Villages Villages चिंचणी

बोईसर पूर्व. ता,जी: पालघर.

चिंचणी म्हणजे तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणारे तर कोकणाच्या किनारपट्टीत वसलेले गाव. पूर्वेकडे शेतमळाने फुललेले गाव. १९५ उत्तर अक्षांस ८२.२१ पूर्व रेखांवर ५८३.९६ चौरस हेक्टर वर गाव वसलेले आहे.

प्राचीन काळातल्या मानवी वसाहतीच्या आत पुरावा खोदलेले- प्राचीन तलाव ५ कि.मी.श्‍ लांब व अडीच कि.मी. लांब व अडीच कि.मी. रूद असणाऱ्या गावात दहा तलाव खोदून वसाहतकरांनी चिंचणी हे बेट निवास योग्य केले आहे.

देवाळे, कुर्लाई, बहाळे बाभुळे गावतळे अंबाळे नवाळे आणि धोबीतलाव चिंचणीच्या विविध विभागाचे नावे ही चिंचणीच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारी आहे. वावरळ प्राचीन काळी विद्वांची वावर असणारी स्‍थळं चिंचणीतील आदि वसलेले ठिकाण आगरभाट फांद्या परसलेले उराभाट.

विहिरीच्या पाण्यावर शेती केली जाणारे-शितवाळी सतीचा दगड—असणारी बलावडी, विद्वान असणारे पंतोही, सतत वर्दळ असणारा – बोभाटा बुरूजपाडा, किल्याचे प्रवेशद्वार असलेलं देवोडी आळी दमणच्या वास्तव्य असलेले दभणभाट . विद्वान ब्राम्हणाची वसाहत ब्राम्हण आळी बंदर परिसर मधील चिंचणीमुळे भंडारी आळी ते देमणभाटातील वर्तक आळी म्हणजे सातवाहन काळातील असलेले विखुरलेले ठिकाण हे सातवाहन काळातील मृदा भांड्याचे अवशेष इतरत्र विखुरलेले ठिकाण इस. च्या दुसऱ्या शतकातील मोठ्या वसाहतीचे पुरावे म्हणजे सांडपाण्याचा निचरा करण्याठी एकावर एक रचणारे शोष खड्डे मातीच्या गोल रिंग एकावर एक रचून तयार केलेले शोषखड्डे.

शके ९९८ कदंम राजाने हा भाग घेतल्यानंतर, शके १०१६ मधे शिलाघर राजवट आली. त्यांनी उभारलेली शिवमंदीर कालओघात नष्ट झाली. परंतू नागेश्वरी इथे माजी आप्पा पेशवे यांना सापडलेली शिवलिंग ते शिलाहाराचा अस्तित्वाचा पुरावा ठरला पुढे यादव कुलीन प्रतापबिंब प्रदेश व्यापला.

चौदावे शतकाच्या अखेरीस गुजरातचा सुलतान बहादूर शहा याने हा भाग जिंकला. चिंचणीत सापडणारी गुजरात सुलतानची नाणी ही मुस्लीम राजवटीची साक्ष आहे. पुढे त्यांच्या कमकुवत पणाचा पोतृगीजांनी घेतला. चिंचणीतील पाचघोडवी तारापुरचा किल्ला आणि समुद्रकिनाऱ्यावरील 'बुरूज' ही पोतृगीजांची देणं मानली जाते. आजही ह्या गुडविहीरीचे पाणी दैनंदिन कामासाठी वापरले जाते. चिंचणी वासिह्यांनी पोतृगिजाबरोबर व्यापार केला. परंतु त्यांचा धर्म स्विकारला नाही. धर्मातराचा प्रयत्न करताच चिंचणीतील बाहू पाटील आणि मंडळी एकत्र आली. त्यांनी पुण्याच्या पेशवे दरबार गाठला. पहिल्या बाजीराव पेशव्याने उत्तर कोकणातील पोतृगीजाच्या उच्याटणांसाठी चिमाजी आप्पाला पाठविले. नागेश्वरी मराठ्यांची छावणी होती. मराठ्यांनी युद्ध जिंकले व मदत करणाऱ्या चिंचणीच्या सुपुत्राला चिमाजी आप्पाने जमिनीचे दान दिले. ब्राम्हणांना वृत्त्या दिल्या. चिंचणी प्रदेशाचे वसाहतीकरण चिमाजी आप्पाच्या मदतीने स्थीर झाले. चिमाजीने नागेश्वरात महादेवाचे मंदीर बांधले. चिंचणीतील पिंपळनाका इथे बांधलेले विठ्ठल रखूमाईचे मंदीर इथे इंडोवेस्टन स्थापत्यांचा उत्तम ह्याचा नमुना आहे. या मंदीराच्या देवा समोरील चावडीत इथे गावातील नाव-निवाडे सांस्कृतिक मेळे, भजने, किर्तन होत असत. त्यातूनच गावाचे ऐक्य जोपासले आहेत.

