामनंचायत असून "श्री विकास राऊत" हे विद्यामान सरपंच
आहेत. (मधुकर नगर वासिय) गावामध्ये मुले-मुली कमी असल्यामुळे शाळा बंद झाली त्या इमारतीच्या जागेचा
"समाजमंदीर" म्हणून विविध कार्यक्रम होत असतात.
मधुकर नगरच्या नावाजलेल्या व्यक्ती..
पं.वि. रघुंवीर ठाकजी पाटील....
पूज्य साने गुरूजी व भाऊसाहेब रानडे ह्यांच्या विचारांनी भारावलेल्या समाज व शिक्षण यासाठी समर्पित जीवन
जगलेला एक तेजस्वी, चारित्र्यवान तरूण व लेखकही होते. गावचं दैवत मानत.
पं.वि. नारायण नथु पुरव...
हे फार मोठे कवि ह्या गावाचे होते. त्यांचा "सरवंती" हा काव्यसंग्रह १९६७ साली प्रकाशित झाला होता.
पं. वि. अरूण पाटील.....
महाशिवरात्रीला सामाजिक नाटके.... गावातील वेगवेगळ्या कार्यक्रमाचेही जबाबदारी घेऊन सर्व तरूणांची मोट
बांधून ती पूर्ण करीत असे.
श्री. शशांक पाटील – हा मधुकर नगर वासिय खरतर वेश्चिक नागरिक आहे. आजच्या माहीती
तंत्रज्ञानाच्या युगात त्याने मधुकर नगरचे नाव मोठे केले आहे.
मधुकर नगरला नैसर्गिक सौदर्यांची जबरदस्त देणगी आहे. परंतु गावमध्ये जेवणाची राहण्याची सोय
नसल्यामुळे हा गाव आर्थिक सुबत्तेस मुक्त् आहे.
जो कुणी येतो तो ह्या निसर्गाची देणगी लाभलेल्या गावाच्या प्रेमात पडतो असे हे गाव... मधुकर
नगर.