Culture & Tradition
दिव्याची अवस - दीप अमावस्या (महिना : आषाढ़)
आषाढ़ महिन्याचा शेवटचा दिवस. हा दिवस दिव्याची अवस म्हणजेच दिप अमावस्या म्हणुन ओळखला जातो. आषाढ़ संपुन श्रावण महिन्याची सुरुवात होण्याचे संकेत देणारा हा दिवस सण नसला तरी हिंदु संस्कृतीत अग्निला देवतेचा दर्जा दिलेला आहे. ह्याच अग्निदेवाची पूजा दिव्यांच्या माध्यमातून केली जाते. आपल्या भागात पणत्यांची पुजा करून त्या उजळवुन घराच्या चारही कोपऱ्यात अश्या पद्धतीने ठेवल्या जातात की संपूर्ण घर प्रकाशमान झाले पाहिजे.
घरातील प्रमुख पुरुषाने आपल्या अर्धांगिनी सोबत अग्निदेवाला आवाहन करायचे असते की सर्वांवर कृपा कर, कुणालाही तुझ्या कोपाचे धनी होवू देवू नकोस.
सर्वत्र प्रकाश दे. सर्वांचे जीवन उजलुन दे. ह्याच दिवसाला आपल्याकड़े गटारी अमावस्या असेही म्हणतात. हिंदुधर्मात श्रावण महिन्यात बहुतेक लोक मांसाहार मद्यपान करीत नाहीत. ते ह्या दिवशी सहकुटुंब सामिष भोजन करतात.