Culture & Tradition
बैल पोळा (महिना : श्रावण)
श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरीला महाराष्ट्राच्या अनेक भागात शेतकरी मोठ्या उत्साहात पोळा साजरा करतात. त्यांच्यासाठी तो एक महत्वाचा सण असतो. पावसाळ्यात पुर्वीपासुन शेतीचे काम करणाऱ्या बैलांना सजवुन त्यांची पुजा केली जाते. त्यांना गोडधोड पक्वान्न खाऊ घातली जातात. गावातील सर्व बैलांची वाजत गाजत ढोल ताश्यांच्या निनादात मिरवणुक काढली जाते. ह्या दिवशी त्यांना पूर्ण आराम दिला जातो. कोणतेही काम त्यांच्याकडुन करवुन घेतले जात नाही. वर्षभर शेतीकामात आपल्याला निःस्वार्थ सेवा आणि साथ देणाऱ्या वृषभराजाप्रति व्यक्त केलेली ही एक प्रकारची कृतज्ञताच असावी. कर्नाटकात हा सण बेंदुर म्हणुन साजरा करतात. आपल्याकडे पोळ्याच्या दिवशी साजरा न करता कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा---बलिप्रतिपदा).
ह्या दिवशी संपूर्ण पशुधनाला सजवुन घरातील यजमानीण औक्षण करते.
नंतर बलीप्रज्वलित करून प्रज्वलित अग्निची दाहकता कमी झाली की सर्व पशुधन त्यावरून उल्ल्लंघित केले जाते. ह्या मागे ही भावना असते की पावसाळयात गुरांच्या अंगावर गोचिड, गोमाशी असे रक्तपिपासु प्राणी त्यांचे रक्त शोषत चिकटून बसलेले असतात. आगीच्या धगिने आणि धुराने त्या गळुन पडतात आणि गुरांची त्यांच्या जाचातुन सुटका होते. आपल्या भागात केळवे माहिम भागात पोळ्याच्या दिवशी हा सण होतो असे ऐकिवात आहे.