मध्यकाळाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी मराठ्याचा पराभव केला. व चिंचणीतील ब्रिटिशांची राजवट स्थिर झाली. इ.स. १८१८ रोजी पुण्यातल्या शनिवारवाड्यात युनियन जॅक फडकले लवकरच सुप्रतिष्ठ प्रशासनासाठी ब्रिटिशांनी चिंचणीत नगर पालिका स्थापन केली. परंतू १८६२ साली प्रशसकाच्या अभावामुळे नगरपालिका बरखास्त झाली. चिंचणीत प्राथमिक शिक्षणाची सुरूवात १८८६ साली झाली. १९३० पर्यंत चिंचणीत पाच प्राथमिक शाळा होत्याश्‍ मराठी शाळा नं. १,२ दांडीपाडी शाळा, पाटीलवाडा शाळा, बंदर शाळा, इ.स. १८१० साली इग्रजी शिक्षणाची सुरूवात पंढरीनाथ दाजी जोशी यांनी केली. त्याचेच रूपांतर पुढे केडी हायस्कूल मध्ये झाले. या शाळेने चिंचणीला अनेक रूपात सुपुत्र दिले.

चिंचणी व स्वातंत्र चळवळ टिळक युगापासून चिंचणीमध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. डॉ. हिरशचंद्र पुरंदरे हे टिळक भक्त होते. ते केसरी नियत कालीन मागत असत, पंढरीनाथ जोशी त्यांचे सामुदायिक वाचन करत असत. केसरीच्या बलिदानाने तरूणीची मने धगधगू लागली. गांधीयुगापासू येथील मंडळी स्वातत्र्य चळवळीत भाग घेऊ लागली. प्रभातफेरी, देशभक्तिवर गीते, गुफ्त झेंडावंदन, भाषणे, दांडीमात्रा वैय. सत्याग्रह चलेजाव चळवळ व वंदेमातरमांनी तरूणांची मने व चिंचणीतील सर्वच वातावरणांनी भरून गेले. व चिंचणीतील सर्वच वातावरणांनी भरून गेले. या गावांनी २७ स्वातंत्र्य सैनिक व दोन हुतात्मे दिले. कमळाकर पंढरीनाथ जोशींना चार वेळा तुरूंगवास भोगावा लागला. त्याचे घर म्हणजे चिंचणीतील स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र होते. इंग्रजांविरूद्ध निषेध व्यक्त करणाऱ्या छोटू भानाचे या तडफदार शाळकरी मुलाने त्याच्या सवंगड्यासह पोलीसाच्या चावडीला आग लावली व ती भस्म केली.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना मिळालेल्या ध्वज हिंदुस्थानात स्वातंत्र लढाची तीव्रता मिळाल्याने ब्रिटीश साम्राज्य शाहीनी हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य देण्याच ठरले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम केडी हायस्कूलच्या मैदानात संपन्न झाला. त्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध प्रतिष्ठीत बालारीक्षण तज्ञ ताराबाई मोडक हजर होत्या. धार्मिक चिंचणीवर चिंचणी गावात वेगवेगळ्या जातीची अनेक मंदीरे आहेत. सामुद्रीमाता मंदीर, मोरपाड्यातील चाचणमाता सामुद्रीमाता , खाडीनाक्यावरील कुंभार गल्लीतील महालक्ष्मी मंदीर, चिंचणी मार्केटजवळील कृष्णाने पोखाड मंदीर, तर पिंपळ नाक्यावरील मारूतीचे मंदीर व विठ्ठल रखुमाई मंदीर, श्रीराम मंदीर, गणेशमंदीर, पिंपळ्या पारवरील शिवलिंग असे देव पद्यायतन आहे. चिंचणीतील बोभाट्यात रामेश्वरी मंदीर व गायत्रीमंदीर आहे. गावदेवीचे मंदीर मांगेला समाजाने जोपासले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पहिले साई मंदीर चिंचणातील सुतार आळी मध्ये आहे.

शिवाजी चौक येथे दत्तमंदीर गावातील अस्तृश्यांना स्थापन करून दिले. जातीयतेच्या विचाराचा विनाश केला. पाटील वाड्यातील रामेश्वरातील दत्तमंदीर सुंदर व देखणं आहे. देवणभार मध्ये ग्रामदेवतेचे मंदीर आहे. याखेरीज खंडोबा, विठोबा अनेक ग्रामदेवता आहेत. चिंचणीच्या मलग टोकावरील दर्गा व खाडीनाक्यावरील मशीद मुसलीमांचे श्रद्धास्थान आहे. जैनाचे एक देरासन बसून संत बालाजी या जैन मुलीची समाधी स्थान आहे. येथील लोक व वातावरण धार्मिक आहे. १८ बगड जरतीचे लोक ते वेगळेपण जोपासले आहेत. गावातील सांस्कृतीक ऐक्य ही सेवाधीत करीत आहेत.

शेती, डायमेकींग, मासे मारी या गावातील पारंपारिक व्यवसायानी धारण आधुनिरता केली आहे. व्यायाम शाळा, बँका, पोष्ट ऑफीस, बाजारपेठा, मराठी व इंग्रजी शाळा, केजी ते पिजी पर्यंतचे शिक्षण, विविध प्रकारचे उदयोग, व्यवसाय यामुळे चिंचणी गाव आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. गावाचे राजकरण, अर्थकरण, समाजकरण धर्मकरण सर्वत्र समन्वाची भूमीका गावाला समृद्धीकडे नेत आहेत. नव्या व जुन्या गोष्टीचा सुंदर असा संगम चिंचणीत पाहावयास मिळतो.