Culture & Tradition Culture & Tradition दसरा - विजयादशमी (भाग पहिला)  (महिना : अश्विन)

Dasra

आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रिचे घट बसतात. खंडे नवमीला देव उठतात आणि हसत खेळत येतो दसरा. देविने महिषासुराचा वध केला तो हा। दिवस, श्रीरामाने रावणाचा वध केला तो हा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध दशमी. ह्याला विजयादशमी असेही नाव आहे.मराठे ,राजपूत युद्धावर जाताना हाच दिवस मुक्रर करायचे. त्यामागे विजय मिळतोच ही भावना होती. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा आहे. पूर्वी वरतंतु नावाच्या ऋशिंच्या आश्रमात कौत्स नावाचा त्यांचा आवडता शिष्य होता. विद्याकाळ पुर्ण झाल्याने त्याला गुरुदक्षिणा द्यायची होती त्याने गुरुना तसे सांगितले. वरतंतु नि:संग होते पण शिष्याची परीक्षा पहावी म्हणुन ते म्हणाले मला पंचवीस हजार सुवर्णमुद्रा दे. कौत्साला हे शक्य नव्हते. तो त्या कालातील दानशूर राजा रघुकड़े गेला व त्याच्या कड़े सुवर्णमुद्रा मागितल्या.रघुराजाने आधीच सर्व संपत्ति दान केलि होती. दारी आलेला याचक परत जावू नये म्हणून राजाने कुबेराकड़े मागणी केली .

परंतु कुबेराने नकार दिला. राजाने कौत्साला तीन दिवसानी येण्यास सांगितले. तो फार शुर राजा होता.त्याने स्वर्गावर स्वारी करण्याची तयारी केलि. ही गोष्ट इन्द्राला कळली घाबरून त्याने कुबेराला आज्ञा केलि की अगणित सुवर्णमुद्रा रघुराजाच्या राजधानित रात्रीच टाकुन दे कुबेराने नवमीच्या रात्रि ।सुवर्णमुद्रा ओतल्या त्या एका। आपटयाच्या झाड़ावर पडल्या. सकाळी दुताने राजाला ही वार्ता सांगितली राजा स्व:त आला आणि त्याने कौत्साला सांगितले की ह्या सर्वमुद्रा घेवुन जा, पण कौत्साने त्याला हव्या तेव्हडयाच सुवर्णमुद्रा घेतल्या. तरीही अगणित मुद्रा शिल्लक राहिल्या. राजाने त्या आपल्या प्रजेला वाटुन टाकल्या. तो दिवस होता विजयाद्श्मिचा. सुवर्णमुद्रा आपटयाच्या झाडावर पडल्या म्हणुन तेव्हापासून आपटयाची पाने सोन्याचे प्रतीक म्हणुन वाटली जातात.

अठरा हातात वेगवेगळी शस्रे घेवुन महिषासुरा सोबत युद्ध सुरु केले. तो दिवस आश्विन शुद्ध प्रतिपदेचा होता.

सतत नऊ दिवस युद्ध केल्यानंतर दैत्य देवीला शरण आला. आणि तिन्ही लोक निर्भय झाले. तेव्हापासुन देवीला महिषासुर मर्दिनी असे नाव पडले. मुळ बंगाली लोकांचा असलेला दुर्गापूजेचा हा सण लोकांनी नवरात्रौत्सव म्हणुन प्रचलित केला. मात्र आज मुंबईत सर्वाधिक मोठ्या प्रमाणात हा इवेंट म्हणुन साजरा होतो, यामागे अर्थकारण जास्त आणि समाजकारण मात्र कमी असते. तरीही दांडीया आणि रासगरबा ह्या मुळे रसिकजन ह्या उत्सवाकड़े मोठ्या प्रमाणात ओढला जातो.