Villages Villages उमरोळी

आमचे गांव उमरोळी. उमरोळी हे गांव संपुर्ण गुणसंपन्न असुन सर्व सोईने नटलेले आहे. उमरोळी गावाच्या नावाची आख्याईका अशी सांगते की पुर्वी ह्या वस्तीवर भरपूर अशी उंबराची झाडे होती. म्हणून पुर्वीचे लोक ह्या वस्तीला 'उंबराची आळी' म्हणुन संबोधित असत. नंतर हळू हळू उंबराची आळी ला उमरोळी हे नाव पडले. अखेर उमरोळी हे गाव उदयास आले.

ह्या गावात एक मुख्य रस्ता (सडक) असुन तो पालघर व बोईसर ह्या मुख्य शहरांना जोडला गेला आहे. त्या मुळे दळण-वळणाला कुठलेही अडचण येत नाही. तसेच पश्चिम रेल्वेवरील ' उमरोळी रेल्वे स्थानक' हा ही मान उमरोळी गावाने पटकावला आहे. त्या मुळे कामावर जाणारे चाकर मानी व व्यवसायीक ह्याना सोईचे झाले आहे. तसेच उमरोळी गावाला पोहचण्याचे मार्ग उपलब्ध झाले आहेत.

उमरोळी हे गाव मध्यवर्ती असल्या मुळे येथिल आजू बाजूच्या शेजारील गावांना मोठी बाजार पेठ उपलब्ध असुन -1. दापोली 2. मोरेकुण 3. खोरकुण 4. कोळगाव 5. पंचाळी 6. आगवन 7. जांबुळ पाडा 8. निरवाडी 9. वाकोरे 10. पडघे 11. नंडोरे सदर ही ११ गावे उमरोळीला जोडली गेली आहेत.

उमरोळी गावात एकुण नऊ जातीचे (समाजाचे) लोक राहतात. 1. आगरी 2.वाडवळ 3. वैती 4. हरिजन 5. लोहार 6. बौद्ध 7. आदिवासी 8. कुंभार 9. वाणी इ. . भात शेती हा मुख्य व्यवसाय असून भात शेतीवर अवलंबुन न राहता जाती निहाय 1. वाडी करणे 2. ताडी करणे 3. वीट भट्टी 4. बांबुचे विणकाम 5. कोल्हापूरी चामडी चप्पल बनवणे 6 लोखंडी अवजारे बनविणे 7. दुग्ध व्यवसाय 8. . किराणा दुकाण चालविणे हे व्यवसाय करीत आहेत.

उमरोळी हे गाव खाडीला लागुन असल्यामुळे येथील हवामान दमट असते. तिन्ही ऋतु आपले काम चोख बजावत असतात. त्यामुळे उन्हाळी, पावसाळा व हिवाळा हे तिन्ही ऋतु अनुभवायला येतात. जवळच चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल औद्यागिक क्षेत्र (MIDC) तरूण व उच्च शिक्षिकांना एक वरदान ठरले आहे.

उमरोळी गावाची एकुण लोकसंख्या ५००० ते ६००० दरम्यान आहे.

ह्या गावात प्रत्येक समाजाचे समाज मंदिरे आहेत त्यामुळे छोटे व मोठे कार्यक्रम येथे भरवण्यात येतात तसेच येथे नऊ देवतांची मंदिरे आहेत.

 1. श्री ग्रामदेवता नाचण देवी मंदिर (गावदेवी)
 2. श्री हनुमान राम मंदिर
 3. श्री विठ्ठल रूखमाई मंदिर
 4. श्री साईबाबा मंदिर
 5. श्री परशुराम मंदिर
 6. श्री मोजाई माता मंदिर
 7. श्री कालिका माता मंदिर
 8. श्री कमला देवी मंदिर
 9. श्री शिव मंदिर
ग्राम देवता ही नवसाला पावणारी देवता असल्यामुळे गावातील व गावाबाहेरून लोक नवस फेडायला येतात हे मंदिर खाडीलगत असल्यामुळे संध्या काळी लोक फिरायला येत असतात त्यामुळे गाव देवी मंदिर हे एक आकर्षण बनले आहे.

