Culture & Tradition Culture & Tradition देवशयनी (आषाढी) एकादशी  (महिना : आषाढ)

Aashadhi-Ekadashi

हिंदु सौरवर्ष चतुर्थमास आषाढ़ महिन्यात पहिल्या पंधरवड्यात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. महाराष्ट्र आणि आजुबाजुच्या राज्यातील लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपुर येथील श्री पांडुरंगाच्या जत्रेचा दिवस .ह्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातुन लाखो वारकरी आपल्या देवाला वारीच्या माध्यमातून भेटण्यासाठी येतात.१००-२०० कि.मी. पर्यंतचा हा त्यांचा पायी प्रवास हा शिस्तप्रियतेचा एक अनोखा धडा असतो. एव्हडया मोठ्या संख्येने येवून सुद्धा कुठेही शिस्त मोडली जात नाही, कसलीही दंगल नाही, कुणाबद्दल तक्रार नाही. मुखी विठुरायाचे नाव घेत आबालवृद्ध वारकरी मंडळी आपला मार्ग आक्रमित चालत असते. पांडुरंगाच्या भेटीचा एकच ध्यास असतो.

आषाढ़ महीना असल्याने पाऊस सुरु असतो तरीही त्याची पर्वा न करता दिंडी चालत असते. ह्या इव्हेंटचे आकर्षण परदेशी पर्यटकानाही असते. अनेक परदेशी पर्यटक ह्या दिन्डित सामिल होता यावे म्हणून त्याच दरम्यान दरवर्षी भारतात येतात.असे म्हणतात की ह्या दिवसापासुन संपुर्ण चार महीने देव शयनकरतात (झोपतात). म्हणुन त्यांच्या भेटीसाठी प्रत्येक वारकरी धडपडत असतो.

झोपलेले देव पुन्हा चार महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी उठतात. त्यासाठी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे चार महीने संपूर्ण चातुर्मास पाळला जातो. ह्या चार महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात जसे की पोथीवाचन, ग्रंथपारायण श्रीसत्यनारायण पूजा, वेगवेगल्या ठिकाणची देवदर्शन. असा हा भाविकांच्या जिव्हाळ्याचा सोहळा हिंदुसंस्कृतिचा मानबिंदु आहे. आपल्या शेजारील कर्नाटक राज्यातील पांडुरंगाच्या भक्तांनी तर त्याला "कानडाऊ विठ्ठलु" असे संबोधले आहे. "भेटीलागे जिवा लागलीसे आस", "कानडा राजा पंढरिचा", "पंढरीनाथा झडकरी आता", "पंढरी सोडुन चला विनविते रखुमाई विठ्ठला", किंवा "माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी", अशा अनेक भक्तिगीतांनी आपणास विठ्ठल भेटीची प्रचिती येते.