Villages
सालवड
हाल्या वाडवळाचे हे छोटेखानी गाव! पूर्वाश्रमीचे टिवराळे हे या गावाचे नाव. साथीच्या रोगाने पछाडलेल्या काही लोकांनी
आपले प्राण गमावले तर काही नजिकच्या गावात स्थायिक झाले. कालांतराने वडिल साथीच्या आजारात दगावल्यावर
आईसोबत माहीम गावात निवास करणाऱ्या हाल्याने आपल्या मूळ गावचा शोध घेतला. गावचे प्रमूख असणाऱ्या वडिलांच्या
आलीशान वाडयाचे भग्नावशेष जोडून नवे घरच नव्हे तर गाव वसवले. हाल्या वाडवळाचे हेगाव पुढे हालवड व नंतर सालवड या
नावाने प्रसिद्धीस आले.
१७७२ साली या गावात MIDC चा प्रवेश झाला. आणि गावाचाही नूर पालटला. गावात पक्का रस्ता झाला. शेती सोबत
जवळच्या कारखान्यात लोक काम करू लागले.हळूहळू शेती व्यवसाय दुरावला. अनेक लोकांनी स्वतःचे व्यवसाय उभारले.
गावात पहिला किराणा मालाचा व्यवसाय श्री. अनंत राऊत यांनी केला. यानंतर गावाने अनेक सुखद वाळणे घेतली. गावातील
अनेक लोकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. पूर्वी शेती सोबत दुग्धव्यवसाय होता. आता अनेक कारखाने व विविध उदयोग
धंदयानी ह्या गावाचा कायापालट झाला.
गावात चौथी पर्यंतच शाळा होती म्हणून अनेकांना पुढे शिकता आले नाही. आज याही बाबत गाव पुढे आहे गावात सातवी पर्यंत
शाळा आहे. अवघ्या ३ किमी वर असणाऱ्या बोईसर चिञालय परिसरात आज नामांकित शाळा महाविद्यालये झाली. आणि
गावात मुले डॉक्टर, इंजिनिअर्स झाली.
सामाजिक विकासातही गाव अग्रगण्य आहे. सरपंच, उपसरपंच ते पंचायत समिती पर्यंत गावातील मंडळींनी मजल मारली आहे
व अनेक तरूण विविध पक्षांचे कार्य निःस्वार्थभावाने करत आहे. महिला बचत गट आज प्रभावीपणे कार्यरत आहे. निवृत्त लोकांनी
ही आपली संस्था उभारली आहे.
आज गाव कुठेच कमी नाही. पूर्वी सालवड गावात मुलगी देण्यास मुलींचे वडील कचरत. आज मुली सांगून येत असतात.
गावातील गर्हाडीची वाट लुप्तच झाली आज सिमेंट काँक्रिटचे रस्ते आणि इमारती दिमाखात उभ्या आहेत. गावात वाडवळ,
भंडारी व आदिवासी या जाती कोणताही भेदभाव न ठेवता गुण्यागोविंदाने राहत आहेत. रोटुबेटी व्यवहारही यांत निषिद्ध नाही.
एकंदरीत इतर गावांपेक्षा कमी कालावधीत गावाने कात टाकली आहे. व एक नवे सहजसुंदर रूप धारण केले आहे. भविष्यात या
गावाचे अत्याधुनिक शहराचे स्वरूप नक्कीच येऊ शकेल आणि तो सुवर्ण दिवस या गावासाठी आता दूर नाही.