उमरोळी गावात असे अनेक नावाजलेल्या व्यक्ती होऊन गेल्या आहेत. त्यांचे आजही उमरोळी गाव नेहमी स्मरण करत असते.

 1. कै. चिंतामण माहदेव राऊत – (वाडवळ समाज)
 2. कै. गोविंद महादेव राऊत - (वाडवळ समाज)
 3. कै. वासुदेव लक्ष्मण पाटील – (आगरी समाज)
 4. कै. नाना नारायण पाटील - (आगरी समाज)
 5. कै. विष्णु घरत – (आगरी समाज)
 6. कै. केशवे लालजी पाटील - (आगरी समाज)
 7. कै. तुकाराम (जोराकाका) लक्ष्मण पाटील (आगरी समाज)
 8. कै. मंगळदास शाहा – (गुजराती समाज)
 9. कै. कडुभाई शाहा - (गुजराती समाज)
 10. कै. देवजी पांडुरंग जाधव – (बौद्ध समाज)
 11. कै. मंगळ्या नवसू जाधव – (हरिजन समाज)
 12. कै. दामोदर (दामु पाटील) चिंतामण पाटील –(आगरी समाज)
 13. कै. भालचंद्र गोविंद राऊत – (वाडवळ समाज)
 14. कै. सोन्या गजानन पाटील – (वाडवळ समाज)
अशी ही थोर समाज सेवक मंडळी आमच्या उमरोळीला लाभलेली होती. त्यांचे आजही आम्ही स्मरण करत असतो.

इथे प्रत्येक सण व उस्तव साजरे केले जातात. गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. तसेच थोरांची जयंती साजरी केली जाते.

 1. डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती साजरी करून मोठी मिरवणूक काढली जाते.
 2. शिव जयंती सुद्धा ह्याच प्रमाणे साजरी केली जाते.
 3. तसेच प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशिला दिंडीचा काय्रक्रम आयोजित केला जातो सर्व पंचक्रोशीतील भक्त येथ दर्शनाला येत असतात.

उमरोळी हे गाव ग्राम पंचायत च्या मार्फत चालवले जाते. सरपंच हेच ह्या गावचे प्रथम नागरीक म्हणून मान मिळवतात. ह्या गावात ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत आहे. जुनी व नवी अश्या दोन ग्रामपंचायत इमारत असून गावात प्राथमिक व माध्यमिक अश्या दोन शाळा आहेत. इयत्त १ ली ते १० वी पर्यंत मोफत शिक्षण घेता येते. त्यामुळे गावातील सर्व नागरीक १००% सुशिक्षित आहेत.

गावातील सुख सुविधा:

 1. १९६५ पासुन २४ तास विज पुरवठा
 2. १९६५ पासुन स्वतंत्र नळ योजना आता २६ गाव पाणी पुरवठा ह्या योजनेतून रोज पिण्याच पाणी उपलब्ध असते
 3. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा
 4. गावत दोन बँक ची सुविधा व ATM केंद्र
 5. गावात दोन सार्वजनिक शेतकरी पत-पेढ्या कार्यरत
 6. इतर कोणत्याही गावाला जाण्यासाठी उमरोळीहून एस.टी. महामंडळीची बस सेवा
 7. सरकारी दवाखाना
 8. खेळण्यासाठी साईग्राम क्रिकेट मैदान
 9. व्यायम शाळा
 10. हॉटेल व्यवसायातुन उत्तम जेवणाची व राहण्याची सोय
 11. स्वतंत्र दवाखाने - ३
 12. सुसज्ज असे मासळी व भाजी मार्केट
 13. संध्याकाळी खाडी भागात पर्यटन (मॉर्निग वॉक)
 14. उमरोळी रेल्वे स्टेशन
 15. सर्वांन महत्त्वाचे म्हणजे ह्या गावात संकटावेळी संपुर्ण गाव एकत्र येवुन संकटावर मात करतात (गावाची एकी)

जय हिंद – जय – भारत – जय – उमरोळी