Villages Villages मांडे

सफाळे टेंभीखोउावे रस्त्यावर भेटणार मांडे हे गाव शे सव्वाशे वर्षापूर्वी वसलेलं नवं गाव आहे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन वेळा वसलेलं हे गाव आहे. गावाचया जवळच पिंपळाची मान या नावाने ओळखला जाणारा भाग आहे. आजच्या मांडेरांचे पूर्वज या ठिकाणी वास्तव करून होते. पिढीतील लोक मरिआईचा फेटा असं म्हणत अंधश्रद्धेच्या जबरदस्त विळखा तत्कालीन समाजाभोवती होता. परिसरात डॉक्टर नसल्याने औषधोपचार ची वानवा असे. लोक भगताकउे जात. पण त्याच्या छूमंतर ने रोग बरा होणार? अखेर लोक वैतागले आणि आपला सारा संसार घेऊन मांउ्याची आजची मजुबादेवी आहे तेथे त्यांनी धंर बांधून नवं गाव वसवंल. पण नंतर लक्षात आलं ही जागा कोणाच्या तरी मालकीची आहे. गावकऱ्यांनी लागलीच तेथून सथलांतर केलं. आणि आज जेथे मांडे गाव वसलं आहे तेथे धर बांधली असं या गावाचया बाबतीत इजा-बिजा-तिजा झालं.

मांडे गावात आज नागरिक आहेत वाडवळ सोमवंशी पाठारे क्षत्रिय या नावाने त्यांची ज्ञतिसंस्था आहे. वाउवळ, आगरीउ, आदिवासी (मल्हार कोळी) आणि बौद्ध जातीचे लोक राहतात. गावाच्या मुख्य व्यवसाय आहे भातशेती. मांडेगावातील वाडवळ समाज बागायती जोडधंदा म्हणून करतात. आगरी, आदिवासी लोकही बागाईत करू लागले आहेत. काही लोक वीट व्यवसाय करतात. दगड, खडीचे कामही चालते. गावातील काही लोक सरकारी म्हणजे नगरपालिका, रेल्वे टॅम्प, विज, तारखेत इत्यादी ठिकाणी काम करतात. तसेच बरेच जण बाईसर, विरार, वसई, भाईंदर मुबई येथे कारखान्यात काम करतात.

गावात वेल्डींगची दोन कारखाने आहेत. तसेच मोटार सायकल दुरूस्तीचे वर्कशॉप आहे. फ्रसिंग मशिन तसेच भाताची गिरणी आहे.

मांडे गावाची लोकसंख्या १००० इतकी आहे. ७८७ एकर क्षेत्रात गाव विखुरले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योगपती स्व:दादोबा ठाकूर यांची काही प्रॉपर्टीही मांडे गावातच आहे. मुंबईच्या माजी आमदार शरयू ठाकूर या दादोबाच्या स्नु:षा त्याच सध्या मिळकतीची देखभाल करतात.

मांडे गावाला पोहोचणारा डांबरीचा रस्ता आहे. गावात गल्लीत पोहचणारे सिमेंट कॉक्टीकचे रस्ते आहेत.

गावचे हवामान उष्ण व दमट आहे. कधी हवेत गाखा असतो. भाताला,तसेच बागाईतील उपयुक्त हवामान आहे.

ऐतिकासिक वास्तू म्हणून मुजबादेवीचे मंदिर आहे. वैशाख महिन्यात बुद्ध पौर्णिमेला उत्सव व परिसरातील शेवटची यात्रा असते. आचार्याला ही कुलदेवता त्यांचा नेहमी सहभाग असतो. यात्रेला पूर्वी नाटके होतं. सध्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवतापैकी एक आहे. आता नुतनीकरण आणि जिर्णोध्दाराचे काम पूर्ण होऊन भव्यदिव्य वास्तू तालूक्यातील अतिशय देखणं मंदीर दिमाखान उभे आहे. काही लक्ष्मीपुत्रांनी भव्य देणग्या दिल्यानी मंदिराची इमारत उभी राहिली. गावात नव शंकर नाट्य मंडळ, गणेशोत्सव मंडळ गौरीमंडळ आपल्या परीने उत्सव साजरे करतात, दिवाळी, दसरा, दहिहंडी गावातील सर्वजण एकत्र येऊन साजरे करतात. गणेशोत्सवाच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम. वक्तृत्व स्पर्धा संगीत स्पर्धा वेषभूशा स्पर्धा ठेवून बक्षिसे दिली जातात. गावातील गुणवत विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो.

गावात उत्कर्ष महिलामंडळ आहे. त्यांची मांडी, खुर्च्या असून त्याचा विनियोग गावासाठी केला जातो. महिलासाठी हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. सहलीचे आयोजन केले जाते. गावात महिला बचत गट असून सेंदी्रय खत तयार करणे आधुनिक पद्धतीने भाताची लागवड कुकूट्ट पालन इत्यादी कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. गावात क्लिेश मृत्यूफंड उत्त्म रीतीने चालतो. मांडे गावातील माजी जि.प. सदस्य तसेच माजी सरपंच व त्यांच्या पत्नी मौजी सरपंच सौ. सरिता संजय राऊत या दोघांनी विविध विकासाची कामे केली आहेत. तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या माजी सभापती सौ. ज्योती जयेश पाटील याच गावतल्या रस्ते पाट बंधाऱ्या बाबत सहकार्य केले आहे. सध्या त्या पालघर पंचायत समितीच्या सदस्या आहेत.

माजी सरपंच सध्याचे सपसरपंच श्री. जयेश पाटील यांनी गावासाठी भरीव योगदान दिले आहे. वृक्ष लागवड, बंधारे, महिला बचत गटांना मदत, तसेच आरोग्य शिबिरे भरविली आहेत. व्यायाम शाळेचे नुतनीकरण, अंगणवाडी भव्य असे स्मशान भूमीचे बांधकाम गणेश घाट, बौद्ध, आदिवासी समाजासाठी समाज मंदिरे बांधली आहे. गा्रमपंचायतीचे सुरेख ऑफीस बांधले आहे. शाळेसाठी ई-लर्निंग तसेच ऑनलाईन सेवा इत्यादी कामाची भर घातली आहे.

कृषी पुरस्कार शेतकरी शेती सोसायटीचे चेअरमन व समाजसेवक जगन्नाथ राऊत. सहकार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चेअरमन विश्वनाथ पाटील. उद्योजक भूपेश राऊत. विकास पाटील याच गावातील रहिवासी आहेत.

सा.पा.क्ष.स संघाचे माजी मुख्य चिटणीस, कृषी समितीचे अध्यक्ष त्रैमासिक वृत्तपत्रिका माजी संपादक दिनेश वासुदेव पाटील सो.पा.क्ष. संघाच्या महिला विकास समितीच्या अध्यक्ष दर्शना दिनेश पाटील माजी अध्यक्ष सरिता संजय राऊत मांडे गावातील रहिवाशी आहेत.

पर्यटनाबाबतीतील तेवढी सोय नाही समुद्र लांब आहे. शेजारी डोंगरी आहे. दर्शनासाठी म्हणून मुजबादेवीचे सुंदर रेखीव मंदीर आहे. एकंदरीत सफाळे स्टेशनाजवळील मांडे गाव बागाईत, शैक्षणिक निसर्गाने नटलेले आर्थिक बाबतीत पुढे असलेले असे सुंदर गाव आहे.